Thursday, 31 October 2013

डोंगरी ते दुबई

दाऊदचा परिचय : थेट मुलाखत

१९९० नंतरच्या दशकात भारतात दोन घटना घडल्या. त्यामुळे मुंबईतील टोळीवाल्यांच्या दादांचे दैवच बदलून गेले. जेव्हा मी मुंबईतील गुन्हेगारी जगातील या टोळीवाल्यांच्या दादांवरती लिहीत होतो, त्या वेळी दाऊदने भारत सोडून सुमारे दहा वर्षे झाली होती. माझ्या लिहिण्याआधी तीन वर्षांपूर्वी मार्च १९९३मध्ये मुंबईत झालेल्या स्फोटामागचा मुख्य सूत्रधार म्हणून दाऊदचे नाव प्रसिद्धीस आले. त्या वेळचे पंतप्रधान नरसिंह राव यांनी भारतालालायसेन्स राजमधून मुक्त करण्याचे ठरवले आणि भारतीय अर्थकारण मुक्त होण्याची क्रिया सुरू झाली. जेव्हा भारतात अशा प्रकारच्या सुधारणा सुरू झाल्या, तेव्हा विविध आर्थिक संधीचा नुसता महापूर आला. या संधीतून होणारा लाभ प्रथम अचूक जोखला तो निरनिराळ्या टोळ्यांच्या दादांनी! त्या वेळी ते बॉलिवूडमधील जगात गुंतले होते.

मग एकदम जागांच्या व्यवहारात अफाट पैसा निर्माण होण्याची क्षमता निर्माण झाली. आता मुंबईतील बंद  डलेल्या गिरण्यांच्या जागा विकण्यासंदर्भात लोक बोलू लागले. त्या वेळी मुंबईतील गिरण्या एकामागोमाग एकेक बंद पडत होत्या. यातून नवीन इमारतींना भरपूर जागा उपलब्ध होऊ शकत होती. या जागांच्या आधारे जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार, बिल्डरांच्या इमारतींच्या योजना असे उद्योग पुढे येणार होते. त्याभोवती आता हालचाली सुरू झाल्या. त्या वेळी मुंबईत निरनिराळ्या टोळ्यांचे दादा अस्तित्वात होते. त्यात अरुण गवळी होता. त्याने बराच काळ तुरुंगात काढला होता. आश्विन नाईक हा दादा फरारी झाला होता. दाऊद हा दुबईला जाऊन तेथून आपला मुंबईतील व्यवसाय रिमोट वंâट्रोलद्वारे चालवत होता. अनीस इब्राहिम हा दाऊदचा भाऊही व्यवसायाला हातभार लावत होता. अबू सालेम पळून गेलेला होता. दाऊदच्या टोळीतून छोटा राजन हा पुâटून निघाला होता आणि तो स्वत:लाएक हिंदू डॉनअसे म्हणवून घेत होता. ते दोघेही एकमेंकाविरुद्ध सूडाची भाषा बोलत होते

त्यांच्या भांडणाच्या दरम्यान ते एकमेकांच्या व्यवसायातील साथीदारांवरती भर दिवसा तुटून पडत होते. त्या वेळीईस्ट वेस्ट एअरलइन्सनावाची विमान वंâपनी होती. आता ती अस्तित्वात नाही. त्या विमान वंâपनीचा प्रमुख थकियुद्दीन वाहिद याचा खून या भांडणात केला गेला, तर ओमप्रकाश कुकरेजा या बिल्डरचा खून नंतर केला गेला. ज्या पद्धतीने धडाधड खुनांची संख्या वाढत होती, ते पाहून पोलीस शरमिंदे होत होते. ही परिस्थिती पाहून पोलीस कमिशनरने तर असे सुचवले की, आता लोकांनी सरळ हॉकी स्टिक्स हातात घेऊन आपले संरक्षण करावे. गुन्हेगारी जगातल्या बातम्या या काळात देणे ही एक फार मोठी महत्त्वाची गोष्ट होऊन बसली होती.

माझ्या आधीच्या पिढीने दाऊदचाडॉनम्हणून उदय होताना पाहिला होता. मी फक्त मुंबईतील अशा डॉन मंडळीचा बीमोड होताना पाहिले. त्याबद्दलच्या कथा लिहिताना मी माझ्या लिखाणात त्या दादांवरती तुटून पडत होतो, त्यांच्या रहाण्याच्या जागांचे उल्लेख करीत होतो आणि त्यांच्या पसरलेल्या जाळ्यांचे वर्णन करीत होतो.

त्यांच्या आवडीनिवडी, त्यांनी ठेवलेल्या बायका, त्यांचे भडक पद्धतीने जगणे, त्यांचे बॉलिवूडवर असलेले नियंत्रण आणि स्थावर जंगम, प्रॉपर्टीच्या व्यवहारात होणारी त्यांची लुडबूड, असे मी सर्वकाही उघड करीत होतो. अशा दादा मंडळींना मी अनेकदा स्वत: जाऊन भेटत होतो त्यांच्या तोंडून विविध कथा ऐकत होतो आणि त्या प्रसिद्धही करीत होतो. दगडी चाळीत राहणारा दादा अरुण गवळी याची औरंगाबादच्या हर्सुल तुरुंगात जाऊन मी भेट घेतली होती. मी छोटा राजनशीही बोललो होतो. छोटा राजन हा एके काळी दाऊदच्या टोळीत होता. नंतर तो आग्नेय आशियातील एका देशात जाऊन लपून बसला होता. नंतर मी दाऊदच्या छोटा शकीलचीही गाठ घेतली होती. अन् अबू सालेम आश्विन नाईक यांनाही मी भेटलो होतो. परंतु जो मुंबई सोडून परदेशात गेला तरीही आपल्या कृत्यांनी मुंबईवर दूरवरून वर्चस्व ठेवू पहात होता, अशा दाऊदची मुलाखत घेतल्याशिवाय माझे गुन्हेगारी जगावरील लिखाण पुरे होऊ शकणार नव्हते.

तोपर्यंत अनेक जण दाऊदवर लिहू लागले होते; पण ते सर्व जण दाऊदशी थेट संपर्वâ साधू शकत नव्हते. दाऊदने १९९३पूर्वी पत्रकारांना जरी मुलाखती दिल्या होत्या, तरी १९९५नंतर दाऊदचा प्रसारमाध्यमांशी संपर्वâ राहिला नव्हता. जणूकाही प्रसारमाध्यमांच्या रडारावरून दाऊद अदृश्य झाला होता. एव्हाना दाऊद कराचीत स्थायिक झाल्याचे समजले होते; पण त्याच्याशी फोनवरचा संपर्वâ होणे हे जवळजवळ अशक्य होऊन बसले होते.

