Thursday, 17 October 2013

छंद बागेचा

बागेचा इतिहास

बागकाम हल्ली नुसतेच बागकाम राहिले नाही. झाडांना पाणी देणे, खत देणे, त्यांची निगा राखणे इतक्या पुरतेच ते मर्यादित राहिलेले नाही. त्याच्यामध्ये कलात्मकता जास्त आणि बागकाम कमी असा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो.

कमीत कमी जागेत नीटनेटकेपणाने, कलात्मकतेने बाग सजवणे हे एक आव्हानात्मक काम झालेले आहे.
बागेचा छंद असा आहे की, तो आपल्याला तर आनंद देतोच, पण बघणाNयालाही आनंद देतो. बागेचा छंद आपण जोपासला तर ते बघून इतर चार जणांनाही बाग करण्याचा मोह होतो. पर्यावरणाच्या प्रचाराला आपलासुद्धा थोडा हातभार लागतो. मग हा खारीचा वाटा उचलायला काय हरकत आहे? पक्ष्यांना थोडा सहारा मिळतो. बाग आपल्याला ते सुख तर देतेच पण फळे, पुâले, भाजी, औषधी वनस्पती अशा अनेक गोष्टीपण देते. व्यवस्थित आखणी केली तर सगळे फायदेच फायदे!

भारत हा देश विविध प्रकारच्या निसर्गसंपत्तीने, फळा-पुâलांनी, वनस्पतींनी पुâललेला, बहरलेला देश आहे. इतकी विविधता क्वचितच कुठे पाहायला मिळत असेल. हिमालयामधील पुष्पघाटी, पाइनचे वृक्ष; गुलाब, चिनार फळा-पुâलांनी बहरलेला काश्मीर; सिक्कीममधील शेकडो प्रकारची ऑर्विâड; राजस्थानच्या वाळवंटातील खुरटी झुडपे, वॅâक्टस; महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतातील सुंदर वृक्षराजी, सुंदर पुâलांनी बहरलेले कासचे पठार; केरळमधील मसाले, चहाच्या बागा आणि औषधी वनस्पती. प्रत्येक प्रांताची विविधता – वेगळी पुâले, फळे, वनस्पती, वेगळी पिके आपल्या सर्व समावेशक संस्कृतीप्रमाणे तीदेखील मनाला मोहून जाते. प्रत्येक ठिकाणचे निसर्गसौंदर्य वेगळे आहे.

पूर्वीच्या काळी ऋषी-मुनी आपल्या आश्रमात पुâलझाडे व औषधी वनस्पती लावीत. भारतातल्या बागेचा इतिहास पाहायचा झाल्यास वैदिक कालापासून सुरुवात करावी लागेल, अगदी प्रागैतिहासिक काळापर्यंत मागे जावे लागेल. मानवाने शेती करायला सुरुवात केली हीच बागेची सुरुवात, असे म्हणायला हरकत नाही.

भारतातील उद्यानकलेवर विभिन्न धर्म आणि संस्कृतींचा प्रभाव पडलेला दिसतो आणि त्यामुळे त्यामध्ये परिवर्तन घडत गेलेले दिसून येते. यामध्ये जैन धर्माचाही उल्लेख करावासा वाटतो. इ.स. पूर्व कालात २४ जैन
तीर्थंकर होऊन गेले. त्यांना वेगवेगळ्या २४ पवित्र वृक्षांखाली ज्ञानप्राप्ती झाली. 

म्हणजे त्यांनी त्या वृक्षांचे महत्त्व ओळखले होते. ते वृक्ष पुढीलप्रमाणे –

२४ तीर्थंकर व वृक्ष

१. भगवान ऋषभदेव (आदिनाथ) - इयण वृक्ष / वट वृक्ष (DeeefoveeLe)

२. अजितनाथ - साल वृक्ष (Shorea robusta)

३. संभवनाथ - प्रलय वृक्ष (Buchanania latifolia) चारोळीचे झाड

४. अभिनंदननाथ - प्रियांगू वृक्ष (Panicum italicum)

५. सुमतिनाथ - साल वृक्ष (Sala)

६. पद्मप्रभा स्वामी - छत्र वृक्ष (Chhatra)

७. सुपाश्र्वनाथ - शिरीष वृक्ष (Acacia sirisha)

८. चंद्रप्रभा स्वामी - नाग वृक्ष (Naga)

९. पुष्पदंत / सुविधीनाथ - साली वृक्ष (Sali)

१०. शितलनाथ - प्रियांगू वृक्ष (Panicum italicum)

११. श्रेयांसनाथ - तंदुक वृक्ष (Tanduka)

१२. वसुपूज्य स्वामी - पटाला वृक्ष (Bigonia suaveolens)

१३. विमलनाथ - चंबू वृक्ष (Eugenia jambolana)

१४. अनंतनाथ - अशोक वृक्ष (Jonesia asoka)

१५. धर्मनाथ - दधीपर्ण वृक्ष (Clitoria ternatea) गोकर्ण वेल

१६. शांतिनाथ - अनंत नंदी वृक्ष (Cedreala toona) तूणी

१७. वुंâथुनाथ - भिलाका वृक्ष (Bhilaka)

१८. अर्हनाथ - आंबा वृक्ष (Mangitera indica)

१९. मल्लिनाथ - अशोक वृक्ष (Jonesia asoka)

२०. मुनिसुब्रतनाथ - चंपा वृक्ष (Micelia champaka)

२१. नमिनाथ - बकुळ वृक्ष (Mimusops elengi)

२२. नेमिनाथ - वेतास वृक्ष (Vetasa)

२३. पाश्र्वनाथ - धतकी वृक्ष (Grislea tomentosa)

२४. महावीर स्वामी - सागवान वृक्ष (Teak)


No comments:

Post a Comment