`आलद हळ्ळी' म्हटलं की, कुणालाही हे गाव नेमवंâ कुठं आहे, हे लगेच लक्षात येत नाही. हे काही एवढं मोठं गावही नाही म्हणा! या गावात तशा कुठल्याच महत्त्वाच्या घटनाही घडलेल्या नाहीत. हासन जिल्ह्यात एक, जुन्या मैसूर संस्थानात एक अशी एक-दोन `आलद हळ्ळी' नावाची गावं आहेत म्हणा. पण हे गाव धारवाड जिल्ह्यात आहे. पण धारवाड जिल्ह्यातल्या नव्वद टक्के लोकांनाही हे ठाऊक नसेल.
गाव म्हटलं की, त्यात वडाचं झाड हे असतंच. वडाच्या झाडाभोवती पार बांधून गावातले लोक त्यावर बसून गप्पा मारतात. त्यामुळेच वडाच्या झाडाची प्रसिद्धी आहे की काय कोण जाणे! शिवाय वडाच्या झाडाशेजारी बेलाचं झाड लावून त्याभोवती प्रदक्षिणा घालणाNया बायकांची काही कमतरता नाही म्हणा!
हुबळीहून शिग्गावी जाताना, गाव लागण्याआधी दहा किलोमीटरवर `गोटगोडवीय केरे' हे तळं येतं. हे तळं नेहमी पाण्यानं भरलेलं असलं, तरी उन्हाळ्यात त्यातलं पाणी बरंच कमी होतं. गणपती-उत्सवामध्ये त्यात लाल कमळं भरली की, ते परिपूर्ण वाटतं. हुबळीत रणरणतं ऊन असलं, तरी शिग्गावी मात्र सह्याद्रीलगतचा
`मलेनाडचा पदर' आहे. असंच पुढे गेलं की, हावेरी-राणेबिन्नूर हा सगळा देशाचाच भाग आहे. पुढे तुंगभद्रा नदी आडवी येते. पलीकडे हरिहर. हरिहर एका टोकाला असलं, तरी उत्तर कर्नाटकातल्या लोकांच्या दृष्टीनं हा मैसूर संस्थानाचा भाग. उत्तर कर्नाटकची सीमा या नदीच्या काठावरच संपते.
अलीकडे या नदीवर एक नवा आणि एक जुना, असे दोन-दोन पूल होऊन १९५६ सालापासून सगळा कर्नाटक एक प्रदेश झाला असला, तरी आजही कर्नाटकात `जुनं कर्नाटक', `उत्तर कर्नाटक', `निजाम कर्नाटक', `किनारपट्टीवरचा कर्नाटक' असा भेद राहिलेला आहे. अर्थात भेद नाही, असं जीवनच नाही म्हणा!
तो तर निसर्गाचा नियमच आहे! शेजारच्या महाराष्ट्रातही याच प्रकारे कोल्हापूर-पुणेनागपूर असे भेद आहेत. लोकांच्या जगण्यात ही फारशी महत्त्वाची गोष्ट नसली, तरी राजकारणात याला भरपूर महत्त्व आहे.
अधूनमधून हे असमाधान उसळून बाहेर येतं आणि ती वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठावरची बातमी होते. गोटगोडवीय केरेच्या उजवीकडे वळलं की, लागणारा कच्चा रस्ता `आलद हळ्ळी'ला जाऊन पोहोचतो. सुमारे तीस वर्षांपूर्वी शिरसीहून येणारी बस या मुख्य जंक्शनवर थांबायची. गावची माणसं सवारी, बैलगाडी जुंपून या जंक्शनवर यायची. या नाक्याला `गोटगोडवीय तिठा' म्हणायचे. शिवाय या कच्च्या रस्त्याला त्यांच्या भाषेत `अपरोचि रोड' असं नाव होतं. अलीकडे कर्नाटकाच्या दळणवळण खात्यानं आणि विद्युत खात्यानं या गावाला वीज आणि रस्ता द्यायची घोषणा केल्यामुळे आलद हळ्ळीलाही वीज येऊन पोहोचली आहे. शिवाय दररोज हुबळीहून तीन बसेस इथे येतात. त्यामुळे `गोटगोडवीय तिठा'चं महत्त्व कमी झालं आहे.
या कच्च्या रस्त्यानं आठ किलोमीटर चाललं की, `आलद हळ्ळी'ला पोहोचता येतं. इथली लोकसंख्या आठ-दहा हजारांपेक्षा कमी आहे. `मलेनाडु'ला इथून सुरुवात होते, असं म्हणायला हरकत नाही. हमरस्त्यापेक्षा हा आतला रस्ता किती वेगळा आहे! दोन्ही बाजूला घनदाट आंब्याची आणि वडाची झाडं! पूर्वी इथे गोरे
राज्यकर्ते शिकारीसाठी यायचे म्हणे. धारवाडच्या कलेक्टरला हे निद्रित छोटं खेडं आणि इथलं जंगल का आवडलं, कोण जाणे! त्याने इथे एक अतिथीगृह बांधलं.
