Saturday 23 November 2013

निसटलेले

एखाद्या वेळीच
स्टेशनावरच्या संमिश्र कोलाहलाने अभिरामला जाग आली. त्याने डोक्यावरली चादर बाजूला केली. मुंबई-हावरा मेल कुठल्या तरी मोठ्या स्टेशनवर थांबली होती. थोडे उजाडलेही होते. चहा घ्यायचा तर तो इथेच चांगला मिळू शकतो; पण डोळ्यातली झोप पुरती गेली नव्हती. अजून चोवीस तास गाडीत काढायचे आहेत.
इतक्या लवकर उठून काय करायचं ! पुन्हा लागेल झोप तर पहावं म्हणून चादर पुन्हा डोक्यावर ओढून घेतली. पण येणाNया-जाणाNयांची गर्दी आणि प्लॅटफॉर्मवरचे सरमिसळ आवाज ! त्याला झोपून राहणे अशक्य झाले. चहावाल्याला त्याने आवाज दिला. नुसते गरम गोड पाणी. आता पाऊस भुरभुरायला सुरुवात झाली. रात्रभर आकाश कोंदलेलेच होते. जोराने कोसळेल असे वाटत होते पण पाऊस हळूहळू सावधपणे, बेताबेताने पडत राहिला.

त्याच्या खिडकीसमोर एक घोळका आला. त्यातल्या एकाने घाईत डब्यात चढून सीट नंबर, बर्थ शोधला. तो त्याच्या समोरच होता. दोनच सीटचाखिड कीजवळचा बर्थ त्याचा होता. वरच्या बर्थवर त्या दुसNयाने सामान ठेवले. आणि त्याच्या समोरच्या सीटवर हँडबॅग. मग तो अभिरामला म्हणाला, ‘माय सिस्टर इज अलोन. वुईल यू मार्इंड एक्स्चेंजिंग द बर्थ.’ ‘ओ यस, डोन्ट मार्इंड’ तो तत्परतेने म्हणाला, ‘वर काय, खाली काय, फरक काय पडतो !’ 

मग त्या माणसाने खाली उतरल्यावर आपल्या बहिणीलाही सांगितले, की वरचा बर्थ तू एक्स्चेंज करून घे.
‘तशी काही गरज नाही.’ ती म्हणाली.

अभिरामचे आता अभावितपणेच त्या घोळक्याकडे लक्ष गेले. दोन साधारण वयस्कर बायका, दोन पुरुष, एक तरुण, पंजाबी ड्रेसमधली ध्Eाी आणि तिचा हात धरून एक साडेतीन-चार वर्षाचा मुलगा. तो छोटा मुलगा तिच्या हाताला हिसके देत होता. इकडेतिकडे बोट दाखवत होता. पण मुलाकडे विशेष लक्ष न देता तिच्या
माणसांशी बोलण्यात ती गुंतली होती. मधून मधून त्या बायका तिला चढ चढ म्हणून घाई करत होत्या. पण तिला तशी काही घाई नव्हती. गाडी सुटायची वेळ झाली, की ती शांतपणे डब्यात चढेल असे अभिरामला वाटले. मध्येच एका ढकलगाडीकडे तिच्या मुलाने बोट दाखवले. त्यात मुलांना आकर्षित करणारे सटरफटर सामान होते. त्या मुलाला बहुधा चेंडू हवा होता. पण त्याच्या आईने तो त्याला घेऊन दिला नाही. याच्या केसांवरून हात फिरवला. दोन्ही हातांनी मोठा चेंडूचा आकार दाखवून तो आपण घेऊ असे समजावले. न बोलताच. अभिरामला
त्याची बायको आठवली. तिला असे मुलांना समजावता येत नाही. मुले आता सहा-सात वर्षांची आहेत. आणि लहानपणापासून हट्टी होत चालली. त्यांच्याकरता आपल्याजवळ आणि आपल्या बायकोजवळही वेळ नाही.

गाडी जरा जास्तच थांबली का या स्टेशनवर ? स्टेशन कोणते ? त्याने कुणाला तरी विचारले. ‘भुसावळ’ सांगितल्यावर मग त्याच्याच लक्षात आले, भुसावळच असणार. या लाईनने अनेकदा प्रवास झाला, पण स्टेशने लक्षात ठेवत नाही आपण. त्यांच्या वेळा, त्यांच्या जागा... त्यांचा चेहरा- तो पुन्हा समोरच्या
घोळक्याकडे पाहू लागला. ती तिच्या माणसांशी बोलण्यात रमली होती. तिच्या मुलाने तिचे धरलेले बोट सोडले. तो तिथेच इकडेतिकडे फिरू लागला. अभिरामला वाटले की, याच्या आईने याचे बोट धरून ठेवावे. गर्दीत इकडेतिकडे गेला म्हणजे ! तिच्या भावाने तिच्या हातात केळी ठेवली. मोठा घड ती नको म्हणत
होती.

