Thursday, 27 February 2014

तप्तपदी

वूâपेत हवा तो एकांत मिळाला. लग्न झाल्याबरोबर जी पहिलीवहिली संधी मिळते त्या क्षणी जे जे होतं, ते ते सगळं प्रणयाराधन झालं. स्पर्शाने मोह पुâटला. सौरभ बेभान झालाच होता तरीही सावध असावा. सुजाताचं मन आता तिच्या कह्यात नाही, ह्या जाणिवेने तो सुखावला. बाईसुद्धा पुरुषासाठी पागल होते हे दर्शन गौरवास्पद होतं. पण नो, नॉट नाऊ. 

तिने तो दगड का घेतला हे काढून घ्यायचं.

रतिसुखापेक्षाही अहंकार श्रेष्ठ.

तिच्या पापण्यांचं चुंबन घेत, ओठांतल्या ओठांत पुटपुटत सौरभने विचारलं, ‘‘एक विचारू?’’
‘‘हूं.’’
‘‘तू संपूर्ण माझी ना?’’
ती जास्त बिलगली.
‘‘आपण एकमेकांपासून कध्धी काही लपवायचं नाही.’’
‘‘हूं.’’
‘‘सगळं सांगायचं.’’
‘‘हं!’’
‘‘तो दगड कशासाठी घेतलास ते सांग.’’
‘‘अगदी ह्या क्षणी तुमच्या डोक्यात दगडाचा विचार आहे?’’

सुजाताला थोडंसं लांब करीत सौरभ तिच्याकडे पाहत राहिला. वूâपेतला मंद, निळसर दिव्याचा प्रकाश आता तिच्या चेहNयावर पडला होता. सुजाताच्या गोNयापान अंगकांतीवर निळा जिलेटिनचा कागद लावल्याचा सौरभला भास झाला. त्या अंधुक प्रकाशात तिचे मोकळे सोडलेले केस जास्तच काळे दिसत होते. त्या केसांकडे पाहत तो म्हणाला, 

‘‘तुझ्या-माझ्यात काही खासगी असता कामा नये.’’

प्रसंगातून पळवाट शोधायची म्हणून सुजाता म्हणाली, ‘‘सगळं सांगेन. आता ह्या क्षणी हा विषय कशाला?’’
हातातल्या पिशवीकडे पाहत सासूबार्इंनी आठ्या घालत विचारलं, ‘‘तो दगड आहेच का अजून?’’
सुजाता गप्प बसली. हातातला तुकडा दोघांवरून उतरवून टाकीत सासू सौरभला म्हणाली, ‘‘गाडीतून पेâवूâन द्यायचा तो जाताना.’’

‘‘मला तो विषय नकोय आल्या-आल्या.’’

चार दिवसांच्या वास्तव्यात, सगळ्या आनंदसोहळ्यात सौरभने अनेकदा तो विषय काढला. सुजाताने काही सांगितलं नाही. सुजाताचं लक्ष नसेल असं समजून सासूबार्इंनी पुन्हा तो विषय काढलाच. सौरभ वैतागून म्हणाला, ‘‘जाम पत्ता लागून देत नाही.’’ ‘‘तिला केव्हा तरी ते सांगावंच लागेल. ह्या घरी नांदायचं आहे आयुष्यभर, हे तिने लक्षात ठेवावं.’’

‘ह्या गुरुवारी तुझ्या विवाहाला दहा वर्षं पूर्ण होतात. शब्द दिला त्याप्रमाणे मी भेटावयास येत आहे. सगळ्यांना नमस्कार.’ - नित्यानंद गोसावी.

एका साध्या पोस्टकार्डावर एवढाच मजवूâर. आपल्या लग्नाचा वाढदिवस? आपण विसरलो? कसं शक्य आहे? सुजाताने वॅâलेंडर पाहिलं. छे! चोवीस तारखेला अजून अवकाश आहे? वाढदिवस तिथीने आहे का? शक्यता
आहे. गोसावींसारखी व्यक्ती तिथीच लक्षात ठेवणार. रात्री जेवताना सुजाताने सहज विचारलं, ‘‘ह्या गुरुवारी कोणती तिथी आहे हो?’’

‘‘मला काय माहीत? मला कधी पंचांग वगैरे बघताना पाहिलंस का लग्न झाल्यापासून?’’ 

नीलिमा म्हणाली, ‘‘आई, बाबांना तर आषाढी एकादशी कधी असते तेही माहीत नसतं. त्या दिवशी नाही का त्यांनी एकादशीला मटण खाल्लं?’’ ‘‘नोकरीवाला माणूस फक्त वॅâलेंडरवरचे लाल चौकोन लक्षात ठेवतो. तो लाल रंग कुणाच्या पुण्यतिथीचा तेही तो पाहत नाही.’’ सुजाता गप्प राहिली. मनात म्हणाली,‘कोणती का तिथी असेना त्या दिवशी. तिथीपेक्षा अतिथी महत्त्वाचा.’ ‘‘का? आज मध्येच तिथीची आठवण?’’ सहा वर्षांचा आशुतोष पटकन् म्हणाला, ‘‘बाबा, त्या दिवशी आईच्या लग्नाचा वाढदिवस आहे.’’ 

सौरभचं आणि सुजाताचं ह्यावर हसणं संपायच्या आत आशुतोषने विचारलं, ‘‘बाबा, तुमच्या लग्नाचा वाढदिवस कधी?’’ सौरभ म्हणाला,‘‘बहुतेक त्याच दिवशी असेल.’’ नीलिमा,सौरभ,सुजाता का हसताहेत हे आशुतोषला समजलं नाही. नीलिमा म्हणाली, ‘‘तू आईच्या त्या पिशवीतला आहेस.’’ आशुतोषने नीलिमाच्या मांडीवर डाव्या हाताने चापट मारली. ‘‘जेवताना मारामारी करायची नाही.’’ 

‘‘मग ती का मला दगड म्हणते?’’
‘‘जाऊ दे. आपण लक्ष द्यायचं नाही. दगड म्हटलं की दुर्लक्ष करायचं.’’

सौरभच्या बोलण्यावर सुजातानेही दुर्लक्ष केलं. तिने सांभाळलेल्या ‘दगड’ ह्या विषयाबाबत मौन पाळायचं, दुर्लक्ष करायचं ह्याची तिला सवय झाली होती. ती आत्ताही गप्प राहिली. सौरभही न बोलता जेवत होता. दुर्लक्ष करायचं असं तो म्हणाला, पण त्याच्या मनातून तो विषय गेलेला नाही, हे सुजाता जाणून होती. तिने दगड सांभाळला होता. सौरभने विषय. पूर्वी संघर्ष व्हायचे. आता तो घुम्यासारखा तास तास गप्प राहतो. मध्येच त्याने आशुतोषला विचारलं, ‘‘वाढदिवसाचं तुला सांगितलं कुणी?’’

नीलिमा मध्येच म्हणाली, ‘‘आईला पत्र आलंय.’’