मग मी दुसरा एक मार्ग अवलंबायचे ठरवले. मुंबईतील छोटा शकीलच्या जाळ्याजवळ जाण्याचा प्रयत्न मी करू लागलो. हे जाळे हवाला ऑपरेटर, गँग मॅनेजर्स आणि अन्य कोणी संपर्कातील व्यक्ती यांनी बनवलेले होते. काही महिन्यांतच माझ्या प्रयत्नांना यश आले आणि मी छोटा शकीलशी हाय  इनवरून थेट संपर्वâ साधणारा पहिला पत्रकार ठरलो. दाऊदशी थेट मुलाखत मला मिळवून द्या, म्हणून मी शकीलला गळ
घातली. ‘टी-सीरीजच्या म्युझिक वॅâसेट्स काढणारा प्रसिद्ध गुलशन कुमार याची हत्या अबू सालेमकडून झाली. त्या वेळी तो स्वत:ची टोळी स्वतंत्रपणे चालवीत होता; पण या हत्येचा दोष दाऊदकडे जाऊ नये, असे छोटा शकीलला वाटले. कारण यात दाऊदचा हात नव्हता, फक्त सालेमच त्या हत्येला जबाबदार होता. म्हणून शेवटी दाऊद इब्राहिम मला मुलाखत देण्यास तयार झाला. मग मुलाखतीसाठी काही अटी  च्याकडूनच पुढे करण्यात आल्या. पहिली म्हणजे ती मुलाखत जशीच्या तशी प्रसिद्ध करायची. त्यात कोणतीही काटछाट विंâवा बदल करायचा नाही. दुसरी अट ही, जो कोणी मला दाऊदशी संपर्वâ साधून देईल त्याच्याशी मी नंतर कधीही संपर्वâ ठेवता कामा नये.

 मुलाखतीची एवढी विंâमत मला चुकवायलाच हवी होती. कसे काय ते घडले याची हकिगत अशी आहे. मला दिलेल्या सूचनांनुसार मी निरोप येईपर्यंत शांतपणे वाट पहात बसायला हवे होते. जेव्हा दाऊदला सोयीचे वाटेल तेव्हाच तो आपण होऊन मला निरोप पाठवणार होता. त्यानंतर बरेच दिवस उलटले. पण आउटलुकया मासिकाने दाऊद हा जनतेचा शत्रू क्र. कसा आहे, यावर एक लेख प्रसिद्ध केला. हा लेख दाऊदला चांगलाच झोंबला. इतका की, त्याने आपली माणसे आउटलुकच्या ऑफिसात राडा करण्यासाठी सोडली. त्यांनी तेथे जाऊन विध्वंसक कृत्ये केली पार धुमावूâ घातला. परंतु कोणाही व्यक्तीला विंâचितही दुखापत केली नाही. मग एक-दोन दिवसांतच माझा पेजर वाजला. मला त्यावर निरोप दिला गेला की, अमुक एका स्थानिक फोन नंबरवरती संपर्वâ साधावा. त्या वेळी मी एका रिक्षात बसून कलिना येथे चाललो होतो. मी रिक्षा थांबवून जवळच्या एका रेस्टॉरन्टमध्ये गेलो तिथल्या फोनवरून तो स्थानिक नंबर फिरवला. पलीकडून कोणीतरी मला फोन खाली ठेवून दोन मिनिटे थांबण्यास सांगितले. थोड्याच कालावधीत त्या क्रमांकावर माझ्यासाठी फोन आला.


जो कोणी पलीकडून बोलत होता तो अत्यंत सभ्यपणे अदबशीरपणे बोलत होता. जसे काही एखादा उच्चभ्रू लखनवी माणूस बोलावा, तसे त्याचे बोलणे होते. मला याचे आश्चर्य वाटले. याचा अर्थ या दादानेडॉनने शेवटी कोणीतरी सुसंस्कृत माणूस फोन घेण्यासाठी ठेवला होता. एवढे त्याला आदबशीरपणाचे व मॅनर्सचे महत्त्व कळले असावे. बोलणारी व्यक्ती खानदानी उर्दूमध्ये बोलत असल्याने मीही उर्दूतच बोलणे सुरू केले. मी विचारले, ‘‘जनाब,  आपका इसमे गेरामी?’’  

Saturday, 26 October 2013

श्रीमान योगी

शिवनेरी पायथ्याचे जुन्नर गाव पश्चिमेकडे झुकलेल्या सूर्याच्या तिरप्या किरणांत उठून दिसत होते. जुन्नरपासून थोड्या अंतरावर असलेल्या आंबराईत शहाजीराजांचे घोडदळ थांबले होते. एका डेरेदार आम्रवृक्षाखाली शहाजीराजे छोट्या संभाजीसह उभे होते. दुपार टळत येऊनही अद्याप वारा सुरू झाला नव्हता. झाडाचे पानही हलत नव्हते. रात्रीची थंडी उतरायला अजून सुरुवात झाली नव्हती. आंबराईतून दिसणाNया
रस्त्याकडे उभयतांचे सारखे लक्ष जात होते. कोणी दृष्टिपथात येत नव्हते. वाढत्या क्षणाबरोबर शहाजीराजे अधिक अधिक अस्वस्थ होत होते.

‘आबासाहेब, मासाहेब आल्या.’ शंभूराजे म्हणाले . 
‘कुठं?’ मान वर करीत शहाजीराजे विचारते झाले.

शंभूबाळांनी बोट केलेल्या दिशेकडे शहाजीराजांनी पाहिले. तिरप्या सूर्यकिरणांत धुळीचे लोट उडवीत येणारे अश्वपथक दिसत होते. हळूहळू टापांचा आवाज स्पष्टपणे ऐवूâ येऊ लागला. आंबराई नजीक येताच येणाNया पथकाची गती मंदावली. घोडी थांबली. तीन घोडी मंद गतीने पुढे येऊ लागली.

