Wednesday 27 November 2013

झोंबी

ताराचं लग्न झालेलं ताराला माहीत नाही. ती एक वर्षाची असताना तिचं लग्न झालं. तिच्या पाळण्यालाच बाशिंग बांधलं होतं. रतनू त्या वेळी आठ-नऊ वर्षांचा होता. ‘‘वरातीच्या वक्ताला लगाम धरून एकटाच घोड्यावर बसलो हुतो; त्येची आठवण हाय.’’ असं सांगत होता. त्याला तेवढंच आठवतं.

रतनूचा बा आणि ताराचा बा हे दोस्त. रतनूच्या बाऽला दहा-बारा पोरं झाली. त्यांत आठ मुलगे झाले. पण ते लहानपणीच एक-दोन एक-दोन वर्षांचे होऊन मरत असत.

नवरा-बायकोला संशय यायचा. त्यांना वाटायचं भाऊबंदच पोरांना बाध्या घालतात विंâवा लिंबू मंतरून मारतात. भाऊबंद म्हणजे रतनूच्या बाऽचे सख्खे चार भाऊ आणि त्यांच्या बायका. हे पाचीही भाऊ, त्यांचा बा मेल्यावर वाली-सुग्रीवासारखे एकमेकांत भांडू लागले. भांडणं, माNयामाNया, खून हे ह्या घराण्याच्या पाचवीला पुजलेलं.

ह्या घराण्याचा मूळ पुरुष कर्नाटकातून आपल्या बहिणीसह एका रात्रीत पळून कोल्हापूर संस्थानात– कागलला आला होता. पळून येण्याचं कारण; त्यानं कर्नाटकातल्या आपल्या राहत्या गावच्या पाटलाचा खून केला होता. पाटलानं याच्या विधवा बहिणीला ओढण्याचा प्रयत्न केला होता. कागल भाग हा कर्नाटकाच्या सीमेवर आहे. सीमा अगदी दोन मैलांवर चालू होते. त्या मुलखात खेड्यापाड्यांत खुनांचे प्रमाण भरपूर.

त्या कानडी खेड्यात आमच्या मूळ पूर्वजाचा पिंड पोसलेला. त्याचा स्वभाव संतापी, भांडखोर आणि आडव्या डोस्क्यानं वागण्याचा. या घराण्याच्या मूळ पुरुषापासून रतनूच्या बाऽची पाचवी पिढी होती. या पाचव्या पिढीचे पाच सख्खे भाऊ. त्यांचा बाऽ असेतोपर्यंत ते एकजुटीनं राहिले. हूमदांडगे, दादागिरी करणारे म्हणून ते गावात प्रसिद्ध. त्या पाच जणांच्या बाऽला, कागलला होणाNया गुरांच्या बाजाराची जकात गोळा करण्याची कामगिरी असे. तीच कामगिरी या पाच मुलांकडं आलेली. महाराष्ट्र आणि कानडी मुलूख यांच्या सीमेवरचा हा भाग असल्यानं, जकात गोळा करणं फार जिकिरीचं काम होतं. अडाणी माणसं जकात चुकवत. न देता दांडगाईनं निघून जाण्याचा प्रयत्न करत. कमी देण्याची धडपड करत. पुष्कळ वेळा भांडत, मारामाNया करत. त्यात हे पाच जण तयार झालेले. याच काळात ते ‘यादवां’चे ‘जकाते’ झाले.

पुढं; बाऽ मेल्यावर हे पाचजण भाऊ स्वतंत्र झाले. त्यांतील एकाला मूलबाळ नव्हतं, म्हणून त्याला बाकीचे चौघेजण भाऊ वाटा देण्यास तयार नव्हते. पण त्यानं तो भांडून घेतला. नोटांपेक्षा चांदीचे रुपये जास्त वापरात होते. मुलंबाळं असलेल्या भावांवर चिडून, त्यानं वाटणीला आलेले सगळे पैसे एका फाटक्या पोत्यात घालून, ते पोतं एका रेड्यावर लादलं नि रेडा गावभर उधळवला. गावाला पैसे खिरापत म्हणून विस्कटून दिले. ‘‘मी माझ्या गावाला सारी इस्टेट देईन. पर ह्या मांगाच्या बोड्याच्या भावांस्नी एक पै बी देणार न्हाई.’’ अशी त्याची प्रतिज्ञा.

