Wednesday, 8 January 2014

बऊठाकुरानीर हाट

चंद्रद्वीपचे राजे रामचंद्रराय त्यांच्या राजकक्षात बसले होते. अष्टकोनी महाल. त्याच्या छपराच्या कडीपाटाच्या वाशावरून कापडी झालर झुलत होती. भिंतीतल्या कोनाड्यांपैकी एकात गणपतीची आणि बाकीच्यांमध्ये श्रीकृष्णाच्या आगळ्या रूपातील निरनिराळ्या प्रतिमा स्थापन केलेल्या होत्या. विख्यात मूर्तिकार बटकृष्ण वुंâभकार यांच्या हस्ते या सर्व प्रतिमा घडविलेल्या होत्या. दालनांमध्ये चहूबाजूंनी जाजमे पसरलेली होती. मधोमध जरीजडित मखमलीची गादी, तिच्या चारी कोपNयांना जरीची झालर होती. गादीवर तक्क्याला टेवूâन राजे विराजमान झाले होते. चोहोबाजूंच्या भिंतींना देशी आरसे लटकवलेले होते. त्यांतून प्रतिमा काही अचूक अन् योग्य दिसत नव्हती. राजाच्या चहूबाजूंना जी माणसे होती, तीही राजाची प्रतिमा काही हुबेहूब दाखवीत नव्हती. या काचेच्या आणि मानवी आरशांत राजाची प्रतिमा प्रमाणापेक्षा मोठी दिसे. राजाच्या डाव्या बाजूला एक प्रचंड गुडगुडी आणि मंत्री हरिशंकर; तर राजाच्या उजवीकडे रमाई भांड आणि चष्माधारी सेनापती फर्नांडिस असा थाट होता.

राजे म्हणाले, ‘‘अरे रमाई!’’

रमाई म्हणाला, ‘‘आज्ञा महाराज!’’

राजा हसता-हसता लोळू लागला. मंत्री राजापेक्षा जास्त हसले. तसे फर्नांडिस टाळी पिटून हसू लागले. रमाईचे डोळे आनंदाने लकलवूâ लागले. राजाला वाटे, `रमाईच्या बोलण्यावर हसले नाही, तर त्यात अरसिकता दिसेल'; मंत्र्यांना वाटे, `राजा हसल्यावर आपण हसणे, हे आपले कर्तव्यच!' फर्नांडिसला वाटे, ‘हसण्यासारखे
नक्कीच काहीतरी आहे. त्याखेरीज रमाईच्या बोलण्यावर जर एखादा कमनशिबी माणूस चुवूâनमावूâन हसला नाही, तर रमाई त्याला रडवून सोडे. एरवी रमाईचे शिळे विनोद ऐवूâन फारच थोडे लोक आनंदाने हसत. पण भीती आणि कर्तव्यबुद्धीमुळे सगळ्यांनाच खोटे का होईना, अतोनात हसू पुâटे. राजापासून ते  रपालापर्यंत!

राजाने प्रश्न केला, ‘‘काय खबर मग?’’

रमाईला वाटले, `आता विनोदी बोलणे आवश्यक आहे.'

‘‘सेनापती महाशयांच्या घरी चोर आला होता म्हणे, असे पुष्कळदा ऐकले!’’ सेनापती महाशय ते ऐवूâन अस्वस्थ झाले. एक जुनापुराणा किस्सा त्यांच्या नावे खपवण्याचा प्रयत्न चालला आहे, हे त्यांच्या लक्षात आले. रमाईच्या विनोदाला ते जसजसे घाबरत, तसतसा रमाई प्रत्येक वेळी त्यांनाच जाळ्यात पकडे. या सगळ्या प्रकाराने राजाला अतीव आनंद होई. रमाई आल्याबरोबर ते फर्नांडिसला बोलावणे धाडीत.

राजाच्या आयुष्यात दोन प्रमुख आनंद-विषय होते; एक – मेंढ्यांची टक्कर पाहणे आणि दुसरा – फर्नांडिसला रमाईच्या तोंडी देणे. राजाच्या चाकरीत प्रवेश केल्यापासून सेनापतीच्या अंगावर एक शिंतोडा उडाला नव्हता विंâवा बाणाचा जरासा धक्काही लागला नव्हता, पण दरबारात सतत त्याच्या नावे हास्याचे गोळे फोडल्याने फर्नांडिस आता रडवेला होत आला होता. राजाने हसून-हसून ओले झालेले डोळे टिपत प्रश्न केला, ‘‘मग?’’

