फक्त नरकच
विलासची गाडी सुसाट निघाली होती. अंबोली घाट जवळ येत होता. कोकणातलं त्याचं घर वडिलोपार्जित होतं. आता तो त्या घराचा आणि घराला लागून असलेल्या आंबा, काजू आणि नारळांच्या झाडांचा मालक होता. या एवढ्या अवाढव्य वनराईची काळजी घेणारं कुणीतरी हवं होतं. शिवराम गडी, त्याचं कुटुंब त्याने या कामासाठी
नियुक्त केलं, त्यांची राहण्याची सोय केली आणि त्यांच्याशी सौदा ठरवून तो निश्चिंत मनाने मुंबईला यायला निघाला. ‘कौमुदिनी घरी वाट बघत असणार. भाग्यश्रीची अॅडमिशन घ्यायची आहे. अंशुमनच्या अॅडमिशनचंही बघायला हवं.’ विलास मनाशीच म्हणाला. ‘चुकीच्या दिवशी आलो इथे. घरात इतकी कामं असताना बाहेर पडलो.’ पण गावी जाणंही अत्यावश्यक असल्याचं त्याला माहीत होतं. त्यामुळे शिवरामला गाठून सर्व मार्गी लावायलाच हवं होतं. आंबे नुसते लगडले होते. गेला नसता तर इतकी हजारो फळं चोरा-चिलटांनी पळवली तरी असती, नाहीतर वाया गेली असती.
‘काय रसाळ आहे आंबा! वा!’
‘हॅलो.’
‘अरे कुठे आहेस तू?’
‘अगं, निघालोच आहे. तीन-चार तासांत पोहोचेन.’
‘येतोयस ना नक्की?’
‘आता पोहोचेन म्हणतोय तर तू विचारत्येस नक्की येतोयस ना!’
‘तसं नाही रे. पण...’
‘अगं येतोय, येतोय. भाग्यश्री कुठे आहे?’
‘आहे ना इथेच’
‘तिला सांगून ठेव, तिचे पासपोर्टसाइज फोटो लागतील. मार्वâ शीट्सच्या झेरॉक्स, बर्थ र्सिटफिकिट्सच्या झेरॉक्स, स्वूâल लिव्हिंग र्सिटफिकिट्सच्या...’
‘झेरॉक्स! सगळा सेट तयार आहे. उद्या सकाळी लवकर जावं लागेल कॉलेजेस्मध्ये.’
‘हो, आणि अंशुमन कुठे आहे?’
‘गेलाय मित्राकडे. जरा त्याचा पाय घरात टिकत नाही.’
‘तू त्याला पाठवायचं नव्हतंस.’
‘कुक्कुलं बाळ आहे का तो? आणि ऐकतो का माझं? आत्ता येतो, असं सांगून गेला. त्याला आता चार तास होत आले.’
‘मोबाइलवर फोन करून बोलावून घे ताबडतोब. आता लास्ट इयरला आहे, तर त्याने फक्त अभ्यासच करायला हवा.’
‘आता आलास की चांगला कान धर त्याचा.’
‘हो. धरतो.’
‘बघतेय ना मी – लाडावून ठेवलंयस तू त्याला.’
‘आता ह्या वयात त्याला काय ओरडणार? असं म्हणतात ना की, बापाचे बूट पोराच्या पायात फिट् बसायला लागले की पोराला मित्र म्हणावं.’
‘तुझा मित्र सध्या त्याच्या मित्रांबरोबर कुठे हुंदडतोय ते बघ आधी!’
‘मी फोन करतो त्याला, आत्ताच्या आत्ता. मग तर झालं?’
‘नको. मीच करते. तू ड्रायव्हिंग करतोयस ना.’
‘हेड फोन्स लावलेत.’
‘तरीही नको. डायल करताना तुझं रस्त्याकडे दुर्लक्ष होईल.’
‘नाही होणार – ओके. तू कर. चल, ठेवू आता फोन?’
‘हो.’
विलासचं विचारचक्र सुरू झालं. भाग्यश्रीला आर्विâटेक्ट व्हायचं होतं. र्आिकटेक्टसाठी ‘जे.जे.’सारखं दुसरं कॉलेज नाही. उद्या सकाळी लवकरच बाहेर पडायला हवं. आता तिचं करिअर होण्याच्या दृष्टिकोनातून तिला खरी मेहनत घ्यावी लागणार. पोरगी सिन्सिअर आहे. नक्की मेहनत घेईल. हा अंशुच जरा, जरा नाही, तर जास्तच टारगट आहे. लेकाचा माझ्यापेक्षाही हुशार आहे, पण मस्तीही तितकीच आहे अंगात. मेडिकलचं हे वर्ष हॉस्टेलवर राहायचं म्हणतोय! अशी अचानक हॉस्टेलमध्ये अॅडमिशन मिळणार का? काय एक-एक खूळ येतं ह्याच्या डोक्यात! म्हणे घरी अभ्यास होणार नाही. शिवाय मित्र मित्र एकत्र जागून अभ्यास करू. करतीलही.
