सोमवार : वैतागाचा कळस
तो सोमवार होता. मयंकला त्याच्या बोरिवलीच्या घरापासून अंधेरीला असलेल्या ऑफिसपर्यंत पोहोचायला पंचवीस मिनिटं लागायची. हे अंतर साधारणपणानं दहा किलोमीटरचं होतं; पण आज मात्र काहीतरी बिनसलं होतं खरं. मयंक त्याच्या हिरो होंडा स्प्लेंडरवरून नेहमीप्रमाणेच जात होता. पण आज तो अत्यंत अस्वस्थ होता. प्रवासभर त्याला एकापाठोपाठ एक येणाNया अडथळ्यांना तोंड द्यावं लागत होतं. खरंतर या रस्त्यानं तो नेहमीच जायचा; पण आज मात्र आतापर्यंत जेमतेम निम्मं अंतरच त्याने पार केलं असेल-नसेल; पण कितीतरी वेळ आपण प्रवास करतो आहोत, असं त्याला वाटत होतं.
मुंबईच्या उकाड्यानं अन् या दमट हवेनं त्याला जास्तच मनस्ताप होत होता. बाईकवरून जाताना त्याच्या मनात अनेक शंका-कुशंका येत होत्या. प्रत्येक सिग्नलला त्याला थांबावं लागत होतं. आज कोणत्या मुहूर्तावर आपण बाहेर पडलो, असं त्याला सारखं वाटत होतं. एकाच वेळी अचानक इतक्या अडचणींना तोंड देण्याची वेळ आपल्यावर का यावी? खरंच आजचा दिवसच वाईट आहे, असं मयंकला वाटत होतं.
खरंतर मयंक एका आठवड्याच्या रजेनंतर आज ऑफिसला निघाला होता. गेल्या आठवड्यातच दिल्लीला, एका सुंदर मुलीशी, रेवाशी, त्याचा साखरपुडा झाला होता. मयंक अंधेरीला विवाह जुळवणाNया एका वेबसाईटवर नोकरीला होता. आता ऑफिसात गेल्यावर प्रत्येकजण आपल्याला या साखरपुड्याबद्दल विचारणार हे मयंकला माहीत होतं. लग्न कसं जमलं इथपासून ते साखरपुड्यापर्यंत हजार प्रश्न विचारून सगळे भंडावून सोडणार, हे मयंकनं गृहीतच धरलं होतं; पण याबद्दल सविस्तर सांगण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती.
खरंतर लग्न ठरल्यावर, आता नवीन आयुष्याला सुरुवात होणार, हा विचार सगळ्यांनाच किती सुखद, रोमांचक वाटत असतो; पण मयंकचं मात्र तसं नव्हतं. साखरपुड्यामुळे पुढे येणाNया अनेक समस्यांचे विचार त्याच्या डोक्यात थैमान घालू लागले. हा साखरपुडा त्याच्या इच्छेनं झालाच नव्हता. त्याच्या आईवडिलांच्या
आग्रहामुळेच हा कार्यक्रम झाला. मयंकचे आईवडील इंदोरला राहात होते. एवढ्यात लग्न करण्याची आपली तयारी आहे का? जिच्याशी आपला साखरपुडा झाला, ती सर्व दृष्टींनी आपल्याला अनुरूप आहे का? तिचा स्वभाव आपल्या स्वभावाशी जुळणारा आहे का? हल्लीच्या कठीण परिाqस्थतीत सगळ्या दृष्टीने आपण एकमेकांना समजून घेऊ शवूâ का? हे लग्न टिकेल का? अशा अनेक प्रश्नांचा भुंगा मयंकच्या डोक्यात भुणभुणत होता. त्यामुळे बाईकवरून जाताना त्याचं मन मध्येच विचलित होत होतं. कांदिवलीला तर चक्क एक सिग्नल तोडून तो पुढे निघून गेला. नशीब बलवत्तर म्हणून अपघात वगैरे झाला नाही; पण वाहतूक
पोलिसाचं त्याच्याकडं लक्ष गेलं आणि त्यानं मयंकच्या बाईकचा नंबर टिपून घेतला. मयंक पुढं गेला खरा, पण आता या प्रश्नाला कसं तोंड द्यायचं, याबद्दल त्याच्या डोक्यात विचारांचं थैमान सुरू झालं.