घोडदौडीने थकलेल्या जिजाबाईच्या चेहNयावर संभाजीला पाहून क्षीण हास्य उमटले. जिजाबाई दासीच्या आधाराने पायउतार झाल्या. श्रमाने सारा चेहरा लालबुंद झाला होता. नेत्र आरक्त दिसत होते. तीन मासांच्या गर्भार जिजाबार्इंनी आपला घाम टिपला. पदर सावरून त्या शहाजीराजांच्या सामोNया आल्या. 

‘अशी ठायी ठायी थांबत आम्ही दौड करीत राहिलो, तर तुमच्या बापाच्या हाती सापडण्यास फार वेळ लागायचा नाही.’

‘तेच सांगणार होते मी!’
‘मतलब?’ शहाजीराजांनी विचारले.
‘आपण पुढं जावं.’
‘आणि तुम्ही?’
‘पुढचा प्रवास झेपेल, असं वाटत नाही.’
‘मग अशा आडवाटी आपल्याला टावूâन...’
‘जवळच आपले व्याही विश्वासराव आहेत. त्यांच्याकडे थांबता येईल मला.
आपण सुखरूप, तर आम्ही सुखरूप. क्षणाच्या अवधीला सुद्धा फार मोल आहे...’
शहाजीराजे एकदम संतापाने उफाळले, ‘हा आपल्या वडिलांचा प्रताप आहे.
त्याला आम्ही काय करणार? जाधवांचं आणि भोसल्यांचं वैर पिढ्यान् पिढ्या चालवायला आम्हीही समर्थ आहोत, म्हणावं.’
‘मी काय बोलणार यात?’ जिजाबाई बोलून गेल्या.
‘तुम्ही म्हणता, तसं करू. तुमच्या बापाला रक्ताची लाज असेल, तर तो तुम्हांला सोडून देईल, अथवा पळवून नेईल. तुमचं नशीब आणि तुम्ही. आम्हांला जास्त विचार करायला आता उसंत नाही. बोला, हे ठरलं?’
आपले अश्रू कष्टाने आवरून, काही न बोलता जिजाबाई आपल्या घोड्याकडे वळल्या. जुन्नरला खबर गेली. शहाजीराजांचे व्याही विजयराव सिधोजी विश्वासराव खुद्द सामोरे आले; जिजाऊ आणि शहाजी यांना सन्मानाने आपल्या वाड्यात घेऊन गेले. वाड्यात बैठकीवर जाताच शहाजीराजे म्हणाले,

‘विश्वासराव, नाइलाजानं तुम्हांला ही तकलीफ देत आहो. त्याबद्दल आम्ही शरमिंदे आहो.’
‘राजे, असं बोलू नका. आपल्या कामी येण्याची संधी नशिबानं मिळाली, असं आम्ही समजतो. जिवाच्या बाजीनं आम्ही राणीसाहेबांची कदर करू.’
‘तो विश्वास नसता, तर आम्ही आलोच नसतो, आम्हांला आता थांबता येणार नाही. शंभूराजे, चलायचं ना? का राहणार?’
जिजाऊंची नजर चुकवीत शंभू म्हणाला, ‘आम्ही येणार.’
‘शाबास!’ शहाजीराजे म्हणाले.
‘थोडे दिवस बाळ राहिल्यावर आणि सर्व सुखरूपपणे पार पडल्यावर बाळाला पाठविला, तर नाही का चालणार?’ जिजाऊ म्हणाल्या.
‘ऐका, विश्वासराव. बाळाला धोका आहे, आणि आम्हांला नाही.’ 
‘तसं म्हटलं नाही मी.’ जिजाबाई गडबडीने म्हणाल्या.
‘आम्ही शंभूबाळांना नेणार. त्यांच्याकडून फार मनसुबे पार पाडायचे आहेत,
राणीसाहेब. आपल्यासाठी आम्ही बाळकृष्ण हनुमंते, संक्रोजी नीळवंâठ, सोनोजीपंत, कोरडे ही मंडळी ठेवून जात आहोत. थोडी शिबंदीदेखील आहे. आम्ही स्थिरस्थावर झालो, की तुम्हांला घेऊन जाऊ. तब्येतीला सांभाळा.’

शंभू जिजाऊंच्या पाया पडण्यासाठी वाकताच जिजाऊंनी त्याला उराशी कवटाळला. शंभू बाळाने त्या मिठीतून सुटका करून घेतली. जिजाऊंना शब्द पुâटत नव्हता. त्या शंभूचे रूप डोळ्यांत साठवीत होत्या. डोळे भरताच तेही रूप अस्पष्ट झाले. जेव्हा डोळे पुसले, तेव्हा शहाजीराजांच्याबरोबर शंभू वाड्याबाहेर पडत होता- एकदाही
मागे न पाहता. 

जिजाऊंनी उभ्या जागी डोळ्यांना पदर लावला. विश्वासरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई सदरेवर येऊन, जिजाऊंना हाताशी धरून आत घेऊन जात होत्या. पण आत जात असताही बाहेर उठणारा घोड्यांच्या टापांचा आवाज कान थोपवू शकत नव्हते.

जुन्नरवर रात्र उतरली. घराघरांतून समया, पलोते पेटवले गेले. गावाच्या देवडीवरची दिवटी वाNयाने फरफरत होती. गावाच्या नजरेत नुकतीच झोप उतरत होती... आणि अचानक जुन्नरच्या चारी वाटांनी घोड्यांच्या टापांचा खडखडाट उठला. सारा गाव भयचकित झाला. गावाची झोप उडाली.

विश्वासराव नुकतेच जेवण करून सदरेवरच्या झोपाळ्यावर बसले होते. सदरेवरच्या भिंतींवर टांगलेली शध्Eो पलित्यांच्या उजेडात चमकत होती. टापांचा आवाज कानांवर येताच विश्वासराव चटकन उभे राहिले. त्यांचे लक्ष दरवाज्याकडे वळले... 

आणि त्याच वेळी दरवाज्यातून जासूद धावत आला. 

‘घात झाला! लखुजी जाधवरावांनी सारा गाव वेढलाय्. ते इकडंच येत आहेत.’
‘चांगल्या मुहूर्तावर आले..’ म्हणत विश्वासरावांनी सदरेवरची तलवार उचलली.

विश्वासरावांनी चार पावलांत दरवाजा गाठला; आणि सामोरे लखुजी जाधवराव आले. लखुजींच्या हाती तळपती तलवार होती. चेहNयावर त्वेष होता.

