उपोद्घात
थंड वाNयाची एक मंद लाट हळुवारपणे त्या विस्तीर्ण पठारावर पसरत गेली आणि त्या लाटेवर आरूढ होत एक रंगीत पुâलपाखरू अवकाशात अलगद तरंगू लागले. त्या इवल्याशा कीटकामध्ये विलक्षण चैतन्य होते. वाNयाशी छचोरपणा करत कधी ते खोलवर सुरकांडी मारायचं तर दुसNयाच क्षणी वर झेपावत हवेत एक सुंदर वर्तुळ रेखाटायचे. त्याची ती लयबद्ध होणारी हालचाल खरोखरच विलोभनीय होती. नाजूक सौंदर्याचा तो एक अप्रतिम नमुना होता.
पुâलपाखराचे पंख गडद पिवळ्या रंगाचे होते व त्यावर काळ्या रंगाची नक्षीदार जाळी होती. त्या दुर्गम प्रदेशात इतवंâ सुंदर पुâलपाखरू सापडणं दुरापास्त होते. म्हणूनच की काय त्या पाखराला नावही आगळंवेगळंच दिलेलं होते. पॅपिलिओ पॅनोप्टस. नेत्रसुखद पुâलपाखरू.

घर, धान्याचं कोठार, इमारत काही काही नव्हते. गच्च दाबून बसवलेली ओल्या मातीची टेकाडंच फक्त नुकत्याच संपवलेल्या ताज्या कामाची साक्ष देत होती. पण पुâलांच्या गर्द ताटव्याखाली झाकली गेलेली ती टेकाडंदेखील दृष्टीस पडणं धड कठीण झालं होतं.
इतका दूरचा प्रवास करूनही, त्या पुâलपाखराने पुâलांकडे मात्र साफ दुर्लक्ष केलं होतं. पुâलांमधले सुगंधित परागकण शोषण्याच्या विंâवा पुâलांमधला रसाळ मकरंद चाखण्याचा त्याने जराही प्रयत्न केला नव्हता. उलट हवेमध्ये उंच उंच उडण्याकडेच त्याचा कल दिसत होता. जणूकाही त्याला हवी असलेली ऊर्जा त्या हवेमधूनच त्याला मिळत होती.
आणि अखेर शिशिरातल्या त्या फिकट आभाळाखाली चमचमणाNया एका पिवळ्या झेंड्यावर ते विसावलं. मात्र थांबतानाही त्याने एखाद्या सुवासिक जांभळ्या पुâलाची निवड केली नव्हती. पठाराला एका भव्य, उत्तुंग पर्वताने वेढलं होतं व त्या डोंगरातून उगम पावलेले अनेक निर्झर वाहात वाहात माळरानापर्यंत पोहोचले होते. पण पुâलपाखरानं त्यातलं मधुर जल एकदाही प्यायलं नाही. एक चौरस किलोमीटर परिमितीच्या त्या खास बांधलेल्या वुंâपणाबाहेर ते विंâचितही भरकटलं नाही. रंगीत शेतावरून भिरभिरण्यातच ते संतुष्ट राहिलं. दिवसांमागून दिवस आणि रात्रींमागून रात्री, तो एवढासा जीव काहीही न खाता-पिता अविश्रांतपणे, अखंड उडत राहिला.
सात दिवसांनी ‘नशी’ नावाचं झंझावती वादळ अचानक अवतरलं. प्रचंड वेग आणि ताकद असलेल्या त्या घोंघावणाNया वाNयाच्या आवाजाने अवघ्या कडेकपारी दणाणून गेल्या. त्या तुफानाचा तडाखा इतका जबरदस्त होता की, वाटेत येणाNया प्रत्येकाची धूळदाण उडवत ते तितक्याच बेफामपणे पठारावर
आदळलं. त्या इवल्याशा जीवामध्ये इतक्या मोठ्या निर्दयी वादळाशी मुकाबला करण्याची ताकद कुठून असणार? वुंâपणाभोवती गोलाकार पेâNया मारून ते आधीच दुर्बल झालं होतं. वाNयाच्या एका भोवNयाने त्याला अल्लद उचललं, गरागरा फिरवलं आणि जमिनीवर भिरकावून दिलं. पुâलपाखराच्या नाजूक देहाच्या
ठिकNया उडाल्या.
गस्त घालणाNया एका सैनिकाला धुळीमध्ये पिवळं काहीतरी चमकताना दिसलं व त्याने जीप थांबवली. पायाच्या घोट्यापर्यंत वाढलेल्या गवतावर गुडघे टेकवत तो सावधपणे ती आकृती निरखू लागला. असं पुâलपाखरू त्याने यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं. पहिली गोष्ट म्हणजे ते आकाराने चांगलंच मोठं होतं. त्याचे पंख कडक होते व त्याच्या रेशमासारख्या मुलायम त्वचेतून कागदाइतक्या पातळ धातूचे तुकडे बाहेर डोकावत होते. त्याची दुभागलेली लुसलुशीत छाती, एका हिरव्या तारेने जोडलेली होती. मनाच्या गोंधळलेल्या अवस्थेत त्याने ते पुâलपाखरू उचललं व त्याची तो काळजीपूर्वक तपासणी करू लागला. स्वत:ला तो आधी एक अभियंता मानत होता व मग एक सैनिक. तेही काहीशा नाखुशीनेच. त्याने जे काही पाहिलं होतं, त्यामुळे तो पार हादरून गेला होता. पुâलपाखराच्या छातीत एक अॅल्युमिनियमची इटुकली पेटी होती. त्या पेटीत
एक बॅटरी लपवलेली होती. बॅटरीची लांबी व एवूâण आकार जेमतेम तांदुळाच्या दाण्याएवढा असेल. ती बॅटरी एका मायक्रोवेव्ह ट्रान्समीटरला जोडलेली होती. त्याने पुâलपाखराच्या नाकाजवळचा भाग आपल्या अंगठ्याच्या नखाने खरवडला. त्याच्या हातात एकदम केसाएवढ्या तंतूसदृश वायर्सचा एक पुंजकाच आला. नाही... शक्य नाही, तो स्वत:शीच पुटपुटला. छे. असं नाही होऊ शकत.
निदान इतक्या लवकर तर नाहीच नाही. तो आपल्या जीपच्या दिशेने धावत सुटला. त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. तो मनाला समजावत होता. उलटसुलट तर्वâ लढवत होता. पण मनाला काहीच पटत नव्हतं. दगडाला ठेचकाळल्याने, त्याचा तोल गेला व तो मातीत कोलमडला. मात्र दुसNयाच क्षणी त्याने स्वत:ला सावरलं. तो उठून उभा राहिला आणि वेगाने जीपकडे जाऊ लागला. आता प्रत्येक मिनिट महत्त्वाचं
होतं.
जीपमध्ये बसून आपल्या बॉसला फोन करताना, त्याचा हात अक्षरश: थरथरत होता.
‘‘त्यांनी आपल्याला शोधून काढलंय.’’
No comments:
Post a Comment