Saturday, 22 February 2014

संभाजी

रायगडावर शंभूराजे पोचले. त्यांनी फडावरच्या कामात दिवसभर स्वत:ला गुंतवून ठेवले होते. तेथे चित्त लागेना म्हणून ते घोड्यावरून जगदीश्वराच्या मंदिरात जाऊन पोचले. त्यांनी आपल्यासोबत कोणाही मानकNयांच्या पालख्या वा घोडी येऊ दिली नाहीत. मंदिरातल्या त्या शांत, थंडगार गाभाNयात बराच उशीर ते तसेच बसून राहिले. राजमहालाकडे येता येता त्यांनी बारुदाच्या कोठारांना भेट दिली. लौकरच औरंगजेबाचे आक्रमण अपेक्षित होते. ते स्वत:ला कामामध्ये खूप गाडून घेत होते, पण त्यांचे अंतर्मन दूर कुठेतरी भटकत होते.

काही केल्या शंभूराजांच्या डोळ्यांसमोरून बाळाजी चिटणिसांची ती घाNया डोळ्यांची, कनवाळू मूर्ती हलता हलत नव्हती. त्यांनी दोन दिवसांमागे कलशांकडून औंढाच्या माळावरची ती हकिगत पुन्हा एकदा मुद्दाम ऐकली होती आणि ते भेसूर, भयानक चित्र त्यांच्या मेंदूमध्ये गच्च रुतून बसले होते. आपला मृत्यू डोळ्यांसमोर दिसत असताना अण्णाजी दत्तो मात्र बिलवूâल कचरले नव्हते. उलट मारेकNयांच्या
शध्Eाांकडे ते काहीशा निर्ढावल्या, बेदरकार नजरेने बघत होते. राजांशी उभा दावा धरल्याच्या गुन्ह्यासाठी एक ना एक दिवस अशी शिक्षा आपल्या नशिबी ठेवली आहे, याची जणू त्यांना पूर्वकल्पना होती.
बाळाजी चिटणिसांची हकिगत खूपच हृदयद्रावक होती! त्यांच्या अस्सल पत्राने साराच घोटाळा उघड झाला होता. इतर अपराध्यांना जिवे ठार मारल्याचे दु:ख शंभूराजांना अजिबात नव्हते. मात्र या गडबडीत राज्यातले अत्यंत निष्ठावंत, सहृदय आणि निष्पाप असे बाळाजी चिटणीस हकनाक गेले, हे मात्र त्यांच्या जिव्हारी लागले! सायंकाळी शंभूराजे आपल्या महालाकडे परतले. मात्र त्यांची पावले चंदनी उंबरठ्यावरच अडखळली.

औंढाच्या माळावर गुन्हेगारांचा नि:पात झाला, तरी त्या गुन्ह्यातली एक अस्सल गुन्हेगार व्यक्ती आपल्याच सप्तमहालामध्ये राहते आहे, या विचाराने त्यांचे चित्त खवळले. ताडताड पावले टाकत शंभूराजे सोयराबार्इंच्या महालाकडे निघाले. 

अचानक दौडत येऊन बाजारात घोडेस्वार घुसल्यावर बकNयाकोंबड्यांची गर्दी भिरभिरत दूर पळून जावी, त्याप्रमाणे पोरेसोरे, चाकर, खिदमदगार यांची पळापळ उडाली. सोयरा-बार्इंच्या महालाकडील दासदासी आणि कुणबिणी पुढे ठ्यां पळू लागल्या. शंभूराजांची उग्र चर्या पाहण्याची हिंमतच कोणात उरली नव्हती. त्यातल्या
त्यात सेवकांना शहाणपण सुचले. राजे उंबरठ्यावर पोचण्यापूर्वीच त्यांनी आतून दरवाजा ओढून घेतला. भिंतीतला खांबासारखा भलामोठा अडसरही आतून लावला गेला.

शंभूराजे महालाच्या दारात पोचले. ते समोरच्या बंद दरवाजाकडे दात ओठ खात हाताच्या मुठी वळत पाहू लागले. ती कोणी व्यक्ती उरली नव्हती. जळत्या, भडकत्या चुलाण्यावरची ती उकळलेली काहीलच होती जणू! दरवाजाकडे पाहात शंभूराजे मोठ्याने गरजले, ‘‘मातोश्री, महालाच्या दारंखिडक्या बंद केल्या म्हणून पापं काही लपत नाहीत! जेव्हा प्रथम आम्ही तुम्हांला नजरवैâदेत टाकलं होतं, तेव्हाच तुम्हांला बजावलं होतं — इथे आपण दयाबुद्धीवर नव्हे तर सख्ख्या मातेच्याच अधिकारानं राहा! पण मातोश्री, आपण कारस्थानांची परिसीमा गाठलीत. 

राजमातेच्या जागी एका स्वार्थी, कावेबाज आणि कारस्थानी अशा हिडीस स्त्रीचं दर्शन घडवलंत! मातोश्री ऽऽ आत का लपून बसलात? उघडा दरवाजा!!...’’ शंभूराजांच्या अंगात भडकलेली आग अधिकाधिक भडकत होती. त्यांच्या रौद्र रूपाशी सामना करायची कोणातही हिंमत नव्हती. आपल्या डोळ्यांतून जळते निखारे पेâकत शंभूराजे गरजले, ‘‘मातोश्री, त्या वैâकयीनेही लाजून मान खाली घालावी अशी आपली कृष्णवृ âत्यं! राज्याचे कायदेशीर वारसदार असताना आपण गड्यामाणसांकडून आम्हांला गिरफ्तारीचा हुवूâम पाठवता?.... एकदा नव्हे दोन दोन वेळा आमच्या प्राणावर उठता?... अहो, कुठे त्या मातोश्री पुतळाबाई, ज्यांनी शिवाजीराजांचे जोडे आपल्या हृदयाशी कवटाळून आगीत उडी घेतली. सती गेल्या. अमर झाल्या! आणि इकडे शिवाजीचं स्वराज्य केवळ स्वार्थासाठी आपण त्या औरंगजेबाच्या पोराच्या झग्यात पेâकायला निघाला होता? अरे, तुम्ही कसल्या आमच्या मातोश्री? तुम्ही तर पुतनामावशी!!...’’

महालाच्या पल्याड बोळातून रहिवाशांची गर्दी झालेली. स्वारशिपाई लपतछपत राजांचा तो उद्रेक ऐकत होते. पुढे जायची कोणात हिंमत नव्हती. तितक्यात पाठीमागच्या गर्दीने भांग दिला आणि आपली करारी पावले टाकत येसूबाई राणीसाहेब तेथे पोचल्या. त्यांनी उखळत्या शंभूराजांचा हात पकडला आणि कठोर सुरात सुनावले, ‘‘नाथ, आपण राजे आहात. राजासारखं वागावं.’’ शंभूराजांनी येसूबार्इंचा हात झिडकारला. आपला हात उंचावत ते गरजले, ‘‘आमच्या राजमातेनं काय वैâदाशिणीसारखे वर्तन करावं? आमच्या अष्टप्रधानांनी
वैNयापुढं नमाज पढावा आणि सुरे आमच्या गळ्यावर ठेवावेत?’’

‘‘राजे, कृपा करा. राग आवरा—’’

‘‘सोडा येसूबाई! आपण आमच्या रागालोभाचं काय घेऊन बसला आहात!

केवळ ह्या आपल्या राजारामांची मातोश्री आहेत म्हणूनच.... नाही तर यांना कधीच भिंतीत चिणून मारलं असतं.’’

