Monday, 20 January 2014

मेहता पब्लिशिंग हाऊसचे भारत फोर्ज, बारामती येथे ग्रंथप्रदर्शन


‘आपल्या स्नेहीजनांना पुस्तके भेट द्या.’ या नव्या संकल्पनेला बारामतीकरांंपर्यंत पोहोचवण्यासाठी मेहता पब्लिशिंग हाऊस ने भारत फोर्ज, बारामती शाखा यांच्या सहयोगाने दोन दिवसांच्या ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन केले आहे. दि. १७ व १८ जानेवारी,२०१४ या कालावधीत भरवण्यात आलेल्या या ग्रंथप्रदर्शनात मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने प्रकशित करण्यात आलेली अनेक ऐतिहासिक, आत्मकथनपर, वैचारिक, मनोरंजक अशी विविध विषयांवर आधारित अनेक पुस्तके एकाच ठिकाणी पाहण्याची व खरेदी करण्याची सुवर्णसंधी बारामतीकरांना मिळणार आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन भारत फोर्ज च्या बारामती शाखेचे उपाध्यक्ष नितीन महाजन यांनी केले. ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी बारामतीमध्ये वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी मेहता पब्लिशिंग हाऊसने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. ‘समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी, भारत फोर्जच्याच सदस्यांपासून सुरुवात करू’ अशीr घोषणा त्यांनी याप्रसंगी केली. ‘भारत फोर्ज च्या टीम मधील सर्व सदस्य सहकुटुंब या प्रदर्शनाला भेट देतील व वाचनाची आवड कुटुंबातील आबालवृद्धांमध्ये निर्माण करतील अशी ग्वाही त्यांनी सर्वांतर्पेâ दिली’.

आम्ही हाती घेतलेल्या या उपक्रमाला सक्रिय पाठिंबा दिल्याबद्दल माननीय नितीनजी, एस. बी. पाटील, महेश जाधव, पुणे टीमचे प्रशांत ढवळे,एस.व्ही. भावे आणि भारत फोर्ज च्या संपूर्ण टीमचे मन:पूर्वक आभार!


---
ऋचा बाक्रे
 

No comments:

Post a Comment