‘कुठं आहे तो भोसला?’ लखुजी गर्जले.
‘प्रथम तलवार म्यान करावी, आणि आत यावं...’ विश्वासरावांनी सांगितले.
‘मुकाट्यानं वाट सोड.’ लखुजी म्हणाले.
शांतपणे विश्वासराव म्हणाले, ‘सज्जनांच्या घरात नागव्या तलवारीने प्रवेश करता येत नाही.’
लखुजी तेथेच थबकले. संतापाने त्यांचे पांढरे कल्ले थरथरले. पुन्हा त्यांनी तोच प्रश्न केला,
‘कुठं आहे तो भोसला?’
‘ते इथं नाहीत.’
‘दडला असेल.’
‘दडून बसण्याइतकी भोसल्यांची कुळी अजून नामर्द झाली नाही.’
छद्मीपणाने हसत लखुजी म्हणाले, ‘पळून जाण्याइतपत झालेली आहे?’
विश्वासरावांचा संयम सुटला. ते म्हणाले,
‘खबरदार, जाधवराव! फार ऐकलं. हे भोसल्यांच्या व्याह्यांचं घर आहे. इथं भोसल्यांचा उपमर्द ऐकला जात नाही.’
‘हं:! अर्ज करीत नाही मी.’ लखुजी त्वेषाने समशेर उचलीत म्हणाले, ‘हाती समशेर आहे. हो बाजूला.’
क्षणात विश्वासरावांनी आपली तलवार झटकली. सरकन म्यान चौकात पडले आणि विश्वासरावांच्या हाती तलवार तळपू लागली.

‘ही हिंमत!’ म्हणत लखुजीरावांनी तलवार उचलली, तोच आवाज झाला, ‘आबा!’ त्या आवाजाबरोबर लखुजीरावांची नजर वळली. सदरेच्या सोप्यावर जिजाबाई उभ्या होत्या. पलोत्याचा उजेड अध्र्या चेहNयावर पडला होता. लखुजींचा हात खाली आला. विश्वासरावांनी वाट दिली, तरी लखुजींना पाऊल उचलण्याचे सामथ्र्य नव्हते.

जिऊ! केवढ्या आठवणी त्या नावाबरोबर साठवल्या होत्या! लखुजींची लाडकी लेक, जाधवरावांच्या घरची साक्षात लक्ष्मी! ही भोसल्यांच्या घरात गेली आणि जाधवांची कोण दुर्दशा उडाली...

लखुजींच्या हातातील तलवार गळून पडली. भ्रमिष्टासारखे ते पुढे सरकत असता, त्यांचे ओठ पुटपुटत होते. सारे बळ एकवटून ते बोलले, 

‘जिऊऽऽ’
‘आबा!’ म्हणत जिजाबाई पायNया उतरल्या आणि चौकाच्या मध्यभागी आलेल्या लखुजीरावांना त्यांनी मिठी मारली. दोघांच्या पाठीवरची बोटे एकमेकांना समजावीत होती. उभयता सदरेवर आले. लखुजीराव सदरेच्या बैठकीवर बसले, विश्वासराव पुढे होऊन पाय शिवत म्हणाले, ‘मामासाहेब, क्षमा करा.’

‘व्वा, विश्वासराव! क्षमा कसली मागता? उलट, तुमची तडफ पाहून आम्हांला आनंद झाला. भोसल्यांच्यामध्ये नसले, तरी भोसल्यांच्या आप्तस्वकीयांमध्ये वाघ आहेत, हे पाहून आम्हांला आनंद वाटतो.’

आपल्या बोलण्यावर खूश झालेले लखुजीराव मोकळेपणाने हसले; आणि आपण एकटेच हसतो आहोत, याची जाणीव होऊन हसता-हसता थांबले. जिजाबार्इंना जवळ घेत ते म्हणाले,

‘पोरी, तुझं बरं आहे ना?’ 
‘बरं! काय विचारता, आबा?’ बोलता-बोलता जिजाबाई थांबल्या.
लखुजीराव म्हणाले, ‘बोल ना, पोरी. थांबलीस का?’
जिजाबार्इंनी वडिलांच्या नजरेला नजर भिडवली. एक वेगळेच दु:ख उन्मळून उठले. कळायच्या आत त्या बोलून गेल्या,
‘पोरीची जात म्हणजे हळदी-बुक्क्याची. कुणीही उचलावी आणि कुणाच्याही कपाळ केव्हाही चिकटवावी. रंगपंचमीच्या दरबारात तुमच्या जिऊची हळद अशीच उधळलीत. अजून ती वाNयावर फिरते आहे.’
‘वाNयावर का?’ लखुजी गर्जले. ‘या लखुजी जाधवाची वूâस इतकी वारेमोल केव्हापासून झाली? त्याला बायकोचा भार वाटत असेल. मला माझी पोर जड नाही.’
‘पोरीवर एवढी माया आहे, तर हा दावा कसला? कुणाबरोबर? हा दावा साधला आणि तुमच्या पोरीचं कपाळ उघडं पडलं, तर बरं वाटेल तुम्हांला? आबा, ह्या जिऊची तुम्हांला शपथ...’

लखुजीरावांनी एकदम जिजाबार्इंना जवळ ओढले. त्यांच्या तोंडावर हात ठेवीत भरल्या आवाजात ते म्हणाले,
‘नको, पोरी, बोलू नको! शपथेत मला गुंतवू नको. जसं रक्त तुझ्यात गुंतलं, तसाच हा देह जाधवरावांच्या कुळीला बांधला गेला आहे. वैर! ते आता माझ्या टाळण्यानं टळत नाही. यातच मरण दैवास आलं. ते भोगणं एवढंच माझ्या हाती आहे. पोरी, माझा तुला आशीवार्द आहे. अखंड सौभाग्यवती हो! या बापाची काळजी करू नको. गेला, तरी दु:ख मानू नको.’

जिजाबाईच्या डोळ्यांतून पाणी निखळले. ते टिपत लखुजीराव म्हणाले, ‘रडू नको, पोरी! ऐक माझं. चारी बाजूंना बघ. दुष्काळी मुलूख. माणसाला माणूस ओळखत नाही. एक शाही स्थिर नाही. चौपेâर बंडाळी उसळली आहे. अशा परिस्थितीत एकटी कशी राहणार तू? माझं ऐक! माझ्याबरोबर सिंदखेडला चल.