Thursday, 20 February 2014

द स्पिरिच्युअ‍ॅलिस्ट

मार्गदर्शक आत्मा
मंगळवार- २४ फेब्रुवारी, १८५७

स्वप्नरंजन संपतच नव्हते. माझे धुक्यात नाहीसे होणे. माझा शांतपणा कधी संपूच नये असे वाटत होते. शांतताभंग झाला. आतमध्ये आवाज येऊ लागला. ‘यापूर्वी माझी जाणीव झाली नाही काय? आता मात्र मी आले की मला येऊ दे.’

‘‘आत्म्या, तू आला आहेस काय?’’
 
आतमध्ये उचंबळून आल्यासारखे, घशात काहीतरी अडकले आहे असे वाटले. समाधानाने दिलेले उत्तर ‘होय.’
डोरोथीने अधीरपणे विचारले, ‘‘जॉनी आहे का एव्हरेट?’’

आत्मा क्रोधित झाला. माझ्या शरीरावर पडलेल्या दाबामुळे मला क्रोध जाणवला. माझ्या शरीरातल्या सगळ्या जाणिवा तिला माहीत करून घ्यायच्या असाव्यात. एका बाजूने जॉर्डन माझ्या मांडीवर दाब देत होता. बोटाने मला कुरवाळत होता. ‘`ते काही माझं काम नाही. अशा क्षुल्लक बाबींची कशाला दखल घ्यायची?'’ डोरोथी संतापाने उद्गारली, ‘‘हे क्षुल्लक काय?’’ मी हवेत तरंगत आहे असे वाटले. माझ्याबाहेर पडून मी माझ्याकडे बघते आहे, असे वाटले. मायकेलने डोरोथीला शांत राहण्याची खूण केली. 

तिला शांत करून तो म्हणाला, ‘‘आम्हाला जॉनी िंकवा एव्हरेटशी बोलायचं आहे. त्यांना आण, मग तुझं म्हणणं ऐवूâ.’’ मला तिच्या क्रोधाची जाणीव झाली. माझ्या हाडांवर कुणीतरी प्रहार करत आहे असे वाटले. माझ्या मनातले तिला कसे समजले? मायकेलने केलेली लगट, घेतलेले चुंबन, तिचा राग व तीव्र इच्छा जाणवत होती, पण तिने शेवटी ऐकले. थोडे मागे सरवूâन तिने जागा करून दिली. त्याच्या अंगात फार ताकद नव्हती, पण शांत झाल्यावर त्याने साद घातली, ‘‘ममा.’’

डोरोथीचा चेहरा पांढरट झाला होता. आवंढा गिळत ती म्हणाली, ‘‘एव्हरेट?’’ ‘‘आम्ही आलोय, ममी. जॉनी आणि मी. तो सांगतोय की तो राखी रंगाचा स्कार्पâ आठव. जरा बघ तो कुठाय?’’ ‘‘कोणता स्कार्पâ?’’
‘‘आठवतंय का? तो म्हणतोय शोधून काढ.’’ ‘‘अरे पण.’’ ‘‘अगं काहीतरी आहे तिथं. तो सांगत नाही मला.’’
‘‘ठीक आहे, मी आणते.’’ ‘‘ममा, विसरू नको बरं का.’’ ‘‘नाही रे बाबा, नाही.’’ ‘‘आम्हाला तुझी काळजी वाटते.’’ ‘‘तुम्ही दोघेही बरे आहात ना?’’ 

त्या लहान मुलांची ताकद कमी पडत चालली. माझ्यावरचा त्यांचा अंमल कमी होत चालला. तो झगडत होता. ‘‘आता जायला पाहिजे. मी सुखात आहे. किती छान आहे सगळं...’’

मी पाहिले माझे डाके पुढे झुकले होते. श्वास थांबला होता. कुणालाच या सर्व प्रकाराचे महत्त्व वाटत नसावे. मायकेल संतापला होता. आता माझ्यावर त्या स्त्रीच्या आत्म्याने ताबा मिळवला. माझ्या मानेला झटका
बसला. श्वास जोराने चालू झाला.

‘‘तुझ्या मुलाला आणलं होतं, झालं का समाधान?’’ आवाजात कमालीचा क्रोध होता आणि काहीतरी विकृत समाधान. डडले कातावून ओरडला, ‘‘तू आहेस तरी कोण?’’ विकट हास्य माझ्या छातीत धडकलं, ‘‘माझं काय काम आहे माहीत आहे काय?’’

‘‘काय आहे काम?’’ मायकेलची पृच्छा.

‘‘तुला पुन्हा भेटायचंय!’’ तिने मला मायकेलकडे झुकविले. आवाजात रंगेलपणा आणि क्रोध दोन्ही होते.

‘समजून घे.' त्याला हे अपेक्षित नव्हतं. `आठव जरा तो कशी सुरुवात करतो ते. तो कसा घाबरतोय. त्याला माहीत आहे, त्यानं माझं काय केलंय ते. तुझ्या दुबळेपणाचा त्याने फायदा उठविला. पूर्वी असंच त्याने माझ्याशी केलंय.’ 

‘‘जॉर्डनला भेटायला?’’ विल्सन मॉलने विचारले, ‘‘पण का?’’ ‘‘तुला काय करायचंय त्याच्याशी?’’

‘‘तू इथे का आली आहेस?’’ डडलेने परत विचारले. आवाजात जरब होती,
 
‘‘तू आहेस तरी कोण?’’
 
मायकेल म्हणाला, ‘‘चूप बस.’’
 
 

Monday, 17 February 2014

Healthy Habits for a Fit Family

As I have indicated, the solution to routine weight loss is simple, uncommonly common, and it works for both individuals and families. It is not hype; it is not “new”; it is not a “secret.” It is the only fat-loss regimen that has been rigorously tested and survives intact today because it is based on valid science, not marketing. So what do you have to do to lose weight? Actually, a better question is, what do you have to do to lose extra body fat? You will see the difference shortly.

Weight Loss 101

The first step to fat control is to honestly examine what you Simple math can tell you the calorie content of any food if you know the amount of protein, fat, and carbohydrate in the food. You simply multiply the number of grams by the number of calories in a gram of that food component. For example, if a serving of fries (about twenty fries—not super-sized!) has 16 grams of fat, 144 calories are from fat. That’s 16 grams × 9 calories per gram. are currently eating, and the second step is to reduce it! If you weren’t eating too much, you wouldn’t be in the fix you are in. Don’t let anyone fool you. 

Total calories matter, and they matter a great deal. Some diet plans state that the total calories consumed are not as important as the kind of calories. There is a grain of truth to that, but it mainly pertains to which calories are burned and which are stored. If you eat 800 calories of protein and 800 calories of fat, some of both will be converted to body fat if they are not burned up by activity or metabolism. A calorie by any other name is still a calorie, regardless of the source. 

A calorie is simply a measure of energy generated when a substance is metabolized. (Here calorie actually represents 1 kilocalorie, but to avoid confusion, I will continue to use the term calorie.) A gram of protein yields 4 calories when it is burned. A gram of carbohydrate yields 4 calories when it is metabolized, and a gram of fat yields 9 calories when it is consumed. (By the way, a gram of alcohol yields 7 calories when consumed.) 

