मे महिना संपून जून महिना सुरू झाला. आकाशात ढगांची धावपळ सुरू झाली होती. निळ्या आकाशात काळ्या काळ्या ढगांचे पुंजके दिसू लागले. त्या ढगांचे आकारसुद्धा किती सुंदर. कधी ते हत्तीसारखे वाटत, तर कधी काळ्याभिन्न गेंड्यासारखे. कधी उंदरांसारखे, तर कधी कावळ्यांच्या थव्यासारखे. हे ढगांचे आकार पाहून बंटू अगदी वेडापिसा होऊन गेला होता.
बंटू अंगणात बसून ढगांची गंमत पाहत होता. इतक्यात त्याच्या डोक्यावर, नाकावर टपाटप पाण्याचे थेंब पडले. बंटूनं वर पाहिलं तर काय, त्या मघाच्याच काळ्या हत्ती - ढगातून पाण्याचे थेंब टपटपत होते. बंटूला खूप आनंद झाला. तो अंगणात उताणा पडून, डोळे बंद करून पाऊस पीत राहिला.
डोळे बंद केल्यावर त्याला असं वाटलं, आपण एका मऊ मऊ काळ्या काळ्या ढगावर झोपलो आहोत. आपणही ढगाबरोबर लांब लांब चाललोय.
बंटू ढगातून खाली डोकावून पाहू लागला.
छोटी-छोटी घरं, आडवी-तिडवी शेतं, लांबच लांब पसरलेल्या नद्यांच्या रेषा आणि हिरव्या हिरव्या डोंगरांच्या जणू झाल्या होत्या उश्या.
बंटू अगदी हरखून गेला.
बंटू ढगाला म्हणाला,
‘‘ए, चला ना रे, माझ्या मामाच्या गावाला. माझं तिथं छोटंसं काम पण आहे.’’
‘‘आँ? कुठलं काम?’’ ढगानं विचारलं.
बंटू सांगू लागला,
‘‘आपण भराभरा जाऊन मामाच्या घरावर थांबू. तिथं तुझ्याकडचं सगळं पाणी मामाच्या घरावर ओत. पाणी कसं पडलं ते पाहायला गच्चीवर सगळी जणं येतील. मग मी आईला हाक मारीन.’’
ढग नुसताच बंटूशी गप्पा मारत होता. पण पुढं काही सरकेना. म्हणून वंâटाळून बंटू म्हणाला,
‘‘अरे, आपण माझ्या मामाच्या गावाला कधी जायचं?’’ ढग जोरात हसला. ढगातलं पाणीदेखील डुचमळलं.
बंटू ढगातच असल्यानं गार गार पाण्याचा मोठा घोट त्यानं गिळला.
‘‘अरे बंटू, तुझ्या मामाच्या गावाला आपण जाऊच की. आता संध्याकाळ झाली, की वाNयाची दिशा बदलेल, त्याचा जोर वाढेल, मग आपण झपाझप सरकत जाऊ.’’
तेवढ्यात तिथून एक लठ्ठ ढग आला. तो म्हणाला,
‘‘बंटू, मघाशी मी गेंडा होतो, पण आता हत्ती झालोय. येतोस का फिरायला? चल, बैस माझ्या पाठीवर.’’
बंटू म्हणाला, ‘‘नको बाबा. मला माझ्या मामाच्या गावाला जायचं आहे. आता थोड्या वेळानं वारा सुटला, की आम्ही पळायला लागणार.’’
‘‘वारा येईपर्यंत थांबता कशाला?’’ असं स्वत:शीच बडबडत तो हत्ती ढग लांब गेला आणि धावत येऊन त्या बंटूच्या ढगाला अशी जोरात धडक मारली की बस्स, रे बस्स! बंटूचा ढग गडबडा लोळत निघाला, ते थेट डोंगरापाशी जाऊन थांबला. बंटूच्या ढगाला एवढ्या धावपळीनं चांगलीच धाप लागली. तो थोडा वेळ डोंगराला टेवूâन उभा राहिला. त्याचं सारखं हाशहुश चालू होतं.
थोड्या वेळानं तो बंटूला म्हणाला, ‘‘हं, हा आला डोंगर आणि हे तुझ्या मामाचं गाव. अरे, पण, बंट्या, तुझ्या मामाचं घर ओळखायचं कसं?’’
‘‘हॅ! ते तर एकदम सोपं.’’
बंटू हसला. त्यानं ढगातलंच पाणी ढगावर उडवलं, आणि म्हणाला, ‘‘एका सुंदरशा बागेत माझ्या मामाचं घर आहे. घरात शिरताना
No comments:
Post a Comment