ते तुझंच माहेर आहे. सगळं ठीक झाल्यावर, म्हणशील तिथं राहा.’ नकारार्थी मान हलवीत जिजाऊ म्हणाल्या, ‘नको, आबा, मी जाधवांची माहेरवाशीण असले, तरी भोसल्यांची सासुरवाशीण आहे. माहेर विसरायला हवं मला. अशा परिस्थितीत माहेरी आले, तर भोसल्यांच्या घराण्याशी बेइमानी होईल.’

नि:श्वास सोडून लखुजी म्हणाले, ‘एक कोडं सोडवायला गेलं, की दुसरं पडतं. पोटची पोर तू. अवघडलेली. नवNयानं सोडून दिलेली... आणि हा तुझा बाप, लखुजी जाधवराव नुसतं पाहण्याखेरीज काही करू शकत नाही.’ 

Friday, 25 October 2013

परीघ

`आलद हळ्ळी' म्हटलं की, कुणालाही हे गाव नेमवंâ कुठं आहे, हे लगेच लक्षात येत नाही. हे काही एवढं मोठं गावही नाही म्हणा! या गावात तशा कुठल्याच महत्त्वाच्या घटनाही घडलेल्या नाहीत. हासन जिल्ह्यात एक, जुन्या मैसूर संस्थानात एक अशी एक-दोन `आलद हळ्ळी' नावाची गावं आहेत म्हणा. पण हे गाव धारवाड जिल्ह्यात आहे. पण धारवाड जिल्ह्यातल्या नव्वद टक्के लोकांनाही हे ठाऊक नसेल.

गाव म्हटलं की, त्यात वडाचं झाड हे असतंच. वडाच्या झाडाभोवती पार बांधून गावातले लोक त्यावर बसून गप्पा मारतात. त्यामुळेच वडाच्या झाडाची प्रसिद्धी आहे की काय कोण जाणे! शिवाय वडाच्या झाडाशेजारी बेलाचं झाड लावून त्याभोवती प्रदक्षिणा घालणाNया बायकांची काही कमतरता नाही म्हणा! 

हुबळीहून शिग्गावी जाताना, गाव लागण्याआधी दहा किलोमीटरवर `गोटगोडवीय केरे' हे तळं येतं. हे तळं नेहमी पाण्यानं भरलेलं असलं, तरी उन्हाळ्यात त्यातलं पाणी बरंच कमी होतं. गणपती-उत्सवामध्ये त्यात लाल कमळं भरली की, ते परिपूर्ण वाटतं. हुबळीत रणरणतं ऊन असलं, तरी शिग्गावी मात्र सह्याद्रीलगतचा
`मलेनाडचा पदर' आहे. असंच पुढे गेलं की, हावेरी-राणेबिन्नूर हा सगळा देशाचाच भाग आहे. पुढे तुंगभद्रा नदी आडवी येते. पलीकडे हरिहर. हरिहर एका टोकाला असलं, तरी उत्तर कर्नाटकातल्या लोकांच्या दृष्टीनं हा मैसूर संस्थानाचा भाग. उत्तर कर्नाटकची सीमा या नदीच्या काठावरच संपते.

अलीकडे या नदीवर एक नवा आणि एक जुना, असे दोन-दोन पूल होऊन १९५६ सालापासून सगळा कर्नाटक एक प्रदेश झाला असला, तरी आजही कर्नाटकात `जुनं कर्नाटक', `उत्तर कर्नाटक', `निजाम कर्नाटक', `किनारपट्टीवरचा कर्नाटक' असा भेद राहिलेला आहे. अर्थात भेद नाही, असं जीवनच नाही म्हणा! 

तो तर निसर्गाचा नियमच आहे! शेजारच्या महाराष्ट्रातही याच प्रकारे कोल्हापूर-पुणेनागपूर असे भेद आहेत. लोकांच्या जगण्यात ही फारशी महत्त्वाची गोष्ट नसली, तरी राजकारणात याला भरपूर महत्त्व आहे. 

अधूनमधून हे असमाधान उसळून बाहेर येतं आणि ती वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठावरची बातमी होते. गोटगोडवीय केरेच्या उजवीकडे वळलं की, लागणारा कच्चा रस्ता `आलद हळ्ळी'ला जाऊन पोहोचतो. सुमारे तीस वर्षांपूर्वी शिरसीहून येणारी बस या मुख्य जंक्शनवर थांबायची. गावची माणसं सवारी, बैलगाडी जुंपून या जंक्शनवर यायची. या नाक्याला `गोटगोडवीय तिठा' म्हणायचे. शिवाय या कच्च्या रस्त्याला त्यांच्या भाषेत `अपरोचि रोड' असं नाव होतं. अलीकडे कर्नाटकाच्या दळणवळण खात्यानं आणि विद्युत खात्यानं या गावाला वीज आणि रस्ता द्यायची घोषणा केल्यामुळे आलद हळ्ळीलाही वीज येऊन पोहोचली आहे. शिवाय दररोज हुबळीहून तीन बसेस इथे येतात. त्यामुळे `गोटगोडवीय तिठा'चं महत्त्व कमी झालं आहे. 

या कच्च्या रस्त्यानं आठ किलोमीटर चाललं की, `आलद हळ्ळी'ला पोहोचता येतं. इथली लोकसंख्या आठ-दहा हजारांपेक्षा कमी आहे. `मलेनाडु'ला इथून सुरुवात होते, असं म्हणायला हरकत नाही. हमरस्त्यापेक्षा हा आतला रस्ता किती वेगळा आहे! दोन्ही बाजूला घनदाट आंब्याची आणि वडाची झाडं! पूर्वी इथे गोरे
राज्यकर्ते शिकारीसाठी यायचे म्हणे. धारवाडच्या कलेक्टरला हे निद्रित छोटं खेडं आणि इथलं जंगल का आवडलं, कोण जाणे! त्याने इथे एक अतिथीगृह बांधलं. 

ही सगळी माहिती या गावातली तोंडाची बोळकी झालेली वृद्ध मंडळी सांगतात. गावाबाहेर मोठं तळं आहे. या तळ्याच्या भोवताली वडाची झाडं आहेत. त्यांची रचना तळ्याला बांध घातल्यासारखी दिसते. तळ्याच्या त्या बाजूला अतिथीगृह आहे. तेही वडाच्या राईत आहे. वडाला कन्नडमध्ये `आल' म्हणतात. या वडाच्या राईमुळे या गावाला `आलद हळ्ळी' हे नाव पडलं असावं. `हळ्ळी' म्हणजे खेडंिं कवा गाव.

