Friday, 29 November 2013

डॉलर बहू

बेंगळूरहून मिरजेकडे जाणाNया कित्तूर-चन्नम्मा एक्सप्रेसची चंद्रू अस्वस्थ मनानं वाट पाहत होता. त्याला स्टेशनवर येऊन बराच वेळ झाला होता, पण अजूनही गाडीचा पत्ता नव्हता.

चंद्रूचा धाकटा भाऊ गिरीशही त्याच्याबरोबर होता. पण `आलोच एका मिनिटात दोन पेपर घेऊन!-’ असं सांगून तो जो निघून गेला होता, तो अर्धा तास होऊन गेला तरी आला नव्हता. चंद्रू मनातल्या मनात चडफडत पुन्हा-पुन्हा घड्याळ पाहत होता.

रेल्वे सावकाश स्टेशनमध्ये शिरताना दिसली. ती सावकाश प्लॅटफॉर्मला लागली तेव्हा चंद्रूच्या मनाची अस्वस्थता थोडी कमी झाली. तरीही मनाच्या एका कोपNयात कातरता भरली होती. वाटत होतं, आजवर न पाहिलेलं गाव - धारवाड! कसं आहे कोण जाणे!

आयुष्यात प्रथमच आपलं लाडवंâ आणि चिरपरिचित माहेर सोडून अपरिचित पतीमागून आनंदानं, तरीही कातर मनानं जाणाNया नव-विवाहितेसारखी चंद्रूची मन:स्थिती झाली होती.

बेंगळूर, मंड्य, मैसूर, शिवमोगा ह्या प्रदेशापलीकडे चंद्रू आजवर कधीही गेला नव्हता. आता शिक्षण संपल्यावर पहिल्या-वहिल्या नोकरीच्या निमित्तानं तो धारवाडला निघाला होता.

धारवाडमध्ये त्याला नोकरी मिळाली होती. आज-काल नोकरी मिळणंच कठीण असल्यामुळे हाताला लागलेली पहिली नोकरी सोडण्याचा प्रश्नच नव्हता. गावाचा मोह मोठा, की पैशाचा मोह मोठा ? राष्ट्रीय बँकेत टेक्निकल ऑफिसरच्या हुद्द्यावर काम करायचं म्हणजे चांगलीच नोकरी म्हणायची! त्यामुळे निरुपायानं
तो धारवाडला जायला तयार झाला होता.

कुठूनतरी अचानक समोर आलेला गिरीश म्हणाला, `गाडी आली चंद्रू. चल, सामान दे.’

चंद्रू विचाराच्या तंद्रीतून भानावर आला. या गिरीशचा स्वभावच असा! क्षणभरही निवांत म्हणून राहणार नाही हा! सतत काही ना काही धावपळ चालूच असते याची!-

चंद्रू आपल्या जागेवर बसला. गाडी सुटताच त्यानं प्लॅटफॉर्मवरच्या गिरीशला हात हलवून निरोप दिला. गाडीनं हळूहळू प्लॅटफॉर्म सोडला आणि ती धावू लागली. बघता-बघता गिरीशचा हलणारा हात नजरेआड झाला.
गाडीनं वेग घेताच चंद्रूनं आत नजर टाकली. शेजारपाजारचे प्रवासीही काही वेळ आपापलं सामान नीट लावण्यात आणि आपसात गप्पा मारण्यात गढून गेले.

`यंदा पाऊस काय करतोय कोण जाणे!’

`गेल्या वर्षी बरा झाला पाऊस! यम्मी केरि- म्हशींचं तळं पूर्ण भरून गेलं होतं.’

`त्याच्या मागच्या वर्षी- सांगतो मी- घटप्रभेचा धबधबा अस्सा भरून वाहत होता म्हणून सांगू! मस्त दिसत होता!’

चंद्रू ऐकत होता. मनातल्या मनात तो गडबडला होता. भोवतालची माणसं त्याच्या मातृभाषेतच- म्हणजे कन्नडमध्येच- बोलत होती. पण त्याला त्यातले कितीतरी शब्दांचे अर्थच समजत नव्हते! एखादी परक्या प्रांतातली भाषा ऐकावी तसं वाटून तो कावरा-बावरा झाला होता.

