Friday, 22 November 2013

अ‍ॅना आणि सयामचा राजा

वेल्स ते भारत

वेल्समधील कार्नरव्हॉन या ठिकाणी ५ नोव्हेंबर १८३४ रोजी तिचा जन्म झाला होता. थॉमस मॅक्सवेल क्रॉफर्ड पतिपत्नींच्या अ‍ॅना हॅरिएट या मुलीला ओळखणारे आता तेथे कोणीही नव्हते. पण तेथून अध्र्या जगाइतक्या लांब असलेल्या, आशियातल्या एका सुंदर शहरात अजूनही तिची आठवण काढली जाते.

अरुंद रस्त्यांचे स्वच्छ गाव असलेले कार्नरव्हॉन, आयुष्याची सुरुवात करण्यासाठी फारच सुरेख जागा होती. मोठ्या रस्त्यांना छोट्या अरुंद गल्ल्या मिळत होत्या. पण सगळे रस्ते अतिशय स्वच्छ होते. समुद्रावरून वाहणारा ताजा वारा आणि त्या विशाल समुद्रावर क्षितिजावरून उगवणारी आणि क्षितिजापार नाहीशी होणारी
जहाजे; उन्हाळ्यातल्या संध्याकाळी शहराच्या उत्तरेकडल्या चौपाटीवर िंहडणे आणि एजलसी हिल्सच्या मागे ढगांच्या रंगीबेरंगी स्वप्नभूमीत सूर्य मावळताना पाहणे फार सुखकारक असायचे.

गौरवशाली भूतकाळाची आठवण करून देणाNया अनेक गोष्टी त्या भागात पसरलेल्या होत्या. छावण्यांचे अवशेष, गढ्या, किल्ले, क्रॉमलेक्स (म्rदस्तम्प्ेपुराणैतिहासिक काळातील वर्तुळाकार दगडी रचना), मठ यांतून त्या खुणा दिसत होत्या. पूर्वी सतत होणाNया हल्ल्यांपुढे ब्रिटनने अखेर या भागात माघार घेतली
होती. वेल्सच्या या भागात रोमनांनी जरी खूप मोठा तोफखाना ठेवलेला असला तरी येथे या वेल्सभूमीवर त्यांना पूर्ण वर्चस्व कधीच स्थापन करता आले नव्हते. वेल्स लोकांची स्वातंत्र्याची भूक ते मारू शकले नव्हते आणि त्यानंतरची अनेक शतके इंग्लिश लोकही हे काम करू शकले नाहीत. या एल्फ आणि मर्लिनच्या भूमीत
घालवलेल्या बालपणाची एक आठवण अ‍ॅना हॅरिएट क्रॉफर्ड अजूनही विसरली नव्हती. वनपNया आणि जंगलातील आत्म्यांच्या नावाने ती झाडांना पत्रे अडकवून ठेवत असे आणि त्यांना छान-छान उत्तरे येत असत. या सगळ्यातून स्वातंत्र्याबद्दल अत्युत्कट प्रेम, गाढ धर्मश्रद्धा, धैर्य आणि अभिमानाची भावना हे सर्व ज्या तNहेने अ‍ॅनाच्या मनात जोपासत राहिले त्यात काही नवल नव्हते आणि त्या मूल्यांनीही तिला कधी सोडले नाही.

ती फक्त सहा वर्षांची असताना तिचे आईवडील भारतात निघून गेले. भारतात स्वातंत्र्ययुद्धाला तोंड पुâटल्यामुळे वॅâप्टन क्रॉफर्ड आणि त्यांच्या रेजिमेंटला भारतात बोलावण्यात आले होते. त्यांचे एक नातेवाईक मुलींसाठी शाळा चालवत होते. त्यांच्याकडे सहा वर्षांच्या छोट्या अ‍ॅनाला त्यांनी ठेवले. परंतु काही महिन्यांतच
म्हणजे अ‍ॅनाची सात वर्षे पूर्ण व्हायच्या आतच, एके दिवशी मिसेस वॉलपोलने तिला आपल्या उबदार बाहूंत घेतले आणि तिच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी तिला हळुवारपणे सांगितली. मायदेशापासून हजारो मैल दूर देशात, राणीसाठी लढताना तिच्या वडिलांनी देह ठेवला होता.

१८४९ साली भारतातील सर्वांत छान आणि थंड नोव्हेंबर महिन्यात मुंबई बंदरात एक जहाज थडकले. पंधरा वर्षांची अ‍ॅना ही त्यातली एक प्रवासी होती. शाळेतून नुकतीच बाहेर पडलेली, ताजी, कोवळी अ‍ॅना आपल्या आईला भेटायला अतिशय उत्सुक होती. तिच्या आईने पुन्हा लग्न केले होते. पहाटेच्या धुक्यातून सूर्य हळूहळू बाहेर पडत होता. ही मुलगी उत्सुकतेने आणि आश्चर्याने आपल्या केबिनच्या खिडकीतून बाहेर पाहत होती. ती लहान चणीची; पण देखणी अन् नाजूक मुलगी होती. तिचे डोळे आणि केसही तपकिरी होते. तिच्या कुरळ्या लाटालाटांच्या केसांचा मधोमध भांग पाडलेला होता. बोट जशी धक्क्याला लागली तसे अ‍ॅनाचे डोळे अधीरपणे आईला शोधू लागले. इतक्या वर्षांनंतर आपण आपल्या आईला ओळखू शवूâ की नाही, या कल्पनेने ती मनातून थोडीफार घाबरलेली दिसत होती, पण तिची आई थोडे वाढलेले वय आणि फिकटपणा वगळता होती तशीच होती. बोटीच्या धक्क्यावरून त्या घोडागाडीत बसल्या आणि निघाल्या. अ‍ॅना गाडीच्या खिडकीतून बाहेर डोकावून प्रत्येक नवे अद्भुत दृश्य नजरेत साठवत होती. काही आठवडे मुंबईत त्यांच्या ओळखीच्या मित्रांकडे राहून मग पुढे पुण्याला जाऊ, असे तिच्या आईने तिला सांगितले. तिचे सावत्र वडील पुण्याला पी.डब्ल्यू.डी. खात्यात मोठ्या हुद्द्यावर होते. पुण्यात काही महत्त्वाची सरकारी बांधकामे चालू होती. त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी त्यांना पुण्यातच राहावे लागणार होते. पण या दरम्यान मुंबई जितकी पाहून घेता येईल तितकी पाहून घ्यायची, असे तिच्या आईने ठरवले होते.