पण हेही काही खरं नाही. हे गाव तसं पुराण काळापासून प्रसिद्ध आहे.  महाभारत काळात पांडव अज्ञातवासासाठी इथे आले होते. हे मोठं तळं खोदून इथंच त्यांनी आपल्या वडिलांना िंपडदान केलं होतं. त्याशिवाय विजय नगरच्या काळी त्याचे संस्थापक व्यासराय यांनी इथे मारुतीची स्थापना केली. याची खूण म्हणजे इथल्या हनुमंताच्या शेपटीत असलेली घंटा, असं चंपक्का कानिटकर अधिकारयुक्त स्वरात सांगतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चंपक्कांशी वाद घालायचं धैर्य कुणामध्येही नाही!

इथल्या घनदाट वडांची झाडी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. मागे ब्रिटिशांच्या काळी कुणीतरी इथल्या त्या काळ्या घनदाट राईचं चित्रही काढून इथल्या अतिथीगृहाच्या ओसरीत टांगलं आहे. त्यावरून त्या काळी हे जंगल किती घनदाट असावं, याची कल्पना येते.

स्वातंत्र्य मिळाल्यावर काहीही उद्योग नसल्यामुळे झाडं तोडणाNयांची झळ आलद हळ्ळीलाही लागली आहे. इथले मोठाले वृक्ष कोसळले आणि गावकNयांच्या घरचं सरपण झालं. अलीकडे सरकारच्या नव्या पर्यावरणविषयक घोषणांना घाबरून ग्रामपंचायतीच्या लोकांनी पुढाकार घेऊन उरलेल्या राईला वुंâपण घालून `झाडं तोडण्यास मनाई आहे.' असा बोर्ड लटकवला आहे.

तरीही चोरून-मारून झाडं तोडण्याचा उद्योग या छोट्या खेड्यात चाललेला असतोच. कुNहाडीला कुठं बोर्ड वाचता येतो? आणि झाडांना तोंड कुठं आहे? गावाच्या मध्यभागी बसस्टॅन्ड असल्यामुळे काही जण हुबळी-धारवाडला महागडं घर भाड्यानं घेण्याऐवजी इथे घर करून रोज ये-जा करतात. इथं राहिलं की, शांत जीवन मिळतं. धुराचा त्रास नाही. त्यामुळे बNयाच सुशिक्षितांना इथं घर करणं, सोयीचं वाटतं. कारण इथलं हायस्वूâल धारवाडच्या केईबोर्डापेक्षा आणि हुबळीच्या लॅमिंगन हायस्वूâलपेक्षा चांगलं आहे. इथे शिकलेले अनेक विद्यार्थी बोर्डात आले आहेत. त्यात भीमण्णाची मुलगी मृदुला हीही एक.

इथं आधी केवळ कन्नड भाषेचे सातव्या इयत्तेपर्यंतचे वर्ग चालायचे. तेही गावकNयांनी सरकारच्या हाता-पाया पडून सुरू करायला लावले होते. त्यानंतर इथले विद्यार्थी पुढच्या शिक्षणासाठी शिग्गाव िंकवा हुबळीला जायचे. बाहेरच्या रस्त्यानं गेलं, तर सोळा-अठरा किलोमीटरवर शिग्गाव. पण आतल्या रस्त्यानं गेलं तर चिक्क बंडीगेरी-शिशुनाळ-गंजिकट्टीवरून गेलं की, केवळ आठ किलोमीटर अंतर पडतं. कितीतरी विद्यार्थी सकाळी न्याहारी करून सोबत डबा घेतात आणि हायस्वूâलला जातात. पुढे ही मुलं कॉलेजसाठी हावेरी िंकवा हुबळीलाही जातात. 

गाव म्हणजे एकुलती एक गल्ली. तिच्या दोन्ही बाजूला घरं आहेत. तीच मुख्य गल्ली. सगळ्या घरांची रचना सारखीच. शंभरपैकी नव्वद माणसं शेतकरी. त्यामुळे सुरुवातीला ओसरी, जवळच गुरांचा गोठा, नंतर माजघर, विस्तीर्ण स्वयंपाकघर, लहानशी खोली, परसात भाताची कणगी, गंजी, एखादा भोपळ्याचा वेल. मारुतीच्या देवळासमोर असलेल्या वडाच्या झाडाला बांधलेल्या झोपाळ्यावर मृदुला बसून झोके घेत होती. सामान्यत: श्रावण महिन्यात नागपंचमीच्या दिवशी मुली-बाळी नवे कपडे लेवून झोपाळ्यावर झोके घेताना दिसतात. आता, युगाधी म्हणजे गुढीपाडव्याला उन्हात कुणीही असा झोका खेळत नाही. पण मृदुलेला या कशाचीही पर्वा असल्याचं दिसत नव्हतं. ती निवांतपणे आपल्याच आनंदात झोके घेत होती.

`आलद हळ्ळी' म्हटलं की, कुणालाही हे गाव नेमवंâ कुठं आहे, हे लगेच लक्षात येत नाही. हे काही एवढं मोठं गावही नाही म्हणा! या गावात तशा कुठल्याच महत्त्वाच्या घटनाही घडलेल्या नाहीत. हासन जिल्ह्यात एक, जुन्या मैसूर संस्थानात एक अशी एक-दोन `आलद हळ्ळी' नावाची गावं आहेत म्हणा. पण हे
गाव धारवाड जिल्ह्यात आहे. पण धारवाड जिल्ह्यातल्या नव्वद टक्के लोकांनाही हे ठाऊक नसेल.

गाव म्हटलं की, त्यात वडाचं झाड हे असतंच. वडाच्या झाडाभोवती पार बांधून गावातले लोक त्यावर बसून गप्पा मारतात. त्यामुळेच वडाच्या झाडाची प्रसिद्धी आहे की काय कोण जाणे! शिवाय वडाच्या झाडाशेजारी बेलाचं झाड लावून त्याभोवती प्रदक्षिणा घालणाNया बायकांची काही कमतरता नाही म्हणा! 

