Wednesday 4 December 2013

महाश्वेता

आनंद असताना थोड्याच अवधीत जो ‘लक्ष्मीनिवास’ तिला चिरपरिचित वाटत होता, तोच आता तिला आनंद नसताना अपरिचित वाटू लागला. तिथं ऐकटीनं पाऊल टाकणं तिला नकोसं वाटलं. किती केलं तरी श्रीमंतांचं घर ! 

आपलं कामकाज, आपलं वागणं-बोलणं त्या बंगल्याला साजेसं आहे की नाही, याविषयी तिला मनात भीती वाटू लागली. तिच्या मनातली भीती जाणवून राधक्का म्हणाल्या, ‘आनंदचं विमान गेलं. चला, गावी परतूया. घरात तिन्हीसांजेला दिवा लावायला पाहिजे. बघता-बघता सहा महिने जातील. एवढं घाबरायला काय झालं? दिवेलागणीला घरी हजर व्हायला पाहिजे.’

बाहेर गिरिजा आणि ड्रायव्हर तुकाराम वाट पाहत बसले होते. राधक्का बाहेर येत म्हणाल्या, ‘तुकाराम, आम्हांला पोतदार सराफांच्या दुकानापाशी सोड आणि धाकट्या बाईसाहेबांना भाजी-मार्वेâटला घेऊन जा. आठ दिवसांची भाजी घेऊन ये.’ त्यांनी भाजीसाठी त्याच्याकडे पैसे दिले. कदाचित नव्या सुनेला घरातल्या सोन्या-चांदीच्या व्यवहारात एवढ्यात कशाला घ्यायचं, असा त्यांचा विचार असावा. आपण घराची मालकीण असताना तिला महत्त्वाचे आर्थिक व्यवहार समजायचं कारणच काय?

यावर अनुपमा काहीच बोलली नाही. वाद घालणं, उलट उत्तर देणं, उगाच संशय घेणं तिच्या स्वभावातच नव्हतं. तिनं आपल्या सासूबार्इंनी भाजी आणायला का धाडलं, याविषयी काही विचारही केला नाही. उगाच फाटे फोडणं तिला ठाऊक नव्हतं.

तुकारामनं भाजीची खरेदी संपवली आणि विमनस्कपणे गाडीत बसलेल्या  अनुपमेपाशी येऊन म्हणाला, ‘बाईसाहेब, थोरल्या बाईसाहेबांनी दिलेले पैसे पुरले नाहीत. आणखी पाच रुपये चार आणे द्यायला पाहिजेत. देता?’ 

अनुपमेनं आपली पर्स उघडून पाहिली. आनंदनं गावी जाताना दिलेले दोनशे रुपये तिथंच होते. पण तुकाराम म्हणाला, ‘शंभराची नोट नको. पाच रुपयांसाठी एवढी चिल्लर कुणी देत नाही. सुटेच द्या.’ अनुपमेचं शेजारीच असलेल्या गिरिजेच्या पर्सकडे लक्ष गेलं. सराफाच्या दुकानात घाईनं जाताना ती विसरून गेली असावी. क्षणभर तिच्या पर्समधून पैसे काढून घ्यायची तिला भीती वाटली. पण तुकाराम आणि भाजीवाला छोकरा
समोरच उभे होते. पाच रुपयांसाठी त्यांना ताटकळायला लावणं अयोग्य वाटून तिनं विचार केला, नाही तरी गिरिजा घरातलीच मुलगी आहे, नणंदच आहे. तिनं गिरिजेची पर्स उघडून त्यातल्या पाच-पाचच्या दोन नोटा काढून तुकारामाच्या हाती दिल्या, ‘सुटे आणून दे.’

ते दोघं निघून गेले. अचानक गिरिजाची पर्स तिच्या हातून निसटून खाली पडली. अनुपमा घाबरली. काही विंâमती वस्तू असल्या आणि त्या गहाळ झाल्या तर?... तिनं घाई-गडबडीनं पडलेलं सामान गोळा केलं.