To summarize: Source of Calories per Energy Gram Fat 9 Carbohydrate 4 Protein 4 

It is easy to see that, gram for gram, fat is a great concentrated source of energy; energy that you have to expend or it will stay with you in the form of love handles and jelly bellies. The source of the calories does not change the energy content. A gram of protein from Bessie the cow will yield the same energy as a gram of protein from Sally soybean, assuming it is completely metabolized. There is no question that the source and kind of nutrient will have different effects on things like cholesterol synthesis, but the calories remain the same. Therefore, a recommendation to decrease your calorie intake means decrease the total intake of calories, regardless of the source. This doesn’t mean that you should live on only one source of calories (i.e., eating protein bars morning, noon, and night), because there is more to nutrition than just calories.

Friday, 14 February 2014

दॅट थिंग कॉल्ड लव्ह

सोमवार : वैतागाचा कळस

तो सोमवार होता. मयंकला त्याच्या बोरिवलीच्या घरापासून अंधेरीला असलेल्या ऑफिसपर्यंत पोहोचायला पंचवीस मिनिटं लागायची. हे अंतर साधारणपणानं दहा किलोमीटरचं होतं; पण आज मात्र काहीतरी बिनसलं होतं खरं. मयंक त्याच्या हिरो होंडा स्प्लेंडरवरून नेहमीप्रमाणेच जात होता. पण आज तो अत्यंत अस्वस्थ होता. प्रवासभर त्याला एकापाठोपाठ एक येणाNया अडथळ्यांना तोंड द्यावं लागत होतं. खरंतर या रस्त्यानं तो नेहमीच जायचा; पण आज मात्र आतापर्यंत जेमतेम निम्मं अंतरच त्याने पार केलं असेल-नसेल; पण कितीतरी वेळ आपण प्रवास करतो आहोत, असं त्याला वाटत होतं.

मुंबईच्या उकाड्यानं अन् या दमट हवेनं त्याला जास्तच मनस्ताप होत होता. बाईकवरून जाताना त्याच्या मनात अनेक शंका-कुशंका येत होत्या. प्रत्येक सिग्नलला त्याला थांबावं लागत होतं. आज कोणत्या मुहूर्तावर आपण बाहेर पडलो, असं त्याला सारखं वाटत होतं. एकाच वेळी अचानक इतक्या अडचणींना तोंड देण्याची वेळ आपल्यावर का यावी? खरंच आजचा दिवसच वाईट आहे, असं मयंकला वाटत होतं.

खरंतर मयंक एका आठवड्याच्या रजेनंतर आज ऑफिसला निघाला होता. गेल्या आठवड्यातच दिल्लीला, एका सुंदर मुलीशी, रेवाशी, त्याचा साखरपुडा झाला होता. मयंक अंधेरीला विवाह जुळवणाNया एका वेबसाईटवर नोकरीला होता. आता ऑफिसात गेल्यावर प्रत्येकजण आपल्याला या साखरपुड्याबद्दल विचारणार हे मयंकला माहीत होतं. लग्न कसं जमलं इथपासून ते साखरपुड्यापर्यंत हजार प्रश्न विचारून सगळे भंडावून सोडणार, हे मयंकनं गृहीतच धरलं होतं; पण याबद्दल सविस्तर सांगण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती. 

खरंतर लग्न ठरल्यावर, आता नवीन आयुष्याला सुरुवात होणार, हा विचार सगळ्यांनाच किती सुखद, रोमांचक वाटत असतो; पण मयंकचं मात्र तसं नव्हतं. साखरपुड्यामुळे पुढे येणाNया अनेक समस्यांचे विचार त्याच्या डोक्यात थैमान घालू लागले. हा साखरपुडा त्याच्या इच्छेनं झालाच नव्हता. त्याच्या आईवडिलांच्या
आग्रहामुळेच हा कार्यक्रम झाला. मयंकचे आईवडील इंदोरला राहात होते. एवढ्यात लग्न करण्याची आपली तयारी आहे का? जिच्याशी आपला साखरपुडा झाला, ती सर्व दृष्टींनी आपल्याला अनुरूप आहे का? तिचा स्वभाव आपल्या स्वभावाशी जुळणारा आहे का? हल्लीच्या कठीण परिाqस्थतीत सगळ्या दृष्टीने आपण एकमेकांना समजून घेऊ शवूâ का? हे लग्न टिकेल का? अशा अनेक प्रश्नांचा भुंगा मयंकच्या डोक्यात भुणभुणत होता. त्यामुळे बाईकवरून जाताना त्याचं मन मध्येच विचलित होत होतं. कांदिवलीला तर चक्क एक सिग्नल तोडून तो पुढे निघून गेला. नशीब बलवत्तर म्हणून अपघात वगैरे झाला नाही; पण वाहतूक
पोलिसाचं त्याच्याकडं लक्ष गेलं आणि त्यानं मयंकच्या बाईकचा नंबर टिपून घेतला. मयंक पुढं गेला खरा, पण आता या प्रश्नाला कसं तोंड द्यायचं, याबद्दल त्याच्या डोक्यात विचारांचं थैमान सुरू झालं.

पोलीस आता आपला पाठलाग करतील, या भीतीनं तो आणखीच वेगाने निघाला. जेमतेम एक किलोमीटर तो गेला असेल-नसेल, तेवढ्यात एका विचित्र अडथळ्यामुळं त्याची पंधरा मिनिटं वाया गेली. त्या भागातला स्थानिक खासदार गोविंदा, यानं तिथल्या झोपडपट्टीवाल्यांचा मोर्चा काढला होता. अनधिकृत झोपड्या
पाडण्याच्या सरकारच्या मोहिमेचा निषेध करण्याकरिता हा जंगी मोर्चा निघाला होता. गंमत म्हणजे गोविंदानं – सत्ताधारी पक्षाच्या खासदारानंच – हा मोर्चा काढला होता. केवढा विरोधाभास होता हा!

मोर्चा जाईपर्यंत मयंकला थांबावं लागलं. त्यामुळं मयंकला थोडीशी उसंतही मिळाली, पण भावी पत्नी रेवा आणि त्याचा साहेब राममूर्ती, यांच्याबद्दलच्या विचारांची साखळी मात्र त्याच्या डोक्यात चालूच होती. मोर्चा गेल्यानंतर मयंकचा प्रवास पुन्हा सुरू झाला. मात्र आता त्याला प्रत्येक सिग्नलला थांबावं लागलं. आज
सगळ्या सिग्नलनी जणू काही त्याच्याविरुद्ध कटच केला होता. त्याची बाईक सिग्नलजवळ पोचली रे पोचली की, सिग्नलचा दिवा एकदम लाल व्हायचा! आज त्याला सगळं दान उलटंच पडत होतं. 

प्रत्येक सिग्नलला थांबल्यावर न चुकता बाईकच्या आरशात तो आपली छबी न्याहाळत होता. स्वत:च्या दिसण्याबाबत मयंक जरा अधिकच जागरूक होता. बाईकवरून जाताना काही वेळातच एकदम मयंकला अनामिक बेचैनी जाणवू लागली. मग त्याच्या लक्षात आलं की, आपल्या घशाला कोरड पडली आहे. शरीरातलं पाणी कमी झाल्यासारखं वाटत आहे. त्यात वाटलं, आज उगीचच अशी भीती का वाटते आहे? मग त्याच्या लक्षात आलं की, तो घामानं डबडबला आहे. खरं तर अजून बारादेखील वाजले नव्हते; पण तापमान ३९० सेंटिग्रेड असावं. दमटपणाही खूपच वाढला होता. आधीच तो अस्वस्थ अवस्थेत प्रवास करीत होता.