ही सगळी माहिती या गावातली तोंडाची बोळकी झालेली वृद्ध मंडळी सांगतात. गावाबाहेर मोठं तळं आहे. या तळ्याच्या भोवताली वडाची झाडं आहेत. त्यांची रचना तळ्याला बांध घातल्यासारखी दिसते. तळ्याच्या त्या बाजूला अतिथीगृह आहे. तेही वडाच्या राईत आहे. वडाला कन्नडमध्ये `आल' म्हणतात. या वडाच्या राईमुळे या गावाला `आलद हळ्ळी' हे नाव पडलं असावं. `हळ्ळी' म्हणजे खेडंिं कवा गाव.
पण हेही काही खरं नाही. हे गाव तसं पुराण काळापासून प्रसिद्ध आहे. महाभारत काळात पांडव अज्ञातवासासाठी इथे आले होते. हे मोठं तळं खोदून इथंच त्यांनी आपल्या वडिलांना िंपडदान केलं होतं. त्याशिवाय विजय नगरच्या काळी त्याचे संस्थापक व्यासराय यांनी इथे मारुतीची स्थापना केली. याची खूण म्हणजे इथल्या हनुमंताच्या शेपटीत असलेली घंटा, असं चंपक्का कानिटकर अधिकारयुक्त स्वरात सांगतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चंपक्कांशी वाद घालायचं धैर्य कुणामध्येही नाही!
इथल्या घनदाट वडांची झाडी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. मागे ब्रिटिशांच्या काळी कुणीतरी इथल्या त्या काळ्या घनदाट राईचं चित्रही काढून इथल्या अतिथीगृहाच्या ओसरीत टांगलं आहे. त्यावरून त्या काळी हे जंगल किती घनदाट असावं, याची कल्पना येते.
स्वातंत्र्य मिळाल्यावर काहीही उद्योग नसल्यामुळे झाडं तोडणाNयांची झळ आलद हळ्ळीलाही लागली आहे. इथले मोठाले वृक्ष कोसळले आणि गावकNयांच्या घरचं सरपण झालं. अलीकडे सरकारच्या नव्या पर्यावरणविषयक घोषणांना घाबरून ग्रामपंचायतीच्या लोकांनी पुढाकार घेऊन उरलेल्या राईला वुंâपण घालून `झाडं तोडण्यास मनाई आहे.' असा बोर्ड लटकवला आहे.
तरीही चोरून-मारून झाडं तोडण्याचा उद्योग या छोट्या खेड्यात चाललेला असतोच. कुNहाडीला कुठं बोर्ड वाचता येतो? आणि झाडांना तोंड कुठं आहे? गावाच्या मध्यभागी बसस्टॅन्ड असल्यामुळे काही जण हुबळी-धारवाडला महागडं घर भाड्यानं घेण्याऐवजी इथे घर करून रोज ये-जा करतात. इथं राहिलं की, शांत जीवन मिळतं. धुराचा त्रास नाही. त्यामुळे बNयाच सुशिक्षितांना इथं घर करणं, सोयीचं वाटतं. कारण इथलं हायस्वूâल धारवाडच्या केईबोर्डापेक्षा आणि हुबळीच्या लॅमिंगन हायस्वूâलपेक्षा चांगलं आहे. इथे शिकलेले अनेक विद्यार्थी बोर्डात आले आहेत. त्यात भीमण्णाची मुलगी मृदुला हीही एक.
इथं आधी केवळ कन्नड भाषेचे सातव्या इयत्तेपर्यंतचे वर्ग चालायचे. तेही गावकNयांनी सरकारच्या हाता-पाया पडून सुरू करायला लावले होते. त्यानंतर इथले विद्यार्थी पुढच्या शिक्षणासाठी शिग्गाव िंकवा हुबळीला जायचे. बाहेरच्या रस्त्यानं गेलं, तर सोळा-अठरा किलोमीटरवर शिग्गाव. पण आतल्या रस्त्यानं गेलं तर चिक्क बंडीगेरी-शिशुनाळ-गंजिकट्टीवरून गेलं की, केवळ आठ किलोमीटर अंतर पडतं. कितीतरी विद्यार्थी सकाळी न्याहारी करून सोबत डबा घेतात आणि हायस्वूâलला जातात. पुढे ही मुलं कॉलेजसाठी हावेरी िंकवा हुबळीलाही जातात.