हुबळीहून शिग्गावी जाताना, गाव लागण्याआधी दहा किलोमीटरवर `गोटगोडवीय केरे' हे तळं येतं. हे तळं नेहमी पाण्यानं भरलेलं असलं, तरी उन्हाळ्यात त्यातलं पाणी बरंच कमी होतं. गणपती-उत्सवामध्ये त्यात लाल कमळं भरली की, ते परिपूर्ण वाटतं. हुबळीत रणरणतं ऊन असलं, तरी शिग्गावी मात्र सह्याद्रीलगतचा
`मलेनाडचा पदर' आहे. असंच पुढे गेलं की, हावेरी-राणेबिन्नूर हा सगळा देशाचाच भाग आहे. पुढे तुंगभद्रा नदी आडवी येते. पलीकडे हरिहर. हरिहर एका टोकाला असलं, तरी उत्तर कर्नाटकातल्या लोकांच्या दृष्टीनं हा मैसूर संस्थानाचा भाग. उत्तर कर्नाटकची सीमा या नदीच्या काठावरच संपते. 

अलीकडे या नदीवर एक नवा आणि एक जुना, असे दोन-दोन पूल होऊन १९५६ सालापासून सगळा कर्नाटक एक प्रदेश झाला असला, तरी आजही कर्नाटकात `जुनं कर्नाटक', `उत्तर कर्नाटक', `निजाम कर्नाटक', `किनारपट्टीवरचा कर्नाटक' असा भेद राहिलेला आहे. अर्थात भेद नाही, असं जीवनच नाही म्हणा! 

तो तर निसर्गाचा नियमच आहे! शेजारच्या महाराष्ट्रातही याच प्रकारे कोल्हापूर-पुणेनागपूर असे भेद आहेत. लोकांच्या जगण्यात ही फारशी महत्त्वाची गोष्ट नसली, तरी राजकारणात याला भरपूर महत्त्व आहे.  धूनमधून हे असमाधान उसळून बाहेर येतं आणि ती वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठावरची बातमी होते. गोटगोडवीय केरेच्या  जवीकडे वळलं की, लागणारा कच्चा रस्ता `आलद हळ्ळी'ला जाऊन पोहोचतो. सुमारे तीस वर्षांपूर्वी शिरसीहून येणारी बस या मुख्य जंक्शनवर थांबायची. गावची माणसं सवारी, बैलगाडी जुंपून या जंक्शनवर यायची.

या नाक्याला `गोटगोडवीय तिठा' म्हणायचे. शिवाय या कच्च्या रस्त्याला त्यांच्या भाषेत `अपरोचि रोड' असं नाव होतं. अलीकडे कर्नाटकाच्या दळणवळण खात्यानं आणि विद्युत खात्यानं या गावाला वीज आणि रस्ता द्यायची घोषणा केल्यामुळे आलद हळ्ळीलाही वीज येऊन पोहोचली आहे. शिवाय दररोज हुबळीहून तीन बसेस इथे येतात. त्यामुळे `गोटगोडवीय तिठा'चं महत्त्व कमी झालं आहे.


Thursday, 24 October 2013

माणदेशी माणसं

झे ल्या

आता माझ्या आयुष्याला अगदी वेगळं वळण लागलं आहे. इतवंâ की, कधीकाळी माणदेशातल्या िंनबवडे नावाच्या खेड्यात मी शिक्षक होतो, मला महिन्याकाठी पंचवीस रुपये पगार मिळत होता, मराठी दुसरी आणि तिसरीचे वर्ग माझ्याकडे होते आणि तीन महिने ज्ञानदानाचं पुण्यकर्म मी इमानेइतबारे करत होतो या साNया गोष्टी मी विसरून जाव्यात. त्यांची कधी आठवणही मला होऊ नये; पण इतके दिवस लोटले, तरी ते दिवस माझ्या आठवणीत आहेत, याचं कारण झेल्या – लोहाराचा एक पोर! माझा एक विद्यार्थी! 

पहिल्याच दिवशी सांधे खिळखिळे झालेल्या लाकडी खुर्चीवर मी बेतानं बसलो आणि एकवार साNया वर्गावरून नजर फिरवली. पाटी, पुस्तवंâ, फडक्यात बांधलेली दप्तरं विंâवा लहान-सहान पत्रासाच्या पेट्या पुढ्यात घेऊन चिल्लीपिल्ली डोळे विस्फारून बसली होती. नवे मास्तर मारकुटे आहेत की चांगले आहेत, ते सारखे
हिशेब आणि गणितं सांगतात की अधूनमधून गोष्टीसुद्धा सांगतात, सारखं मोडीवाचन घेतात की गाणीसुद्धा म्हणायला लावतात? असे विचार त्या चिमण्या डोक्यातून उड्या मारत असावेत.

मी एकवार हळूच हसलो. टेबलावर रुळाखाली ठेवलेली हजेरी उघडली, चिनीमातीच्या दौतीत टाक बुडवला आणि म्हणालो, ‘‘हं, हजेरी सांगा रे!’’ साधारणत: मराठी शाळेतले शिक्षक ज्या आवाजात हे वाक्य म्हणतात, तसा आवाजात मी काढला होता. हजेरीवरची नावं वाचू लागलो, ‘`सदाशिव नारायण न्हावी!’'

आढ्याशी भिरभिरणाNया चिमणीकडं पाहणारं पहिल्या नंबरचं एक पोरगं दचकलं. टोपी सावरून अर्धवट उभं राहत ओरडलं, ‘‘हजर.’’ 
मी त्याच्या नावापुढे एक आकडा टाकला.
‘‘अब्दुल फत्तूभाई मुलाणी!’’
लाल टोपीचा गोंडा हलला आणि चिरका आवाज उठला, ‘‘हजर.’’
‘‘नामदेव तुकाराम माळी.’’
हे नाव वाचताच दोन-तीन पोरं एकदम ओरडली, ‘‘गैरऽऽ’’
त्या नावापुढे मी पुâली घातली. मराठी दुसNया वर्गात एवूâण बारा मुलं होती.
शेवटचं नाव मी वाचलं, ‘‘जालंदर एकनाथ लोहार!’’
आणि पुन्हा पोरं ओरडली, ‘‘गैर हाय मास्तर.’’
‘‘लई दिस झालं! मास्तर, त्यो साळंतच येत न्हाई!’’
खरंच, त्या नावापुढे साNया पुâल्याच होत्या.
‘‘का येत नाही रे?’’ मी विचारलं.
‘‘कुनाला ठावं मास्तर! आनू जाऊ का बोलावून?’’ एक जणानं विचारलं.