‘‘निवेदन करतो महाराज. (फर्नांडिस त्यांच्या कुत्र्याची बटणे सोडू लागले व तो अंगात घालू लागले.) तीन-चार दिवसांपासून सेनापती महाशयांच्या घरी रात्री चोर ये-जा करीत होता. साहेबांच्या सौभाग्यवतींना  मजल्यावर त्यांनी यजमानांना पुष्कळ हलवले, परंतु काही केल्या यजमानांची झोपमोड त्या करू शकल्या नाहीत.’’

राजानं प्रतिसाद दिला– ‘‘हा: हा: हा: हा:!’’ 

मंत्री – ‘‘हो: हो हो हो हो हो!’’

सेनापती – ‘‘हि: हि!’’

‘‘दिवसभरातील गृहिणीचा तगादा सहन न होऊन हात जोडून यजमान म्हणाले, `दया कर माझ्यावर, आज रात्री नक्की चोराला पकडतो.'’ रात्री दोन प्रहर वेळेला सौभाग्यवती म्हणाल्या, ‘`अहो, चोर आलाय.’' यजमान म्हणाले, `‘अगं, खोलीत दिवा आहे. चोराला मी दिसेन आणि मी दिसल्याबरोबर तो पळून जाईल.’' चोराला
हाक मारून ते म्हणाले, `‘आज वाचलास बरे तू! खोलीत उजेड आहे. आज खुशाल पळून जाऊ शकशील. उद्या येऊन दाखव. अंधारात तुला कसा धरतो ते बघ!’’

राजा – ‘‘हा हा हा हा!’’

मंत्री – ‘‘हो हो हो हो हो!’’

सेनापती – ‘‘ही: ही:’’

राजा म्हणाला, ‘‘मग पुढे?’’

रमाईने जाणले, अजूनही राजाची तृप्ती झालेली नाही. त्याने गोष्ट पुढे सुरू ठेवली. ‘‘पण चोराला फारशी भीती वाटली नाही. त्यानंतरच्या रात्रीही तो खोलीत आला. गृहिणी म्हणाली, `‘सर्वनाश झाला, उठा!'’ गृहस्थ म्हणाले, `‘तू उठ ना.’' 

गृहिणी म्हणाली, `‘मी उठून काय करू?’' गृहस्थ म्हणाले, `‘अगं, खोलीत एखादा दिवा तरी लाव. काहीच दिसत नाहीये.’' गृहिणी भयंकर रागावली. गृहस्थ त्याहून अधिक रागवून म्हणाले, ‘`बघ बरे, तुझ्यामुळेच सर्वस्व गेले. दिवा लाव, बंदूक आण.’' मध्यंतरीच्या काळात चोर आपले चोरीचे कामकाज आटपून म्हणाला, `‘महाशय, एक चिलीम भरून देता का? फार श्रम झालेत.'’ गृहस्थ भयंकर भडवूâन म्हणाले, ‘`थांब बेटा. मी चिलीम भरून देतो, परंतु माझ्या जवळ आलास, तर या बंदुकीने तुझे मुंडके उडवून देईन.'’ चिलीम ओढून झाल्यावर चोर म्हणाला, `‘महाशय, जरा दिवा लावलात तर उपकार होतील. पहार कुठे पडून गेलीये, सापडत नाहीये.'’ सेनापती म्हणाले, ‘`बेटा घाबरलेला दिसतोय. दूर राहा, जवळ येऊ नकोस.'’ मग त्यांनी गडबडीने दिवा लावला. चोरीचा माल बांधून चोर निघून गेला. गृहिणीला गृहस्थ म्हणाले, `‘बेटा भयंकर घाबरलाय!’’

राजा आणि मंत्र्यांना हसू आवरेना. फर्नांडिस थांबून-थांबून मध्येमध्ये ‘ही ही’ असे ओढून-ताणून बळे-बळे हसू लागले. 

महाराज म्हणाले, ‘‘रमाई, मी सासुरवाडीला जातोय, ऐकलेस का?’’ रमाई तोंड वाकडे करीत म्हणाला, ‘‘असारम् खलु संसारम्, सारम् श्वशुरमंदिरम् (हशा – प्रथम राजा, मग मंत्री, मग सेनापती.) गोष्ट खोटी नव्हे. (दीर्घ नि:श्वास सोडून) सासुरवाडीचे सगळेकाही सुरस! आहार, मानसन्मान; दुधावरची साय मिळते. माशाचं डोकेङ मिळते; सगळेकाही सरस! फक्त सर्वांत नीरस म्हणजे पत्नी!’’

No comments:

Post a Comment