गाव म्हणजे एकुलती एक गल्ली. तिच्या दोन्ही बाजूला घरं आहेत. तीच मुख्य गल्ली. सगळ्या घरांची रचना सारखीच. शंभरपैकी नव्वद माणसं शेतकरी. त्यामुळे सुरुवातीला ओसरी, जवळच गुरांचा गोठा, नंतर माजघर, विस्तीर्ण स्वयंपाकघर, लहानशी खोली, परसात भाताची कणगी, गंजी, एखादा भोपळ्याचा वेल. मारुतीच्या देवळासमोर असलेल्या वडाच्या झाडाला बांधलेल्या झोपाळ्यावर मृदुला बसून झोके घेत होती. सामान्यत: श्रावण महिन्यात नागपंचमीच्या दिवशी मुली-बाळी नवे कपडे लेवून झोपाळ्यावर झोके घेताना दिसतात. आता, युगाधी म्हणजे गुढीपाडव्याला उन्हात कुणीही असा झोका खेळत नाही. पण मृदुलेला या कशाचीही पर्वा असल्याचं दिसत नव्हतं. ती निवांतपणे आपल्याच आनंदात झोके घेत होती.
`आलद हळ्ळी' म्हटलं की, कुणालाही हे गाव नेमवंâ कुठं आहे, हे लगेच लक्षात येत नाही. हे काही एवढं मोठं गावही नाही म्हणा! या गावात तशा कुठल्याच महत्त्वाच्या घटनाही घडलेल्या नाहीत. हासन जिल्ह्यात एक, जुन्या मैसूर संस्थानात एक अशी एक-दोन `आलद हळ्ळी' नावाची गावं आहेत म्हणा. पण हे
गाव धारवाड जिल्ह्यात आहे. पण धारवाड जिल्ह्यातल्या नव्वद टक्के लोकांनाही हे ठाऊक नसेल.
गाव म्हटलं की, त्यात वडाचं झाड हे असतंच. वडाच्या झाडाभोवती पार बांधून गावातले लोक त्यावर बसून गप्पा मारतात. त्यामुळेच वडाच्या झाडाची प्रसिद्धी आहे की काय कोण जाणे! शिवाय वडाच्या झाडाशेजारी बेलाचं झाड लावून त्याभोवती प्रदक्षिणा घालणाNया बायकांची काही कमतरता नाही म्हणा!
हुबळीहून शिग्गावी जाताना, गाव लागण्याआधी दहा किलोमीटरवर `गोटगोडवीय केरे' हे तळं येतं. हे तळं नेहमी पाण्यानं भरलेलं असलं, तरी उन्हाळ्यात त्यातलं पाणी बरंच कमी होतं. गणपती-उत्सवामध्ये त्यात लाल कमळं भरली की, ते परिपूर्ण वाटतं. हुबळीत रणरणतं ऊन असलं, तरी शिग्गावी मात्र सह्याद्रीलगतचा
`मलेनाडचा पदर' आहे. असंच पुढे गेलं की, हावेरी-राणेबिन्नूर हा सगळा देशाचाच भाग आहे. पुढे तुंगभद्रा नदी आडवी येते. पलीकडे हरिहर. हरिहर एका टोकाला असलं, तरी उत्तर कर्नाटकातल्या लोकांच्या दृष्टीनं हा मैसूर संस्थानाचा भाग. उत्तर कर्नाटकची सीमा या नदीच्या काठावरच संपते.
अलीकडे या नदीवर एक नवा आणि एक जुना, असे दोन-दोन पूल होऊन १९५६ सालापासून सगळा कर्नाटक एक प्रदेश झाला असला, तरी आजही कर्नाटकात `जुनं कर्नाटक', `उत्तर कर्नाटक', `निजाम कर्नाटक', `किनारपट्टीवरचा कर्नाटक' असा भेद राहिलेला आहे. अर्थात भेद नाही, असं जीवनच नाही म्हणा!
तो तर निसर्गाचा नियमच आहे! शेजारच्या महाराष्ट्रातही याच प्रकारे कोल्हापूर-पुणेनागपूर असे भेद आहेत. लोकांच्या जगण्यात ही फारशी महत्त्वाची गोष्ट नसली, तरी राजकारणात याला भरपूर महत्त्व आहे. धूनमधून हे असमाधान उसळून बाहेर येतं आणि ती वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठावरची बातमी होते. गोटगोडवीय केरेच्या जवीकडे वळलं की, लागणारा कच्चा रस्ता `आलद हळ्ळी'ला जाऊन पोहोचतो. सुमारे तीस वर्षांपूर्वी शिरसीहून येणारी बस या मुख्य जंक्शनवर थांबायची. गावची माणसं सवारी, बैलगाडी जुंपून या जंक्शनवर यायची.
या नाक्याला `गोटगोडवीय तिठा' म्हणायचे. शिवाय या कच्च्या रस्त्याला त्यांच्या भाषेत `अपरोचि रोड' असं नाव होतं. अलीकडे कर्नाटकाच्या दळणवळण खात्यानं आणि विद्युत खात्यानं या गावाला वीज आणि रस्ता द्यायची घोषणा केल्यामुळे आलद हळ्ळीलाही वीज येऊन पोहोचली आहे. शिवाय दररोज हुबळीहून तीन बसेस इथे येतात. त्यामुळे `गोटगोडवीय तिठा'चं महत्त्व कमी झालं आहे.
No comments:
Post a Comment