Wednesday 13 November 2013

पितृऋण

हुबळीच्या बँकेत बदली झाल्याची ऑर्डर पाहून व्यंकटेशांचा मूड एकदम बिघडला. ह्या वेळेस बदली नक्की होणार, हे माहीत असलं तरी जवळच, म्हणजे कोलार, कनकपूर, म्हैसूर अशा ठिकाणी ती होईल, असं त्यांना वाटत होतं; पण हुबळी म्हणजे अगदीच अनोळखी गाव, त्यातून लांब. काय करावं ते व्यंकटेशांना सुचेना. त्यामुळे कार चालवत निरुत्साही मनाने व्यंकटेश त्यांच्या जयनगरच्या घरी परतले.

खरं पाहता व्यंकटेशांना काम करण्याची आवश्यकता नव्हती. त्यांचे मित्रही त्यांना नेहमी व्ही.आर.एस. घेऊन घरी आराम करायला सांगायचे. घरात पैशाची कमतरता नव्हती. मात्र निरोगी असताना घरात नुसतं बसून राहणं, व्यंकटेशांच्या मनाला पटत नव्हतं.

नव्या वातावरणात मुलंही व्यवाqस्थत वाढली होती. त्यातून त्यांची बायको `शांता' घरचे सर्व व्यवहार त्यांच्यापेक्षा चांगल्या रीतीने पार पाडायची. केवळ ‘बाईसाहेबांचा नवरा’ एवढीच त्यांची िंकमत होती.

``आमची शांता चुवूâन मुलगी झाली आहे. एखादं राज्य सांभाळण्याची तिची योग्यता आहे.'' असं व्यंकटेशांचे सासरे सूर्यनारायणराव नेहमी कौतुकाने म्हणायचे. त्या वेळेस व्यंकटेश गप्प बसत असत.

व्यंकटेश घरी पोहोचले, तेव्हा शांता तयार होऊन कारमधून निघाली होती. तिच्या एकंदर मेकअपवरून बाईसाहेबांचा लेडीज क्लबमध्ये कार्यक्रम असावा, असा व्यंकटेशांनी अंदाज केला. शांताने मेकअपबरोबर हिNयाचे दागिने घातले होते. रेशमी साडी नेसली होती. त्या अर्थी काहीतरी विशेषच कार्यक्रम असावा, असं व्यंकटेशांना वाटलं. नाहीतर हिNयाचे दागिने बाहेर कशाला पडले असते? लेडीज क्लब प्रेसिडेंट, कॉलेज कमिटी मेंबर, स्वूâल कमिटी व्हाइस प्रेसिडेंट या पदांवर असल्याने अशा अनेक कार्यक्रमांतून शांता नेहमी पुढे असायची. 

त्यामुळे ती घरी फार कमी असायची. घरात असली, तर सतत फोनला चिकटलेली असायची. ती शेअर्सचे व्यवहार करायची, म्हणून त्यांची मुलगी गौरी नेहमी, ``आई, तू बाहेर राहूनच कामं कर. तुझ्या फोनमुळे मला डिस्टर्ब होतं.'' असं निर्भयपणे सांगायची. मात्र शांताला आता या गोष्टीचा रागही येईनासा झाला होता.

बाहेर जाऊन कार सुरू करण्यापूर्वी, ``मला यायला बहुतेक उशीर होईल. तुम्ही आणि गौरी जेवून घ्या, माझी वाट पाहू नका. येताना बाबांना भेटून येईन. आई आजारी आहे असं कळलंय.'' असं सांगून उत्तराची वाट न पाहता शांता निघून गेली.

तिचे आईवडील जयनगरमध्येच थोड्याशा अंतरावर राहायचे. शांताने आईवडिलांना आपल्या घरी येऊन राहायला सांगितलं, पण व्यवहाराच्या दृष्टीने त्यांना ते पटलं नाही. ``आम्ही जवळच आहोत आणि म्हटलं तर लांबही आहोत. हातपाय चालताहेत तोवर वेगळे राहू. जावयाकडे राहणं बरं नाही.'' असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, म्हणून दिवसातून एकदा शांता माहेरी जाऊन यायची.

व्यंकटेश घरात आले. गौरीने माडीवरून खाली येताना बाबांना घरात आलेलं पाहिलं आणि पॅâन सुरू करून सोफ्यावर धपकन बसणाNया वडिलांना म्हणाली, ``बाबा, काय झालं? तब्येत बरी नाही का?''

व्यंकटेशांनी काही न बोलता गौरीकडे पाहिलं. गौरी उंच, सडपातळ आणि गोरी होती. तिचे अंतस्थ गुण— प्रेम, आपुलकी, तिचा चेहरा उजळून टाकायचे. ती बुद्धिमानही होती. त्यामुळे व्यंकटेशांना तिच्याबद्दल फार माया वाटायची. ``गौरी, माझी हुबळीला बदली झाली.'' अगदी निराशेने व्यंकटेश बोलले. ``त्यात काय झालं? डोंगरच कोसळल्यागत बोलताय की! हुबळी म्हणजे काही कलकत्ता नाही. रात्री गाडीत बसलात की, सकाळी हुबळीला पोहोचाल,'' गौरी म्हणाली.

``तसं नाही गौरी. तिथं पुन्हा नवं घर मांडावं लागेल. अनोळखी गाव, शिवाय तिथून इथे कधी बदली होईल, तेही माहीत नाही.'' व्यंकटेशांनी शंका व्यक्त केली.

``बाबा, तुमच्या प्रॉब्लेमवर दोनच उत्तरं आहेत. एकतर आईला सांगून कोणाकडून तरी बदली वॅâन्सल करवून घेणं िंकवा तिथं जाऊन वर्षभर राहून इकडे बदली करवून घेणं.'' गौरीने सुचवलं.

शांताला सांगून कोणाकडून तरी बदली वॅâन्सल करवून घेणं व्यंकटेशांना मात्र मुळीच पसंत नव्हतं. शांताला सांगितलं असतं तर तिचं उत्तर ठरलेलं होतं— ``अहो, अशा कमी पगारात कशाला काम करता? माझ्या मॅनेजरला मी तुमच्यापेक्षा जास्त पगार देते. उगीचच कोणाच्यातरी पाया पडत काम करण्यापेक्षा
व्ही.आर.एस. घ्या आणि घरी बसा.'' 

शांताचं आयुष्य म्हणजे नुसता देण्याघेण्याचा व्यवहार होता. तिच्या श्वासात, रक्तात, कणाकणात व्यवहार भरला होता. कधीकधी ती भावनाशून्य आहे, असंच वाटायचं. तिचं बोलणं कमी होतं. कोणताही प्रसंग असो, त्याकडे बघण्याचा तिचा रोख व्यवहारीच असायचा. एखाद्या व्यक्तीला समजावून घेण्याची तिची रीतही तीच. जिथे भावना नसतात तिथे व्यवहार फार सुलभ! पण भावनाशून्य होऊन जीवन कसं जगायचं? घर चालवण्यासाठी फक्त व्यवहार काय कामाचा?

No comments:

Post a Comment