या वास्तव्यात, कार्नरव्हॉनच्या साध्या आयुष्यातून इकडे आलेल्या या तरुण इंग्लिश मुलीवर एका घटनेने फार मोठा परिणाम केला. एका श्रीमंत विधवेने दिलेल्या डिनर पार्टीला त्या गेल्या होत्या. आलेल्या पाहुण्यांनी अ‍ॅना हॅरिएटचे फारसे लक्ष वेधून घेतले नव्हते, पण राणीच्या सेवेत जे भारतीय नोकर होते, त्यांनी तिचे लक्ष वेधून घेतले. जेवणाच्या वेळी ते इतक्या हलक्या पावलांनी इकडेतिकडे वावरत होते की, त्यांच्या पावलांचा आवाजही येत नव्हता. पाहुण्यांना ते वाढत होते, मद्य देत होते, प्लेट्स ठेवत होते, उचलत होते, पण कशाचाही अजिबात आवाज होत नव्हता. सगळ्या कामात परिपूर्णता आणि सहजता होती. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ते काम करत होते. 

जे नोकर त्या वेळी टेबलांजवळ नव्हते, ते आपली पाळी येईपर्यंत दरवाजाशी िंकवा खांबांजवळ हाताची घडी घालून शांतपणे वाट बघत उभे होते. त्यांचे चमकणारे डोळे सोडले, तर ते ब्राँझचे पुतळे तर नाहीत ना अशीच शंका यावी. जेवणाच्या वेळचा मुख्य विषय ब्रिटिश साम्राज्यविस्तार हाच होता. अ‍ॅना त्या शब्दांच्या समुद्रात तरंगत होती. ती फक्त ऐकत होती, बोलत काहीच नव्हती. ती गप्प होती याचे कुणालाच काही विशेष वाटले नाही, कारण तिच्याकडून तेच अपेक्षित होते. पण ती बाह्यात्कारी जरी शांत वाटत असली तरी तिच्या डोक्यात वादळ घोंघावत होते.

ब्रिटिश अधिकाNयांचे चेहरे मद्यामुळे लाल झालेले होते. ब्रिटिशांनी भारतावर प्रस्थापित केलेल्या वर्चस्वाबद्दल ते अभिमानाने बोलत होते, आणि तिला नवल वाटत होते. ब्रिटिश मोहिमा, धोरण आणि विजय यांच्याबद्दल बोलताना ते भारतीयांचा अतिशय तिरस्काराने उल्लेख करत होते. इथल्या एकेकाला त्याची जागा दाखवून देण्याबद्दल त्यांच्या गप्पा चालू होत्या. `त्यांची जागा?' हे ऐकताना अ‍ॅनाला मनातल्या मनात आश्चर्य तर वाटत होतेच; पण तिला फार अस्वस्थदेखील वाटत होते. `त्यांच्याच देशात, त्यांची कोणती जागा असेल?'

तिच्या मनात विचार येत होते. त्यांचे हसणे, पुâशारक्या आणि वांशिकदृष्ट्या आपणच श्रेष्ठ आहोत ही त्यांच्या बोलण्यातून जाणवणारी उर्मट खात्रीची भावना या सर्व गोष्टींनी त्या वेल्समधल्या तरुण मुलीच्या मनावर एक कडवट ठसा उमटवला. 

अचानक ते उत्तम जेवण, खिडकीतून पाझरणारे झNयाचे झुळझुळ संगीत, टेबलांभोवतालची रंगीबेरंगी वर्दळ यांबद्दल तिच्या मनात एक तिरस्काराची भावना उसळली. काळोखात उभे असलेले; काही अशुभ घडणार आहे, असे सूचित करणारे ते काळे लोक आणि टेबलाभोवती बसलेल्या गोNया लोकांच्या चेहNयावरचा प्रत्येक
भाव, प्रत्येक हालचाल काळजीपूर्वक टिपत असलेले, यांत्रिकपणे हालचाल करणारे हे लोक मनात काय विचार करत असतील? त्यांच्या या प्राचीन भूमीवर कब्जा करणाNया या गोNया लोकांचा ते तिरस्कार, द्वेष करत असतील का? गप्प बसलेली काळी माणसेही खरी हाडामांसाची, भावना असलेली माणसे आहेत, असा विचार
तिच्याशिवाय तिथला कोणताही माणूस करत नव्हता. सर्व पाहुण्यांच्या दृष्टीने ती सगळी दगडी िंकवा लाकडी कळसूत्री बाहुल्या होत्या. जिवंत मनुष्य म्हणून त्यांच्या लेखी त्यांना काही अस्तित्वच नव्हते.

No comments:

Post a Comment