सासवड येथे नुकत्याच पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनाला मराठी रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. मेहता पब्लिशिंग हाऊसच्या पुस्तकांचे प्रदर्शन येथे भरवण्यात आले होते.
ऐतिहासिक पुस्तके, अनुवादित सत्यकथा, कथा-कादंबNया, गूढकथा, विज्ञानविषयक गोष्टी ,व्यक्तिमत्व विकसनावर आधारित अनेक पुस्तके एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्यामुळे वाचकांच्या चेहNयावर ग्रंथ खरेदीसाठी उत्साह दिसत होता. व.पु. काळे, रणजित देसाई, वि.स. खांडेकर यांसारख्या सुप्रसिद्ध मराठी लेखकांची गाजलेली पुस्तके आकर्षक किमतीत उपलब्ध होत असल्याने हे प्रदर्शन ग्रंथप्रेमींसाठी पर्वणीच ठरले.
आम्ही प्रकाशित केलेल्या शिवाजी सावंत यांच्या ‘मृत्युंजय', `छावा', `युगंधर' या नवीन स्वरूपातील पुस्तकांना त्यांच्या आकर्षक पुठ्ठाबांधणीमुळे प्रचंड मागणी होतीच पण त्याचबरोबर दाऊद अणि समकालीन वाढत्या गुन्हगारीचे चित्रण करणारी `डोंगरी ते दुबई' ही अशोक पाध्ये अनुवादित सत्यकथा खरेदी करण्याकडे लोकांचा कल दिसून येत होता. व्यक्तिमत्व विकसनावर आधारित असलेले स्वाती लोढा यांचे `चला उठा कामाला लागा', आर. डी. मुनोत यांचे `चिंतामुक्त जीवन' तसेच शं. व्यं. काश्यपे यांचे `मुलांवरचे संस्कार' ही पुस्तके घेण्यासाठीहीr वाचकांची झुंबड उडाली होती. सचिन पिळगांवकर यांच्या रंगभूमीवरील सुवर्णमहोत्सवी कारकीर्दीवर आधारित `हाच माझा मार्ग' या आत्मकथनाला सचिनच्या चाहत्यांनी भरभरून दाद दिली.
वाचकांंना अशा प्रकारचे मनोरंजक व दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू. ग्रंथप्रदर्शनातील वाचकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता भविष्यात अशी अनेक प्रदर्शने आमच्यातर्पेâही भरविण्याचा आमचा मानस आहे.
---
ऋचा बाक्रे
पी. आर.
मेहता पब्लिशिंग हाउस
No comments:
Post a Comment