Wednesday 20 November 2013

पर्व

``ज्याप्रमाणे राजिंसहासन थोरल्या भावाचं असतं, त्याप्रमाणे मुलीनं फक्त थोरल्याला दान म्हणून गेलं पाहिजे. दोन : थोरला राज्यावर बसला, तरी धाकट्यांनाही ज्याप्रमाणे राज्योपभोगात समान हक्क असतो, त्याप्रमाणे हिच्यावर प्रत्येकाचा अधिकार राहील. राज्यात जे घडतं, ते ज्याप्रमाणे राजाच्या नावावर
पडतं, त्याप्रमाणे हिच्यापोटी जन्मणाNया मुलांना थोरल्या धर्मराजाच्या नावानं नामकरण व्हावं. पण मुलांनी मात्र प्रत्येकाला पिता मानलं पाहिजे. मृत्यूनंतर प्रत्येकाला समान प्रमाणात जलप्रदान करायला हवं. पाच : नंतर कुठल्याही स्वयंवरात यापैकी कुणीही दुसNया कन्येला िंजवूâन आणली िंकवा युद्धात कुठल्या
राजानं कन्या अर्पण केली, तर तिनंही याच पद्धतीनं आचरण केलं पाहिजे. अशा इतर बायकांची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी थोरल्या राज्ञीची. सहा...''

आता कशाला हव्यात त्या नियमांच्या आठवणी? सगळे नियम अर्जुनानं कितीतरी वेळा आपल्याला हवे तसे मोडले आहेत. फक्त स्वत:साठी, अशी एक पत्नीही करून आणलीय् त्यानं! आणि मी बसलेय् इथं धर्मराजाची पट्टराणी होऊन! त्याच्या राजाचं प्रतिरूप होऊन! त्याच्या द्यूताचा पण होऊन! अवमानित होऊन! वनवासी... रानटी लोकांसारखी वंâदमुळं आणि मांस खात! कुणाच्या तरी घरची चार कामं करून स्वत:ला सगळ्यांपासून दडवत! खरं आहे! कुठल्या आर्य ध्Eाीला मिळणार आहे हे भाग्य! पाचपट सुख, म्हणे! लग्न तरी का करतात, हे असले पण लावून? शक्तिवानानं िंजवूâन घ्यायचं, आपल्याला हवं तसं वाटून घ्यायचं आणि नको असेल, तेव्हा भिरकावून द्यायचं! कुणी सुरू केली ही स्वयंवराची क्षत्रिय पद्धत?...

``मुलं येताहेत. पाचहीजण एकाच रथातून. किती ऊन्ह हे!'' ज्योतिष्मति जवळ येऊन म्हणाली.

थोड्याच वेळात घरासमोर रथाचा आवाज ऐवूâ आला. पाचही मुलं रथातून उतरली.

कृष्णा उठून दरवाज्यापर्यंत गेली.

काय ह्या उन्हाच्या झळा! नुसतं रणरणत होतं समोरचं अंगण! मुलांचे चेहरे आणि सर्वांग घामानं डबडबून गेलं होतं. त्यावर धुळीचा लेप चढला होता. सगळे आत आले. स्नान केलं. तोवर दासीनं शिजवलेले खाद्यपदार्थ आणून ठेवले होते. ज्योतिष्मतीनं जेवायची बाकीची व्यवस्था केली होती. स्वत: कृष्णा आग्रह कर-करून त्यांना जेवायला वाढत होती.

त्यांचं जेवण होताच तीही जेवली. पोटात अन्न पडताच मुलांना जांभया येऊ लागल्या. बाहेर उन्हाचा दाह पसरला होता. वाळ्याचे पडदे सोडून, त्यावर पाणी मारून थंड केलेल्या खोलीत ज्योतिष्मतीनं लाकडी फळ्यांवर चटया अंथरून मुलांसाठी झोपायची व्यवस्था केली होती. एका ओळीत डोकी येतील, अशा
रीतीनं पाचही मुलं झोपली. पाय मात्र थोडे वर-खाली होते. प्रतििंवध्याची उंची थोडी कमी होती. धाकटा श्रुतसेन सगळ्यांत उंच होता. हा कुणासारखा आहे? इतरांपेक्षा जरा जास्त बोलका आहे हा. पण कुणाचीच देहयष्टी भीमासारखी नाही. प्रत्येकाच्या चेहNयावरून आणि शरीर-यष्टीवरून फिरणारी दृष्टी तिचा
गोंधळ वाढवत होती. एकाची हनुवटी नकुलासारखी वाटली, की नाक अर्जुनासारखं वाटत होतं. एकाचा चेहरा सहदेवासारखा वाटला, तरी ओठांची ठेवण कुणासारखी आहे, याचा तिच्या मनात गोंधळ उडत होता. पाच पांडवांची मुलं आहेत, त्यामुळं एकाशीच साम्य दिसत नाही, असं तिनं मनाशी समाधानही करून घेतलं.

