न संपणारी गोष्ट
आ ज आजोबा, आजी, विष्णू काका असे सगळेच उदास होते. मुलांची उन्हाळ्याची सुट्टी आता जवळजवळ संपल्यासारखीच होती. लवकरच सगळ्या मुलांना आपापल्या घरी परत जावं लागणार होतं. गेले तीन आठवडे त्यांच्या खेळण्यानं, हसण्या-खिदळण्यानं, धावपळीनं, भांडणानं, घर नुसतं गजबजलेलं होतं. आता परत सारं कसं शांत शांत होणार. पुढच्या वर्षी सुट्टीत मुलं परत येईपर्यंत सगळं नुसतं शांत, उदास. मुलांनापण वाईट वाटत होतं. सगळी मुलं आपल्या आजीआजोबांच्या भोवती जमली होती. रघू त्यांच्यात सगळ्यात मोठा.
तो म्हणाला, ‘‘या वर्षीच्या सुट्टीत नेहमीपेक्षा जास्त मजा आली. आम्ही डिस्नेलँड बघायला गेलो होतो ना, तेव्हापेक्षासुद्धा जास्त मजा इथे आली.
आणि त्याचं कारण म्हणजे या सगळ्या गोष्टी.’’
आजोबा म्हणाले, ‘‘मी जेव्हा शाळेत शिक्षक म्हणून काम करायचो ना, तेव्हा मुलांना जर काही शिकवायचं असेल, काही धडे द्यायचे असतील, तर ते मी गोष्टीरूपानं द्यायचो. ते मला जास्त सोपं पडायचं.’’
आनंद म्हणाला,‘‘मला इतिहासाचं पुस्तक वाचायचा ना खूप वंâटाळा येतो. पण त्याऐवजी तुम्ही जर आम्हाला ऐतिहासिक गोष्टींमधून इतिहास शिकवला तर आमच्या सगळं नीट लक्षात राहील.’’
आता सर्वांचे डोळे चमवूâन उठले आणि नजरा आजीकडे वळल्या.
‘‘आजी, आज आमचा इथला शेवटचा दिवस आहे ना? मग आम्ही फक्त एक गोष्ट ऐवूâन गप्प बसणार नाही, बरं का. आम्हाला आणखी गोष्टी सांग.’’ मग सगळे एकदम गोंगाट करू लागले, ‘‘गोष्ट! गोष्ट! गोष्ट!’’
पण आजी मान हलवत म्हणाली, ‘‘तुम्ही जर फक्त लोणची आणि लाडू एवढंच खात राहिलात, तर तुमची तब्येत नीट राहील का? गोष्टीपण अशाच असतात. तुम्ही तुमचा सगळा वेळ फक्त गोष्टी ऐकण्यात वाया नसतो घालवायचा. मग त्यानं वंâटाळा येतो. एकदा एका राजाला कधी न संपणारी गोष्ट ऐकावी लागली ना, तसं होतं बरं का मग आपलं.’’ ।
‘‘मला कथा ऐकायची आहे! ही माझी आज्ञा आहे,’’ मायानगरचा राजा प्रतापसिंह ओरडून म्हणाला. हा राजा प्रताप केवळ पंधरा वर्षांचा होता. तसा मनानं तो एक लहान मुलगाच होता. खरंतर त्याला हे राजाचं पद भूषवणं मुळीच आवडायचं नाही. कारण त्यामुळे कायदेकानूंवर लक्ष ठेवणं, जनतेच्या समस्या लक्षपूर्वक ऐकणं आणि इतर अनेक वंâटाळवाण्या गोष्टी करणं त्याला भाग पडायचं. राजा असण्यामधली फक्त एकच गोष्ट त्याला आवडायची. तो जे म्हणेल ते सर्वांना ऐकावंच लागायचं. लोकांना आज्ञा सोडणं, त्यांच्याकडे
विविध मागण्या करणं त्याला खूप आवडायचं; पण त्याहीपेक्षा त्याला सर्वांत जास्त काय आवडायचं, तर ते म्हणजे गोष्टी ऐकणं. त्याच्या राजधानीत देशोदेशीचे कथाकथनकार गोळा व्हायचे. ते त्याच्या दरबारात रीघ लावायचे.
त्याला गंमतीदार गोष्टी सांगायचे, भीतिदायक गोष्टी सांगायचे, जादू आणि चमत्कारांच्या, मंत्रतंत्राच्या गोष्टी सांगायचे, इतरही अनेक गोष्टी सांगायचे. राजा प्रताप त्या सर्वच गोष्टी अगदी लक्षपूर्वक ऐकायचा. त्याला गोष्टी ऐकायला खूप आवडत. एखाद्या कथाकथनकारानं जर फार चांगली कथा सांगितली तर तो त्याच्यावर इतका प्रसन्न व्हायचा की मग त्याच्यावर बक्षिशी आणि देणग्यांचा वर्षाव करायचा. सोन्या-चांदीचा वर्षाव
करायचा. त्याच्या दरबारातले मंत्री त्याच्या या वागण्यामुळे अगदी वंâटाळले होते. ते कधीतरी एक सुस्कारा टावूâन त्याला समजावण्याचा प्रयत्नसुद्धा करत. ‘‘महाराज, हे कथा ऐकणं वगैरे सगळं ठीक आहे; पण तुम्ही आधी हातातलं काम करून मग कथा ऐकल्यात तर ते जास्त योग्य ठरेल. तुमच्या प्रजाजनांसाठी तुम्हाला खूप कामं करावी लागणार आहेत. ती सगळी कामं पडून राहिली आणि तुम्ही तुमचा सगळा वेळ जर असा कल्पनाविश्वात रममाण होण्यात घालवलात तर आपल्या राज्याची प्रगती कशी काय होणार?’’
पण हे ऐवूâनही राजा प्रतापनं त्या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. त्याला फक्त कथा ऐकण्यात रस होता आणि त्या कोणाकडूनही ऐकण्याची त्याची तयारी होती; पण हे असं किती दिवस चालणार? रोज रोज त्याला नवीन
नवीन कथा कुठून ऐकायला मिळणार? काही दिवसांतच लोकांकडचा गोष्टींचा साठा संपत आला. त्यात मग काही लोकांनी लबाडी सुरू केली. खूप दिवसांपूर्वी सांगितलेल्या गोष्टीच ते परत येऊन सांगायचे. पण प्रताप अत्यंत कुशाग्र बुद्धीचा होता. तो म्हणायचा, ‘‘मी ही गोष्ट पूर्वी ऐकलेली आहे. तीच गोष्ट परत येऊन सांगणाNयाचा ताबडतोब शिरच्छेद करा!’’
No comments:
Post a Comment