शिवाय घामानं संपूर्ण डबडबला होता. त्यामुळे त्याला सगळं नकोसं वाटत होतं. जाम वैतागला होता मयंक!
जोगेश्वरी क्रॉसिंगजवळ पोचल्यावर मयंकला एकदम एका इंग्रजी दैनिकातवाचलेली बांद्रा-वरळी सी- कविषयीची बातमी आठवली. त्याच्या मनात एकदमक विचार चमवूâन गेला– असाच एखादा पूल बोरिवली-अंधेरी दरम्यान समुद्रावर बांधण्याचा विचार कोणी केला तर? त्यामुळे उपनगरातली वाहतूक अतिशय
सुरळीत होईल आणि लोकांचा वेळही वाचेल. मयंकला वाटलं, व्वा! मुंबईची प्रचंड रहदारीची समस्या सोडवण्याची काय मस्त शक्कल सुचली आपल्याला! स्वत:वर भलताच खूश झाला तो, पण क्षणभरच. कारण सिग्नल लागला म्हणून तो उभा होता, पण सिग्नल पडल्यावरही तो आपल्याच नादात राहिल्यानं, पाठीमागच्या वाहनचालकांचे हॉर्न त्याला ऐवूâ आले. 

Thursday, 13 February 2014

एक अनादि अनंत प्रेमकहाणी

क्लेअर : एकटं मागे राहणं फार कठीण गोष्ट असते. मी हेन्रीची वाट पाहत राहते; तो बरा असेल, अशी आशा करत. तो कुठे आहे, हे मला ठाऊक नसतं. खरंच, खूप कठीण असतं, अशी वाट बघत राहणं. मग मी स्वत:ला कामात गर्वâ ठेवते. त्यामुळे वेळ कधी आणि कुठे जातो, हे समजत तरी नाही.

मी एकटीच झोपते आणि एकटीच उठते. फिरायला जाते, एकटीच. थकवा येईपर्यंत कामं करत राहते. हिवाळ्यामध्ये बर्फाखाली दडणाNया पालापाचोळ्याशी चाललेला वाNयाचा खेळ बघत बसते.

त्याबद्दल विचार करू लागेपर्यंत सगळंच सोपं वाटतं. खरंच, एखाद्याच्या अनुपाqस्थतीत प्रेम इतवंâ तीव्र का बनतं? पूर्वीच्या काळी पुरुष समुद्रसफारीवर जात, तेव्हा त्यांच्या बायका पाण्याच्या काठावर उभं राहून तासन् तासन क्षितिज निरखत राहत– एखादी नाव दिसतेय का, ह्या आशेने. तशीच आता मी हेन्रीची वाट पाहत राहते. तो कुठल्याही पूर्वसंकेताशिवाय केव्हाही अचानक गायब होतो. मग मी त्याची वाट बघत बसते. वाट पाहतानाचा एकेक क्षण युगांसारखा वाटतो. तो प्रत्येक क्षण काचेप्रमाणे; िंकबहुना काचेइतका संथ व पारदर्शक असतो. त्या प्रत्येक क्षणामधून बघताना मला पुढचे अगणित क्षण वाट बघत उभे असलेले दिसतात. का तो अशा ठिकाणी गेलाय, जिथे मी त्याच्यासोबत जाऊ शकत नाही! हेन्री : कसं वाटतं? कसं वाटतं बरं?

कधीतरी असं वाटतं की, क्षणभरासाठी (च) तुमचं लक्ष विचलित झालं आहे. मग, अभावितपणे लक्षात येतं; की तुमच्या हातातलं लाल रंगाचं पुस्तक, पांढरी बटणं व लाल चौकड्या असलेला कॉटनचा शर्ट, तुमच्या सगळ्यात आवडीच्या काळ्या जीन्स, एका टाचेत छोटंसं छिद्र असलेल्या तपकिरी मोज्यांचा जोड,
दिवाणखाना, गॅसवर ठेवलेलं चहाचं आधण... हे सगळं गायब झालं आहे. तुम्ही पूर्ण नग्नावस्थेत उभे आहात, एका अनोळखी खेड्यातील वाटेवरच्या डबक्यात साचलेल्या, घोट्यापर्यंत येणाNया बर्फाळ पाण्यात. तुम्ही क्षण-दोन क्षण तिथेच स्तब्ध उभे राहता; ह्या आशेने की हे `स्वप्न’ संपून तुम्ही पुन्हा आपल्या  वाणखान्यात,
गरमागरम चहाची वाट बघत दाखल व्हाल. पण, तसं काही होत नाही. मग थरथरत उगीच शिव्या घालत आणि `आपण इथून गायब व्हावं’ ही प्रार्थना करत पाच मिनिटं घालवल्यावर, तुम्ही वाट पुâटेल तिथे झपाझप चालू लागता. अखेर तुम्ही एखाद्या फार्महाऊसमध्ये पोहोचता. तुमच्याकडे दोन पर्याय उपलब्ध असतात- चोरी करणंिं कवा त्या लोकांना सगळं समजावून सांगणं. चोरी पकडली गेली, तर तुरुंगवास नक्की असतो; पण समजावून सांगणं ही फारच कठीण व वेळखाऊ प्रक्रिया असते. खोटं बोलणं ओघानं येतंच... त्यामुळेही कधी कधी तुरुंगवास घडतोच. मग मरू दे ना...

कधी कधी तुम्हाला वाटतं की, तुम्ही अचानकपणे उभे राहिला आहात- खरं तर त्या वेळी तुम्ही पलंगावर छानपैकी झोपलेले असता. तुम्हाला मेंदूपर्यंत रक्त धावत असतानाचा नाद ऐवूâ येतो, मग घेरी आल्यासारखी वाटते. हातापायांना मुंग्या येतात आणि मग अचानक ते गळून पडल्याचा भास होतो. क्षणभरातच - तितकाच
वेळ असतो तुमच्याकडे आधार शोधायला, हातपाय झाडायला (प्रसंगी ह्या झटापटीत तुम्हाला इजाही होते, आजूबाजूच्या वस्तूंचा निचरा होतो) आणि मग तुम्ही एथन्स, ओहायोमधल्या मोटेल ६ च्या हिरव्यागार गालिच्यावर उभे असता. सोमवार, ६ ऑगस्ट १९८१, पहाटे ४:१६ ची वेळ. अचानकपणे, तुमचं डोवंâ जोरात
कुणाच्या तरी दरवाज्यावर आदळतं. फिलाडोqल्फयाची मिस टीना शूल्मन दरवाजा उघडते... आणि तिच्या उंबरठ्यावर बेशुद्ध होऊन पडलेल्या नग्न माणसाला पाहून जोरजोरात चित्कारू लागते.

