Wednesday 18 December 2013

हाच माझा मार्ग ...

रामनगरममध्ये ‘शोले’चं शूिंटग सुरू असताना अचानक ‘राजश्री प्रॉडक्शन्स’चे सर्वेसर्वा ताराचंद बडजात्या (सेठजी) एके दिवशी सेटवर आले. त्यांनी रमेश सिप्पी यांच्यासह सगळ्यांशी भेटीगाठी घेतल्या, सगळ्यांबरोबर फोटो काढून झाले. मी दुसNया बाजूला उभा होतो. ‘एक फोटो हिरोबरोबर काढायचाय,’ असं ते म्हणत होते. अमितजी, धरमजी, हरिभाई सगळे तर तिथेच होते. मग ‘हिरो’ कोण, हे कुणालाच कळेना. 

‘आमच्या हिरोबरोबर एक फोटो काढायचाय,’ असं म्हणून ताराचंदजी माझ्याजवळ आले आणि मला फोटोसाठी घेऊन गेले. फोटो काढला. मला या प्रकाराचा त्या वेळी काहीच उलगडा झाला नाही. तो होण्यासाठी आणखी काही काळ जावा लागला....!

सन १९७३च्या अखेरीला अमिताभ यांचे बंधू अजिताभ यांच्या लग्नाचा स्वागत-समारंभ होता. तिथे राजकुमार बडजात्या यांच्याशी भेट झाली. राजबाबू माझ्याकडे येऊन म्हणाले, ‘‘तुमचा ‘अजब तुझे सरकार’ हा चित्रपट मी पाहिला. तुमच्यासोबत आम्हाला एक चित्रपट करायचा आहे.’’ ‘अजब तुझे सरकार’च्या वितरणाचे हक्क ‘राजश्री’नं घेतले होते. त्यामुळे त्यांना माझा चेहरा ओळखीचा होता. ‘दोस्ती’स्टाइलचा एखादा चित्रपट त्यांना माझ्याबरोबर करायचा होता. ताराचंदजींच्या ‘शोले’च्या सेटवरच्या त्या फोटोसेशनचं रहस्य मला या पार्टीत उलगडलं!

‘राजश्री’नं मला करारबद्ध केलं आणि ‘शोले’ बनत असतानाच मला ‘हिरो’ म्हणून ब्रेक मिळाला. ‘गीत गाता चल’ असं चित्रपटाचं नाव ठरलं. पप्पा आणि मधुसूदन कालेलकर हे एकत्र पटकथालेखन करतात, हेसुद्धा राजबाबूंनी ऐकलं होतं. त्यामुळे राजबाबूंनी त्या दोघांना मला डोळ्यासमोर ठेऊन चित्रपटाचं स्क्रिप लिहिण्यासाठी करारबद्ध केलं. चित्रपटाचं शीर्षक ठरलं ‘गीत गाता चल’.

माझ्याबरोबर काम करण्यासाठी दोन हिरॉइन्स हव्या होत्या, त्यासाठी ऑडिशन्स सुरू होत्या. बेबी सारिका नावाची एक बालकलाकार आता मोठ्या भूमिका करण्याच्या वयाची झाली असेल, असं काहींच्या बोलण्यातून येत होतं.

चित्रपट ‘सिनेमास्कोप’ होता, त्यामुळे त्यात शूिंटग झालेला काही भाग पडद्यावर कसा दिसतो, हे पाहण्यासाठी आम्ही ‘अंबर ऑस्कर’या थिएटरमध्ये गेलो होतो. त्या वेळी सारिका तिच्या आईबरोबर तिथे आली होती. तिला पाहताक्षणी तीच या भूमिकेसाठी योग्य आहे, असं मला वाटलं. श्रीमंत ठावूâरच्या मुलीची व्यक्तिरेखा होती. तिच्या चेहNयावर ती श्रीमंती दिसत होती. दिसायला सुंदर आणि उंच होती. (ती उंच असल्यानं आमची जोडी कितपत शोभेल, अशी मला शंका होती. परंतु शूिंटगदरम्यान ती काळजी घेण्यात आली.) अंतिमत: तिची निवड झाली आणि चित्रपट सुरू झाला.