‘आनंद घ्यायला येतील की नाही ? अपरात्री गाडी पोचते चक्रधरपूरला. तिथून उतरून पुढे असनसोल... वयस्कर बाईने विचारले. ‘प्रत्येक वेळी उतरवून घ्यायला कुणी कशाला यायला हवं’? जाईन मी.’

‘लहान मूल आहे !’

‘म्हणून काय झालं ?’

‘आनंद नाही आले तर सकाळ होईतो थांब वेिंटग रूममध्ये टॅक्सीनं निघायची घाई करू नकोस.’

‘अगं, लहान आहे का मी आता ! ती म्हणाली. अभिरामला वंâटाळल्यासारखे झाले तो खाली उतरला. तेवढ्यात गाडीची अनाऊन्समेंट झाली. पाच-दहा मिनिटात गाडी सुटणार होती. तो डब्यासमोरच थांबला. तिला निरोप द्यायला आलेल्या बायका डोळे पुसू लागल्या. बरोबरचे पुरुषही गंभीर झाले.

‘आनंदच्या मुंबईच्या बदलीचं कळव,’ भाऊ म्हणाला. तिच्या डोळ्यात पाणी होते की नाही हे अभिरामला दिसले नाही. मुलाला तिने पाहिले तर तो नव्हता. तिने इकडेतिकडे पाहिले. सगळे घाबरले. इकडेतिकडे करू लागले. पण ती घाबरली नाही. शांतपणेच तिने मुलाला शोधले. असेलच इकडेतिकडे ! तिनेच बाकीच्यांना
सांगितले, आणि तिलाच तो दिसला. तिने बोट दाखवून सांगितले. त्याच्यामागून हमालांची झुंबड आणि सामानाची ढकलगाडी येत होती. ती त्याला आवाज देत होती, आणि तो तिकडे लक्ष न देता इकडेतिकडे पाहत जात होता. तिचा भाऊ पोहोचायच्या आतच तिने मुलाला गाठले आणि अलगद बाजूला घेऊन कडेवर घेतले. ढकलगाडीवाला हमाल तिच्यावरच खेकसला. गाडी बाजूने वळवायलाही जागा नव्हती. तिने मुलाला गाडीकडे बोट करून दाखवले, की ती सुटते आहे. बस इतकेच. तो असा हात सोडून गेल्याबद्दल ती त्याला रागावली नाही. आपली बायको असती तर तिने मुलाला दोन लगावल्या असत्या, अभिरामला वाटले. पण आपला
मुलगा असा हात सोडून नसताच गेला. आपल्या बायकोला थोडीही अनिश्चितता सहन होत नाही. ती मुलाला घेऊन डब्यात बसून राहिली असती. तिने त्याला खाली उतरवलेच नसते. तिला सगळे जिथल्या तिथे. जसेच्या तसे लागते. आताच निघताना कितीवेळा बजावले, उतरल्यावर फोन करा. काम झाल्यावर निघतानाही करा. बायको तर अशी लहान मुलाला घेऊन एकटी कधी निघालीच नसती. ती आता मुलाला घेऊन गाडीत चढली. दाराशीच उभी राहिली.

पत्र पाठव. जप स्वत:ला, फोन कर. इतकी गॅप नको ठेवू येण्यात, असे सांगताना त्या आजी दिसणाNया बाईचे डोळे वहायलाच लागले. गाडी हलली तिने कडेवरच्या मुलाला हात घेऊन तो साNयांच्या दिशेने हलवला. तो मुलाने दोन्ही हात त्या लोकांकडे घेण्यासाठी पसरले. पण गाडीने हळूहळू वेग घेतला. ती मग मुलाला घेऊन आपल्या सीटवर आली. तिच्या जागेवर ठेवलेली तिची हँडबॅग वर ठेवून ाी बसली. मुलाला दोघांच्या मध्ये बसवताना अभिरामकडे पाहून हसली. 

सहजच ओळख करून घेणारे ते सहज अकृत्रिम हसू. आणि आपोआपच त्यानेही सहजच विचारले. माहीत झाले होते तरी... ‘कुठे उतरणार ?’

No comments:

Post a Comment