प्रतििंवध्याचा स्वभाव फारसा बोलका नव्हता. तो मुकाट्यानं उताणा पडून, आढ्याकडे दृष्टी खिळवून काही तरी विचारात गढून गेला होता. इतर चौघंही युद्धाच्या वेळी शत्रू कुठून आला, तर आपण कसा बाण टाकायचा, याचा विचार करत होते.

सर्वांत आधी श्रुतसेन झोपी गेला. त्यापाठोपाठ श्रुतसोमानं बोलणं थांबवून डोळे मिटले. श्रुतर्कीित आणि शतानिकही जांभई देऊन कुशीवर वळले. थोरला मात्र आतापर्यंत त्यांच्या गप्पांतही रमला नव्हता आणि आता झोपण्यातही सहभागी झाला नाही. तसाच आढ्याकडे दृष्टी खिळवून उताणा पडून होता. हातात पंखा घेऊन, त्या पाचही जणांच्या उशाशी बसून सावकाश वारा ढाळणारी कृष्णा त्याच्याकडे पाहत होती. त्याला अजूनही जागाच पाहून तिनं विचारलं, ``झोप येत नाही, का, बाळ?''

``मला तशी दुपारी झोपायची सवय नाही.''

``थकला नाहीस सराव करून?''

``एवढा काही नाही.''

याचं बोलणं बेताचंच. मनाला वाटेल, ते मोकळेपणानं बोलणं तर त्याहूनही कमी. इथं येऊन पाच महिने झाले. आतामात्र क्वचित कधी तरी आईशी थोडाफार बोलत होता. तेही फक्त जवळपास कुणी नसताना िंकवा ती एकटीच आपल्याच विचारात चूर होऊन बसली असताना.

काही तरी बोलायचं, म्हणून तिनं विचारलं, ``पाठीमागून शत्रू आला, तर काय करायचं, हे कुणी शिकवलं तुला?''

``अभिमन्यूनं.''

``बाळ, तो फक्त सोळा वर्षांचा आहे. तू चोवीस वर्षांचा. धर्नुिवद्येत त्यानं तुम्हांला शिकवावं, एवढे मागं राहिलात? तुमच्या मामानं तुम्हांला नाही का शिकवलं?''

``शिकवलंय् ना! चांगलं शिकवलंय्. पण अभिमन्यूला त्याचे बाबा शिकवतात, नाही का! आणि ते जितके कसलेले धनुर्धारी आहेत, तेवढं संपूर्ण आर्यावर्तातही कुणी नाही. मामानं आम्हांला आपल्याकडंच सगळं कौशल्य शिकवलंय्.''

आढ्याकडे पाहत प्रतििंवध्य अगदी सरळ आणि सहजपणे सांगत होता. पण त्याच्या या बोलण्यामुळं कृष्णेच्या हृदयात मात्र काही तरी बोचल्यासारखं झालं.

अर्जुन आपल्या मुलाला आपलं कौशल्य शिकवत आहे, हे काही वाईट नाही. पण हीही त्याचीच मुलं आहेत ना! की ही पाचजण धर्मराजाची आहेत, असं हा समजतो?

एकाएकी तिच्या मन:पटलासमोर आजवर कधीच न जाणवलेला अर्जुनाच्या स्वभावाचा एक पैलू प्रकर्षानं सामोरा आला. चतुर, रसिक, वीर, सुंदर, अहंकारी, स्वार्थी, सुखाकांक्षी असं अर्जुनाचं रूप तिच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. अभिमन्यूचं लग्न ठरल्याची बातमी कानांवर येताच कुठं तरी सुप्त रूपानं दडलेली भावना आता रूप घेऊ लागली. त्याच्याविषयी तिरस्कार... समोर येऊन उभा राहिला, तर अवाक्षरही न बोलण्याएवढा प्रचंड तिरस्कार उफाळून आला.

