Friday, 18 October 2013

तजेलदार कॅनव्हास


रूप पाहुनिया डोळा...

‘आम्ही वैवुंâठवासी। आलो याच कारणासी।’
‘तो ताल, ती लय माझ्या अंगात घुमू लागली. त्या तल्लीन
अवस्थेतच मी गाभाNयात शिरले. सुख आणि वेदना, जीवन आणि
मृत्यू, ज्ञान आणि भाबडेपणा, कर्मनिष्ठा आणि भक्तियोग या साNयाचे
चिरंतन प्रतीक असलेल्या ज्ञानेश्वरीची जन्मखूण समोर उभी होती.
ओबडधोबड पाषाणी खांब... याने आधार दिला होता, त्या ज्ञानवंताच्या
पाठीला....’

नव्े ाासे... दोन नद्यांमधलं साधसं गाव. भोवती गोदावरी नदी आणि प्रवरा नदी.‘वरा’ विंâवा ‘पापहरा’ असा हिचा उल्लेख पुराणात आहे. म्हणून ती प्रवरा! 

महाराष्ट्रातलं कुठलंही गाव असावं तसंच हे गाव. पडकी खोपटं, दगडमातीचे तापलेले रस्ते, उजाड माळावर उभ्या बोरी-बाभळी, तरटी, काटेिंरगणी, दारिद्र्य, धूळ आणि रणरणतं ऊन.

या गावाचे स्थान त्रिकालाबाधित आहे. याला पौराणिक महत्त्व आहे. पुराणात याबद्दल कथा आहेत. हे ग्राम मानववंशशाध्Eााचा ग्रंथच आहे. याचा इतिहास मोठा आहे आणि आजच्या भाविक मनावर हे गाव राज्य करतं.

नेवाशात मोहनीराजाचे देऊळ आहे. ‘मोहनीराज’ म्हणजे महामाया. अमृतासाठी देव-दैत्यात भांडण झालं, तेव्हा विष्णूने आदिमायेचे रूप घेतलं. ती ‘आदिमाया’ म्हणजे मोहनीराज नेवाशाला विसावते.

अश्मयुगीन मानव इथं राहिला आहे. त्या भटक्या, शिकारी मानवाने ज्याच्या मांसावर आपली गुजराण केली असेल, अशा आज अस्तित्वात नसलेल्या काही जनावरांची हाडे, जबडे इथं सापडले. त्यांच्या अस्तित्वाचा कालखंड निश्चित केला गेलाय, इ.स.पूर्व दोन लक्ष वर्षं; इतका तो प्राचीन आहे. त्या आदिमानवाची मी वारस. आज इथल्या मातीला स्पर्श करत होते.

इथं एक लांबोडं टेकाड उभं आहे. तिथं वस्ती होती, ताम्रपाषाणयुगीन लोकांची. इ.स.पूर्व १५००च्या आसपासचा काळ. इथं होता; चिकणमातीचा काळाभोर थर. तो पाहून माणूस स्थायिक झाला. त्याने घरं बनवली. हाताने मडकी, मोठे रांजण बनवले. ‘माणूस जात्याच कलासक्त!’ या ताम्रपाषाणयुगीन माणसाने मातीच्या भांड्यांवर कुत्र्यांची, हरिणांची चित्रं रंगवली. कलेने जीवन सुंदर बनवण्याचा आपला सोस पुरातनच!

या टेकाडाला पुन्हा झगमगता काळ आला; तो इ.स.पूर्व पहिलं शतक ते तिसरं शतक. सातवाहनांच्या राजवटीचा काळ. नेवाशाचा संबंध त्या वेळी रोमन साम्राज्याशीही आला होता, याचे पुरावे या मातीने जपलेत. रोमन खापरं, सातवाहन राजांची नाणी, तांब्याची थाळी, मातीचे अर्चनावुंâड, घरं, स्फटिक, काच, हस्तिदंत यांचे दागिनेही इथे मिळाले. प्रगत संस्कृतीच्या साNया खुणा. मांस भाजून खाणारा माणूस सुसंस्कृत
झाला तसा शरीराचे, जिभेचे चोचले पुरवू लागला होता. याची साक्ष देतात इथं मिळालेले दगडी पाटे-वरवंटे, दाठणाची वा दळणाची जाती. इसवी सन चौदाव्या-  पंधराव्या शतकातल्या मुसलमानी कालखंडाचे भग्नावशेष पुढे इथं आलेल्या दारिद्र्याच्या कहाण्या सांगतात. हलक्या दर्जाची खापरं, पुâटके मणी, तुटक्या बांगड्या....

या प्राचीन नगरीने काळाचे सारे ‘पाऊलठसे’ उरीपोटी जपले आहेत. अनादी काळाशी जुळलेली आपली नाळ इथं पुरलेली आहे, म्हणूनच मनाचे झंकार थेट त्या अश्मयुगीन मानवाशी नेऊन भिडवण्याची ताकद या क्षेत्रात आहे.

आणि अर्वाचीन काळातलं तर काय बोलावं. या नेवाशात पाय ठेवताक्षणी भाविक मन हातात जोडे घेऊनच आदराने चालू लागते. इथल्या हवेतला गंध, इथल्या धुळीचा कण, मातीचा स्पर्श, इथल्या चराचरांतला अणूरेणू ज्ञानेश्वरीच्या ओवी गातो. महाराष्ट्राच्या घराघरांतून जी ज्ञानेश्वरी जागते, भजनदिंड्यांतून गाजते,
भाविकांच्या मनात रुणझुणते; तिच्या जन्माची खूण इथं आहे. इथंच तो वाग्यज्ञ झाला. प्रत्यक्ष विश्वात्मक देवाला आवतण धाडलं गेलं आणि इथंच तो ज्ञानियांचा राजा `सुखिया' झाला.

त्या विलक्षण कवी योग्याने कोवळ्या वयामध्ये ज्या खांबाला टेवूâन शांत स्वराने ज्ञानेश्वरी वदली तो खांब. ‘पैसाचा खांब.’ पैसा म्हणजे ‘अवकाश-आकाश.’ हा खांब आहे, ‘मेणाहुनी मऊ आणि वङ्काास भेदू ऐसा कठीण.’ नेवाशात मी शिरले आणि पावलं वाट चालू लागली, ती या पैसाच्या खांबाची. शतकानुशतवंâ अवघ्या
अवकाशाचे टेकण झालेला हा ‘पैसाचा खांब’ स्थिरचित्त उभा आहे. भाविक या खांबाला चिद्भेटीची मिठी घालतो. हा खांब त्याच्या हृदयात जीवनाचे चिरंतन तत्त्व अबाधित राखतो.

No comments:

Post a Comment