हॉटेल ताजमधील अंधारयात्रा
आशिष खेतान
दृश्य एक :
पोलीस उपायुक्त विश्वास नांगरे-पाटील यांचा थोडा डोळा लागला होता. तेवढ्यात फोनची घंटी वाजली. तिशीतले, रुंद कपाळ, भक्कम जबडा, काळे कुळकुळीत केस आणि बारीक कोरलेल्या मिशा असलेले नांगरे-पाटील मुंबईच्या विभाग एकचे प्रमुख होते. पोलीस व्यवस्थेसाठी मुंबईचे बारा विभाग पाडले आहेत. विभाग एकमध्ये दक्षिण मुंबईतील कुलाबा, नरिमन पॉर्इंट आणि मरिन ड्राईव्हसारखे भाग आहेत. ते त्यांच्या अधिकार कक्षेत येतात. तासापूर्वीच ट्रायडेंट हॉटेलमधील सुरक्षा व्यवस्थेसंबंधीची एक बैठक आटोपून ते आले होते. भव्य अरबी समुद्राचा वक्रांकित किनारा, ‘राणीचा वंâठहार’ (क्वीन्स नेकलेस) म्हणून ओळखला जातो.
तेथील ओबेरॉय हॉटेलच्या लगत गगनचुंबी इमारतीत ट्रायडेंट आहे. २८ नोव्हेंबरला एका पारितोषिक प्रदान समारंभाला पंतप्रधान मनमोहनिंसग ट्रायडेंटमध्ये उपाqस्थत राहणार होते. भारताच्या पंतप्रधानांच्या सुरक्षिततेची जबाबदारी जरी विशेष सुरक्षा दलाकडे (एसपीजी) असली तरी पंतप्रधानांच्या मार्गावर नियंत्रण ठेवणे, त्या मार्गावर अडथळे उभे करणे, प्रवेश बंद करणे यासारख्या किरकोळ संरक्षक व्यवस्था स्थानिक
पोलिसांकडे असतात.
एसपीजीच्या पथकाच्या सभासदांना भेटून रात्री साडेआठ वाजता नांगरे-पाटील घरी परतले. नरिमन पॉर्इंट ते मेट्रो सिनेमाजवळील स्टोन बिाqल्डंग हा प्रवास मोटारीने पंधरा मिनिटांचा होता. तिथे एका साध्या सरकारी सदनिकेत ते राहत होते. आपल्या पत्नी आणि दोन मुलांबरोबर जेवल्यानंतर ते एक डुलकी घेण्यासाठी आडवे झाले.
रात्री ११ वाजता त्यांना आणखी एका बैठकीला जायचे होते. तेवढ्यात दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांचा फोन आला तेव्हा रात्रीचे ९:४० झाले होते. वेंकटेशम यांनी घाईने निरोप सांगितला, `लिओपोल्ड वॅâपेâच्या बाहेर गोळीबार झाल्याची बातमी आहे. आपला एक कॉन्स्टेबल जखमी झाला आहे.
कृपया घटनास्थळी ताबडतोब जावे.' नांगरे-पाटील यांनी चटकन आपला गणवेश चढवला. ग्लॉक पिस्तूल आणि गोळ्यांची दोन पाकिटे कातडी पिशवीत घातली. आपले वैयाqक्तक संरक्षक अमित खेपलेला बरोबर घेऊन कुलाबा मार्केटच्या दाट वस्तीतील लिओपोल्ड हॉटेलकडे ते रवाना झाले. पाश्चात्त्य, परदेशी पर्यटकांची तिथे विशेष गर्दी असते.
मोटार कुलाब्याच्या दिशेने वेगाने जात असताना नांगरे-पाटील यांच्या डोक्यात अनेक शक्यता येत होत्या. या गोळीबाराशी टोळीयुद्धाचा संबंध असेल का? का वैयाqक्तक सूड हे कारण असावे? लिओपोल्ड वॅâपेâच्या समोरच असलेल्या पोलीस स्टेशनवरील अधिकाNयांकडून काही माहिती मिळवण्याच्या आधीच पाटील यांना
आणखी एक फोन आला. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक ए.एन. रॉय फोनवर होते.
त्यावेळी रात्रीचे पावणेदहा वाजले होते.