पाचही मुलांना वारा ढाळत ती तशीच बसून राहिली. प्रतििंवध्य तसाच उताणा आढ्याकडे पाहत झोपला होता. त्या नीचाला धर्माची िंकचितही चाड नाही. धर्माचं जे काही ओझं असेल, ते फक्त माझाच चेंदामेंदा करण्यासाठी आणि त्या धर्माची धग असेल, तर ती मला अंतर्बाह्य पोळून शिजवून काढण्यासाठी! कुणाला कशाला हवा हा धर्म! त्यातही अर्जुनाला!

रोज एकेकाप्रमाणे पाच रात्री विवाह साजरा झाला माझा. त्यानंतर सहाव्या दिवशी... हो. नक्की आठवतं. सहाव्या दिवशी दुपारी राजमाता वुंâतीनं मला बोलावणं पाठवलं. दोन्ही हातांनी जवळ घेत सांगितलं, ``मुली, तू पाचही जणांची झालीस. आता तुला मी एक परम-धर्माची गोष्ट सांगते. ती सतत तुझ्या लक्षात असू दे. पतीच्या उत्कर्षासाठी झटणं हा आर्य-

ध्Eाीचा एकमेव धर्म आहे. हे तुलाही ठाऊक आहेच. तुझे पाचही पती एकत्र राहतील, तरच ते स्वत:चं रक्षण करू शकतील आणि आपलं राज्यही पुन्हा मिळवू शकतील. कुठल्याही कारणानं त्यांच्यात पूâट पडली, तर वाळवी लागून भलामोठा महाल मातीत मिसळून जावा, तशी गत व्हायला वेळ लागणार नाही. आजवर कधीही एकमेकाला शब्दानंही न दुखावणारी माझी मुलं तुझ्यावरच्या मोहापायी एकमेकाच्या जिवावर उठली होती! तू मिळाल्यावर आता पुन्हा एक दिलानं उभी आहेत. तुझा कटाक्ष जरी एखाद्याला जास्त मिळत आहे, असा
इतरांना संशय आला, तर पुन्हा त्यांच्या मनात किाqल्मष निर्माण होईल. त्यामुळं पाचहीजणांवर काया-वाचा-मनानं सारखं प्रेम करायला हवंस तू! हे तुझं व्रत झालं पाहिजे.''

सुनेला सासूनं उपदेश केला– आपल्या मुलांच्या उत्कर्षासाठी! या धर्माचं पालन करताना मी काय काय भोगलंय, हे कुणाला समजणार? काया! वाचा! पण मन? तेही समान प्रमाणात वाटणं ही काय माझ्या हातातली गोष्ट आहे? कुणाच्या हातातली गोष्ट आहे ही? राजमातेला कसा कळणार मनाचा बलिष्ठ धर्म? बोलणं कुणाबरोबर कमी नाही, की जास्त नाही. कुणाला हसून आणि कुणाला कपाळावर आठ्या घालून, असंही कधी केलं नाही. जसं धर्माला, तसंच नकुल-सहदेवालाही स्वयंसमर्पण! पण अर्जुनाखेरीज इतर कुणाशी मनाचं सामीप्य कसं शक्य होतं? अंतर्मनच बोलण्याचं रूप घेऊन बाहेर येत होतं. प्रेमकलेतच नव्हे, तर प्रेम-संभाषणातही चतुर असलेला अर्जुन संभाषणाच्या ओघात मनातलं सारं बोलायला भाग पाडत होता. अशा वेळी वाचा मनाशी द्रोह करत होती. या दोहोंबरोबर शरीरही तसं वागल्याशिवाय कसं राहील? अर्जुनाबरोबरची रात्र या भूमीवरची राहतच नव्हती!

तरीही या कृष्णेनं इतरांची फसवणूक केली नाही! जे अर्जुनाला ती सहजपणे अर्पण करत होती, तेच इतरांना प्रयत्नपूर्वक, उसन्या उत्साहानं देत होती. नववधू द्रुपद राजकुमारीनं लग्नाच्या सहाव्या दिवसापासूनच या तळमळीत स्वत:ला झोवूâन दिलंय्! पाच पांडवांचं सख्य या मुठीत शाबूत ठेवण्यासाठी तिनं स्वत:च्या
तन-मनाची ससेहोलपट होऊ दिली आहे! आणि आता त्याच ऐक्याला आपण होऊन तडा जात असताना मी काय करू? माझी तडफड व्यर्थ गेली, म्हणून तळमळण्याखेरीज दुसरं काय आहे माझ्या हातात.

2 comments:

  1. Yeah it's really nice book...
    When I was reading every time I was getting to know new things about the mahabharata characters..
    That's really great book....

    ReplyDelete