तुम्ही काऊन्टी हॉाqस्पटलमध्ये शुद्धीवर येता- डोक्याला ठणका लागलेला असतो. खोलीच्या दाराबाहेर एक हवालदार, खरखरणाNया रेडिओवर `फिलीज गेम’ ऐकत बसलेला असतो. देवदयेने, तुम्ही पुन्हा बेशुद्ध होता आणि सहा तासांनी शुद्धीत येता, ते स्वत:च्या घरातल्या गुबगुबीत गाद्यांच्या पलंगावर- तुमच्याकडे
िंचताग्रस्त चेहNयाने बघत बसलेल्या पत्नीकडे पाहत. कधीतरी तुम्हाला अगदी हर्षवायू झाल्यासारखं वाटतं. सगळीच सृष्टी कशी उदात्त, उत्कृष्ट आणि वलयांकित आहे, असं वाटू लागतं. मग क्षणार्धात ही
मन:ाqस्थती पालटून, तुम्हाला घुसमटल्यासारखं होऊ लागतं आणि मग, तुम्ही गायब होता! प्रगट होता, तर कुठे? एखाद्या शहरी बागेमधल्या टपोNया जेरॅनियम्सवरिं कवा तुमच्या वडलांच्या सुंदर बुटांवर िंकवा तीन दिवस अगोदर तुमच्या स्नानगृहाच्या फरशीवर िंकवा १९५०च्या एका सुंदर सायंकाळी टेनिसच्या प्रांगणात िंकवा १९०३मध्ये इलिनॉईसमधल्या एका बाकड्यावर, भडाभडा ओकत! 

कसं वाटतं? कसं वाटतं असं निरनिराळ्या काळात, वेगवेगळ्या ठिकाणी कुठल्याही अवस्थेत प्रगट होताना?
अगदी अशा स्वप्नात असल्यासारखं वाटतं, ज्यात तुमच्यापुढे अशी प्रश्नपत्रिका टाकली आहे, जिचा तुम्ही अभ्यासच केलेला नाहीये- तुम्ही कपडेही घातलेले नाहीत! आणि तुम्ही पैशाचा बटवा घरीच विसरून आला आहात! ह्या सगळ्या येण्या-जाण्याला, प्रवासाला काही नियम, काही ताळतंत्र आहे का? हे सगळं थांबवण्यासाठी, वर्तमानाला कवटाळून राहण्यासाठी काही उपाय आहे का? मला माहिती नाही. खुणा असतात, संकेत मिळत राहतात- कुठल्याही आजाराप्रमाणे माझ्या ह्या आजारातही काही सूत्रं आहेत, काही शक्यता आहेत. 

अतीव थकवा, गोंगाट, तणाव, अचानक उभं राहणं, भगभगणारा दिवा- ह्यांपैकी कशामुळेही माझा काळप्रवास सुरू होतो. मी `संडे टाइम्स’ वाचत बसलेलो असतो. कॉफीचे घुटके घेत बाजूला झोपलेल्या क्लेअरकडे कटाक्ष टाकत असतो आणि काही समजण्याच्या आत, मी १९७६ मध्ये पोचतो- माझ्या १३ वर्षांच्या मूर्तीला
आजोबांच्या घरासमोरच्या हिरवळीची निगा राखताना पाहतो... म्हणजे कधी असंही होतं, की वर नमूद केलेले कुठलेही घटक नसतानाही, माझा काळप्रवास सुरू होऊ शकतो. माझे काही काही प्रवास अगदी काही क्षणांपुरतेही असतात- जसा एखादा रेडिओ योग्य त्या ध्वनिलहरी शोधताना जरासा चाचपडतो तसा. मी अचानक स्वत:ला मोठ्या गर्दीत अडकलेला पाहतो. सगळीकडे माणसंच माणसं... ही झुंबड! तर कधी मी स्वत:ला एकदम एकटा असलेला पाहतो. एखाद्या शेतात, घरात, गाडीमध्ये, समुद्राकाठी, मध्यरात्री एखाद्या ओस शाळेत... मला भीती वाटत राहते की, कधी मी एखाद्या तुरुंगात वगैरे प्रगट होईन िंकवा माणसांनी खच्चून भरलेल्या लिफ्टमध्ये िंकवा भरधाव वेगाने गाड्या धावत असणाNया एखाद्या महामार्गावर! मी हा असा... नग्नावस्थेत वाट्टेल तिथे प्रगट होणारा. काय आणि कसं समजावून सांगणार मी लोकांना काळप्रवास करताना मला माझ्यासोबत काहीच नेता येत नाही. कपडे, पैसे, ओळखपत्र... काहीच नाही. त्यामुळे खरंतर माझा सर्वाधिक वेळ कपडे-बिपडे गोळा करण्यात आणि लपवण्यातच जातो. तरी नशीब मला चष्मा नाही!

Tuesday, 11 February 2014

Hon'ble Mr. Justice V.S. Sirpurkar appreciates Before Memory Fades...


बिफोर मेमरी फेड्स...

प्रकरण १२

व्यावसायिक आयुष्यातील काही वळणे

शासन अथवा शासकीय अधिकारी यांच्याकडून जर नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन होत असेल, तर त्याविरुद्ध दाद मागण्याचा कायदेशीर आधिकार आपण स्वीकारलेल्या संविधानात आपण सर्व नागरिकांनी आपल्याकडे घेतला आहे, ही नि:संशयपणे अतिशय चांगली गोष्ट आहे. पण मला वाटते त्या बरोबरच आपण जर एका राज्यातील नागरिकांची अन्य राज्यातील नागरिकांप्रतीची काही कर्तव्ये, विशेषत: एकाहून जास्त राज्यातून वाहणाNया नदीच्या पाण्याचे राज्याराज्यांत न्याय्य पद्धतीने वाटप कसे करावे, यासंबंधीच्या
जबाबदाNया, कर्तव्ये हीसुद्धा जर संविधानात ठरवून दिली असती आणि तीही अनिवार्य ठरवली असती, तर आपल्या राष्ट्रनिष्ठेच्या कल्पनेत, आपल्या वागण्यात, वृत्तीत योग्य असा खूप फरक पडला असता. 

‘भोपाळ दुर्घटना' या प्रकरणात छापलेल्या विजय के. नागराज आणि नित्त्या व्ही. रामन यांच्या पत्रात त्यांनी एक वाक्य लिहिले होते, `आपल्याविषयी आमच्या मनात असणारा आदर गुजरात प्रकरणामुळे दुणावला होता.' हे गुजरात प्रकरण माझ्या आयुष्यातील आणखी एक छोटेसे, वैशिष्ट्यपूर्ण वळण होते, ज्याच्याविषयी
तुम्हाला सांगितलेच पाहिजे.

गुजरातमधील नर्मदा धरणाची उंची वाढवल्यामुळे तेथील ज्या आदिवासी जमातींना१ स्थलांतरित, विस्थापित व्हावे लागले होते (आणि पुढेही आणखी बNयाच लोकांना व्हायला लागणार होते.) त्यांच्यातर्पेâ एक जनहित याचिका डिसेंबर, १९९८च्या आधी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. गुजरात राज्याच्यावतीने ज्येष्ठ वकील म्हणून सरकारची बाजू मांडण्याचे काम माझ्यावर सोपवण्यात आले होते. या याचिकेद्वारा जे प्रश्न चर्चेत येणार होते ते हे होते की `देशातील स्थानिक लोकांना त्यांना हव्या त्या कोणत्याही ठिकाणी, ते
शतकानुशतके ज्या पद्धतीने राहात होते तसे राहण्याचा अंगभूत हक्क आहे का? 