पर्समध्ये तसं काही विशेष नव्हतं. कुठल्याही कॉलेजकुमारीच्या पर्समध्ये असणाNया वस्तूच तिथं होत्या. वंâगवा, सेंटची बाटली, छोटा आरसा, कॉपॅक्ट, टिकलीचं पाकीट असंच किरकोळ सामान होतं. एका रुमालात मात्र काहीतरी गुंडाळून ठेवलं होतं.

रुमाल उलगडून बघताच अनुपमा शिळेसारखी स्तब्ध झाली. तिच्या कल्पनेतही येणार नाही, अशी वस्तू त्या रुमालात गुंडाळून ठेवली होती. त्यात गर्भ- निरोधक गोळ्यांचं पाकीट नीट ठेवलं होतं ! त्यातच एक चिठ्ठी होती, ‘रात्री आठनंतर !’

अनुपमा गडबडून गेली. आपल्या अतिश्रेष्ठ घराण्याचा गुणगौरव तिनं असंख्य वेळा ऐकला होता. राधक्कांच्या सोवळ्याओवळ्याच्या अवडंबराची कटकट ती दररोज पाहतच होती. आणि अशा घरातली ही तरुण मुलगी कसले धंदे करतेय हे !... अनुपमेचा काही क्षण स्वत:च्या डोळ्यांवरही विश्वास बसेना. 

तिनं पुन्हापुन्हा त्या गोळ्या पाहून खात्री करून घेतली.

वस्तुत: तिलाही लग्नाच्या वेळेपर्यंत या गोळ्यांची माहिती नव्हती. लग्नानंतर आनंदचा परदेश-प्रवासाचा बेत पक्का असल्यामुळे, त्यानंच तिला त्या गोळ्यांची ओळख करून दिली होती.

—तिनं पुन्हा ती चिठ्ठी निरखून पाहिली. ते अक्षरही गिरिजाचं नसल्याचं तिच्या लक्षात आलं. मग कुणाचं असेल हे?... काय चाललंय हे सगळं?... 

घरात आनंद आणि राधक्कांना हे ठाऊक आहे काय? अनुपमानं गडबडीनं पर्स पुन्हा भरून ठेवली. गिरिजाच्या पर्समध्ये सत्तर- ऐंशी रुपये नेहमीच असायचे. त्यातले पाच रुपये काढल्याचं तिच्या लक्षात येणार नाहीच. आपण पर्स उघडल्याचं तिला सांगायचं नाही, असं अनुपमेनं ठरवलं. ड्रायव्हरनं गाडी सोनाराच्या दुकानापाशी उभी केली. राधक्का आणि गिरिजा गाडीत येऊन बसल्या. अनुपमेनं गिरिजाचा चेहरा निरखून पाहिला– तिला तो नेहमीसारखा सुरेख न वाटता कपटी आणि धूर्त तरुणीचा चेहरा वाटला. 

‘माझी पर्स इथंच राहिली वाटतं ! तुम्ही पाहिली काय?’

‘इथं? मला ठाऊक नाही, कुठं आहे?’ अनुपमा खोटंच म्हणाली.

सीटखालची पर्स काढून देत राधक्कांनी बजावलं, ‘गिरिजा, पर्स अशी इथं-तिथं टाकायची नसते. आपण पर्स कुठंतरी टाकायची आणि लोकांवर उगाच आळ घ्यायचा, हे काही बरं नव्हे.’

अनुपमाला हा नाटकीपणा वैताग आणणारा वाटला. गावी आल्यावर अनुपमानं गिरिजेच्या वागणुकीवर विशेष लक्ष ठेवलं. पण याविषयी कुणाशीही मनमोकळं बोलण्याचं धैर्य तिला वाटलं नाही. राधक्कांना सांगण्याइतवंâ धैर्य तिच्या अंगी नव्हतंच. सासूसुनेच्या नात्यात एवढा मोकळेपणा कुठून येणार? त्यात अनुपमा गरीब घरातून आलेली सून. तोंडानं त्याविषयी बोलून दाखवलं नाही, तरी तसं वागून दाखवण्याची त्यांची पद्धत होती. शिवाय घरात सतत काही ना काही चाललेलं असे. कधी पुâलांचा लक्ष वाहणं, कधी देवांना सहदाा दिव्यांनी ओवाळणं, कधी देवांची हळदीवुंâकवानं पूजा बांधणं— काही ना काही चाललेलं असे.

