पाहुणा
फीबी झोपून उठली. खरे म्हटले, तर बागेतील पीअर वृक्षावरच्या रॉबिन पक्ष्याच्या त्या प्रेमी युगुलाने मोठा चिवचिवाट करून तिला उठवले. उठल्याउठल्या खालच्या मजल्यातील हालचालीची तिला चाहूल लागली. त्यासरशी अगदी गडबडीने ती स्वयंपाकघरात येऊन पोहोचली. तेथे येऊन बघते तर हेप्झीबा तिच्याआधीच हजर. एका खिडकीजवळ ती उभी होती, हातातले पुस्तक अगदी नाकाजवळ धरून. त्या पुस्तकातील मजकुराचा वास घेण्यासाठीच जणू! पण बिचाNया हेप्झीबाच्या मनात तसले काही नव्हते हो! तिच्या मूळच्या अधू दृष्टीला त्या पुस्तकाचे वाचन अवघड जात होते. खरेच! एखाद्या ग्रंथातील महत्त्वाचे ज्ञान या पद्धतीने, म्हणजे नुसत्या त्याच्या वासाच्या माध्यमातून प्रकट झाले असते, तर अशा प्रकारचा एकमेव ग्रंथ ठरला असता तो! आणि मग मोठी मौज उडाली असती त्या स्वयंपाकगृहात. जिकडेतिकडे हरणाचे मांस, टर्की, कोंबडा, डुकराची चरबी लावून तळलेले कवडे, पुिंडग, केक, खिसमस पाव, नाना तNहेच्या या अन्नपदार्थांचा खमंग घमघमाट पसरून दरवळून गेले असते ते पाकगृह. असा तो ग्रंथ पाकशास्त्रव्र्
िाâयांचा ग्रंथ होता. अगदी सचित्र असा. त्यात इांqग्लश पद्धतीने तयार करण्याच्या पदार्थांच्या असंख्य जुन्या कृती समजावून दिल्या होत्या. स्पष्टीकरणासाठी अधूनमधून चित्रेही दिली होती. त्या चित्रांवरून एखाद्या सरदाराने आपल्या किल्ल्यातील भव्य दिवाणखान्यात योजिलेल्या मेजवानीची मांडणी कशी करावी याची कल्पना येत होती. अशा त्या नानाविध संपन्न व गुणकारी करामतींमधून (अर्थात, त्यांच्यापैकी
एकीची तरी कोणी चव पाहिली असेल िंकवा नाही ही शंका उरतेच म्हणा. अगदी आज्या-पणज्यांच्या काळापर्यंत जाऊन भिडले तरी) बिचारी हेप्झीबा थोड्या वेळात तयार होणारा एखादा पदार्थ शोधीत होती. अंगी असलेले कौशल्य आणि साहित्य यांच्या साहाय्याने तिला न्याहारी बनवायची होती.
थोड्याच वेळात एक खोल सुस्कारा सोडीत हेप्झीबाने पदार्थांच्या कृती सांगणारा तो ग्रंथ बाजूला ठेवला. फीबीकडे तिने म्हाताNया स्पेकलने – कोंबडीचे तिने ठेवलेले नाव –काल एखादे अंडे घातले होते काय, याची चौकशी केली.
ताबडतोब फीबी त्यासाठी धावत गेली, पण हात हलवत परतली; ती अपेक्षित मौल्यवान वस्तू न आणता. मात्र त्याच क्षणी रस्त्यावर आपल्या आगमनाची ललकारी देणारा एका मासेविक्याचा शंखध्वनी ऐवूâ आला. दुकानाच्या खिडकीवर अगदी उत्साहाने ठोके देत हेप्झीबाने त्याला आत बोलावले. त्याने भलावण केलेल्या त्याच्या गाडीतील माशांतला मासा खरेदी केला. तो समुद्रातला मासा होता. नुकत्याच सुरू झालेल्या मोसमाच्या आरंभाला एवढा गलेलठ्ठ मासा प्रथमच सापडला होता. नंतर फीबीला तिने कॉफीची बोंडे भाजण्याची विनंती केली. मध्येच तिने सांगितले की, ती अस्सल ‘मोचा’ (एक उंची कॉफी) होती. तिच्या दृष्टीने त्या प्रत्येक लहान बोंडाचे महत्त्व सुवर्णफळासम भासत होते. इतकी जपून ठेवलेली होती ती तिने. आता तिने त्या जुनाट शेगडीच्या अवाढव्य पात्रात जळणाचा इतका मोठा ढीग ओतला की, त्यामुळे स्वयंपाकघरात रेंगाळणारा अंधार ताबडतोब नाहीसा झाला. फीबीलाही आपण काहीतरी साहाय्य करावे असे वाटून तिने एक
प्रकारचा इंडियन केक बनविण्याची कल्पना काढली. तयार करण्याची पद्धत जितकी सोपी तितकीच त्याची रुचिसंपन्नता मोठी होती. तिच्या आईकडून शिकली होती ती त्याची बनावट. जर व्यवाqस्थत जमला तर कोणत्याही पद्धतीच्या ब्रेकफास्टकेकला तो भारी होता. हेप्झीबाने तिच्या सूचनेचा आनंदाने स्वीकार केला.