जकातीचा पैसा भरपूर आलेला.

पुढं; कागलचा गुरांचा बाजार बंद झाला आणि कोल्हापुरास गेला. त्याबरोबर ह्यांचं जकातीचं काम बंद पडलं. मागं फक्त ‘जकाते’ हे पड-नाव राहिलं. मग ह्या पाच भावांचा सगळ्या गावालाच त्रास होऊ लागला. पाचांतील दुसरा भाऊ जळितं करण्यात प्रसिद्ध. तिसरा मग सरकारी रानं लिलावात घेऊन, तीच निम्मीनिम्मी वाटून, जास्त पैसे घेऊन पोटवाट्यानं देऊ लागला. चौथा शेती करत असे. पाचवा; म्हणचे रतनूचा वडील, शेती बघता बघताच लांबलांबच्या गावांना जाऊन, तेथून धान्य खरेदी करून दुसNया मुलुखाला नेऊन विके. असा उद्योग करण्यासाठी मनगटात भरपूर सामथ्र्य लागे. वाटा आडरानांतल्या. रानांत लुटालूट, दरोडे नेहमी होत. परक्या गावात आलेल्या माणसाजवळची नगद रक्कम लुटली जाई. त्यामुळं बरोबर ताकदीची माणसं घेऊन, सानेचे विळे, भाले, कुNहाडी घेऊन खरेदीला जावं लागत असे. रतनूही आपल्या बाऽ बरोबर पुष्कळ वेळा खरेदीला जाई. पण पुढं रतनूच्या बाऽला वाटलं; एकुलतं एक पोरगं. अशा जोखमीच्या धंद्यात घालण्यापेक्षा त्येला शेतकरीच करावा.

...पाची भाऊ आपापल्या घरात सवते होते; पण एकमेकांचे वैर विसरले नव्हते. एकमेकाच्या वैरणी जाळायचे. कापणीला आलेली पिवंâ कापून न्यायचे, चोरून गवतं कापायचे. अधनं मधनं एखादं जनावर टाचा खुरडून मरायचं नि प्रत्येकाच्या पोटात संशयाचा गोळा उठायचा... रतनूच्या आई-वडलांना वाटायचं; ह्या भाऊबंदकीत आपलं एकबी पोरगं जगणार नाही. म्हणून रतनूच्या वडलानं लांब जाऊन मांगवाड्याशेजारी जागा विकत घेतली नि तिथं तीन जप्त्यांचं साधं घर बांधलं. त्या घरात त्याची तीन पोरं जगली. त्यांतला थोरला रतनू. त्याच्या खालच्या दोन बहिणी; वंâबळा नि आकणी... ह्या तिघांतही घराण्याचे गुण उतरलेले. अंगातली शक्ती कमी होईल, वय वाढत जाईल तसं रतनूच्या वडलाचं ध्यान शेतीकडं जास्त लागलं. गावात मिळेल त्याची पाच-सात एकरांची जमीन तो फाळ्यानं करायचा. त्यातच ऊस, माळवं, मिरची, गहू-हरभरा पिकवायचा. फाळा
भागवून मिळेल तेवढ्यात तो दर साल गुदरायचा. सुगी झाली की, कधीमधी जवळपासच्या खेड्यावरच जायचा नि जोंधळ्या-तांदळाची खरेदी करायचा. कोल्हापुरात गाडीनं नेऊन विकायचा. कधी चार पैसे उरायचे, कधी जेवढ्यास तेवढंच व्हायचं.

चार दिसाचं पोटपाणी बाहेर पडायचं. ‘‘निदान बैलभाडं नि आमची पोटं तरी बाहीर पडली. बसून घरातलंच खाण्यापेक्षा हे काय वंगाळ न्हाई.’’ अशी तो स्वत:ची नि बायकोची समजूत घालायचा. पण हळूहळू त्यानं हा व्यापार बंद करून टाकला नि पोराबाळांसह शेतावरच कष्टपाणी करू लागला... तरी भाऊबंदकीची भुणभूण
अधनंमधनं चालूच होती. हाडवैरी असलेल्या मधल्या भावानं त्याच्या शेजारीच मोकळी जागा घेऊन, इर्षेला पडून टोलेजंग घर बांधलं.