लाखो लोकांच्या कल्याणाचा विचार करून त्यातील काही लोकांना त्यांची निवासस्थाने सोडून अन्य ठिकाणी, समुद्रपातळीपासून जास्त उंचीवरील प्रदेशात, सक्तीने हलवता येते का? येत असेल तर किती प्रमाणात? आणि या प्रश्नांशी निगडित असा आणखी एक प्रश्न – विस्थापितांच्या पुनर्वसनाची पुरेशी व्यवस्था उपलब्ध आहे का?'

ती याचिका न्यायालयात अनिर्णित अवस्थेत असताना एक दिवस गुजरातचे मुख्यमंत्री केशुभाई पटेल मला भेटायला माझ्या निवासस्थानी आले. ती सदिच्छा भेट होती असे मला सांगण्यात आले होते, तरी त्याच्या एका वेगळ्या पाश्र्वभूमीची मला कल्पना होती. काही महिन्यांपूर्वी वर्तमानपत्रात अशा बातम्या प्रसिद्ध होत होत्या की गुजरातमधील काही भागांतील खिश्चन लोकांना त्रास देण्यात येतो आहे, त्यांचा धर्मग्रंथ – बायबल – ठिकठिकाणी जाळला जात आहे. त्या बातम्या वाचल्याबरोबर  (या घटनेचा नर्मदा धरण प्रश्नांशी काहीही संबंध नव्हता, तरीही) मी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडे त्या कृतीविषयी माझी स्पष्ट नाराजी आणि तीव्र निषेधाची भावना व्यक्त करून, त्यांना योग्य ती पावले उचलून या असल्या प्रकारांना तातडीने आळा
घालण्याची विनंती केली होती. त्यांनी मला असे कळवले होते की, खरे म्हणजे त्या बातम्यात फारसा अर्थ नव्हता आणि तरीही ते लक्ष घालून योग्य ती कारवाई करतील.

त्यानंतर एक दोन महिन्यांनी नर्मदा धरण विस्थापितांच्या पुनर्वसनाविषयी काही धोरणात्मक निर्णय घ्यायचे होते, त्या संदर्भात माझी मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्ष भेट झाली होती. त्यावेळपर्यंत, वृत्तपत्रातील बातम्यांनुसार खिश्चन अल्पसंख्याकांचे त्रास आधिकच वाढलेले होते. आता फक्त बायबल्सच जाळली जात नव्हती, तर चर्चेसनाही आगी लावणे, तेथील पावित्र्य भंग करणे, असे प्रकारही गुजरातच्या अनेक भागांत घडत होते. मी त्या बातम्या वाचून जसा अतिशय व्यथित झालो होतो, तसा रागावलोही होतो. मी त्या भेटीत मुख्यमंत्र्यांना जरा कडक शब्दांत सुनावले आणि त्यांना बजावले की, त्यांनी जर त्वरित उपाय योजले नाहीत, तर मला त्या बाबतीत योग्य ती पावले उचलावी लागतील.

परत एकदा त्यांनी मला तोंड भरून आश्वासने दिली, तोंडी आणि नंतर लेखीही, पण प्रत्यक्ष परिणाम काहीच दृष्टोत्पत्तीस येत नव्हता. अल्पसंख्याकांवर, विशेष करून खिश्चन धर्मीयांवर होणारे जुलूम थांबवण्यात गुजरात सरकारची निष्क्रियता मला असह्य झाली आणि अखेर डिसेंबर, १९९८मध्ये गुजरात सरकारचे
स्वीकारलेले वकीलपत्र मी मुख्यमंत्र्यांकडे परत केले आणि त्यांना माझा `याच नाही तर कुठल्याच बाबतीत गुजरात राज्यसरकारचे वकीलपत्र न स्वीकारण्याचा निर्णय कळवून टाकला. माझ्या या निषेधाच्या कृतीमुळे सगळीकडे खूपच खळबळ उडाली होती.

Thursday, 6 February 2014

रुल्स ऑफ डिसेप्शन

उपोद्घात

थंड वाNयाची एक मंद लाट हळुवारपणे त्या विस्तीर्ण पठारावर पसरत गेली आणि त्या लाटेवर आरूढ होत एक रंगीत पुâलपाखरू अवकाशात अलगद तरंगू लागले. त्या इवल्याशा कीटकामध्ये विलक्षण चैतन्य होते. वाNयाशी छचोरपणा करत कधी ते खोलवर सुरकांडी मारायचं तर दुसNयाच क्षणी वर झेपावत हवेत एक सुंदर वर्तुळ रेखाटायचे. त्याची ती लयबद्ध होणारी हालचाल खरोखरच विलोभनीय होती. नाजूक सौंदर्याचा तो एक अप्रतिम नमुना होता. 

पुâलपाखराचे पंख गडद पिवळ्या रंगाचे होते व त्यावर काळ्या रंगाची नक्षीदार जाळी होती. त्या दुर्गम प्रदेशात इतवंâ सुंदर पुâलपाखरू सापडणं दुरापास्त होते. म्हणूनच की काय त्या पाखराला नावही आगळंवेगळंच दिलेलं होते. पॅपिलिओ पॅनोप्टस. नेत्रसुखद पुâलपाखरू.

ते मुक्तपणे विहरत होते. संरक्षित रस्त्यांवरून, विद्युतभारित वुंâपणावरून तर कधी काटेरी तारांमधून ते स्वच्छंदपणे उडत होते. वुंâपणापलीकडे रानपुâलांचं शेत पसरलं होते. त्या पुâलांमधलं वैविध्य आणि त्या पुâलांचे लुभावणारे रंग डोळे दिपवून टाकत होते. दूरवर कुठेही एकदेखील वास्तू दिसत नव्हती. एखादं
घर, धान्याचं कोठार, इमारत काही काही नव्हते. गच्च दाबून बसवलेली ओल्या मातीची टेकाडंच फक्त नुकत्याच संपवलेल्या ताज्या कामाची साक्ष देत होती. पण पुâलांच्या गर्द ताटव्याखाली झाकली गेलेली ती टेकाडंदेखील दृष्टीस पडणं धड कठीण झालं होतं.

इतका दूरचा प्रवास करूनही, त्या पुâलपाखराने पुâलांकडे मात्र साफ दुर्लक्ष केलं होतं. पुâलांमधले सुगंधित परागकण शोषण्याच्या विंâवा पुâलांमधला रसाळ मकरंद चाखण्याचा त्याने जराही प्रयत्न केला नव्हता. उलट हवेमध्ये उंच उंच उडण्याकडेच त्याचा कल दिसत होता. जणूकाही त्याला हवी असलेली ऊर्जा त्या हवेमधूनच त्याला मिळत होती. 

आणि अखेर शिशिरातल्या त्या फिकट आभाळाखाली चमचमणाNया एका पिवळ्या झेंड्यावर ते विसावलं. मात्र थांबतानाही त्याने एखाद्या सुवासिक जांभळ्या पुâलाची निवड केली नव्हती. पठाराला एका भव्य, उत्तुंग पर्वताने वेढलं होतं व त्या डोंगरातून उगम पावलेले अनेक निर्झर वाहात वाहात माळरानापर्यंत पोहोचले होते. पण पुâलपाखरानं त्यातलं मधुर जल एकदाही प्यायलं नाही. एक चौरस किलोमीटर परिमितीच्या त्या खास बांधलेल्या वुंâपणाबाहेर ते विंâचितही भरकटलं नाही. रंगीत शेतावरून भिरभिरण्यातच ते संतुष्ट राहिलं. दिवसांमागून दिवस आणि रात्रींमागून रात्री, तो एवढासा जीव काहीही न खाता-पिता अविश्रांतपणे, अखंड उडत राहिला.

