ड्रॉइंग मास्तरांचा तास
इतिहासाचे मास्तर रजेवर होते. वर्ग रिकामाच होता. घंटा होऊन पाच मिनिटे झाली तरी कोणी आले नाही, हे पाहून आम्हाला बरे वाटले. आता कोणी गुरुजी येत नाहीत, हे नक्की. झकास झाले! तीनचार तास अभ्यास करून हातांची बोटे दुखायला लागली होती. वंâटाळा आला होता. आता एवढा तास झाला म्हणजे मधली सुट्टीच. पोटात खड्डा पडला होता.
केव्हा एकदा मधली सुट्टी होते आणि डबा खातो असे झाले होते. पिशवीतल्या डब्याकडे एकसारखे लक्ष जात होते आणि मनाला त्रास होत होता. हा एवढा तास... एवढा तास संपला म्हणजे िंजकली. थोडी कळ काढायला पाहिजे...
आम्ही असा विचार करीत होतो आणि गुरुजींची वाट पाहत होतो; पण कोणी आले नाही. घंटा होऊन पाच मिनिटे झाली. याबरोबर सगळीकडे आनंदीआनंद पसरला. पिशवीतला डबा काढून मी तो एकदम उघडून पाहिला. त्यातले एक कडबोळे तोंडात टाकले. दुसNयाने काही उद्योग नसल्यामुळे बाक वाजवायला सुरुवात केली. कुणी शेजारच्या पोराच्या पाठीत धपाटा घातला. कुणी मॉनिटरला वेडावून दाखवले. दोघा-चौघांनी बाकावर उभे राहून उड्या मारल्या आणि टांगत्या दिव्याला हात लावण्याचा प्रयत्न केला. एकाने `इय' म्हटल्यावर दुसNयाने `हुई' केले. हळूहळू वर्गात चांगलाच गोंधळ माजला. कडबोळे खाता-खाताच माझे समोर
लक्ष गेले. डाव्या बाकावरचा वामन्या देशपांडे तोंडात पोqन्सल घालून तोंड वाजवीत होता.
त्याच्या खाकी पँटमधून लंगोटीचे टोक बाहेर लोंबत होते. वामन्या लेकाचा बावळटच आहे. नेहमी लंगोट्या घालून येतो आणि मारुतीसारखा शेपटी लांबवून बसतो. मला तर इतके हसू येते म्हणता!... हळूच मी उठलो आणि हात पुढे करून त्याची लंगोटी ओढली.
त्याबरोबर वामन्या ओरडला आणि त्याची सबंध लंगोटी माझ्या हातात आली. सगळा वर्ग खो-खो करून हसू लागला. वामन्याचे तोंड गोरेगोमटे झाले. कुणी तरी मोठ्यांदा ओरडले, ``बजरंगबली की जय!'' ``वामन्या, शेपूटऽऽ' वामन्या रडवुंâडीला येऊन म्हणाला, ``देतोस का नाहीस माझी लंगोटी? बघ हं, नाही तर –''
``नाहीतर काय करशील?'' मी त्याच्यापुढे लंगोटी नाचवली.
``गुरुजींना सांगेन.''
– असे म्हणून त्याने लंगोटीचे एक टोक धरले आणि ओढले. मग मीही जोरात ओढले. आमची दोघांची रस्सीखेच सुरू झाली. बाकीच्या मुलांनी टाळ्या वाजवून या गोष्टीचे स्वागत केले. ह्यामुळे मला भलताच जोर आला. मारामारी करण्याच्या नादात मुले टाळ्या वाजवायची थांबली, हे माझ्या लक्षात आले नाही. जिकडे कडे
एकदम शांतता पसरली. भोवताली गोळा झालेले पळत-पळत आपापल्या जागेवर पटापट जाऊन बसले; पण माझे लक्षच नव्हते. काही तरी धोका असल्यासारखे एकाएकी वाटले, म्हणून मी लंगोटी ओढता-ओढता एकदम समोर पाहिले.
बापरे!
समोर आमचे ड्रॉइंगचे मास्तर टेबलापाशी उभे होते.
त्याबरोबर मी हातातली लंगोटी एकदम सोडून दिली. वामन्या एकदम पाठीमागे कोसळला. त्याचे टाळके शेजारच्या बंडूच्या टाळक्यावर ठाण्दिशी आदळले. दोघेही मोठ्यांदा ओरडले.
घाईघाईने मी खाली बसण्याच्या बेतात होतो. तेवढ्यात ड्रॉइंग मास्तरांनी मला जवळ बोलावले. भीत-भीत मी जागा सोडली. टेबलाच्या दिशेने हलके-हलके प्रवास सुरू केला.
``अरे, लवकर ये ना गाढवा! चालता येत नाही का तुला?'' ड्रॉइंग मास्तर ओरडले. मग ते स्वत:च माझ्याजवळ आले, माझा हात धरला.
``काय चाललं होतं?''
``काही नाही, सर. हा वामन्या आहे ना, तो म्हणाला माझी लंगोटी तर बघ किती जाम आहे. अजिबात फाटत नाही. म्हणून मी ओढली.'' मी नम्रपणाने उत्तर दिले.
``नाही सर, यानं उगीच माझी लंगोटी ओढली.'' वामन्या डोक्याला हात लावून म्हणाला, ``मी काही म्हणालो नव्हतो, सर –'' ``होय का?''
असे म्हणून सरांनी माझ्या पाठीत एक गुद्दा चढवला. पाठ चोळीत-चोळीत मी विचारले, ``पण सर –''
``काय?'' ``आत्ता इतिहासाचा तास आहे, सर. ड्रॉइंगचा नाहीये.'' ``ते ठाऊक आहे मला. डोंगरेगुरुजी रजेवर आहेत, म्हणून मी आलोय.''
बोलण्याच्या नादात सरांनी माझा हात सोडला. मी पळत-पळत जागा गाठली. टाळ्या वाजवल्या.
``छान झालं सर, तुम्ही तासावर आलात. आता ड्रॉइंग घ्या, सर; इतिहास नको.''
माझी ही सूचना ऐकल्यावर वर्गात जरा खळबळ माजली. सगळेच बोलू लागले. सरांना सूचना करू लागले. कुणी गोष्ट सांगण्याची सूचना केली, कुणी वादनाची पेटी आणण्याबद्दल ओरडून सांगितले, तर कुणी स्वस्थ बसून सगळ्यांनी विश्रांती घेणे इष्ट असल्याचा अभिप्राय व्यक्त केला; पण इतिहास नको याबद्दल सगळ्यांचे एकमत दिसले.
टेबलावर हात आपटून मास्तरांनी वर्गात शांतता स्थापन केली. मग ते नाक उडवीत खुर्चीत बसले. थोडा वेळ विचार केल्यावर ते रागीट मुद्रेने म्हणाले, ``आता तास इतिहासाचा आहे ना?''
No comments:
Post a Comment