Tuesday 24 December 2013

कमोदिनी

वैâसे आऊँ बालमा

रेल्वे स्टेशनच्या फलाटावर गाडी उभी होती. प्रवाशांची, हमालांची वर्दळ वाढली होती. भर उन्हाळ्याचा उकाडा जाणवत होता. माणसांच्या वर्दळीबरोबर घामाचा धुमारा वातावरणात भरला होता. पहिल्या वर्गाच्या डब्यापाशी सूरजित आले.

त्यांनी डब्याच्या गजाला बांधलेले रिझव्र्हेशन कार्ड पाहिले आणि त्यांच्या मागून येणाNया नोकराला ते म्हणाले, ‘रामिंसग, हाच डबा! गर्दी दिसत नाही. आणखी एकच पॅसेंजर आहे. बर्थ खालीच आहे. सामान ठेव.’
‘जी!’ म्हणत म्हातारा रामिंसग आत शिरला. पाठोपाठ हमालाने सामानासह डब्यात प्रवेश केला. रामिंसग हमालाकडून सामान लावून घेत होता. बर्थवर अंथरूण पसरून होताच रामिंसग खाली उतरला. त्याने हमालाला पैसे दिले. हमाल जाताच सूरजितांनी विचारलं,

‘रामिंसग.’

‘जी.’

‘बिछायत केली?’

‘जी!’

‘तू तुझी जागा बघ. मुंबईला जाईपर्यंत मला काही लागणार नाही.’

मान तुकवून रामिंसग निघून गेला. फलाटावरून फिरणाNया हातगाड्या ते पाहत होते. पुस्तके, फळे, खाद्यपदार्थ, खेळणी यांच्या गाड्यांना चुकवीत, डबे शोधत जाणारी वर्दळ ते निरखीत होते. सूरजितांचं वय साठी ओलांडून गेलं होतं. 

मस्तकी केसाळ पांढरी शुभ्र टोपी, अंगात जाकीट, लखनवी झब्बा, पायांत विजार आणि मोजडी हा त्यांचा वेश होता. गालावरच्या कल्ल्यांवरून हात फिरवीत असता बोटातली टपोNया माणकाची अंगठी लक्ष वेधून घेत होती. एके काळच्या गौरवर्णावर पांढरी छटा उमटली होती. पाणीदार डोळ्यांभोवती काळी वर्तुळे पसरली होती,
गळ्याजवळ सुरकुत्यांचं जाळं विणलं गेलं होतं. उभारल्या जागी सूरजितांनी आपल्या जाकिटाच्या खिशातून रुमाल काढला. त्या रुमालाची घडी उलगडताच उठलेल्या मंद सुवासाने त्यांना बरं वाटलं. त्या रुमालानं घाम टिपून सूरजितांनी डोळ्यांजवळ मनगट नेऊन आपलं घड्याळ पाहिलं. गाडी सुटायला दहा मिनिटं उरली होती. त्यांच्या डब्यातला सहप्रवासी अद्याप आला नव्हता. कुतूहलाने त्यांनी परत आरक्षण-पत्रिका पाहिली. 

चंदाबाई सावनीवाले हे त्या सहप्रवाशाचं नाव होतं. सूरजितांच्या चेहNयावरचं आश्चर्य लपलं नाही. त्यांनी परत ते नाव वाचलं. त्यांच्या चेहNयावर समाधान पसरलं. त्या समाधानात सूरजित डब्यात चढले. डब्यातले सारे पंखे रामिंसगने सुरू केले होते. उष्मा कमी होण्याऐवजी उष्ण हवेचे वाफारे अंगावर येत होते. सूरजितांनी आपलं जाकीट काढलं. डब्यातल्या आरशावरच्या खुंटाळ्याला जाकीट, टोपी अडकवली. बर्थवर पसरलेल्या अंथरुणावर उशाशेजारी गुलाबी नॅपकीन होता, तो हाती घेऊन ते अंथरुणावर बसले. उशीचा आधार पाठीशी घेऊन पायांतली मोजडी काढून मांडी घालत असता कडक इस्त्री केलेला पांढरा शुभ्र पायजमा कुरकुरला. गाडी सुटायला अवघी पाच मिनिटं उरली असता डब्याच्या रोखाने येणाNया माणसांच्या मेळाव्याने सूरजितांचं लक्ष वेधून घेतलं. त्या गर्दीपुढे दोघे-चौघे गृहस्थ वाट मोकळी करीत होते. त्या गर्दीच्या मध्यभागी प्रयत्नाने राखलेल्या मोकळ्या जागेतून एक वयस्क स्त्री चालत येत होती. डब्यापाशी येताच ती गर्दी डब्याच्या दाराशी पांगली. बसल्या जागेवरून सूरजित ते पाहत होते. ती वयस्क स्त्री दुसरी कोणी नसून भारताची सर्वश्रेष्ठ गायिका चंदाबाई सावनीवाले आहे, हे त्यांनी ओळखलं होतं. डब्यात दुसNया बर्थखाली सामान लावलं जात होतं. चंदाबाईच्या गळ्यात हार घालून पदस्पर्श करणारी माणसं सूरजित पाहत होते. पायाशी वाकलेल्या चाहत्यांच्या पाठीवरून प्रेमभराने चंदाबाईचे हात फिरत होते. कुणीतरी म्हणालं, 

‘माई, गाडीत बसा. वेळ झाली.’

‘होय रे! नारायणा, तू तुझी जागा पकड बाबा.’

‘माई, मी नंतर भेटेन.’

‘नको रे! आज उपवास आहे. मला काही लागायचं नाही.’

नारायण गर्दीतून निघून गेला. चंदाबाई डब्यात चढल्या. दाराशी उभे राहून त्या निरोप घेत होत्या. निरोप देणाNया गर्दीच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते. गाडीची शिटी झाली आणि काही क्षणांत गाडी धक्के देत सरवूâ लागली. फलाट मागे पडेपर्यंत दाराशी हात हलवीत चंदाबाई उभ्या होत्या. नंतर चंदाबार्इंनी दरवाजा लावला. एकदा सूरजितांकडे पाहून त्या आपल्या बर्थवर पसरलेल्या अंथरुणावर बसल्या. बिछान्यावर पानाचा चांदीचा डबा उघडत चंदाबाई म्हणाल्या, ‘भारीच उकाडा, नाही?’

No comments:

Post a Comment