Monday, 2 December 2013

सुकेशिनी आणि इतर कथा

देवसुंदरी

हुविनाहदाळी नावाच्या गावात गोपाल नावाचा तरुण राहत होता. तो अत्यंत बुद्धिमान, दिसायला उमदा, देखणा आणि शिवाय श्रीमंतही होता. त्याची भली मोठी हवेली होती. हवेलीभोवती मोठी बाग होती आणि त्याच्याकडे सात गाई होत्या. त्या गाई वैशिष्ट्यपूर्ण होत्या. त्या चांगल्या धष्टपुष्ट होत्या आणि इतर
कोणत्याही सामान्य गाईपेक्षा कित्येक पटीनं जास्त दूध देत असत. ते दूध चवीला अत्यंत मधुर व पौष्टिक असे. संपूर्ण राज्यात त्यामुळे ते दूध प्रसिद्ध होतं. त्या गार्इंमुळेच गोपाल इतका सधन झाला होता. त्या गार्इंना तो आपली संपत्ती मानत असे. त्या गार्इंना तो आपल्या जिवापलीकडे जपायचा, त्यांची उत्तम देखभाल करायचा.

एक दिवस पहाटे उठून गोपाल गार्इंच्या धारा काढायला गेला, पण पहिल्या गाईचं दूध काढू लागताच त्याच्या असं लक्षात आलं, की ती दूध देतच नव्हती. तिला पान्हा पुâटत नव्हता. मग त्यानं दुसNया गाईचं दूध काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही तसंच घडलं. त्या दिवशी सातही गार्इंचं दूध काढण्यात त्याला काही यश आलं नाही. हे काय गौडबंगाल आहे, हे काही त्याला समजेना. गार्इंच्या चाNयात तर काही गडबड नसेल ना? असं त्याला वाटलं. त्याने आपल्या नोकरांना सांगून अत्यंत उत्कृष्ट प्रतीचा चारा मागवला व तो गार्इंना चारला.

दुसNया दिवशी पहाटे परत तसंच घडलं. कोणतीही गाय दूध देईना. मग त्याने स्वत: सर्व गार्इंना घरामागच्या कुरणात चरण्यासाठी नेलं. त्याच्या देखरेखीखाली गाई चरू लागल्या आणि तरीही दुसNया दिवशी त्यांनी दूध दिलंच नाही. गार्इंना दुसNया ठिकाणी चरायला न्यावं. जागा आणि वातावरण बदललं की त्यांना पान्हा पुâटेल, असं त्याला वाटलं. त्यानं गार्इंना आता नदीकाठी चरायला नेलं. तिथं गवत आणि पाणी मधुर होतं. गार्इंनी तिथे मोठ्या आनंदाने विहार केला आणि पोटभर गवत खाल्लं.

परत दुसNया दिवशी तोच प्रकार घडला. एकाही गाईनं दूध दिलं नाही. आता मात्र गोपाल काळजीत पडला. या दुधाच्या उत्पन्नावरच तर त्याचा उदरनिर्वाह चालत होता. त्याची प्रतिष्ठा आता पणाला लागली होती. प्रश्न गवताचा विंâवा इतर कोणत्याही गोष्टीचा नसून, कोणीतरी आपल्याआधी चोरून गार्इंच्या धारा काढायला येत असावं, असं त्याला वाटू लागलं. मग त्याने आपल्या नोकरांना बोलावून घेतलं व घराच्या मुख्य फाटकावर कडी नजर ठेवण्याची सूचना दिली, पण तरीही कसं कोण जाणे, दूध मिळतच नव्हतं. ते नक्कीच कोणीतरी चोरून नेत होतं.

आता गोपालने रात्रीच्या वेळी जातीने गार्इंवर पहारा ठेवण्याचं ठरवलं. रात्रभर काहीही घडलं नाही, पण पहाटेच्या वेळी मंद वाNयाच्या झुळकीसरशी एक अनामिक गंध त्याच्या नाकात शिरला आणि त्यानं जणू गुंगी आल्यासारखा तो झोपी गेला. त्याला जाग आली, तेव्हा उन्हं चांगलीच डोळ्यावर आली होती आणि आजही दुधाचा पत्ता नव्हता. 

कोणीतरी ही युक्ती करून दूध चोरून नेत आहे, हे आता गोपालला कळून चुकलं. मग त्या रात्री त्यानं डोक्यावरून काळा बुरखा घेतला आणि अंधारात एका कोपNयात लपून बसला. पहाटेचा वारा नेहमीसारखा सुगंध बरोबर घेऊन आला, पण गोपालनं मुठीनं नाक घट्ट धरून ठेवलं. तो डोळे फाडून बघत राहिला. थोड्याच वेळात एक अतक्र्य गोष्ट घडली. आकाशातून एक सुवर्णाची शिडी खाली सोडण्यात आली आणि त्यावरून सात असामान्य लावण्यवती हसत खेळत खाली उतरून आल्या. प्रत्येकीच्या हातात एक सुवर्णाची घागर होती.

गोपालचा तर आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्या स्वप्नसुंदरींपैकी प्रत्येकीनं गोपालच्या एकेका गाईचं दूध काढलं आणि आपल्याजवळची घागर भरताच त्या सुवर्णाच्या शिडीवरून वर चढू लागल्या. गोपाल आता त्यांच्या दिशेला पळत सुटला. गोपालला बघताच त्या घाबरल्या आणि अधिकच जोरानं वर जाऊ लागल्या. त्या सर्वांना पकडणं तर काही गोपालला शक्य नव्हतं; पण त्याने सातव्या तरुणीचा हात घट्ट पकडला. बाकीच्या सहा तरुणी त्या सुवर्णाच्या शिडीसह आकाशात अदृश्य झाल्या. ती शेवटची गोपालच्या तावडीत सापडलेली तरुणी भीतीनं थरथर कापू लागली. तिच्या सुंदर डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

‘‘तुम्ही कोण आहात? तुम्ही माझ्या गार्इंचं दूध रोज चोरून का म्हणून नेता? मी तुमचा काय अपराध केला आहे?’’ गोपालनं तिच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.

