Thursday 24 October 2013

माणदेशी माणसं

झे ल्या

आता माझ्या आयुष्याला अगदी वेगळं वळण लागलं आहे. इतवंâ की, कधीकाळी माणदेशातल्या िंनबवडे नावाच्या खेड्यात मी शिक्षक होतो, मला महिन्याकाठी पंचवीस रुपये पगार मिळत होता, मराठी दुसरी आणि तिसरीचे वर्ग माझ्याकडे होते आणि तीन महिने ज्ञानदानाचं पुण्यकर्म मी इमानेइतबारे करत होतो या साNया गोष्टी मी विसरून जाव्यात. त्यांची कधी आठवणही मला होऊ नये; पण इतके दिवस लोटले, तरी ते दिवस माझ्या आठवणीत आहेत, याचं कारण झेल्या – लोहाराचा एक पोर! माझा एक विद्यार्थी! 

पहिल्याच दिवशी सांधे खिळखिळे झालेल्या लाकडी खुर्चीवर मी बेतानं बसलो आणि एकवार साNया वर्गावरून नजर फिरवली. पाटी, पुस्तवंâ, फडक्यात बांधलेली दप्तरं विंâवा लहान-सहान पत्रासाच्या पेट्या पुढ्यात घेऊन चिल्लीपिल्ली डोळे विस्फारून बसली होती. नवे मास्तर मारकुटे आहेत की चांगले आहेत, ते सारखे
हिशेब आणि गणितं सांगतात की अधूनमधून गोष्टीसुद्धा सांगतात, सारखं मोडीवाचन घेतात की गाणीसुद्धा म्हणायला लावतात? असे विचार त्या चिमण्या डोक्यातून उड्या मारत असावेत.

मी एकवार हळूच हसलो. टेबलावर रुळाखाली ठेवलेली हजेरी उघडली, चिनीमातीच्या दौतीत टाक बुडवला आणि म्हणालो, ‘‘हं, हजेरी सांगा रे!’’ साधारणत: मराठी शाळेतले शिक्षक ज्या आवाजात हे वाक्य म्हणतात, तसा आवाजात मी काढला होता. हजेरीवरची नावं वाचू लागलो, ‘`सदाशिव नारायण न्हावी!’'

आढ्याशी भिरभिरणाNया चिमणीकडं पाहणारं पहिल्या नंबरचं एक पोरगं दचकलं. टोपी सावरून अर्धवट उभं राहत ओरडलं, ‘‘हजर.’’ 
मी त्याच्या नावापुढे एक आकडा टाकला.
‘‘अब्दुल फत्तूभाई मुलाणी!’’
लाल टोपीचा गोंडा हलला आणि चिरका आवाज उठला, ‘‘हजर.’’
‘‘नामदेव तुकाराम माळी.’’
हे नाव वाचताच दोन-तीन पोरं एकदम ओरडली, ‘‘गैरऽऽ’’
त्या नावापुढे मी पुâली घातली. मराठी दुसNया वर्गात एवूâण बारा मुलं होती.
शेवटचं नाव मी वाचलं, ‘‘जालंदर एकनाथ लोहार!’’
आणि पुन्हा पोरं ओरडली, ‘‘गैर हाय मास्तर.’’
‘‘लई दिस झालं! मास्तर, त्यो साळंतच येत न्हाई!’’
खरंच, त्या नावापुढे साNया पुâल्याच होत्या.
‘‘का येत नाही रे?’’ मी विचारलं.
‘‘कुनाला ठावं मास्तर! आनू जाऊ का बोलावून?’’ एक जणानं विचारलं.

‘‘घरी न्हाई त्यो, वड्यात चिचा पाडतोय मास्तर!’’ दुसNया एकानं अचूक माहिती सांगितली. पोरांचा एकच गिल्ला चालू झाला, तसा मी रूळ टेबलावर आपटला. गोंगाट बंद झाला. तिसरीची झाल्यावर दुसरीची हजेरी घेतली आणि मग तीन चांगली दणकट पोरं जालंदरला बोलावून आणण्यासाठी पाठवून दिली. मोठ्या
वीरश्रीनं ती गेली. खेड्यातल्या शाळेत हे नेहमीच चालतं. मुलगा गैरहजर असला म्हणजे शिक्षकानं त्याला बोलवण्यासाठी मुलं पाठवायची, त्यांनी नाही तिथून त्याला शोधून पकडून आणून शिक्षकापुढे उभं करायचं. त्यानं हिरवा-पिवळा होईपर्यंत त्या पोराला मारायचा आणि सांगायचं, ‘‘आता गैर राहिलास, तर याद राख! उलटा टांगीन!’’

वेळापत्रक पाहिलं आणि मी मुलांना गणितं सांगू लागलो. पंधरा-वीस मिनिटं झाली असतील-नसतील, तो ती मुलं जालंदरला घेऊन आली. तो हिसकाहिसकी करत होता आणि पोरांनी त्याचे दंड घट्ट पकडले होते.
‘‘सोडा त्याला. कुठं होतास रे?’’

