Saturday, 9 November 2013

फॉर हिअर, ऑर टू गो?

अमेरिकेची हाक

एरवी स्वत:हून विस्तवात हात घालणं होता होईस्तो टाळण्याकडेच नेमस्त मराठी मनोवृत्तीचा कल. पण
शोधायला गेलं तर इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर झळाळत्या, तेजस्वी पाऊलखुणा रोवणारी, हातावर निखारे घेऊनच जन्माला आलेली मराठी माणसं भेटतात.

ज्ञानसंपादनाच्या असीम महत्त्वाकांक्ष्ो पोटी महासागर पोहून देशान्तराच्या अग्निदिव्याला सामोNया जाणाNया डॉ. आनंदीबाई जोशी त्यातल्या अग्रणी. आपल्या पंचक्रोशीपलीकडचा स्वदेशसुद्धा आवाक्याबाहेरचा – अपरिचित असणाNया त्या काळात एकटीच्या जीवावर महासागर ओलांडण्याचं धैर्य अंगी बाणवलेली ही अवघ्या अठरा वर्षांची मध्यमवर्गीय ब्राह्मण तरुणी... आणि स्वध्Eाीने उंबरठा ओलांडणं
(धर्मबाह्य म्हणून) मंजूर नसणाNया सनातनी पुरुषांच्या पिढीत जन्मूनही ‘डॉक्टर’ होण्याच्या जिद्दीला पेटलेल्या आपल्या पत्नीला स्वत:हून जहाजात बसवून देणारा गोपाळ जोशी नावाचा अफाट तरुण... या दोघांनी जे केलं, ज्या काळात केलं; ते अग्निदिव्याहूनही प्रखर होतं.

आनंदीबाई १८८३ सालच्या जूनमध्ये अमेरिकेला गेल्या. त्या आधीही काही ‘मराठी’ पावलं इंग्लंड-अमेरिकेच्या ओढीने भारताचा किनारा सोडून गेली होती.

पंडिता रमाबाई आनंदीबार्इंच्या समकालीन. त्या १८८३ मध्येच इंग्लंडला गेल्या. केशव मल्हार गुरुजीभट नावाच्या अमेरिकेची हाक गृहस्थांना पुणे सार्वजनिक सभेने निधी उभारून १८८२ साली अमेरिकेत व्यावसायिक शिक्षण घ्यायला पाठवलं होतं. हे गुरुजीभट आणि भास्कर विनायक राजवाडे असे दोघे आनंदीबार्इंना अमेरिकेत भेटायला आल्याची नोंद आनंदीबार्इंच्या चरित्रात आहे. त्याच्या आगे-मागे ‘इंडिया इंडिपेन्डन्स लीग’ची स्थापना करणारे डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे अमेरिकेला गेले. विसावं शतक सुरू होता होता शंकर आबाजी भिसे नावाच्या हरहुन्नरी गृहस्थांनी अमेरिकेत ‘भिसे आयडियल टाईप कास्टर
कार्पोरेशन’ची स्थापना केली. इंग्रजांनी बजावलेल्या अटक वॉरन्टपासून बचावासाठी अज्ञातवासात गेलेले काका भाटवडेकर सशध्Eा क्रांतीकारकांबरोबर मालवाहू जहाजाच्या तळघरात लपून शिकागोला पोचले... अशा किती जिगरी कहाण्या! 

पण एकोणिसाव्या शतकात अमेरिकेला गवसणी घालायला झेपावलेल्या ‘मराठी’पणावर पहिली ठसठशीत नाममुद्रा कोरलेली आहे ती मात्र अमेरिकन पदवी संपादन करणाNया पहिल्या भारतीय ध्Eाी डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचीच! समुद्र उ¼ंघन, परदेशगमन, परकीयांचा (िंहदूंचा धर्म बुडवायला टपलेल्या किरिस्तावांचा) सहवास आणि लग्न झालेल्या कुलीन ब्राह्मण ध्Eाीने पतीपासून दूर परदेशात राहून
शिकणं ही सारीच तत्कालीन समाजाच्या दृष्टीने महापातवंâ होती. पण ‘मी करत्यें ते पातक नसून त्या आत्मोन्नतीच्या वाटा आहेत’ असं जाहीरपणे ठणकावून भोचक संस्कृतीरक्षकांची बोलती बंद करणाNया आनंदीबार्इंना कुणी अडवू शकलं नाही.  ना त्यांना बहिष्कृत करण्यास निघालेला समाज, ना त्यांची तोळामासा र्आिथक ाqस्थती, ना अज्ञाताचं भय!