`हॉटेल ताजमहाल पॅलेसकडे तातडीने जा. मला ताजमधून गोळीबार आणि स्फोटाचे आवाज ऐवूâ येत आहेत.’ त्यांच्या आवाजात घबराट होती. महाराष्ट्र सरकारमधील दुसNया क्रमांकाच्या वरिष्ठ अधिकारी, राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव चित्कुला झुत्शी यावेळी ताजमध्येच होत्या. झुत्शींनी रॉय यांना फोनवरून
कळवले की, काही अज्ञात बंदुकधाNयांनी हॉटेलवर हल्ला केला आहे. पाटील यांचे सर्वांत वाईट दु:स्वप्न खरे ठरले होते. जेमतेम दोन महिन्यांपूर्वीच नांगरे-पाटील यांना गुप्तचर विभागाकडून (आयबी) माहिती मिळाली होती की, ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला होण्याचा धोका आहे. त्यानुसार २९ सप्टेंबरला काही पोलीस अधिकाNयांसह नांगरे-पाटील यांनी संपूर्ण हॉटेलच्या रचनेची आणि व्यवस्थापनाने केलेल्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली होती. ३० सप्टेंबरला हॉटेल व्यवस्थापनाशी झालेल्या बैठकीत त्यांनी सुरक्षाव्यवस्थेविषयी
आणखी काही सूचना केल्या होत्या. त्या बैठकीचे टिप्पण तयार करून ते कुलाबा पोलीस स्टेशनला दिले होते. हॉटेल व्यवस्थापनाने काही गोष्टी करायच्या होत्या. त्यांचा पाठपुरावा कुलाबा पोलिसांनी करायचा होता.
‘ताज टॉवर’ या नावाने ओळखल्या जाणाNया नव्या ताज हॉटेलचे केवळ ५० मुख्य प्रवेशद्वारच वापरावे आणि जुन्या ताजची (सहा मजली, ताजमहाल पॅलेस) सर्व प्रवेशद्वारे बंद ठेवावीत.
सहज भेद्य अशा दरवाजांच्या जागी धोक्याची जाणीव होताच क्षणार्धात बंद करता येतील असे स्वयंचलित दरवाजे बसवावेत.
सर्व पाहुणे दरवाज्यात बसवलेल्या मेटल डिटेक्टर्समधूनच (Dइश्D) जातील आणि नंतर त्यांची हातात धरता येणाNया मेटल डिटेक्टरने झडती घेतली जावी.
एक्स-रे यंत्राच्या सहाय्याने सर्व सामानाची तपासणी करावी.
हॉटेलच्या दक्षिणेकडील लाकडी चौकटी असलेला काचेचा दरवाजा लोखंडी जाळी लावून कायमचा बंद ठेवावा. सीसीटीव्ही वंâट्रोल रूममधून सीसीटीव्ही पूâटेजवर चोवीस तास नजर ठेवावी. ‘ताज टॉवर’ – नव्या ताज हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळ शध्Eाधारी रक्षक ठेवावेत.
१९९३ मध्ये मुंबई स्टॉक एक्सचेंजवर झालेल्या हल्ल्यानंतर तिथे जशी बहुस्तरीय काटेकोर सुरक्षा व्यवस्था केली गेली, तशाच पद्धतीची व्यवस्था नांगरे- पाटील यांनी सुचवली होती. हॉटेलजवळ मुंबई पोलीस दलातील चार शध्Eाधारी पोलीसही तैनात केले गेले होते.
महाराष्ट्रातील दूरच्या धुळे जिल्ह्यात दंगल झाल्याने मुंबईतील संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्तासाठी १४ ऑक्टोबरला हे चार पोलीस हॉटेलजवळून काढून घेतले गेले. ताज हॉटेलने मेटल डिटेक्टर बसवले, पण हल्ल्याच्या दोन आठवड्यांपूर्वीच ग्राहकांची गैरसोय होते म्हणून ते काढून टाकले गेले. इतर संरक्षक उपाय अंमलात आणलेच गेले नाहीत. आधी लिओपोल्ड वॅâपेâतील गोळीबाराची बातमी आणि नंतर ताज हॉटेल... हा काही टोळीयुद्धातील गोळीबार नाही हे नांगरे-पाटील यांच्या लक्षात आले.
