Tuesday, 10 December 2013

बेंडबाजा

जाऊ मी सिनेमात?

शाळकरी वयात सिनेमाचे आकर्षण फार मोठे होते. त्या काळात करमणुकीची इतर साधनेही फारशी नव्हतीच म्हणा. आमच्या पंढरपूरसारख्या तालुक्याच्या लहान गावी तर त्या दृष्टीने खडखडाटच. म्हणून सिनेमाचे माहात्म्य फार! कुठलाही सिनेमा हा निदान एकदा तरी पाहण्यासारखा असतोच असे माझे नम्र मत होते. म्हणून कधी सनदशीर मार्गाने वडिलांकडून पैसे घेऊन मी सिनेमा पाहत असे, तर कधी क्रांतिकारकाच्या वाटेने जाऊन गुपचूप आपले ईाqप्सत साध्य करून घेत असे. घरातली रद्दी परस्पर विवूâन त्यातून एखादा सिनेमा बाहेर काढायचा, हा त्यातलाच एक धाडसी मार्ग. डोअरकीपरची ओळख वाढवून त्याच्या वशिल्याने आत घुसणे हा दुसरा मार्ग; मात्र तो फारसा यशस्वी होत नसे. 

मध्यांतरानंतर पुष्कळदा डोअरकीपर हा प्राणी पास न बघता सर्वांना आत सोडी. त्याचा उपयोग करून हातात पांढरा कपटा ठेवून संभावितपणे आत शिरणे ही आणखी एक चोरवाट. अशा वेळी निम्माच सिनेमा पदरात
पडे. निम्मा तर निम्मा! सर्वनाशाची वेळ आली असता शहाणी माणसे अध्र्यावरच समाधान मानतात आणि अर्धा वाटा सोडून देतात, हे संस्कृत वचन मी पुढे शिकलो, पण तो धडा प्रत्यक्षात मात्र मी पूर्वीच गिरवला होता. सिनेमा पाहण्याच्या या वेडामुळे आपण पुढे सिनेमात जावे, ही महत्त्वाकांक्षा मनात निर्माण होणे हे अगदी
अपरिहार्य होते. सिनेमात काम करणारी माणसे प्रत्यक्ष पाहायला मिळत नसत, त्यामुळे त्यांच्याबद्दलचे कुतूहल फारच मोठे होते. माझ्या लहानपणी आमच्या घराच्या शेजारच्या माडीवरच सुप्रसिद्ध अभिनेत्री शांता आपटे राहत असत. त्या तेव्हा फार सुप्रसिद्ध नव्हत्या, पण तरी त्यांचे नाव लोकांना ठाऊक झाले होते. मला
वाटते भालजी पेंढारकरांच्याच `श्यामसुंदर' या चित्रपटात त्यांनी राधेचे काम केले होते. त्यावेळी त्या गाणे शिकण्यासाठी पंढरपूरला राहिल्या होत्या. कधीतरी त्या रस्त्याकडेच्या सज्जात उभ्या राहिलेल्या दिसत. मी अशा वेळी तोंडाचा `आ' करून अत्यंत आश्चर्यचकित मुद्रेने त्यांच्याकडे पाहत राही. सिनेमात काम करणारी माणसे प्रत्यक्ष पाहिली याचा आनंद काही वेगळाच होता. अशा वेळी आपणही सिनेमात जाऊन काम करावे ही आकांक्षा पुन्हा उफाळून वर येई. चित्रपटात काम करण्यासाठी काही पात्रता लागते, ती आपल्याजवळ आहे की नाही असला फालतू विचार तेव्हा कधी डोक्यात आलाच नाही. त्या लोकांना योगायोगाने चान्स मिळाला. आपल्यालाही तसाच कधीतरी `चान्स' मिळाला पाहिजे, एवढेच पक्केपणाने वाटायचे.

आपल्याकडे फार मजा आहे. कुठल्याही व्यवसायात शिरण्यासाठी काही पात्रता असावी लागते असल्या शंका-कुशंका कधी कुणाला येतच नाहीत. ``चान्स मिळाला पाहिजे, बस्स.'' एखादे चिरंजीव उनाड निघाले की, त्याचे तीर्थरूप काळजीत पडतात. या पोराचे पुढे होणार तरी कसे? मग कधीतरी हा बाप आपल्या मित्राला ही व्यथा सांगतो. ``बाबुराव, आता तुम्हीच सांगा. हा आमचा बंडू अगदीच वाया गेलाय! दोन वेळा जेवायला फक्त घरी येतो बघा. एरवी दिवसभर उनाडक्या करीतिं हडतो. अभ्यास नाही, शाळा नाही. काही नाही. 