वंâपनी सरकारच्या सेवेत पोष्टखात्यात चाकरीला असलेल्या गोपाळराव जोशींची १८८१ साली कलकत्त्याला बदली झाली. त्या अनोळखी शहरात संसार मांडण्यासाठी जागा शोधण्याच्या सुरुवातीच्या दिवसांत ‘परान्न कसे खावे?’ म्हणून या गरीब दाम्पत्याने जवळच्या कोरड्या फराळावर गुजराण केली होती. परक्या चुलीवर
शिजवलेलं खाण्यास न धजणाNया या धर्मभोळ्या ब्राह्मण मनांमध्ये ‘वाटले तर मडमेचे कपडे घाल. जरूर पडली तर मांस खा. पण आता मागे पाहू नकोस’ अशी जिद्द घालणारं अमेरिकेचं स्वप्न रुजलं, तो काळ तब्बल सव्वाशे वर्षांपूर्वीचा होता. कलकत्त्याजवळ श्रीरामपूर नावाच्या छोट्या गावात नोकरीनिमित्ताने राहाणाNया आनंदी-गोपाळ या दाम्पत्याच्या जीवनाला शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्याच्या स्वप्नाचा स्पर्श झाला आणि एकाएकी उठलेलं वादळ चोहो दिशांनी घोंघावत आलं.

एकतर एकटी बाईमाणूस किरिस्तावांच्या देशात जाऊन स्वधर्मास लांच्छन आणणार म्हणून सनातनी समाजात रोष पेटला आणि सर्वसामान्य कुवतीच्या आप्तस्वकीयांपासून तुटून ज्ञानोपासनेच्या तेजस्वी पण एकाकी वाटेवर दूरवर एकलंच चालत आलेलं हे ब्राह्मण जोडपं प्रदीर्घ विरहाच्या असह्य टप्प्याशी येऊन
पोचलं. दोघांनी जायचं तर एवढी पुंजी आणावी कुठून? या गुंत्यात अडकलेल्या गोपाळरावांनी शोधलेला मार्ग ‘त्या’ काळाचा विचार करता अविचारीच होता. 

त्यांनी अठरा वर्षांच्या आनंदीला एकटीच अमेरिकेस धाडायचं ठरवलं. आधुनिक वैद्यक शिकण्याच्या ध्यासाने झपाटलेल्या आनंदीने तो अग्निदिव्याचा निखारा एका विलक्षण धुंदीत तळहाती घेतला. आधीच चिडलेल्या सनातनी ब्राह्मणांना एकट्या बाईमाणसाने परदेशगमन करण्याचा हा अगोचरपणा कसा सहन व्हावा?

विरोध, हेटाळणी आणि जहरी लोकिंनदेचं मोहोळ उठलं. या लोकविरोधाला उत्तर द्यायचं ठरवून गोपाळरावांनी आनंदीबार्इंच्या प्रस्थानाआधी श्रीरामपूरला एका जाहीर सभेचं आयोजन केलं. त्या सभेत अस्खलीत अव्वल
इंग्रजीत तरुण, तडफदार आनंदीने स्वत: आपली बाजू मांडली. आनंदीबाईचं ते भाषण म्हणजे देशकालाच्या, रिती-परंपरांच्या चौकटीत आपली स्वप्नं बंदिस्त करण्यास ठाम नकार देणाNया कडव्या आत्मनिष्ठेचं झळझळीत, तेजस्वी प्रतिरूपच आहे.

No comments:

Post a Comment