दृश्य दोन :
ताजमहाल पॅलेस आणि ताज टॉवर या दोन इमारती, अपोलो बंदरासमोरच्या समुद्रकिनाNयावर समुद्रात भर टावूâन तयार केलेल्या जेमतेम तीन एकर जागेत उभ्या आहेत. समोर अथांग अरबी समुद्र पसरलेला आहे. पहिली इमारत सुमारे शंभर वर्षांपूर्वीची आहे आणि ती पौर्वात्य स्थापत्य शैलीची आहे तर दुसरी गगनचुंबी इमारत १९७० नंतर बांधली गेली. २६ नोव्हेंबरच्या संध्याकाळी इतर संध्याकाळांप्रमाणेच हॉटेल दिव्यांनी लखलखत होते. मुख्य कळस चंद्राप्रमाणे प्रकाशमान होता, तरदोन्ही बाजूंचे कळस ताNयांप्रमाणे चमकत होते. हॉटेलच्या आत वैभव आणि चैन ऊतू जात होती. दोन्ही लॉबी आणि कॉरिडॉर्समधून हळूवार संगीत चालू होते. बॉलरूममध्ये प्रसिद्ध व्यक्तींची ये-जा होती. टेबलांवर काटे चमच्यांच्या आवाजाबरोबर गप्पांची किलबिल चालू होती. बाहेर समोरचा समुद्र शांत होता. ‘गेट वे ऑफ इंडिया’ तुरळक पर्यटक परतत होते आणि रस्त्यावरून काही वाहने धावत होती. ताज हॉटेलच्या पश्चिमेस पाचशे मीटर अंतरावरील कुलाबा मार्केटमध्ये मात्र खूप गजबजाट होता. पर्यटकांची गर्दी होती. मध्यरात्रीही हौशी चैनी लोकांची लहानलहान गल्ल्यातून
गर्दी होती. चोखंदळ ग्राहक, फळांपासून ते अनेक फालतू वस्तू विकणारे पेâरीवाले यांनी पदपथ भरून गेले होते. अरूंद रस्त्यांवरून मोटारी, टॅक्सी, आणि बसेस मिळेल तेवढ्या इंचभर जागेतून पुढे सरकत होत्या. माणसांच्या कोलाहलात वाहनांचा आवाज, मोटारींचे हॉर्न ह्यांची भर पडत होती. ताज लगत असलेल्या एका गल्लीच्या तोंडाशी लिओपोल्ड वॅâपेâ आहे. तिथे हरतNहेचे लोक जमलेले असले तरी त्यातून पाठीवर सॅक घेतलेले, थंड बिअरचे घोट घेणारे परदेशी प्रवासी उठून दिसत होते. त्या रेस्टॉरंटच्या प्रवेशद्वाराजवळ दोन तरुण उभे होते. ते आत जाण्यापूर्वी एखाद्या मित्राची वाट पाहत असल्यासारखे वाटत होते. त्यांच्या पाठीवर दोन पुâगलेल्या पिशव्या होत्या आणि पदपथावर दोन गच्च भरलेल्या बॅगाही होत्या. रेस्टॉरंटमधील गडबड-
गोंधळाचा आस्वाद घेत असलेल्या गर्दीकडे ते एकटक पाहत होते. नंतर त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि पाठीवर थोपटले. त्यांच्यापैकी एकाच्या डोळ्यात पाणी आल्याचेही एका पेâरीवाल्याने पाहिले. दोन जिवलग मित्रांच्या ताटातुटीचा तो क्षण होता.
पुन्हा केव्हा भेट होईल याची काहीच कल्पना नव्हती. आता जायचे म्हणून थैल्या उचलण्यासाठी ते खाली वाकले. पण ते तसे नव्हते. थैल्या उघडून त्यातून त्यांनी दोन बंदुका काढल्या. त्या खरं तर अॅसॉल्ट रायफल्स होत्या. त्यांच्या काळ्या नळ्या दोघांच्याही काळ्या पोशाखाशी मिळत्याजुळत्या होत्या. नंतर लिओपोल्ड वॅâपेâच्या दोन दरवाजांमधून दोघे आत गेले. एक डाव्या बाजूने आणि दुसरा उजव्या बाजूने. एकाने वॅâश
काऊंटरच्या दिशेने एक छोटी गोल वस्तू पेâकली. तो बॉम्ब होता, क्षणार्धात कान बधिर करणारा एक मोठा स्फोट झाला. नंतर सगळा धूर आणि जाळ... कुलाबा मार्केटमधील नेहमीच्या रात्रीच्या गोंगाटाला या अपरिचित आवाजाने छेद दिला. त्यानंतर पाठोपाठ बंदुकीच्या पैâरी झडल्या. खाण्यापिण्यात दंग असलेल्या गिNहाईकांवर गोळ्यांचा वर्षाव झाला. संपूर्ण जागा आधी निळी आणि नंतर लालभडक बनली. रक्तामांसाच्या रंगाने इतर सगळे रंग गिळून टाकले. तपकिरी फर्निचर, पांढरी शुभ्र फरशी, निळ्या िंभती सगळं
लाल-लाल झालं.