सात दिवसांनी ‘नशी’ नावाचं झंझावती वादळ अचानक अवतरलं. प्रचंड वेग आणि ताकद असलेल्या त्या घोंघावणाNया वाNयाच्या आवाजाने अवघ्या कडेकपारी दणाणून गेल्या. त्या तुफानाचा तडाखा इतका जबरदस्त होता की, वाटेत येणाNया प्रत्येकाची धूळदाण उडवत ते तितक्याच बेफामपणे पठारावर
आदळलं. त्या इवल्याशा जीवामध्ये इतक्या मोठ्या निर्दयी वादळाशी मुकाबला करण्याची ताकद कुठून असणार? वुंâपणाभोवती गोलाकार पेâNया मारून ते आधीच दुर्बल झालं होतं. वाNयाच्या एका भोवNयाने त्याला अल्लद उचललं, गरागरा फिरवलं आणि जमिनीवर भिरकावून दिलं. पुâलपाखराच्या नाजूक देहाच्या
ठिकNया उडाल्या. 

गस्त घालणाNया एका सैनिकाला धुळीमध्ये पिवळं काहीतरी चमकताना दिसलं व त्याने जीप थांबवली. पायाच्या घोट्यापर्यंत वाढलेल्या गवतावर गुडघे टेकवत तो सावधपणे ती आकृती निरखू लागला. असं पुâलपाखरू त्याने यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं. पहिली गोष्ट म्हणजे ते आकाराने चांगलंच मोठं होतं. त्याचे पंख कडक होते व त्याच्या रेशमासारख्या मुलायम त्वचेतून कागदाइतक्या पातळ धातूचे तुकडे बाहेर डोकावत होते. त्याची दुभागलेली लुसलुशीत छाती, एका हिरव्या तारेने जोडलेली होती. मनाच्या गोंधळलेल्या अवस्थेत त्याने ते पुâलपाखरू उचललं व त्याची तो काळजीपूर्वक तपासणी करू लागला. स्वत:ला तो आधी एक अभियंता मानत होता व मग एक सैनिक. तेही काहीशा नाखुशीनेच. त्याने जे काही पाहिलं होतं, त्यामुळे तो पार हादरून गेला होता. पुâलपाखराच्या छातीत एक अ‍ॅल्युमिनियमची इटुकली पेटी होती. त्या पेटीत
एक बॅटरी लपवलेली होती. बॅटरीची लांबी व एवूâण आकार जेमतेम तांदुळाच्या दाण्याएवढा असेल. ती बॅटरी एका मायक्रोवेव्ह ट्रान्समीटरला जोडलेली होती. त्याने पुâलपाखराच्या नाकाजवळचा भाग आपल्या अंगठ्याच्या नखाने खरवडला. त्याच्या हातात एकदम केसाएवढ्या तंतूसदृश वायर्सचा एक पुंजकाच आला. नाही... शक्य नाही, तो स्वत:शीच पुटपुटला. छे. असं नाही होऊ शकत.

निदान इतक्या लवकर तर नाहीच नाही. तो आपल्या जीपच्या दिशेने धावत सुटला. त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. तो मनाला समजावत होता. उलटसुलट तर्वâ लढवत होता. पण मनाला काहीच पटत नव्हतं. दगडाला ठेचकाळल्याने, त्याचा तोल गेला व तो मातीत कोलमडला. मात्र दुसNयाच क्षणी त्याने स्वत:ला सावरलं. तो उठून उभा राहिला आणि वेगाने जीपकडे जाऊ लागला. आता प्रत्येक मिनिट महत्त्वाचं
होतं. 

जीपमध्ये बसून आपल्या बॉसला फोन करताना, त्याचा हात अक्षरश: थरथरत होता.

‘‘त्यांनी आपल्याला शोधून काढलंय.’’

Tuesday, 4 February 2014

वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

प्रिय वाचकहो, 

आज वसंतपंचमी. वसंत ऋतू हे भावविभोर प्रेमाचं प्रतीक आहे तसेच सरस्वतीमातेची, ज्ञानाची आराधना करण्याचाही हा दिवस आहे. ज्ञान आणि प्रेम यांचा सुरेख संगम असलेल्या मीरेच्या अमर प्रेमाची कहाणी 'मीरा एक वसंत आहे'. 

‘पग घुंघरू बांध’ हा ओशोंद्वारे वेळोवेळी मीराने रचलेल्या पदांवर विस्तृतपणे दिलेल्या प्रवचनांचा संग्रह आहे. ओशोंच्या मतानुसार ही प्रवचनं नाहीत, तर आपल्या सर्वांना मीराच्या प्रेमाच्या सरोवरातील नौका विहारासाठी पाठवलेलं आमंत्रण आहे. हे प्रेमाचं सरोवर अद्भुत आहे, अनुपम आहे. कारण ह्या सरोवराचं पाणी सर्वसाधारण नाहीये. हे तर मीराच्या अश्रूंचं मानसरोवर आहे आणि हे इतवंâ शुद्ध, निर्मळ आहे, की कदाचित गंगेचं पाणीही तसं असू शकणार नाही. मीराला समजणं खूप कठीण आहे. काव्य, तर्वâ, ज्ञान ह्या दृष्टिकोनांतून मीराला समजण्याचा प्रयत्न केला तर चूक होणारच. कारण मीरा ना कविता आहे, ना शाध्Eा ना तर्वâ. ती तर दुखNया प्रेमाची एक अतिशय सुंदर अशी अनुभूती आहे. मीरा शरीराने आqस्तत्वात नाहीये, ना होती. मीराच्या रुपाने भक्तीने शरीर धारण केलं नी आqस्तत्वात आली.

‘निराकार जब तुम्हें दिया आकार स्वयं साकार हो गया।’ 

प्रेमाच्या ह्या साकार प्रतिमेच्या डोळ्यांमधील एक एक अश्रू, एक एक पद आहे आणि एक एक पद म्हणजे एक एक खंडकाव्य आहे. जशी मीरा तिच्या गिरिधरगोपाळपर्यंत पोहोचण्यासाठी लोकलज्जा, मानमर्यादा, कुळाचार, घरदार सर्व सोडून धावली, तसंच, ज्ञानाचं सूत्र, तर्वâवितर्वâ, काव्याचे सारे प्रकार आपण जोपर्यंत सोडून देत नाही, विसरत नाही तोपर्यंत आपण मीरापर्यंत पोहोचू शकत नाही. हे युगानुयुगे चालत आलेले ह्या काव्य शाध्Eााचे नियम मीराच्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी फोल आहेत. मीराने अश्रूंनी प्रेमाचे इतके विविध रंग रंगविले, खुलविले, उधळले की ते मोजता येणार नाहीत. ना वजनाने, ना काव्यशाध्Eााने. ह्या प्रेमाच्या पदपथावह्वन ती इतकी दूरपर्यंत पोहोचली आहे की तिला तिच्या स्वत:च्या आqस्तत्वाची जाणीव नाही. म्हणूनच मीरा एक वसंत आहे. तिच्या प्रेमाचे रंग, गंध कायम मनात दरवळत राहतात.

मेहता पब्लिशिंग हाउसतर्फे सर्वांना वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!