नो मॅन्स गार्डन
मी लहान असताना आमच्या शाळेची लक्ष्मीश्वर नामक गावी सहल गेली होती. तिथे एक मोठं देवालय आहे. त्याचं नाव सोमेश्वराचं देऊळ. हे मंदिर प्रचंड मोठं असून, मंदिराच्या सभामंडपात मोठमोठे स्तंभ आहेत आणि भिंतींवर अतिशय सुरेख कोरीव काम केलेलं आहे. मंदिराच्या आवारात जागोजागी नितांत सुंदर शिल्पकृती आहेत; पण त्या सगळ्याचं त्या वेळी मला काही विशेष वाटलं नव्हतं; परंतु मंदिराच्या प्रांगणात एक मोठा पाषाण आहे. त्यावर काही विशिष्ट रेखाकृती कोरलेल्या आहेत. हा पाषाण पाहून माझं मन भरून आलं. हा पाषाण एक हजार वर्षांहूनही अधिक जुना आहे. त्यावर एक शिलालेख कोरलेला आहेच, तसंच काही
चित्रंपण कोरलेली आहेत. चित्रात एका जलवुंâभामधून काही गाई-म्हशी पाणी पीत असल्याचं दाखवलं आहे. एक माणूस जवळच्या विहिरीतून पाणी शेंदून त्या जलवुंâभात भरत आहे, असंही दाखवलं आहे. कन्नड भाषेत याला ‘धर्म येथा’ असं म्हणण्यात येतं. एखादा कनवाळू माणूस एक विहीर बांधतो, जवळच एक जलवुंâभ
ठेवतो आणि विहिरीतून त्या वुंâभात पाणी भरण्यात येऊन तो वुंâभ माणसांना आणि प्राण्यांना पाणी पिण्यासाठी सतत भरलेला राहावा, अशी व्यवस्था करून ठेवतो.
हा जलवुंâभ विंâवा त्यातलं पाणी, हे सर्वांसाठी असतं. त्यावर कुण्या एकाची मालकी नसते. मी अगदी लहान असल्यापासून ही संकल्पना माझ्या मनावर जशी काही कोरली गेलेली आहे. सर्वसाधारणपणे लोक जेव्हा इतरांना मदत करतात, तेव्हा त्यांची काहीतरी अपेक्षा असते; पण तुमच्या मनात मानवजातीबद्दल, पशुपक्ष्यांबद्दल खरोखर प्रेम असेल, तर मग हळूहळू ही अपेक्षा कमीकमी होत पार नाहीशी होते.
जीवनाच्या विशाल संदर्भापुढे हे तुझं, हे माझं अशी मालकी हक्काची भावना लुप्त होऊन जाते. माणसाला खराखुरा निर्मळ, उच्च दर्जाचा आनंद त्यानंतरच मिळतो. एका गावात पराप्पा नामक एक वयोवृद्ध माणूस राहत होता. त्याची दृष्टी तशी चांगली होती. त्याला कानांनी व्यवस्थित ऐवूâही येत असे; पण गेल्या काही
दिवसांपासून त्याला चालताना थोडा त्रास होऊ लागला होता. तरुणपणी तो एकेका दिवशी वीस मैल आरामात चालून जाऊ शकायचा; पण आता तशी स्थिती राहिली नव्हती. त्याला त्याच्या आई-वडिलांकडून रसाहक्कानं पाच एकर जमीन मिळाली होती. त्या जमिनीत अपार काबाडकष्ट करून त्यानं स्वत:चा व्याप पुष्कळ वाढवला होता. आता त्याच्या मालकीची पन्नास एकर जमीन होती. त्यानं आयुष्यात पुष्कळ
यश मिळवलं होतं.