मग काय, ते स्वयंपाकघर खमंग आणि चविष्ट पदार्थांच्या तयारीला लागले. त्या स्वपाकघराच्या रचनादुष्ट धुराड्यातून गिरक्या मारीत पुढे सरकणाNया धूम्रवलयामधून त्या प्रासादात काम केलेल्या मृत स्वयंपाकिणींची भुते त्याच्याकडे मोठ्या आश्चर्याने बघत राहण्याचा संभव होता िंकवा त्या धुराड्यातून खाली डोकावून तेथे तयार होणाNया पदार्थांचा साधेपणा पाहून त्यांनी नाकेही मुरडली असतील. आपले
छायावत हात त्या पदार्थांत खुपसण्याचा निष्फळ प्रयत्नही केला असेल त्यांनी. त्याचे त्यांना दु:खही झाले असेल. अर्धवट भुकेले उंदीर मात्र हळूच आपल्या जागेबाहेर येत होते. आपल्या मागच्या पायांवर बसून त्या धुरकटलेल्या वातावरणाचा वास घेत होते ते. पदार्थ हाताला लागण्याच्या क्षणाची आशाळभूतपणे वाट पाहत
होते बिचारे.
तसे म्हणाल, तर हेप्झीबाला प्रथमपासूनच स्वयंपाक करण्याची आवड नव्हती. तिच्या आताच्या या कृशतेला तिचा हा तिटकाराच सर्वस्वी जबाबदार होता. स्वयंपाक करावा लागतो, भांड्यात पळी फिरवत बसावे लागते िंकवा आधणावर लक्ष ठेवावे लागते, या कटकटीपेक्षा जेवणच न केलेले बरे, असे तिला वाटायचे. म्हणून आजचा तिचा हा स्वयंपाकाच्या शेगडीपुढचा उत्साह म्हणजे तिच्या भावनेच्या पराक्रमाची एक कसोटीच होती. खरोखरच, ते एक भावना हेलावणारे दृश्य होते, निश्चितपणे शोकदायकही तेवढेच. (अर्थात, वर वर्णन केलेली ती स्वयंपाकिणींची भुते आणि ते उंदीर यांच्याखेरीज तेथे असणारी एकमेव प्रेक्षक – फीबी – दुसNया
एखाद्या कामात गुंतली नसल्यास!) नवीन पेटते निखारे एकत्र करून त्यावर तो समुद्रातला मासा भाजत असताना तिचे ते निस्तेज गाल शेगडीची उष्णता आणि अधिक कामाची घाई यांमुळे लालेलाल झाले होते. त्या भाजत्या माशाकडे ती मोठ्या काळजीने आणि अतिशय लक्ष देऊन पाहत होती, जणूकाय तिचे स्वत:चे
हृदयच काढून घेऊन त्या शेगडीच्या जाळीवर भाजण्यासाठी ठेवलेले होते आणि तो पदार्थ योग्य त्या पद्धतीने तयार होण्यातच तिचे चिरंतन सुख साठवलेले होते.
घरातील जीवनात व्यवाqस्थत मांडलेल्या आणि सर्व प्रकारचे रुचकर पदार्थ असलेल्या न्याहारीसाठी बसण्याइतके सुखदायक क्षण कोणतेच नसतात. ते सुख वेगळेच असते. आपल्या दवदार जवानीसह दिवस वर येत असतो. आपल्या आध्यााqत्मक आणि विषयासक्त वृत्ती एकमेकांशी जमवून घेण्याच्या ाqस्थतीत
असतात. दिवस जसजसा पुढे सरकेल तसतसे त्यांचे बिनसण्याचा संभव असतो. आपण स्वत: ताजेतवाने होऊन बसलेले असतो तिच्यापुढे. या सगळ्या गोष्टींमुळे त्या सकाळच्या न्याहारीतून मिळणारा ऐहिक आनंद पूर्णत: उपभोगता येतो आपल्याला. आपल्या स्वभावधर्मातील शरीररचनेच्या दृष्टीनेही ते ठीक असते. त्या वेळी थोडेफार अधिक पोटात गेल्यामुळे त्याच्या विशेष मोठ्या तक्रारी अथवा त्याची नुसती होणारी भावना यांपैकी काहीच घडत नाही. अशा एखाद्या न्याहारीच्या ताटावरच्या गप्पाही मोठ्या चुरचुरीत व खेळकर असतात. विशेषत: सभोवती आपल्याच परिचयाची माणसे, पाहुणे असतील तर त्यांच्या विचारांतसुद्धा त्या छटा अधिकाधिक येतात. त्यांच्या जोडीला जेवताजेवता एकमेकांचा जो सहवास येतो, त्या वेळच्या विचारांना ठळक अशा सत्याचा आधार मिळतो. इतर वेळी तसे क्वचितच घडते. आज हेप्झीबाने मांडलेले ते ब्रेकफास्ट-टेबल सर्वांत आनंददायक अशा एका मेजवानीचे स्थळ बनून राहिले होते. जगातील सगळ्या उत्साहाचे वेंâद्रच
बनले होते जणू! सडसडीत आणि डौलदार पायांच्या त्या टेबलावर एक अतिशय उंची रेशमी कापड अंथरलेले होते. त्याच्यावर ठेवलेल्या पदार्थांतील त्या भाजलेल्या माशातून वाफा उठायला लागल्या, पूर्वीच्या काळातील रानवट, मागासलेल्या आदिमानवाच्या देवळातील मूर्तीसमोर जळत राहणाNया सुगंधी धुपातल्यासारख्या.
‘मोचा’च्या बोंडांच्या कॉफीचा सुगंध असा दरवळला म्हणता की, त्याने कोणत्याही संरक्षक अशा कुलदैवताच्या घ्राणेंद्रियाला िंकवा न्याहारीच्या टेबलावर लक्ष ठेवणाNया एखाद्या आधुनिक शक्तीलाही तिच्या स्वादाने आनंदित केले असते.
No comments:
Post a Comment