‘वड्यात चिचा पाडत हुता. आमी साळंत चल म्हनल्यावर आईभनीवरनं शिव्या दिल्या मास्तर!’’ पोरांनी माहिती दिली. बटण नसलेल्या कुडत्याला एक हातानं गळ्याशी धरून झेल्या – जालंदरचा हा अपभ्रंश बिथरल्या खोंडासारखा उभा होता. अंगानं किरकोळच. वयानंही फारसा नसावा. तेरा-चौदा एवढा. डोक्याला
मळकट अशी पांढरी टोपी. अंगात कसले कसले डाग पडलेलं, मळलेलं, बाहीवर ठिगळ लावलेलं हातमागाच्या कापडाचं कुडतं; त्याला शोभेलशीच तांबड्या रंगाची चौकडे असलेली गादीपाटाची चड्डी! तिचे दोन्ही अंगचे खिसे पुâगलेले. त्यांत बहुधा चिंचा भरलेल्या असाव्यात.

सौम्य आवाजात मी विचारलं, ‘‘काय रे, शाळेत का येत नाहीस?’’
‘‘काम असतं घरी.’’ गुर्मीत झेल्या बोलला. त्याचे दात काळे आणि किडलेले होते.
‘‘कसलं?’’
‘‘म्हस हिंडवावी लागती. भाता वडावा लागतो. दादा म्हणतो, साळंत जाऊ
नगंस!’’
झेल्याची ही सबब खोटी होती. कारण पहिल्या नंबरला असलेला न्हाव्याचा सदा एकदम बोलला, ‘‘लबाड बोलतोस! कायसुदीक करीत न्हाई ह्यो घरी. बापाला सांगतो, साळंत मास्तर मारत्याती म्हनून अन् गावात उनाडक्या करीत हिंडतो! काय ऐकत न्हाई बापाचं!’’

त्यावर झेल्यानं रागरागानं सदाकडे बघितलं आणि तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला – ‘‘चल की साळंबाहेर, जीवच घेतो तुजा!’’

झेल्याचा उनाडपणा, गुंडगिरी आणि धाडस श्रेष्ठ असल्याची माझी खात्री पटली, तरीसुद्धा मवाळपणानं मी म्हणालो, ‘‘अरे, काम असलं, तर विचारून जावं तेवढ्यापुरतं. मी काही नाही म्हणणार नाही तुला.’’

झेल्याचा हिशेब चुकल्याचं त्याच्या चेहNयावर दिसत होतं. फोका आणि कानफाडात घेण्याच्या तयारीनं तो आला होता; पण मी प्रथमपासूनच पड घेतली होती.

‘‘खिशात काय आहे तुझ्या?’’

इतका वेळ बटणाच्या अभावी धरलेली मूठ एकदम सुटली आणि दोन्ही हात झेल्यानं खिशात कोंबले.
‘‘काय न्हाई.’’

‘‘चिचा हायत्या मास्तर!’’ असं ओरडून एक पोरगं जागेवरून उठून पुढं आलं आणि झेल्याच्या खिशात कोंबलेले हात हिसवूâ लागलं, तसा तो केवढ्यातरी मोठ्यांदा ओरडला, ‘‘अगं आय आय गं! बोट मुरगाळलं माजं!’’

मला माहिती होतं की, हा शुद्ध कांगावा होता. ‘‘तू बाजूला हो रे! जागेवर बैस बघू!’’ मी त्या पोराला दटावला आणि झेल्याला पुन्हा म्हणालो, ‘‘झेल्या, काढ बघू काय आहे ते खिशात. चिंचा आहेत का? आण त्या. ठेव टेबलावर. मला हव्यात घरी न्यायला!’’

काही वेळ तो तसाच उभा राहिला आणि मग बोलला, ‘‘समद्या?’’

‘‘हो. आधी सगळ्या काढून टेबलावर तरी ठेव. मग मी लागेल तेवढ्या घेतो आणि तुला देतो राहिलेल्या!’’

हिरव्यागार चिंचांचे मोठमोठे आकडे खिशातून भराभर काढून झेल्यानं टेबलावर ठेवले.

‘‘शाबास जालंदर! मास्तरांचं ऐकणारा शहाणा मुलगा आहेस तू. बैस आता जाग्यावर. शाळा सुटल्यावर तुला देईन मी त्यातल्या चिंचा.’’ 

किडके दात न दाखवता झेल्या खुशीनं हसला. त्यानं एकवार चड्डी दोन्ही हातांनी वर ओढली. टोपी कपाळावर ओढली आणि कुडत्याचा मोकळा गळा मुठीत पकडून तो जागेवर जाऊन बसला. मग सर्वांना पुढे येऊन बसायला सांगून मी सिंदबादची गोष्ट मुलांना सांगू लागलो. हिNयामाणकांनी भरलेली दरी, झाडाच्या
खोडाएवढे पाय असलेले पक्षी आणि हत्तीलासुद्धा गिळणारे साप... सगळी मुलं ऐकण्यात रंगून गेली. डोळे विस्फारलेले, कान टवकारलेले. सगळे रंगलेले, गुंगलेले. मी झेल्याकडे पाहिलं. 

5 comments:

  1. खूप छान,,,,जुन्या आठवणी जाग्या झाल्या। ही जुनी पुस्तके कुठे मिळतील।
    virangadon@gmail.com

    ReplyDelete
  2. पूर्ण कथा पाहिजे अर्धी नको

    ReplyDelete
  3. हा एक अविस्मरणीय पाठ आहे

    ReplyDelete