Tuesday 15 October 2013

मोहनदास

बालपण

काठियावाड, १८६९-८८

पोरबंदर. अरबी समुद्रानं जवळपास संपूर्णपणे वेढलेलं, समुद्र-किनाऱ्यालगतचं आणि आफ्रिका अरबी जगताबरोबर ऱ्या काळापासून व्यापारी संबंध असलेलं गाव. ऑक्टोबर १८६९ या दिवशी इथेच मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म झाला. भगवान श्रीकृष्णाचा बालसखा सुदामा, हा इथे वास्तव्याला असल्याची कथा प्रचलित असल्यामुळे या गावाला क्वचितसुदामपुरीअसंही संबोधलं जाई. पांढऱ्या चुनखडकाची एक भिंत गावाचं लाटांपासून रक्षण करत असे आणि या भिंतीवरून परावर्तित होणारा सूर्यप्रकाश या दिशेनं येणाऱ्या खलाशांच्या थेट डोळ्यांवर पडत असे

पोरबंदर संस्थान (१८६९ साली १५ हजार लोकसंख्या असलेलं पोरबंदर गाव या संस्थानाचा एक भाग होतं.) हे ब्रिटिश राज्यकत्र्यांचा प्रभाव असलेल्या भारतीय राजाच्या आधिपत्याखाली होतं. भारतातल्या ब्रिटिश साम्राज्यामध्ये या प्रकारची जवळपास पाचशे मांडलिक संस्थानं होती. यांपैकी काही पोरबंदरपेक्षा क्षेत्रफळानं मोठी होती (पोरबंदर संस्थानचं क्षेत्रफळ ६०० चौरस मैलांच्या आसपास होतं.), तर काही लहानही होती. ही सगळी संस्थानं ब्रिटिश साम्राज्याच्या नकाशात पिवळ्या रंगानं दाखवली जात

ज्या प्रदेशांवर ब्रिटिशांचा थेट अंमल होता, ते नकाशात लाल रंगानं दाखवले होते. पोरबंदरपासून १२० मैल पूर्वेला असलेल्या राजकोट या आतील भागात असलेल्या शहरातून एक ब्रिटिश राजदूत काठियावार (किंवा काठियावाड) प्रांतातल्या सगळ्या मांडलिक राज्यांवर लक्ष ठेवून होता. कराचीच्या दक्षिणेला आणि मुंबईच्या उत्तरेला असलेले अरबी समुद्रात पश्चिमेला डोळ्यात भरणारे हे द्वीपकल्प `सौराष्ट्र' या नावानेही ओळखले जाते

गुजराती ही काठियावाड प्रदेशाची भाषा होती. लागूनच असलेल्या पूर्वेकडील प्रदेशाचीही (जो नकाशात बहुतांशीलालरंगाचा आहे.) तीच भाषा होती. त्या प्रदेशातलं सर्वांत मोठं शहर होतं अहमदाबाद. आणि मुंबईच्या उत्तरेला असलेला किनारपट्टीलगतचा प्रदेश (हासुद्धालाल’), जिथे सुरत हे बंदर ब्रिटिशांचं भारतातील सुरुवातीचं ठाणं होतं, इथेही हीच भाषा बोलली जात होती

मुंबई हे द्वीप ब्रिटिशांनी पोर्तुगीजांकडून १७ व्या शतकात मिळवले, ते नंतर पश्चिम भारतातले सर्वांत महत्त्वाचे केंद्र बनले (इथे बहुतांशी मराठी भाषा बोलली जात होती); परंतु भारतातल्या ब्रिटिश साम्राज्याचा सर्वोच्च अधिकारी, ‘व्हाइसरॉयपूर्वेला बंगालच्या खाडीजवळ असलेल्या कलकत्ता (आता कोलकता) शहरातून सत्ता सांभाळत असे (इथले बहुसंख्य लोक बंगाली भाषा बोलत असत.). अहमदाबादच्या ६०० मैल उत्तरेला तीन शतवंâ मुघल राजवटीखाली असलेलं प्राचीन शहर दिल्ली [जिथे हिंदुस्थानी (हिंदी) ही मुख्य भाषा आहे.] वसलेलं होतं

मोहनदासच्या जन्माच्या बारा वर्षं आधी, १८५७ साली दिल्ली आणि दिल्लीच्या पूर्वेकडच्या काही भागांत, नकाशात पिवळ्या रंगात असलेल्या काही मांडलिक राज्यांसकट, भारतातल्या ब्रिटिश सत्तेला जवळजवळ उलथून टाकणारा असा प्रक्षोभक उठाव झाला आणि याची सुरुवात १७५७ साली झाली होती

आपण वापरत असलेल्या नव्या काडतुसांमध्ये हिंदू धर्मीयांसाठी अपवित्र मानलं गेलेलं गोमांस आणि मुसलमानांसाठी अत्यंत निषिद्ध असलेलं डुकराचं मांस आहे, हे समजल्यावर ब्रिटिश साम्राज्याचे बहुसंख्य सैनिक (जे हिंदू आणि मुसलमान होते.) खवळले

पण हा उठाव दडपला गेला आणि भारतावरील ब्रिटिश सत्तेची पकड १८६९ पर्यंत मजबूत बनली. याच वर्षी सुएझ कालवा बांधला गेला. परिणामी, लंडन ते भारत हा प्रवासही कमी अंतराचा झाला.

No comments:

Post a Comment