नंतर ते दोघे बाहेर पदपथावर आले आणि नेम धरून खेळाचा रंग उडवावा तसा गोळ्यांचा वर्षाव केला. नंतर उजवीकडे वळून ताजकडे जाणाNया गल्लीत ते शिरले. तिथेही जणूकाही रस्ता मोकळा करण्यासाठी ते अंदाधुंद गोळीबार करतच होते आणि खरं तर या दोन बंदुकधाNयांचे मित्र तिथंच जवळपास कुठेतरी होते. जेमतेम शंभर पुâटांवर असलेल्या त्यांच्या दोन मित्रांनी वेगळ्या हालचाली केल्या आणि रक्ताचा सडा पाडण्यास तेही तयार झाले. तेही त्या गल्लीत शिरले. पण सरळ जाण्याऐवजी पहिल्यांदा ते डावीकडे वळले. वाटेत गोकुळ रेस्टॉरंटपाशी थांबून पदपथावर एक गच्च भरलेली पिशवी ठेवली. थोडे पुढे जाऊन उजवीकडे वळले आणि ‘गेट वे ऑफ इंडिया’ समोरील विस्तीर्ण प्रांगणात आले. नव्या ताजच्या मुख्य पोर्चपासून शंभर
पुâटांवर त्यांनी आणखी एक पिशवी ठेवली आणि पोर्चमधून त्यांनी ‘ताज टॉवर’ हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यावेळी रात्रीचे ९:३८ झाले होते. त्यांना हटकण्यासाठी तिथं कुणीही नव्हतं. प्रथम ते स्वागतकक्षापाशी गेले. त्या वास्तुचे वैभव आणि तेथील सुखसोयी न्याहाळत त्यांनी पाच मिनिटे काढली. नंतर त्यांच्यापैकी एकजण ‘शामियाना’ रेस्टॉरंटकडे गेला. त्याच्या सुंदर काचेच्या दरवाज्यासमोर तो उभा राहिला. त्याच्या मनात काहीतरी आलं असावं. थैलीतून त्याने अॅसॉल्ट रायफल बाहेर काढली आणि काचेच्या दरवाज्यांवर नेम धरला. अध्र्या मिनिटाने दुसरा तरुण स्वागतकक्ष सोडून जुन्या आणि नव्या ताजला जोडणाNया मार्गाने निघाला.
उजवीकडे हार्बर बार, माँट ब्लॅक, रॉqव्हसाँ शोरूम्स आणि डावीकडील ‘मसाला क्राफ्ट’ रेस्टॉरंट असलेल्या मार्गाने पोहोण्याच्या तलावासमोरच्या छोट्या मोकळ्या जागेपर्यंत तो पोहोचला. एवढे होईपर्यंत लिओपोल्डमध्ये गोळीबार केलेले ते दोन तरुण जुन्या ताजच्या दक्षिण बाजूला पोहोचले. त्यांनी बंदुकीच्या दस्त्यांनी लाकडी दरवाजा फोडला आणि ते हॉटेलमध्ये शिरले. तेव्हा रात्रीचे ९:४३ वाजले होते. नंतर ते पोहोण्याच्या तलावापाशी गेले आणि तिथे त्यांनी गोळीबार सुरू केला. त्याचवेळी तलावासमोरच्या छोट्या जागेतील इसमानेही थैलीतून अॅसॉल्ट रायफल काढून गोळ्यांचा वर्षाव केला. एक माग काढणारा कुत्रा आणि त्याची काळजी घेणारा माणूस तिकडे धावले. पण त्यांनाही बंदुकधाNयाने ठार केले. नंतर ते चौघेही एकत्र
आले आणि इलेव्हेटरमधून जुन्या ताजच्या सर्वांत वरच्या म्हणजे सहाव्या मजल्यावर पोहोचले.
No comments:
Post a Comment