‘‘केल्सांग मेटो, केल्सांग मेटो...’’

‘‘केल्सांग मेटो! परत फिरा.’’ दूरवरून ऐवूâ येणाNया त्या आवाजात कमालीचे भय होते, पण तरीही मला परत जायचे नव्हते. आणि घोड्याच्या एकाग्रतेत व्यत्यय आणायला नको, असेही आम्हाला प्रकर्षाने वाटत होते. कारण परतीची वाट अधिक धोकादायक असण्याची शक्यता होती. आमच्या अंगावर वरून दगड पडत होते आणि ते चुकविण्यासाठी माझा घोडा धोकादायक कसरती करीत होता. तो एक लहानखुरा, पर्वतामध्ये जन्माला आलेला आणि पर्वतामध्ये जडणघडण झालेला घोडा होता. पर्वतारोहणात अतिशय वाकबगार असलेला. पण या घोड्याबाबत मला एक इशाराही मिळाला होता. आणि तो म्हणजे, तो अतिशय आक्रमक होता आणि त्याच्या पाठीवर बसलेल्या स्वाराला उडवून लावण्यात वाकबगार होता. पण मीही
या सैतानावर स्वार होण्याचा निर्धार केला होता. आता मी खूश होते, नागपो नावाचा हा काळा घोडा खूप शांत आणि एकाग्र झाला होता. अतिशय लहरी आणि हाताळायला अवघड असा लौकिक असलेल्या घोड्यांनाही हाताळण्याचे शिक्षण मी लहानपणी घेतले होते. घोडा हा फार संवेदनशील आणि हुशार प्राणी आहे, हेही या अनुभवात मला समजले असल्याने त्याच्यावर बिनदिक्कतपणे विश्वास टाकायला हरकत नाही अशा निष्कर्षाला मी आले होते.
‘‘केल्सांग मेटो’’ खालून पुन्हा आवाज आला. ‘‘वादळ येतेय, आपण ती खिंड ओलांडू शकत नाही.’’
‘‘आपल्याला ती ओलांडावीच लागेल. पलीकडच्या बाजूला एक गाव आहे. तिथे आपल्याला नक्की आश्रय मिळेल.’’ मी उत्तरले. जोरदार वादळ येत असल्याचा इशारा आम्हाला एका शेतकNयाने दिला होता. शक्य तेवढ्या लवकर पुढील खेड्यात पोचण्याचा प्रयत्न करावा, असेही त्याने सुचविले होते. खिंडीच्या या बाजूला, मुक्कामासाठी आम्हाला मोठ्या खडकाभोवती उगवलेल्या गवताचाच काय तो आधार होता, पण रात्री संरक्षण मिळण्याची कोणतीही सोय तेथे नव्हती. आमचे बोलणे सुरू असेपर्यंत नागपो क्षणभर थांबला. मग मी त्याला हलकेच ‘चल पुढे’ असे म्हणताच तो पुढे निघाला. पाच दिवस मी या घोड्याच्या पाठीवर काढले होते आणि त्या दरम्यान आम्ही दोघांनी आमची एक भाषा निश्चित केली होती. त्यामुळे मला छडी विंâवा चाबूक वापरण्याची गरज पडत नव्हती. लगाम खेचणे विंâवा माझ्या मांड्या आवळून त्याला इशारा देण्याचीही आता गरज नव्हती. नेमक्या शब्दात हुवूâम देणे आणि त्याच्या पाठीवरील माझ्या वजनाची अदलाबदल एवढे पुरेसे होते.
एकाएकी वाNयाचा वेग वाढला. भणाणता वारा आमच्या कानांवर आदळू लागला, घोड्याच्या खोगिराच्या बाजूला बांधलेल्या सामानाला झोंबू लागला. दर मिनिटागणिक त्याची तीव्रता वाढत होती, वादळ आता फार दूर नाही याचाच इशाराजणू हा वारा देत होता. सुदैवाने आमच्या मागून येणाNया वाNयाच्या लाटा मात्र फारशा धोकादायक वाटत नव्हत्या. त्या आम्हाला पर्वतापासून दूर ढकलण्याचा प्रयत्न करीत होत्या.
थोड्याच वेळात, ही खिंड ओलांडण्याचा धोका पत्करण्याचा निर्णय घेतलेल्या माझ्या अन्य सहकाNयांची चाहूल लागली. त्यांनी टाकलेल्या धापांचा आवाज ऐवूâ येऊ लागला. ते घोड्यावरून उतरून लगाम हातात धरून डोंगराच्या बाजूने चालत होते. मी मात्र माझ्या घोड्याच्या – नागपोच्या भरवशावर पुढे निघाले. त्याचा लगाम सैल सोडून दिला. त्याने शांत राहावे यावर लक्ष पूर्ण एकाग्र केले.
अखेर आम्ही ते साध्य केले... घामाने निथळणारा आणि दमल्याने धापा टाकणारा माझा घोडा पर्वतशिखरावर उभा होता. आम्हाला डोंगराच्या दुसNया बाजूला ढकलण्याचे खूप प्रयत्न त्या वादळाने केले. त्या सुसाट वाNयापासून माझे रक्षण करण्यासाठी आणि इतरांची वाट घण्यासाठी मी नागपोवरून उतरले. इतर मंडळी फार मागे नव्हती. अतिशय खडतर आव्हान आम्ही मागे टाकले आहे, याची मला खात्री पटली आणि एकाएकी मला जाणवले, या तणावाने माझ्यामधील पूर्ण त्राणच जणू शोषून घेतले होते. पण मला हे ठाऊक नव्हते की, मी ज्या संकटातून बाहेर पडले होते ते अगदी क्षुल्लक ठरावे असे आणखी मोठे आव्हान पुढे उभे होते.
No comments:
Post a Comment