Thursday 5 December 2013

अस्तित्व

रावसाहेब तेव्हा अजून ‘रावसाहेब’ झालेले नव्हते. रेल्वेच्या मालविभागात कारवूâन म्हणून काम करीत होते. पगार फारच कमी होता. 

कुणिगल हे त्यांचे गाव. शिक्षणही फारसे झालेले नव्हते. फार फार तर मॅट्रिकपर्यंत शिकले असतील; पण त्यांची वृत्ती समाधानी होती. आपल्या बहिणीच्या लग्नासाठी त्यांनी आपली जमीन, घर विवूâन टाकले होते.
अंगभर कर्ज झाले होते. त्यात ही लहान पगाराची नोकरी. अशा मुलाला मुलगी कोण देईल?

त्यांच्यासारख्याच गरीब घराण्यात वाढलेली, बेंगलोरमधल्या अक्की पेठमध्ये राहणारी सुमती, त्यांची बायको म्हणून त्यांच्या घरी आली.

सुमतीचा स्वभाव अगदी नावाप्रमाणेच होता. तीसुद्धा मोठ्या कुटुंबातून आली होती.

लग्न झाले, तेव्हा रावसाहेब चिक्कबाणावर या गावात नोकरीला होते. लग्नानंतर दोन वर्षांनी नीरजा जन्मली.
सुमतीच्या गरीब भावंडांनी ‘कर्तव्य’ म्हणून तिचे बाळंतपण कसेबसे पार पाडले.

बेंगलोरच्या वाणीविलास या सरकारी हॉाqस्पटलात नीरजाचा जन्म झाला. बाळंतपणात फार रक्तदाााव झाल्यामुळे गर्भाशय काढायची वेळ आली. ध्Eाीरोगतज्ज्ञ फार हुषार असूनसुद्धा दुसरा इलाजच नव्हता. डॉ. शशिकला यांनी कृष्णरावांना बोलावून सांगितले, ‘‘यानंतर तुम्हाला मुलं होणार नाहीत. आता गर्भाशय काढले नाही, तर आईच्या जिवाला धोका आहे.’’ 

नाइलाज झाल्याने कृष्णरावांनी सही केली; पण घरात कुणालाही सांगितले नाही. कृष्णरावांची आई सुंदरम्मा. मुलगी झाल्याची बातमी ऐकताच तिने नाक मुरडले.

‘‘पहिली मुलगीच का? सुमतीला पुढच्या खेपेला मुलगाच व्हायलाच पाहिजे.’’ तिने आपल्या मुलाला बजाविले.
मुलगा-मुलगी होणे हे आईच्या हातात नसते; पण कुणिगलमधल्या त्या म्हातारीला कसे कळणार?

घरात सगळ्या मुलीच भरल्या आहेत. अशिक्षित अशा वातावरणात वाढलेल्यांना हे समजायचे कसे?

सुमती हॉाqस्पटलमधून बाळाला घेऊन घरी आली, तेव्हा तर तिला उठताबसता हेच ऐवूâन घ्यावे लागले. त्यामुळे ती वैतागून गेली होती.

त्या घरातून कधी एकदा बाहेर पडेन, असे तिला झाले होते. कृष्णरावांची बदली महाराष्ट्रातल्या जालना या गावी झाली आणि तिचा प्रश्न सुटला.

सुमती नीरजाला घेऊन अगदी आनंदाने निघाली.

आता परत कधी यायचे कुणास ठाऊक? ‘लवकर ये’ म्हणून प्रेमाने बोलावणारे माहेर नव्हते. आली नाही म्हणून वाईट वाटून घेणारे सासरपण नव्हते.

हिंदी चित्रपट बघून मोडके-तोडके हिंदी बोलायला शिकलेल्या सुमतीने परदेश प्रवासाला निघाल्यासारखी जय्यत तयारी केली आणि ती जालन्याला निघाली. जालना हे महाराष्ट्रातले एक रेल्वे जंक्शनचे गाव. सगळ्या ठिकाणी असते तशी इथेही स्टेशनच्या बाहेर रेल्वे कॉलनी होती.

कमी पगारावर काम करणारे कामगार बहुतेक या रेल्वे कॉलन्यांमधेच राहायचे. ती एक छोटीशी चाळच होती, असे म्हणायला हरकत नाही. दोन खोल्यांचे घर, त्यात छोटेसेच स्वयंपाकघर.

सासू, नणंदा यांचा त्रास नसलेल्या दूरच्या गावी असल्यामुळे हे घर म्हणजे सुमतीला राजवाड्यासारखे वाटू लागले.

घरात तशा कोणत्याच प्रकारच्या सोयी नव्हत्या. तरीसुद्धा जालना हे गाव तिला खूप आवडले.

घरात पाण्याचा नळ नव्हता. आख्ख्या चाळीत पिण्याच्या पाण्याचा एकच नळ. पिण्याचे पाणी तिथून भरून आणावे लागे. पाणी घरात साठवून ठेवावे लागे. त्या दोघांना असे किती पाणी लागणार होते? 

दोन-तीन घागरी झाल्या तरी खूप.

सगळ्यांच्या आधी उठून सुमती पाणी भरून घ्यायची.

त्या रेल्वेच्या कॉलनीत पुष्कळ कुटुंबे होती; पण सुमतीची कुणाशीच जास्त घसट नव्हती.

घरचे सगळे काम संपवून गाणी गुणगुणत, नीरजाशी खेळण्यात तिचा वेळ निघून जायचा.

