Thursday, 13 March 2014

द रोड ऑफ लॉस्ट इनोसन्स

जून १९९८मध्ये आम्ही हे तॉम दाय आसराघर बांधत असतानाच मला `प्रिन्स ऑव्ह अस्टुरिया' हे पारितोषिक मिळालं. तो फोन पिएरनं घेतला. त्यानं मला सांगितलं की, स्पेनच्या युवराजाने मानवतावादी मूल्यांचा प्रसार करण्याच्या कामाबद्दल एका खास पारितोषिकासाठी माझी निवड केली आहे. आम्हा दोघांपैकी कोणीही या
पारितोषिकाविषयी या आधी ऐकलेलंही नव्हतं आणि त्या लोकांना आमची माहिती कशी कळली हेही आम्हाला उलगडत नव्हतं. पण लौकरच आम्हाला कळून आलं की, हे एक फार मोठ्या प्रतिष्ठेचं पारितोषिक आहे आणि त्या पारितोषिकाबरोबर आमच्या स्वप्नातही कधी न आलेली ५० लक्ष पेसेटाज म्हणजे सुमारे ४०,०००
डॉलर्स एवढी रक्कमही आहे.

हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी आम्ही स्पेनला गेलो. पाच वर्षांची अदनाही आमच्याबरोबर होती. मिंगची शाळा सुरू होती आणि माझ्या दत्तक आईने आमच्या गैरहजेरीत तिची काळजी घ्यायचं मान्य केलं होतं. आम्ही पहिल्या वर्गाने प्रवास केला. याआधी मी असा प्रवास कधीच केला नव्हता. माझ्या लक्षात आलं की
पहिल्या वर्गाने प्रवास करीत असलात तर तुम्हाला राजेशाही वागणूक मिळते. आम्ही पूर्वीसारखेच सामान्य आणि गरीब दिसत होतो तरी आम्हालाही राजासारखंच वागवण्यात आलं. आम्ही अस्टुरियास या स्पॅनिश संस्थानाच्या राजधानीच्या शहरात, ओविएदोला पोहोचलो तेव्हा मला सांगण्यात आलं की, त्या रात्री मला भाषण करावं लागणार आहे. मी काहीच तयारी केलेली नव्हती आणि बुद्धिवंतांची िंकवा कोणत्याही
व्यवाqस्थत कपडे घातलेल्या लोकांच्या सभेची मला नेहमीच भयंकर भीती वाटत आलेली आहे.

एका मोठ्या खूप प्रशस्त अशा सभागृहामध्ये आमचं स्वागत करण्यात आलं. तिथे दूरचित्रवाणीची अनेक पथकं आपल्या सर्व सामग्रीसह हजर होती. स्पेनच्या राजपुत्राने आमची ओळख करून दिली. माझ्या शेजारी उभी असलेली सुंदर स्त्री म्हणजे ग्राका माचेल ही नेल्सन मंडेला यांची पत्नी होती. ती स्वत:ही एक अतिशय
थोर आणि सज्जन स्त्री आहे. माझ्या पाठीमागे रिगोबेर्ता मेन्शू उभ्या होत्या. ग्वाटेमालामधील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना याआधीच नोबेल शांतता पारितोषिक मिळालेलं होतं. माझ्यासारख्या अडाणी बाईनंही त्यांच्याविषयी ऐकलेलं होतं. एम्मा बोनिनोही तिथे होत्या. त्यांनी माझ्याकडे पाहून हात हलवला आणि उत्तेजनपर असं एक ाqस्मतही केलं. स्त्रिया आणि मुलं यांच्या हक्कांसाठी काम करणाNया एवूâण
आठ ध्Eिायांना हे पारितोषिक देण्यात येणार होतं.

मला अगदी लहान, नगण्य असं  वाटायला लागलं. मी इतकी अस्वस्थ झाले होते की, राजपुत्र काय म्हणताहेत हेही मला नीटसं कळत नव्हतं. पण जे काही कळत होतं ते फार हेलावून टाकणारं होतं. ते जगातल्या इतर भागांमध्ये आqस्तत्वात असलेल्या भयानक क्रौर्याविषयी, स्त्रिया आणि मुलं यांना भोगाव्या लागणाNया अमानुष वागणुकीविषयी पाश्चात्य देशांमध्ये असलेल्या कमालीच्या उदासीनतेबद्दल बोलत होते. भाषण करण्याची माझी पाळी आली तेव्हा मी सरळ डोळे मिटून घेतले आणि कंबोडियामधल्या ध्Eिायांच्या
परिाqस्थतीबद्दल बोलायला सुरुवात केली.

मी माझ्या स्वत:च्या आयुष्याविषयी बोलले, तशीच कुंटणखान्यांमध्ये गुलामीचं आयुष्य जगत असलेल्या मुलींविषयीही बोलले. त्यांना किती वाईट वागवलं जातं, त्यांना कोणत्या थराच्या िंहसेला तोंड द्यावं लागतं, हे सांगितलं. मी म्हटलं, ‘लोक कंबोडियन मुलींच्या गोडशा ाqस्मताबद्दल बोलतात, पण ते हसू खरं नसतं.'
एवढ्या मोठ्या सभेसमोर मी इतका वेळ बोलू शकेन याची मला स्वत:लाच कल्पना नव्हती. माझं बोलणं संपलं आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. हळूहळू सभागृहात प्रकाश वाढला आणि श्रोत्यांमधल्या अनेक जणांच्या डोळ्यांतले अश्रू मला दिसले. मला अगदी थवूâन गेल्यासारखं वाटत होतं, पण आज काहीतरी
महत्त्वाचं साध्य केल्याचं समाधानही मला वाटत होतं. त्यानंतर दूरचित्रवाणीच्या प्रतिनिधींना माझी मुलाखत घ्यायची होती. खूप गर्दी होती. पण ग्राका माचेलनं त्यांना नंतर यायला सांगितलं. मी किती भावुक झाले होते हे तिला आणि एम्मा बोनिनोला स्पष्ट दिसत होतं. त्या मला माझ्या हॉटेलवर घेऊन गेल्या. माझी मुलगी तिथे दोन तास झोपली आणि उरलेली रात्र रडत होती. तिला थोपटत मी रात्रभर जागीच होते.

1 comment:

  1. परंतु थोड Realistic असत तर अजून छान वाटल असत.

    ReplyDelete