‘‘आम्ही स्वर्गाचा राजा देवेंद्र यांच्या सात कन्या आहोत. आमच्या इंद्रलोकी मुबलक दूध मिळतं, पण तुझ्या गार्इंच्या दुधाइतवंâ सुमधुर दूध मात्र कुठंच मिळत नाही. आम्ही तुझ्याकडच्या दुधाची ख्याती ऐवूâन होतो, त्यामुळं त्याची चव घ्यायचीच असं आम्ही ठरवलं. एकदा त्याची चव घेताच आम्हाला कळून चुकलं, खरंच, इतवंâ सुमधुर दूध कुठेच मिळणार नाही. मला तुम्ही कृपा करून सोडा. मी तुम्हाला पाहिजे तेवढी धनदौलत देईन, पण मी इंद्रलोकापासून दूर राहू शकत नाही.’’

पण त्या लावण्यवतीच्या असामान्य सौंदर्यानं गोपाल जणू मंत्रमुग्ध होऊन गेला होता. तो देहभान विसरला होता. तो म्हणाला, ‘‘हे सुंदरी, तुझ्या लावण्यानं मी मोहित झालो आहे. तू माझ्याशी विवाह कर. माझी पत्नी होऊन माझ्या घरी राहा. म्हणजे तुला रोज हवं तेवढं दूध मिळेल, तेही चोरी न करता. शिवाय मी तुझी काळजी घेईन.’’ 

त्याची ती जगावेगळी विनंती ऐवूâन त्या लावण्यवतीला काय बोलावं तेच सुचेना. ती गोंधळून गेली. ‘‘अरे, पण ते कसं शक्य आहे? आपल्या दोघांची जगं किती वेगवेगळी आहेत.’’

पण गोपाल काही ऐकायलाच तयार नव्हता. अखेर तिनं त्याचं म्हणणं मान्य केलं, पण ते एका अटीवर. ती म्हणाली, ‘‘हे बघ, मी तुझ्याशी विवाह करीन, पण त्याचवेळी माझ्याजवळची ही सुवर्णाची घागर मी बंद करून तुझ्या घराच्या माळ्यावर ठेवून देईन. ती तू कधीच उघडायची नाहीस. जर ती तू उघडलीस, तर मात्र मी तुला सोडून जाईन.’’

गोपालने ती अट तात्काळ मान्य केली आणि ते दोघेही विवाहबद्ध झाले. त्यानंतर दोघांचं आयुष्य अत्यंत सुखात सुरळीत चालू होतं. आकाशातून उतरलेली ती सुंदरी पृथ्वीवर चांगलीच रुळली होती. दिवस चालले होते.
एक दिवस ती बाहेर गेली असताना काहीतरी काम निघालं आणि गोपालला माळ्यावर चढावं लागलं. तिथे त्याची नजर त्या सुवर्णाच्या बंद घागरीवर पडली. त्याच्या आत काय असेल बरं? या विचारानं तो अस्वस्थ झाला. आपण नुसतं आत डोकावून पाहिलं, तर आपली प्रेमळ पत्नी आपल्यावर नक्कीच चिडणार नाही, असं त्याच्या मनात आलं.

त्याने ती घागर पुढं ओढली आणि त्यावरचं झाकण काढलं. पाहतो तर काय. ती रिकामीच होती. आत काहीच नव्हतं. आपल्या पत्नीच्या वेडेपणाचं त्याला मनापासून हसू आलं. तो खाली उतरून आपल्या कामाला लागला.
सायंकाळी त्याची पत्नी घरी परतली. घरात पाऊल टाकताच तिच्या सर्व काही लक्षात आलं. तिचा चेहरा विवर्ण झाला. ती दु:खी झाली. ती गोपालला हाक मारून म्हणाली, ‘‘मला आता गेलं पाहिजे.’’ 

‘‘पण तू इतकी अस्वस्थ का होते आहेस? त्या घागरीत काहीच नव्हतं.’’ ‘‘अरे, गोपाल... माझी सगळी स्वप्नं मी त्या कळशीत भरून ठेवली होती. तू तिचं झाकण उघडताच ती सगळी वाNयाबरोबर उडून गेली. तुमच्या या जगात माझ्या स्वप्नांशिवाय जगणं मला शक्य नाही रे. आपण जरी परस्परांच्या कितीही निकट आलो ना, तरी प्रत्येकाची स्वत:ची अशी काही स्वप्नंही असतातच, असावीच लागतात. स्वप्नांमुळेच तर आपण भविष्याकडे बघायला शिकतो, पण तू तुझ्या वचनाचा भंग केलास.’’

असं म्हणत क्षणार्धात गोपालची ती देवसुंदरी आपल्या घागरीसह त्याच्या आयुष्यातून कायमची निघून गेली, पण तिच्या बोलण्याचा मथितार्थ ती गेल्यावर गोपालच्या ध्यानात आला. तिच्याविषयी त्याला आत्यंतिक आदर वाटू लागला. त्यानंतर काही काळाने गोपालनं आपलं दु:ख विसरून गावातील एका साध्यासुध्या मुलीशी विवाह केला आणि तो सुखानं राहू लागला. 

No comments:

Post a Comment