तपकिरी रंगाचा कोट आणि काळी टोपी घातलेले एक प्रौढ गृहस्थ तळहातावर तंबाखू अंगठ्यानं मळता-मळता शेजारी बसलेल्या पागोटेवाल्या गृहस्थांना बजावून सांगत होते, `तू काहीही म्हण- पण मला तर हुक्केरी बाळप्पाची गाणीच आवडतात.’

यावर ते पागोटं आणि धोतरवाले गृहस्थ जोरात सांगत होते, `असेल! पण मला मात्र बाले खाँ साहेबांची सतार फार आवडते.’ 

मुकाट्यानं बसलेल्या चंद्रूलाही बोलण्यात ओढत त्यांनी विचारलं, `कुठल्या गावाला निघालाय?’

`धारवाडला.’

`असं होय! धारवाडला कुणाच्या घरी?’

अरेच्चा! हा काय प्रकार आहे? साNया धारवाडमधल्या प्रत्येक घराची ओळख असल्यासारखं विचारताहेत हे!

`कुठल्याच घरी नाही.’

`मग? नोकरीसाठी निघालाय वाटतं!’

`होय.’ चंद्रूनं निरुत्साहानं सांगितलं. पुढचं संभाषण टाळण्याचा हेतू त्यात स्पष्ट होता.

धारवाडमध्ये त्याचा दूरचा नातेवाईक कृष्णमूर्ती राहत होता. कृष्णमूर्ती, म्हणजे किटीच्या घरची माणसं मूळची बेंगळूरची असली तरी, गेली कितीतरी वर्षं धारवाडला राहत होती. किटीच्या वडिलांनी तर तिथं स्वत:चं घरच बांधलं होतं.

किटीलाही धारवाडमध्येच नोकरी लागली होती. तो आणि चंद्रू साधारण बरोबरीच्या वयाचेच होते. आता किटीची कन्नड भाषाही बेंगळूरी ढंग सोडून धारवाडी ढंगाची झाली होती.

चंद्रूला घेऊन जाण्यासाठी आपण स्टेशनवर येत असल्याचं किटीनं कळवलं होतं. त्याच्या घरी जास्तीतजास्त आठवडाभर राहता येईल. वेगळी खोली िंकवा घर बघण्यासाठी त्यानं किटीलाही सांगून ठेवलं होतं. किटीनं घर पाहून ठेवलंय की नाही, देव जाणे!

गाडी तुमवूâरला थांबली. काळ्या टोपीवाल्या गृहस्थांनी चंद्रूला विचारलं, `आमच्याबरोबर जेवताय काय ? चपात्या आहेत.’ चंद्रू चकित झाला. अपरिचित तरुणाला आपल्याबरोबर जेवायला बोलवण्याइतवंâ
औदार्य किती माणसांत पाहायला मिळतं? नकळत त्याच्या आवाजात सौम्यपणा आला, `नको-नको! थँक्स! मी जेवण करूनच घराबाहेर पडलो.’ 

सहप्रवाशांनी आपापले जेवणाचे डबे उघडले. चंद्रू बाहेरच्या मैदानावर नजर खिळवून उद्याचा विचार करण्यात गढून गेला.

सुरेख, सुमधुर स्वर! कुणीही मोहून जावं असे स्वर!

चकित झालेल्या चंद्रूच्या मनाला ग्रासून टाकणारे सारे विचार क्षणार्धात नाहीसे झाले आणि त्याचं मन त्या स्वरांवर एकाग्र झालं. 

र्पािटशनच्या पलीकडून गाणं ऐवूâ येत होतं- `वसंत बनी ती गाते कोकिळ राजमुद्रेची तिला न आशा-’ कोकिळावंâठी कुणी गायिका पलीकडे अति-सुरेल स्वरात आत्ममग्न होऊन गात होती. कुठल्याही वाद्याची साथ नाही- साधं सरळ भावपूर्ण गाणं! अगदी हलक्या आवाजात गाणं सुरू झालं. बघता-बघता डब्यातले इतर
सारे आवाज थांबले. केवळ गाण्याचा आवाज चढत राहिला आणि काही क्षणातच त्यानं संपूर्ण डबा भारून टाकला. सारेच माना डोलावत तल्लीन होउâन गाणं ऐकत होते.

