Wednesday, 23 October 2013

चिंता सोडा सुखाने जगा

दिवसाला बंदिस्त करा!

१८७१च्या वसंत ऋतूमध्ये एका तरुणाने एक पुस्तक उचलले आणि त्यामध्ये ते एकवीस शब्द वाचले. ते पुढे भविष्यात त्याच्या मनावर खोलवर कोरले गेले. मॉाqण्ट्रअल जनरल हॉाqस्पटलमध्ये वैद्यकशास्त्र शिकणारा हा मुलगा आपण परीक्षेत पास होऊ की नाही या भयाने ग्रासला होता. त्याला काय करावे, कोठे जावे आणि वैद्यकीय प्रॉqक्टसपासून चार पैसे कसे कमवावेत याची िंचता पडली होती.

इ. स. १८७१मध्ये वाचलेले ते एकवीस शब्द या वैद्यकशास्त्राचा अभ्यास करणाNया मुलासाठी फार क्रांतिकारक ठरले आणि पुढे तो त्याच्या काळातील सर्वांत मोठा व सुप्रसिद्ध डॉक्टर झाला. जगप्रसिद्ध ‘हॉपकिन्स इाqन्स्टट्यूट’ची स्थापना त्यानेच केली. ब्रिटिश साम्राज्याने ऑक्सफर्ड युनिव्र्हिसटीमध्ये इंग्लंडच्या राजाकडून त्याची ‘रिजिअस प्रोपेâसर’ असा शाही दर्जा असणारी नेमणूक केली. हे सर्वांत मोठे गौरवाचे पद त्याला मिळाले. जेव्हा त्याचा मृत्यू झाला, तेव्हा १४६६ पाने असलेले दोन मोठे खंड त्याच्या कारकिर्दीचा आढावा घेण्यासाठी प्रकाशित केले गेले.

त्याचे नाव होते सर विल्यम ऑसलर! १८७१च्या वसंत ऋतूमध्ये त्याने असे कोणते एकवीस शब्द वाचले होते? थॉमस कार्लाईलच्या एका पुस्तकातील ते एकवीस शब्द होते : ‘दुरून अंधूकसे काय दिसते ते पाहणे हे आपले काम नसून आपल्या हातात आत्ता कोणते काम आहे त्याकडे लक्ष देणे हे आपले काम आहे.’ त्यानंतर बेचाळीस वर्षांनी अशाच एका वसंत ऋतूतील शांत, सौम्य संध्याकाळी येल विद्यापीठातील विद्याथ्र्यांना उद्देशून सर विल्यम्स ऑसलर भाषण करत होते.

त्यांनी विद्याथ्र्यांना सांगितले की, त्यांच्यासारखा माणूस जो चार विद्यापीठांमध्ये प्रोपेâसर आहे, एका लोकप्रिय पुस्तकाचा लेखक आहे ‘तो इतरांपेक्षा खूप जास्त चिंतेबद्दलची काही मूलभूत तत्त्वे जाणून घ्या ।
हुशार असणार’ असा समज असणे स्वाभाविक आहे, पण हे खरे नाही. हे त्यांनी जाहीरपणे सांगितले. त्यांच्या जवळच्या मित्रांना हे माहिती होते की, `माझा मेंदू मध्यम प्रतीचाच आहे.’

मग त्यांना हे जे प्रचंड यश मिळाले होते त्याच्या मागचे गुपित काय होते? त्यांनी त्याचे सारे श्रेय त्यांच्या ‘बंदिस्त दिवसा’च्या जीवनप्रणालीला दिले आहे.म्हणजे काय? याचा अर्थ काय? त्याचे त्यांनी पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण केले आहे.

काही महिन्यांपूर्वी ते जहाजातून अटलांटिक समुद्र पार करत होते. तेथे त्यांनी जहाजाच्या कप्तानाचे निरीक्षण केले होते. ब्रिजवर म्हणजे जेथून जहाज चालवण्याचे काम चालते तेथे उभे राहून फक्त एक बटण दाबले. त्याबरोबर सगळी मशीन्स जोरजोरात धडधडली आणि जहाजाचे अनेक भाग धाडकन बंद झाले आणि अशी
विभागणी झाली की, एकाचा दुसNयाशी काहीच संबंध नाही. ऑसलर यांनी त्याच्या विद्याथ्र्यांना असे आवाहन केले – तुम्हा सर्वांना यापेक्षाही मोठ्या सफरीवर जायचे आहे आणि खूप मोठी कामे एकत्रितरीत्या करायची आहेत. माझे तुम्हाला कळकळीचे सांगणे हे आहे की, तुमचे तुमच्यावर असे नियंत्रण हवे की, तुम्ही सुरक्षिततेचा उपाय म्हणून असे कप्पेबंद आयुष्य जगणे शिकायला पाहिजे. ब्रिजवर या. म्हणजेच आयुष्याला सामोरे जा. महत्त्वाची कामे योग्य दिशेने चालली आहेत का ते बघा. बटण दाबून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरच्या घडामोडींचा अंदाज घ्या. मजबूत लोखंडी दरवाजांनी भूतकाळाला बंदिस्त करा. दुसरे बटण दाबून धातूच्या पडद्याने अजून जन्म न झालेल्या उद्यावर मात करा. आता तुम्ही आजच्या दिवसापुरते तरी
सुरक्षित झालात. भूतकाळाला गाडून टाका. तो मृत आहे. उद्याचे ओझे आजच घेऊ नका. काल आणि उद्याला बरोबर घेऊन चाललात, तर तुमची पावले लटपटणारच!

