Thursday, 12 December 2013

रुचिरा : भाग १

बटाट्याची भाजी : प्रकार १

साहित्य : अर्धा किलो बटाटे, चार-पाच ओल्या मिरच्या, एक चमचा उडदाची डाळ, साखर, मीठ, कढीलिंब, कोथिंबीर, ओले खोबरे, फोडणीचे साहित्य.

कृती : बटाटे उकडून, सोलून फोडी कराव्यात. फोडणी करून त्यात उडदाची डाळ तांबूस होईपर्यंत तळावी व त्यातच कढीलिंब घालून, खाली उतरवून ओल्या मिरच्यांचे तुकडे घालावे आणि त्यावर बटाट्याच्या फोडी घालाव्या. नंतर चवीप्रमाणे मीठ व साखर घालावी व भाजी चांगली परतून दोन वाफा आणाव्या. नंतर खाली
उतरवून ओले खोबरे व कोथिंबीर घालावी. 

या भाजीत ओल्या मिरच्यांऐवजी सुक्या मिरच्याही घालतात. या भाजीत कांदाही घालतात. कांदा चिरून फोडणीत टाकावा. 

बटाट्याची भाजी : प्रकार २
साहित्य : अर्धा किलो बटाटे, ओले अगर सुके खोबरे (किसलेले) पाव वाटी, तिखट, मीठ, साखर, कोथिंबीर, फोडणीचे साहित्य.

कृती : बटाटे सोलून, त्यांचे पातळ काप करून घ्यावेत. थोडे जास्त तेल घालून फोडणी करावी व त्यात बटाट्याचे काप टावूâन खरपूस परतावेत. त्यावर चवीप्रमाणे साखर, मीठ व तिखट घालून, चांगले ढवळून, वर खोबरे व कोथिंबीर घालावी. 

बटाट्याची भाजी : प्रकार ३ (बटाटयाचा रस्सा) 

साहित्य : पाव किलो बटाटे, पाव किलो फ्लॉवर, ओल्या मटाराचे दाणे एक वाटी, दोन मोठे कांदे, दोन पिकलेले टोमॅटो, पाव वाटी खसखस, एक चमचा जिरे, दोन चमचे धने, सुक्या खोबNयाचा कीस अर्धी वाटी, दोन लवंगा, दोन मिरे, दालचिनीचे एक इंचाचे दोन तुकडे, एक इंच आल्याचा तुकडा, लसणीच्या पाकळ्या चार-पाच, ओले खोबरे, कोथिंबीर, फोडणीचे साहित्य. 

कृती : बटाटे उकडून, सोलून फोडी कराव्या. फ्लॉवर चिरून घ्यावा. कांदे बारीक चिरावे. सुके खोबरे, धने, जिरे, लवंगा, दालचिनी, मिरे हे सर्व भाजून घेऊन वाटावे अगर बारीक कुटावे. पाणी घालून खसखस व आले व लसूण निरनिराळी वाटावीत. तेलावर कांदा परतून घ्यावा. फोडणी करून, त्यात मटाराचे दाणे घालून एक वाफ आणावी. नंतर त्यात बटाट्याच्या फोडी, फ्लॉवर व कांदा घालून, रस पाहिजे असेल, त्या प्रमाणात पाणी घालावे व उकळी आणावी. उकळी आल्यानंतर त्यात टोमॅटोच्या फोडी घालाव्या व कुटलेला अगर वाटलेला सर्व मसाला, वाटलेली खसखस, आले व लसूण घालावी व चवीप्रमाणे मीठ व गूळ घालून भाजी चांगली शिजवावी. शिजल्यानंतर वर कोथिंबीर व खोबरे घालावे.

कांद्याची भाजी : प्रकार १

साहित्य : अर्धा किलो कांदे, एक चमचा तिखट, चवीप्रमाणे मीठ, गोडा मसाला, सुपारीएवढी चिंच, मोठ्या लिंबाएवढा गूळ, पाव वाटी शेंगदाण्याचे वूâट, सुक्या खोबNयाचा कीस अर्धी वाटी, फोडणीचे साहित्य.

कृती : कांद्याच्या उभ्या फोडी कराव्या. फोडणी करून, त्यावर कांद्याच्या फोडी टाकाव्या व चांगली वाफ आणावी. एक वाटी पाणी घालावे. नंतर त्यात तिखट, मीठ, गोडा मसाला, गूळ व चिंचेचे पाणी घालावे व तसेच दाण्याचे वूâट, तिळाचे वूâट व खोबNयाचा कीस (भाजून) घालावा. नंतर भाजी चांगली शिजवावी.

टीप : भरल्या वांग्यांप्रमाणे भरल्या कांद्याचीही भाजी वरील मसाला घालूनच चांगली होते. मुंबईकडे मद्रासी कांदे मिळतात. ते आकाराने अगदी लहान असतात व जरा तिखटही असतात. त्या कांद्यांची भाजी वरीलप्रमाणे केल्यास जास्त चांगली लागते.

कांद्याची भाजी : प्रकार २ (पीठ पेरून)

साहित्य : अर्धा किलो कांदे, एक ते दीड वाटी चण्याचे पीठ, दोन चमचे तिखट, चवीप्रमाणे मीठ, आवडत असल्यास थोडी साखर, फोडणीचे साहित्य.

कृती : कांदा बारीक चिरून घ्यावा. जरा जास्त तेल घालून फोडणी करावी. नंतर त्यात चिरलेला कांदा टावूâन चांगली वाफ आणावी. नंतर त्यात तिखट, मीठ व आवडत असल्यास साखर घालावी. नंतर भाजी चांगली ढवळून, त्यावर चण्याचे पीठ घालून, भाजी परतावी व चांगली वाफ आणावी.

टीप : या कांद्याच्या भाजीप्रमाणेच कोबी, फ्लॉवर, दुधीभोपळा, पडवळ, नवलकोल, भोंग्या मिरच्या, घोसावळे (गिलकी), हदग्याची पुâले वगैरे भाज्या पीठ पेरून करतात व त्या चांगल्या होतात.

No comments:

Post a Comment