‘‘घरी न्हाई त्यो, वड्यात चिचा पाडतोय मास्तर!’’ दुसNया एकानं अचूक माहिती सांगितली. पोरांचा एकच गिल्ला चालू झाला, तसा मी रूळ टेबलावर आपटला. गोंगाट बंद झाला. तिसरीची झाल्यावर दुसरीची हजेरी घेतली आणि मग तीन चांगली दणकट पोरं जालंदरला बोलावून आणण्यासाठी पाठवून दिली. मोठ्या
वीरश्रीनं ती गेली. खेड्यातल्या शाळेत हे नेहमीच चालतं. मुलगा गैरहजर असला म्हणजे शिक्षकानं त्याला बोलवण्यासाठी मुलं पाठवायची, त्यांनी नाही तिथून त्याला शोधून पकडून आणून शिक्षकापुढे उभं करायचं. त्यानं हिरवा-पिवळा होईपर्यंत त्या पोराला मारायचा आणि सांगायचं, ‘‘आता गैर राहिलास, तर याद राख! उलटा टांगीन!’’

वेळापत्रक पाहिलं आणि मी मुलांना गणितं सांगू लागलो. पंधरा-वीस मिनिटं झाली असतील-नसतील, तो ती मुलं जालंदरला घेऊन आली. तो हिसकाहिसकी करत होता आणि पोरांनी त्याचे दंड घट्ट पकडले होते.
‘‘सोडा त्याला. कुठं होतास रे?’’

‘वड्यात चिचा पाडत हुता. आमी साळंत चल म्हनल्यावर आईभनीवरनं शिव्या दिल्या मास्तर!’’ पोरांनी माहिती दिली. बटण नसलेल्या कुडत्याला एक हातानं गळ्याशी धरून झेल्या – जालंदरचा हा अपभ्रंश बिथरल्या खोंडासारखा उभा होता. अंगानं किरकोळच. वयानंही फारसा नसावा. तेरा-चौदा एवढा. डोक्याला
मळकट अशी पांढरी टोपी. अंगात कसले कसले डाग पडलेलं, मळलेलं, बाहीवर ठिगळ लावलेलं हातमागाच्या कापडाचं कुडतं; त्याला शोभेलशीच तांबड्या रंगाची चौकडे असलेली गादीपाटाची चड्डी! तिचे दोन्ही अंगचे खिसे पुâगलेले. त्यांत बहुधा चिंचा भरलेल्या असाव्यात.

सौम्य आवाजात मी विचारलं, ‘‘काय रे, शाळेत का येत नाहीस?’’
‘‘काम असतं घरी.’’ गुर्मीत झेल्या बोलला. त्याचे दात काळे आणि किडलेले होते.
‘‘कसलं?’’
‘‘म्हस हिंडवावी लागती. भाता वडावा लागतो. दादा म्हणतो, साळंत जाऊ
नगंस!’’
झेल्याची ही सबब खोटी होती. कारण पहिल्या नंबरला असलेला न्हाव्याचा सदा एकदम बोलला, ‘‘लबाड बोलतोस! कायसुदीक करीत न्हाई ह्यो घरी. बापाला सांगतो, साळंत मास्तर मारत्याती म्हनून अन् गावात उनाडक्या करीत हिंडतो! काय ऐकत न्हाई बापाचं!’’

त्यावर झेल्यानं रागरागानं सदाकडे बघितलं आणि तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला – ‘‘चल की साळंबाहेर, जीवच घेतो तुजा!’’

झेल्याचा उनाडपणा, गुंडगिरी आणि धाडस श्रेष्ठ असल्याची माझी खात्री पटली, तरीसुद्धा मवाळपणानं मी म्हणालो, ‘‘अरे, काम असलं, तर विचारून जावं तेवढ्यापुरतं. मी काही नाही म्हणणार नाही तुला.’’

झेल्याचा हिशेब चुकल्याचं त्याच्या चेहNयावर दिसत होतं. फोका आणि कानफाडात घेण्याच्या तयारीनं तो आला होता; पण मी प्रथमपासूनच पड घेतली होती.

‘‘खिशात काय आहे तुझ्या?’’

इतका वेळ बटणाच्या अभावी धरलेली मूठ एकदम सुटली आणि दोन्ही हात झेल्यानं खिशात कोंबले.
‘‘काय न्हाई.’’

‘‘चिचा हायत्या मास्तर!’’ असं ओरडून एक पोरगं जागेवरून उठून पुढं आलं आणि झेल्याच्या खिशात कोंबलेले हात हिसवूâ लागलं, तसा तो केवढ्यातरी मोठ्यांदा ओरडला, ‘‘अगं आय आय गं! बोट मुरगाळलं माजं!’’

मला माहिती होतं की, हा शुद्ध कांगावा होता. ‘‘तू बाजूला हो रे! जागेवर बैस बघू!’’ मी त्या पोराला दटावला आणि झेल्याला पुन्हा म्हणालो, ‘‘झेल्या, काढ बघू काय आहे ते खिशात. चिंचा आहेत का? आण त्या. ठेव टेबलावर. मला हव्यात घरी न्यायला!’’

काही वेळ तो तसाच उभा राहिला आणि मग बोलला, ‘‘समद्या?’’

‘‘हो. आधी सगळ्या काढून टेबलावर तरी ठेव. मग मी लागेल तेवढ्या घेतो आणि तुला देतो राहिलेल्या!’’

हिरव्यागार चिंचांचे मोठमोठे आकडे खिशातून भराभर काढून झेल्यानं टेबलावर ठेवले.

‘‘शाबास जालंदर! मास्तरांचं ऐकणारा शहाणा मुलगा आहेस तू. बैस आता जाग्यावर. शाळा सुटल्यावर तुला देईन मी त्यातल्या चिंचा.’’ 

किडके दात न दाखवता झेल्या खुशीनं हसला. त्यानं एकवार चड्डी दोन्ही हातांनी वर ओढली. टोपी कपाळावर ओढली आणि कुडत्याचा मोकळा गळा मुठीत पकडून तो जागेवर जाऊन बसला. मग सर्वांना पुढे येऊन बसायला सांगून मी सिंदबादची गोष्ट मुलांना सांगू लागलो. हिNयामाणकांनी भरलेली दरी, झाडाच्या
खोडाएवढे पाय असलेले पक्षी आणि हत्तीलासुद्धा गिळणारे साप... सगळी मुलं ऐकण्यात रंगून गेली. डोळे विस्फारलेले, कान टवकारलेले. सगळे रंगलेले, गुंगलेले. मी झेल्याकडे पाहिलं.