त्याचा ग्रुप चांगला आहे.
सुरेख निसर्ग! दाट झाडी आणि नागमोडी रस्ता. थंडगार वारं. विलासला प्रसन्न वाटत होतं. ड्राइव्ह करायला आनंद वाटत होता. सुख!
लहान वयात स्वकष्टाने मिळवलेली नोकरी. पुढे अजून घेतलेलं शिक्षण. त्यामुळे मिळालेली बढती. दोन गोजिरवाणी पोरं आणि संसार उत्तम सांभाळणारी सहचरी! अजून काय हवं माणसाला? वडिलांची आनुवंशिक संपत्ती. आजमितीला ही प्रॉपर्टी विकायची ठरवली तर करोडोत सौदा होईल. पण विकायची नाहीच.
सांभाळायची. जशी बाबांनी सांभाळली.
वाटेत एक टपरी दिसली म्हणून विलास थांबला. गरमागरम चहा अत्यावश्यक होता. काळया-पांढNया अल्युमिनियमच्या भांड्यात उकळणारं ते तांबडं पाणी!
अॅल्युमिनियमचा मोठ्ठा दांडा आणि पुढे गडव्याचा आकार असलेलं भांडं सतत त्या पाण्यात वर-खाली होत होतं. विलासने एक कटिंग मागितल्यावर त्या लाल पाण्यात दूध ओतलं गेलं. पुन्हा दांडा त्या मिश्रणाला ढवळू लागला. काचेच्या छोट्या ग्लासात लालभडक चहा ओतला गेला. क्षणभर विलासला फाइव्ह स्टार
हॉटेलमध्ये मिळणारा चहा आठवला. कटवर्वâ पेपर आच्छादलेला ट्रे, किटली, कपबशी, टी बॅग, साखरेचे क्यूब्ज आणि छोट्या किटलीत असलेलं दूध! विलासला क्षणात या लालभडक चहाकडे बघून कसंतरीच झालं. चहा प्यावा की न प्यावा?
तो टपरीच्या बाहेर ठेवलेल्या एका मळक्या प्लास्टिकच्या स्टुलावर बसला. समोरचा डोंगर, ती गर्द झाडी आता अगदी शांतपणे, ाqस्थरतेने न्याहाळता येत होती. पक्ष्यांचे निरनिराळे आवाज कानी पडत होते. आणि हां हां म्हणता वातावरण बदललं.
कुठूनसे अचानक ढग जमून आले आणि टप्पोरे थेंब पडू लागले. विलासने त्याच्या नकळत तो लालभडक चहा ओठांना लावला. त्या कडक चहाने त्याला तरतरी आली. वाटलं, फाइव्ह स्टार हॉटेलमधला चहा, ह्या चहापुढे झक मारतो, त्याने हेड फोन्स काढून ठेवले.
खुशीतच त्याने गाडीला स्टार्टर मारला. काच उघडी ठेवून पावसाचं आत येणारं पाणी तो अंगावर घेत राहिला.
मोबाइल वाजला आणि विलास भानावर आला. त्याचा शर्टाच्या उजवीकडच्या भागातला हात ओला झाला होता. त्याने बटण दाबलं. काच वर सरकत जाऊन खिडकी बंद झाली. एसी ऑन केला. वाजतच रहाणारा मोबाइल त्याने अटेंड केला.
‘हॅलो’
‘बोल.’
‘कुठपर्यंत पोहोचलास?’
‘अगं, दर तासातासाने विचारत राहणार आहेस का? येतोय ना मी घरीच?’
‘चिडू नकोस. काळजी वाटली म्हणून फोन केला. पाऊस पडतोय इथे.’
‘हो. इथेही पडतोय.’
‘सावकाश ये, असं सांगायचं होतं.’
‘बरं.’
‘आणि तू अंशुमनला फोन केलास का?’
‘तू करणार होतीस ना? बरं थांब आत्ताच करतो.’
विलासने अंशुमनाला फोन लावला. स्विच्ड् ऑफ! त्याने तीन-चार वेळा ट्राय
फक्त नरकच ।
केला नंबर, पण प्रत्येक वेळेला तेच उत्तर! विलास जरा चिडलाच. तू जा जिथे तुला जायचंय तिथे, पण फोन ऑन ठेवायला नको? राशीने बिल भरतोय फोनचं, आणि नेमवंâ जेव्हा मला बोलायचंय तेव्हा फोन बंद! भेटू देच आता तो. खरंच, चांगलंच धारेवर धरतो त्याला.
पोरगी आपली साधी, सरळ. घर-कॉलेज-घर-क्लास – बस्. अगं जा जरा बाहेर मैत्रिणीकडे जा. एखादा पिक्चर बघ त्यांच्याबरोबर! पण नाही. पिक्चर बघायला जायचं तेही आईबरोबर! कमाल आहे.
No comments:
Post a Comment