भविष्यकाळालासुद्धा भूतकाळासारखे बंद करून टाका. तुमचे भविष्य म्हणजे ‘आज’च आहे. ‘उद्या’ हा शब्दच बाद करून टाका. तुमचा आजचा दिवस हा पापविमोचनाचा दिवस आहे. जो भविष्याची िंचता करतो त्याचा कार्यभाग बुडतो.

त्याला मानसिक आजार होतात. काळज्या मागे लागतात. म्हणून माझा उपदेश ऐका आणि फक्त आजचा विचार करा. ही शिस्त मनाला लावून घ्या. ‘डे टाइट वंâपार्टमेंट’ म्हणजे हेच!

डॉ. ऑसलर यांना असे म्हणायचे होते का की, आपण उद्याची काहीच तयारी करायची नाही? नाही, असे अजिबात नाही; पण त्यांना त्यांच्या भाषणाद्वारे असे सांगायचे होते की, आज तुमच्या हातात जे काही आहे, ते पूर्ण क्षमता वापरून, लक्ष वेंâद्रित करून आणि बुद्धिमत्ता व उत्साह जास्तीतजास्त वापरून करा. हीच
तुमच्या भविष्याची तरतूद आहे.

सर विल्यम ऑसलर यांनी येल इथे असे सांगितले – दिवसाची सुरुवात प्रभूच्या प्रार्थनेने करा. ही प्रार्थना म्हणजे: ‘देवा आम्हाला आज जेवण मिळू दे.’ लक्षात घ्या, ही प्रार्थना फक्त आजच्या जेवणासाठी आहे. काल आपल्याला जे शिळे जेवण मिळाले त्याची तक्रार नाही आणि प्रार्थनेत असेही म्हटलेले नाही की, ‘हे देवा, भविष्यात दुष्काळ पडला, तर पुढे आम्ही काय खायचे? समजा माझी नोकरी गेली तर? आणि मला उपाशी राहावे लागले, तर मी काय करायचे?’

नाही! ही प्रार्थना आपल्याला हेच शिकवते की, देवाकडे फक्त आजच्या दिवसाच्या जेवणापुरतीच मागणी करा, कारण आजचा दिवस तुमचा! उद्याचे कोणी पाहिले?

फार वर्षांपूर्वी एक निर्धन तत्त्ववेत्ता डोंगर-दNयांतून फिरत असताना लोक त्याच्याभोवती जमले. त्या काळात जगणे फार अवघड होते. एके दिवशी लोक त्याच्याभोवती जमले असताना त्याने काही मोठ्या माणसांची विधाने सांगून परिणामकारक भाषण केले. या भाषणातील १५ शब्द असे होते, ‘म्हणून उद्याचा विचार करू नका, कारण उद्याच उद्याचा विचार स्वतंत्रपणे करेल. दिवसभराचा विचार पुरेसा आहे.’

जिझसनेसुद्धा असे सांगितले आहे की, ‘उद्याचा विचार करू नका’; पण हे अनेकांना पटले नाही. त्यांना हे बोलणे काहीसे गूढ, अपरिपूर्णत्वाचे वाटले म्हणून ते हे नाकारतात. ते म्हणतात – `असे कसे चालेल? उद्याचा विचार तर केलाच पाहिजे. माझ्या कुटुंबाच्या रक्षणासाठी मला विमा उतरवला पाहिजे. मला माझ्या
वृद्धापकाळासाठी पैसे बाजूला काढून ठेवले पाहिजेत. आयुष्यात काही प्रगती करण्यासाठी मला नियोजन केले पाहिजे.'

बरोबर आहे तुमचे! नक्कीच तुम्हाला हे केले पाहिजे. जिझसने सांगितलेला हा तीनशे वर्षांपूर्वीचा शब्दांचा अर्थ िंकग जेम्सच्या काळात जो होता तो आज नाही. तीनशे वर्षांपूर्वी `थॉट' या शब्दाचा अर्थ काळजी हा होता. बायबलाच्या नवीन आवृत्त्यांमध्ये हे विचार योग्य पद्धतीने मांडले आहेत. जिझसला असे म्हणायचे होते
की, ‘उद्याची काळजी करू नका.’ नक्कीच उद्याचा विचार तुम्ही करा. त्यासाठी विचार करून आराखडे बांधा, नियोजन करा आणि तयारी करा; पण काळजी करू नका.

No comments:

Post a Comment