एक दिवस त्याचा मुलगा भीमप्पा त्याला म्हणाला, ‘‘पिताजी, तुम्ही तुमच्या तरुणपणी खूप मेहनत केलीत; पण आता शेतीची पद्धत बदलून गेली आहे. आता आपल्या शेतीसाठी ट्रॅक्टर्स आणावे, अद्ययावत यंत्रसामग्रीचा शेतीमध्ये वापर करावा, असं माझ्या मनात आहे. म्हणजे रोज रोज शेतावर जाऊन मजुरांवर देखरेख करण्याची आपल्याला गरज पडणार नाही, शिवाय यंत्र आल्यावर कमी मजुरांना कामावर ठेवावं लागेल. मला तुमच्या सल्ल्याची जेव्हा जेव्हा गरज भासेल, तेव्हा तेव्हा मी तो घेईनच; पण आता तुम्ही घरी राहावं, आराम करावा, असं मला वाटतं.’’
मग पराप्पापण कामातून बाजूला होऊन निवृत्त जीवन जगू लागला आणि शेतीचा पसारा भीमप्पानं सांभाळण्यास सुरुवात केली.
पराप्पानं खूप मोठं घर बांधलं होतं. गावातील पाण्याचा जो जलाशय होता, त्याचा मातीचा बंधारा त्या घराच्या अगदी समोरच होता. याला कन्नड भाषेमध्ये ‘बाडुवू’ असं म्हणतात. म्हणून त्या गावात लोक पराप्पाचा उल्लेख ‘बाडुविना पराप्पा’ असा करत. हळूहळू तीच त्याची ओळख बनली. संध्याकाळच्या वेळी पराप्पा, आपल्या घराच्या पडवीत बैठक मारून बसायचा. मग त्याचे मित्र त्याला तिथे भेटायला येत आणि सगळे मिळून गप्पागोष्टी करत. गावातील विशेष घडामोडींवर चर्चा करत.
पराप्पा हा सधन शेतकरी असल्यानं त्याच्या घरी भरपूर नोकरचाकर होते.
भीमप्पाच्या बायकोनं कामासाठी एक मोलकरीण ठेवली होती. तिचं नाव परव्वा. ती रोज येऊन घराची, अंगणाची झाडलोट करायची, साफसफाई करायची. ती इतकी बडबडी होती, की सगळ्या गावच्या बातम्या तिच्या तोंडी असायच्या. रोज सकाळी नाश्ता करून पराप्पा घराच्या ओसरीत बाडुवूकडे तोंड करून बसायचा
आणि इकडे काम करता परव्वाची तोंडाची टकळी चालू असायची. परव्वाकडे तर स्थानिक वृत्तपत्रापेक्षाही जास्त खमंग, आतल्या गोटातल्या बातम्या असायच्या. परव्वा आपल्या छोट्या मोठ्या कौटुंबिक अडचणींविषयीसुद्धा पराप्पाला सांगायची.
तिचं कुटुंब खूप मोठं होतं. ती, तिचा नवरा, त्याचे आई-वडील, तिची दोन मुलं, एक लांबचा दीर आणि त्याची तीन मुलं – इतकी सगळी माणसं एकत्र राहत. तिचा नवरा पराप्पाच्या शेतात कामाला होता. त्यांचं आयुष्य एवंâदर बिकट होतं.
एक दिवस सकाळच्या वेळी परव्वानं आपलं मौखिक बातमीपत्र सुरू केलं, ‘‘आजकाल भाजीपाल्यावर एक नवा रोग पडलाय, त्यामुळे आता गावच्या बाजारात भाज्यांचे दाम दसपट वाढले आहेत. आजकल श्रीमंतांनसुद्धा भाज्या खाणं परवडेनासं झालंय. तेसुद्धा भाजी खरेदी करताना विचार करतात. एक किलो टमाट्यांचा दर दोन लिटर दुधापेक्षाही जास्त झालाय. कालतर फारच कठीण परिस्थिती ओढवली.’’
ती एक सुस्कारा टावूâन म्हणाली.
Sudha Murti yaanchya "wise otherwise" ani itarhi pustake maNsanishayii bharbharun v nemke boltat
ReplyDelete