चंद्रू त्या गंधर्व-लोकातल्या गंधर्व-गायनात पूर्णपणे बुडून गेला होता. मागं राहिलेल्या बेंगळूरचं आणि पुढं येणाNया धारवाडचं भानही काही क्षण त्याला राहिलं नाही.

गाणं संपलं. पाठोपाठ हसण्याचा किलकिलाट कानांवर आला तेव्हा चंद्रू भानावर आला. तो तरुणींचा आवाज ऐकताना त्याला आपण कित्तूर-एक्सप्रेसमध्ये असल्याची जाणीव झाली.

पाठोपाठ मागणी झाली, `वन्स मोअर! वन्स मोअर, विनू.’

अच्छा ! या अभिनव लता मंगेशकरचं नाव `विनू’ आहे तर! पण विनू म्हणजे काय? वनिता? वंदना? त्या सुरेल स्वराच्या मालकिणीला पाहण्याची इच्छा चंद्रूच्या मनात प्रबल झाली.

र्पािटशनमागून धारवाडी कन्नड भाषेत तोच स्वर पुन्हा ऐवूâ आला, `नको गं बाई! पुरे आता माझं गाणं! साडेदहा वाजून गेले आहेत. लवकर झोपलं नाही तर धारवाडऐवजी पुढं लोंढ्याला उतरायची पाळी येईल!’ त्या विनूनं आणखी गाणी म्हणायचा प्रस्ताव धुडकावून टाकला.

चंद्रूला त्या बोलण्यामुळे बरं वाटलं. म्हणजे ही विनू आणि तिच्या मैत्रिणीही धारवाडला उतरणार आहेत तर! चंद्रूचा उत्साह द्विगुणित झाला. `विनू, तुलाच गान-गंधर्व पुरस्कार मिळायला हवा बघ! कालच्या स्पर्धेत
तुझाच पहिला नंबर येणार याविषयी आमच्या मनात तरी तिळभरही शंका नव्हती!’

म्हणजे या सगळ्या बेंगळूरला कुठल्याशा गायनाच्या स्पर्धेसाठी आल्या होत्या तर! तिथं या विनूला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं तर त्यात काहीही आश्चर्य नाही- चंद्रूच्या अंतर्मनानं न पाहिलेल्या विनूच्या वतीनं निर्वाळा दिला.

`खरंच गं! काल तू `तुंगा-तीर विहारी’ गात होतीस तेव्हा जज्जांसह सगळेच कसे माना डोलावत होते!’

`ते सगळं ठीक आहे! पण आता गाणं बंद! उद्या दुपारी लेडीज-रूममध्ये हवं तर म्हणेन. समजलं?’

बहुधा मैत्रिणींना एवढं बजावत विनू उठून उभी राहिली असावी. काचेच्या बांगड्यांचे आवाज ऐवूâ आले. चंद्रूच्या ज्ञानात आणखी भर पडली- या कॉलेजमध्ये शिकणाNया मुली दिसताहेत.

`एक्सक्यूज मी! मिस्टर- उठता ना?’ तोच आवाज. चंद्रूनं मान वर करून पाहिलं. गोरापान वर्ण, मोठाले काळेभोर डोळे, सरळ टोकदार नाक, दाट काळेभोर केस- अपरिचित तरुणाबरोबर बोलत असल्यामुळे चेहNयावर उमटलेले मिश्र भाव- एका हातात बेडशिट आणि उशी, दुसNया हातात तिकीट.

`माझी सीट आहे ही.’

चंद्रूचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तो तिच्याकडेच भान हरपून पाहत राहिला होता. धारवाडी काठा-पदराची साधी सुती साडी आणि लाल काचेच्या बांगड्या घातलेल्या निराभरण सुंदर युवतीनं त्याची ही गत केली होती! 


No comments:

Post a Comment