रामजनक िंसह हे उत्तर प्रदेशातील गृहस्थ ‘गीत गाता चल’चे निर्मिती व्यवस्थापक होते. त्यांची भाषा थोडी कडक होती. ते मनाने चांगले होते; पण जिभेला तिखट होते. काहीतरी कारणावरून मी थोडा नाराज होतो, म्हणून मी त्यांच्याकडे तक्रार केली, तर ते माझ्यावर ओरडले. मला तो माझा अपमान वाटला आणि मी त्यांना म्हणालो, ‘‘तुमच्याशी मी यापुढे बोलणार नाही.’’

मी तेव्हा फक्त १७ वर्षांचा होतो. राजबाबूंच्या कानावर ही गोष्ट गेली. ते त्याच दिवशी संध्याकाळी सेटवर आले. माझ्यापाशी येऊन म्हणाले, ‘‘सचिनजी, चूक कुणाचीही असो. ते तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत, तुम्ही त्यांना फक्त एकदा ‘सॉरी’ म्हणा, ते आयुष्यभर तुमचा मान राखतील.’’

त्या वयात राग, अहंकार असणं स्वाभाविक असतं. राजबाबूंना वाटलं की, मी कदाचित नकार देईन. पण मी त्यांचा सल्ला लगेच स्वीकारला. मी रामजनक िंसह यांच्याकडे जाऊन म्हणालो, ‘‘सॉरी! मी तुमच्याशी अशा भाषेत बोलायला नको होतं; माझं चुकलं.’’ ते त्यांच्या जागेवरून उठले आणि मला मिठीच मारली! तेव्हापासून त्यांनी अक्षरश: धाकट्या भावासारखी माझी काळजी घेतली. मला काय हवं-नको याची ते तत्परतेनं काळजी घ्यायचे. ‘राजश्री’च्या ज्या चित्रपटांत मी काम करत असेन, त्याचं निर्मिती व्यवस्थापन आपणच बघणार, असं ते जाहीर करून टाकत. ‘नदिया के पार’पर्यंतच्या चारही चित्रपटांसाठी आम्ही एकत्र होतो. कधी-कधी शूिंटगच्या तारखांवरून माझे आणि राजबाबूंचे काही मतभेद झाले, तर रामजनक िंसह माझी बाजू घेऊन राजबाबूंशी भांडायचे. राजबाबू म्हणायचे, ‘‘बघा सचिनजी, तुमच्या एका ‘सॉरी’नं किती जादू केलीय ती!’’

मी त्यांना म्हणायचो, ‘‘तुम्ही त्या वेळी मला वडीलकीचा सल्ला दिलात, तो जास्त महत्त्वाचा होता.’’

‘‘मी ढीग सल्ला देईन हो, पण तुम्ही त्या वयात तो मानलात, हे महत्त्वाचं नाही का?’’ असा त्यांचा प्रतिप्रश्न असायचा.

हा एक अनुभवसुद्धा मला आयुष्यात खूप अमूल्य शिकवण देऊन गेला.

‘गीत गाता चल’ या चित्रपटाची गाणी खूप छान होती. रवींद्र जैन यांनी अतिशय सुंदर गाणी केली होती. स्वत: गीतकार आणि संगीतकारही तेच. आधीची दोन गाणी त्यांनी तयार केली होती. शीर्षक गीत तयार करताना मी रवींद्र जैन यांच्या सांताक्रूझच्या फ्लॅटमध्ये बसलो होतो. ‘‘दादा, निसर्गावरचं एखादं गाणं करा. चित्रपटाचा ‘हिरो’ हा एक भटकणारा स्वच्छंदी मुलगा आहे.’’ मी सांगितलं. 

2 comments:

  1. टीव्हीवर गीत गाता चल लागला, त्यातलं श्याम तेरी बन्सी हे गाणं मला अतिशय आवडलं, अजूनही माझ्या मोबाईलवर आहे. चुकुन माकून इरेझ झालं तर मी लगेच ते पुन्हा डाऊनलोड करून घेतो.

    ReplyDelete
  2. "गीत गाता चल " नक्कीच कधीही उत्तम गाणी होती. आमच्या ब्लॉग वाचण्यासाठी वेळ दिल्याबद्दल आणि आपल्या मौल्यवान प्रतिक्रिया धन्यवाद.

    ReplyDelete