पोलीस आता आपला पाठलाग करतील, या भीतीनं तो आणखीच वेगाने निघाला. जेमतेम एक किलोमीटर तो गेला असेल-नसेल, तेवढ्यात एका विचित्र अडथळ्यामुळं त्याची पंधरा मिनिटं वाया गेली. त्या भागातला स्थानिक खासदार गोविंदा, यानं तिथल्या झोपडपट्टीवाल्यांचा मोर्चा काढला होता. अनधिकृत झोपड्या
पाडण्याच्या सरकारच्या मोहिमेचा निषेध करण्याकरिता हा जंगी मोर्चा निघाला होता. गंमत म्हणजे गोविंदानं – सत्ताधारी पक्षाच्या खासदारानंच – हा मोर्चा काढला होता. केवढा विरोधाभास होता हा!
मोर्चा जाईपर्यंत मयंकला थांबावं लागलं. त्यामुळं मयंकला थोडीशी उसंतही मिळाली, पण भावी पत्नी रेवा आणि त्याचा साहेब राममूर्ती, यांच्याबद्दलच्या विचारांची साखळी मात्र त्याच्या डोक्यात चालूच होती. मोर्चा गेल्यानंतर मयंकचा प्रवास पुन्हा सुरू झाला. मात्र आता त्याला प्रत्येक सिग्नलला थांबावं लागलं. आज
सगळ्या सिग्नलनी जणू काही त्याच्याविरुद्ध कटच केला होता. त्याची बाईक सिग्नलजवळ पोचली रे पोचली की, सिग्नलचा दिवा एकदम लाल व्हायचा! आज त्याला सगळं दान उलटंच पडत होतं.
प्रत्येक सिग्नलला थांबल्यावर न चुकता बाईकच्या आरशात तो आपली छबी न्याहाळत होता. स्वत:च्या दिसण्याबाबत मयंक जरा अधिकच जागरूक होता. बाईकवरून जाताना काही वेळातच एकदम मयंकला अनामिक बेचैनी जाणवू लागली. मग त्याच्या लक्षात आलं की, आपल्या घशाला कोरड पडली आहे. शरीरातलं पाणी कमी झाल्यासारखं वाटत आहे. त्यात वाटलं, आज उगीचच अशी भीती का वाटते आहे? मग त्याच्या लक्षात आलं की, तो घामानं डबडबला आहे. खरं तर अजून बारादेखील वाजले नव्हते; पण तापमान ३९० सेंटिग्रेड असावं. दमटपणाही खूपच वाढला होता. आधीच तो अस्वस्थ अवस्थेत प्रवास करीत होता.
शिवाय घामानं संपूर्ण डबडबला होता. त्यामुळे त्याला सगळं नकोसं वाटत होतं. जाम वैतागला होता मयंक!
जोगेश्वरी क्रॉसिंगजवळ पोचल्यावर मयंकला एकदम एका इंग्रजी दैनिकातवाचलेली बांद्रा-वरळी सी- कविषयीची बातमी आठवली. त्याच्या मनात एकदमक विचार चमवूâन गेला– असाच एखादा पूल बोरिवली-अंधेरी दरम्यान समुद्रावर बांधण्याचा विचार कोणी केला तर? त्यामुळे उपनगरातली वाहतूक अतिशय
सुरळीत होईल आणि लोकांचा वेळही वाचेल. मयंकला वाटलं, व्वा! मुंबईची प्रचंड रहदारीची समस्या सोडवण्याची काय मस्त शक्कल सुचली आपल्याला! स्वत:वर भलताच खूश झाला तो, पण क्षणभरच. कारण सिग्नल लागला म्हणून तो उभा होता, पण सिग्नल पडल्यावरही तो आपल्याच नादात राहिल्यानं, पाठीमागच्या वाहनचालकांचे हॉर्न त्याला ऐवूâ आले.
No comments:
Post a Comment