ताराला दोन भाऊ. एक मोठा आणि एक धाकटा. रामा आणि लिंगाप्पा. रामा तारापेक्षा सहासात वर्षांनी मोठा आणि लिंगाप्पा बNयाच वर्षांनी लहान. ताराचा बाऽ शिवाप्पा जाधव वाळली शेती फाळ्यानं करायचा. मृगापासनं संक्रान्तीपर्यंत त्या शेतात राबायचा. उन्हाळ्यात मोलमजुरी करायचा. घाण्यागुNहाळात गुळव्याच्या हाताबुडी आडसोडी म्हणून काम करायचा. सालाच्या बेजमीचा गूळ मिळवायचा.

सुगीच्या दिसांत आपली सुगी झटक्यासरशी घरात आणून, कुणाकुणाच्या इथं भात-जोंधळा कापायला जायचा. त्याचं शेर-पायली मिळत राहायचं. पावसाळ्याचं दीस जवळ आलं की, भटाबामणांची घरं शाकारायचा. ह्या सगळ्या कामांना साध्या रोजगारापेक्षा दोन आणे जास्त मजुरी असायची. ती उन्हाळभर पदरात पाडून
घ्यायचा. त्या वरच्या दोन आण्यांची रोज रात्री गुत्त्यावर जाऊन नेमानं दारू प्यायचा. ताराचा बाऽ शिवाप्पा आणि रतनूचा बाऽ आप्पाजी हे कधीतरी, रानाकडेला रान आल्यानं एकमेकाचे दोस्त झाले. एकमेकाला बारीसारीक गोष्टीत मदत करू लागले, आधार देत गेले.

रतनू आता आठनऊ वर्षांचा पोरगा झाला होता. एकुलता एक जगल्यामुळं लाडात वाढत होता. घरातलं म्हशीचं दुभतं एकटा खात होता. भाऊबंदांच्या इर्षेवर वाढत असणारं पोरगं. सातव्या वर्षीच तालमीत जाऊ लागलं. भोकरी रंगाचं पाणीदार डोळं. कट्यारीच्या आकाराचं धारदार नाक. पुâगवट नाकपुड्या. गुटगुटीत अंग. तांबूस गोरा रंग. उन्हात तापला की गाजरासारखा दिसे. शाहूमहाराजांच्या तांबड्या मातीत लोळू लागल्यावर तर, तांब्याच्या घासलेल्या घागरीसारखा दिसू लागे. बोलताना रागात, आक्रमक पवित्र्यात बोलल्यागत वाटे. त्यात पुन्हा आवाज मोठा. ओरडला की जनावरंही मागं फिरत असत. आता तर तालमीमुळं त्याच्या अंगात खुमखुमीची पैदास होऊ लागली.

कागल हे शाहूमहाराजांचं औरस गाव. वर्षाला गैबीच्या उरुसात जंगी कुस्त्यांचं मैदान व्हायचं. बैलगाड्यांच्या शर्यती, रेड्या-बकNयांच्या टकरी, ताकदीनं अवजड वस्तू ओढण्याच्या पैजा व्हायच्या. शाहू महाराजांचा हात पाठीवरनं फिरायचा.

प्रत्येक शेतकNयाला वाटायचं; आपल्या पोराच्या पाठीवरनं तो फिरावा. बैलांच्या पाठीवर महाराजांची थाप पडावी. बकNयाच्या तोंडात महाराजांची मूठभर डाळ स्वहस्ते जावी... वर्षभर गाव घुमू लागायचं. प्रत्येक गल्लीच्या तिकटीला तालीम. पहाट झाली की, बारकीसारकी पोरं घुमायची नि अंगं तांबड्या मातीत घुसळायची. गावाच्या उगवतीच्या माळाला कायमचाच बैलगाड्यांच्या शर्यतीचा राऊंड केलेला.

त्या राऊंडवर, पावसाळा झाल्यावर रोज एखाद-दुसरी गाडी सरावासाठी पळतेली दिसायची. माळाला पोरंटोरं दीसभर बकNयांच्या, रेडकांच्या टकरी लावून चुरस करायची. तांबूळ रानात हीच पोरं कुस्त्या लावून बटनं, पैसा-दोन पैसे जिंवूâन घ्यायची. असा कायमचा शाहू महाराजांचा वारा प्यालेलं गाव.

No comments:

Post a Comment