त्यातूनही वेळ मिळालाच तेव्हा हिंदी वाचायला-लिहायला ती शिवूâ लागली. कॉलनीतली कुटुंबे वेगवेगळ्या राज्यांतून आलेली असली तरी हिंदी हीच त्या सगळ्यांची भाषा होती.

कृष्णराव हे अत्यंत सभ्य आणि विश्वासू गृहस्थ. कष्टाळू स्वभावाचे. त्यामुळे कोणत्याही कामासाठी त्यांच्या साहेबांना कृष्णरावच हवे असत. त्यामुळे कृष्णरावांचे घरात असणे, तसे कमीच. त्या दोघांनी कधीच श्रीमंतीची स्वप्ने बघितली नाहीत. अत्यंत समाधानाने ते आपला संसार करीत होते.

नीरजा मोठी होत होती. तिची पहिली पावले याच घरात पडू लागली. आता ती वर्षाची झाली होती. घरभर हिंडत होती. 

नशीब हे प्रत्येकाला वेगवेगळ्या रूपात भेटत असते.

सुमतीला तिचे नशीब भेटले ते नळाच्या रूपात.

एक दिवस काही कारणांनी नळाला पाणी येईनासे झाले. पाण्यासाठी सगळ्यांचा गोंधळ सुरू झाला.

रेल्वे कॉलनीच्या मागच्या बाजूला एका मध्यमवर्गीय श्रीमंतांचे घर होते.

त्यांच्या घराच्या अंगणात एक ‘हँड पंप’ असल्याचे सुमतीने बघितले होते. नीरूला बरोबर घेऊन बाजारात जाताना ती त्या घरासमोरून जात होती. 

सुमतीची त्यांच्याशी ओळख नव्हती; पण त्या घरात भरपूर माणसे असावीत, असे दिसत होते. त्या घरात सरदारजीचे एक कुटुंब राहात होते. 

त्यांच्या घरात पाणी विचारावे तरी कसे? तिला भीड वाटत असली तरी तिने एका हातात घागर घेतली आणि दुसNया हाताने नीरूला चालवत ती त्यांच्या घरी आली.

 घराच्या फाटकाबाहेर सुमती थांबली. फाटकाच्या आतल्या बाजूला सुमतीपेक्षा चार-सहा वर्षांनी मोठी, एक देखणी बाई ‘हँड पंप’ने पाणी काढीत होती. सुमतीकडे पाहून ती हसली. सुमती आणि नीरूला रोज पाहत असावी. तिच्या हसण्याने सुमतीला थोडा धीर आला.

‘‘मला एक घागर भरून पाणी द्याल का? बाळाला पिण्यासाठी पाणी नाही. 

एक घागर पुरे.’’ सुमतीने एका दमात विचारले.

‘‘त्यात काय एवढं, या ना.’’ म्हणत तिने तिला आत बोलावले.

फाटक उघडल्याचा आवाज ऐवूâ आल्याने गॅलरीतून म्हातारी डोकावली.

‘‘कोण गं ते रूपिंदर?’’ तिने विचारले.

‘‘शेजारच्या रेल्वे कॉलनीतले आहेत. एक घागर पाणी पाहिजे म्हणे.’’

त्या म्हातारीने पंजाबी भाषेत काय सांगितले, ते सुमतीला कळाले नाही.

पण रूपिंदरने हसत हसतच सुमतीला सांगितले, ‘‘केव्हा पाहिजे तेव्हा पाणी घेऊन जा.’’

नीरजा पाण्यात खेळत होती. तिने तिच्याकडे बघत विचारले, ‘‘तुमची मुलगी काय?’’

‘‘होय, मला एकच मुलगी आहे. तुम्हाला?’’

‘‘दोन्ही मुलंच आहेत.’’

रूपिंदर आणि सुमती यांची मैत्री जमली, ती अशी.

दुपारचे जेवण झाले, की रूपिंदर सुमतीच्या घरी येऊ लागली. तिची सासू गावात नसली, की नीरजाला घेऊन सुमती तिच्या घरी जाऊ लागली. रूपिंदरच्या घरी भरपूर माणसे होती. मुलेही भरपूर होती. तिचा सबंध दिवस
स्वयंपाकघरातच जात होता. एक दिवस नीरजा आईचे बोट धरून रूपिंदरच्या घरी आली.

बाहेरच्या कट्ट्यावर बसून ती काहीतरी चघळत असताना आतून एक मूल आले आणि ते तिला दाराआडून बघू लागले. नीरजाला बघताच लाजेने का भीतीने माहीत नाही; पण बाहेर न येता त्या मुलाने ‘माँ’ अशी हाक मारली.

‘‘बेटा, बाहेर ये. ती तुझी बहीण आहे. लाजू नकोस.’’ रूपिंदर त्या मुलाला म्हणाली.

सुमती बोलता बोलता थांबली आणि त्या मुलाकडे बघू लागली.

‘‘हा माझा मोठा मुलगा. लहान मुलगा खूप छोटा आहे.’’ रूपिंदरने सांगितले. नीरजाने आपल्या बरोबरीच्या मुलाला बघितले आणि ती पुढे आली. आपला हातातला खाऊ तिने त्यालाही दिला.

सुमतीने त्या मुलाला नीरजाची ओळख करून देताना म्हटले, ‘‘ही तुझी ताई.’’

मुलाने ‘ताई’ म्हणून हाक मारली. 

रूपिंदरने त्या मुलाची ओळख करून देताना म्हटले, ‘‘हा तुझा मुन्ना.’’ नीरजाने त्याला ‘मुन्ना’ अशी हाक मारली.

No comments:

Post a Comment