नारायण राधक्कांना दररोज काही ना काही धार्मिक विधी करायला लावत होता. राधक्का त्याच्या शब्दाबाहेर नसायच्या. या धार्मिक विधींसाठी होणाNया खर्चाचा तर विंâचितही विचार केला जात नव्हता. कुणाला त्याची फिकीरही नव्हती. गिरिजेच्या संदर्भात आनंदला तरी कशी लिहिणार ती? किती झालं तरी त्याची ती लाडकी बहीण! बायको काय अलीकडे घरी आलेली. अनुपमेची आनंदशी अजून नीट ओळखही झाली नव्हती. अशा वेळी अशी नाजूक गोष्ट कशी कळवणार?

गिरिजा रूपगर्विता आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे गर्भश्रीमंत घरातली. त्यामुळे तिनं स्वत:च्या तोNयात राहणं स्वाभाविक होतं. अनुपमा सुंदर असली, तरी गरीब घरातून आलेली. स्वभावानंही गरीब. त्यामुळे अनुपमेची मोठी कुचंबणा होत होती.

एक दिवस गिरिजानं सांगितलं, ‘आई, दोन दिवसांसाठी हळेयबिडु-बेलूरला ट्रीप जाणार आहे. मीही जाणार.’ ‘कॉलेजची ट्रीप? मुलंही येताहेत काय?’ 

‘मुलं येणारच ना ! पण बरोबर लेडी-टीचरही आहेत.’ गिरिजेनं आईची समजूत घालून परवानगी मिळवली.
राधक्कांना वंश-परंपरेनं प्रचंड श्रीमंतीबरोबर सुरेख गुलाबी रंगही आला होता. त्याचबरोबर साखरेचा रोग-डायबेटीसही आला होता. शिवाय वात-प्रकृतीमुळे अलीकडे त्यांना सायंकाळी तास-तासभर बसून पूर्वीप्रमाणे देवाची पूजा करायलाही जमत नव्हतं.

सुंदरक्कांच्या घरी त्यांच्या नातवाचा वाढदिवस होता, त्यानिमित्तानं त्याची आरती करायची आहे, म्हणून राधक्कांच्या घरी निरोप आला. गिरिजा ट्रीपला गेल्यामुळे राधक्कांनी अनुपमेलाच आरतीसाठी जाऊन यायला सांगितलं. मोठ्या घरची सून म्हटल्यावर अनुपमेलाही एकटं पाठवलं जात नव्हतं. ड्रायव्हर सोबत असायचाच. सुरुवातीला तिला याचं कौतुक वाटलं, तरी हळूहळू तिला तो आपलं स्वातंत्र्य हिरावून घेणारा सोन्याचा पिंजरा असल्यासारखं वाटू लागलं होतं.

सासूबार्इंनी सांगितल्याप्रमाणे उत्तम रेशमी साडी नेसून आणि सोन्याचे दागिने लेवून अनुपमा गाडीत बसली. तिच्या देखण्या रूपाकडे राधक्कांनी निरखून पाहिलं.

सगळ्या श्रीमंत घरांप्रमाणेच सुंदरक्कांच्या घरचा आरतीचा थाट होता. तिथल्या गर्दीतही अनुपमा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. त्यामुळे संकोचून एका कडेला बसलेल्या अनुपमेकडे कमला आवर्जून गेली. त्या दोघींची
लग्नाआधीपासून ओळख होती. शिवाय कमला आणि गिरिजा एकाच वर्गात शिकत होत्या.

No comments:

Post a Comment