कार्टं अगदी वाया गेलंय. काय करावं तुम्हीच सांगा मला–'' हे बाबुराव गंभीर चेहरा करून सांगतात, ``असं म्हणता गणपतराव? बंड्या अगदी वाया गेलाय?'' ``अगदी नालायक कार्टं आहे हो! सांगतोय काय मग!'' ``मग असं करा!''

``काय करू?''

``तुम्ही त्याला पोलिसात घाला. नाहीतर जाऊ द्या एकदम मिलिट्रीत– हाण

तिच्या मारी–''

म्हणजे पोलीस खात्यात िंकवा मिलिटरीत जाण्याची पात्रता आमच्या दृष्टीने ही आहे. उमेदवार गडी शक्यतो उनाड, नालायक असला पाहिजे. सिनेमात जाण्यासंबंधीही आमच्या कल्पना अशाच विलक्षण आहेत. आमच्या एका दिग्दर्शक मित्रानेच सांगितलेला अनुभव या दृष्टीने रोमहर्षक आहे. तो म्हणाला, ``अरे, आमचं
एका स्टुडिओत चित्रीकरण चाललं होतं. मधल्या जेवणाची वेळ. ऑफिसच्या आतल्या खोलीत आम्ही एक-दोघे डबे उघडून जेवायला बसलो होतो. चार घास खाल्ले असतील नसतील, तेवढ्यात एक म्हातारबुवा आपल्या चिरंजीवांना घेऊन सरळ आत घुसले. `आत येऊ का?'– वगैरे परवानगी मागण्याची भानगड नाही. 

आले ते आले आणि जोरात म्हणाले, `का हो, तुम्हीच का या सिनेमाचे डायेक्टर?'

मी म्हणालो, `हो, मीच. काय काम आहे?'

आपल्या सतरा-अठरा वर्षांच्या पोराला त्यांनी एकदम पुढे ढकलले. मग आज्ञार्थी सूर काढून पुन्हा जोरात म्हणाले, `या आमच्या मुलाला तुमच्या सिनेमात घ्या.'

मी त्या मुलाकडे निरखून पाहिले. काटकुळा, उंच पोरगा, करकोच्यासारखी मान वर आलेली, डोळ्यांना चष्मा, गालफडं वर आलेली. एवूâण आनंदच होता, पण शक्य तेवढी शांत मुद्रा ठेवून मी विचारलं, `काय शिकलाय हा?' 

`काही शिकलेला नाही. दरवर्षी नापास. नववीतच शाळा सोडलीय काट्र्यानं.' म्हातारबुवा बोलले.

`ते असू द्या, पण याचा आवाज वगैरे चांगला आहे? गाणं?–'

`कसला आवाज?' म्हातारबुवा उसळलेच. `अहो मुसळ घशात कोंबावं तसला आवाज आहे. कुठलं गाणं अन् काय?–'

`मग अभिनय वगैरे? शाळेतल्या नाटकात काम वगैरे?–'

`छट्! अभिनय कसला आलाय बोडक्याचा!'

`मग याला येतं तरी काय?'

`काहीही येत नाही–' म्हातारा गरजलाच. `अगदी नालायक आहे कार्टं. वाया गेलंय म्हणा ना! म्हणून तर म्हणतो तुमच्या सिनेमात घ्या.' ''

दिग्दर्शक मित्राने सांगितलेली ही सत्यकथा ऐवूâन माझी दातखीळच बसली. सिनेमात जाण्याची आमच्याकडं एवूâण ही लायकी! 

सिनेमात गेलं की दाबून पैसा मिळतो, सगळीकडे आपला बोलबाला होतो, कीर्ती वगैरे म्हणतात ती मिळते, एवढीच आमची सिनेमासंबंधी कल्पना. त्यातून सुंदर नटीबरोबर गुलुगुलु गोष्टी करायला मिळतात, तिचा हात हातात घ्यायला मिळतो आणि जमलेच तर एखाद्या दृश्यात अंग भरून मिठीही मारता येते. मग आणखी काय पाहिजे? `काम का काम और इनाम!' चित्रपटसृष्टीत शिरणाNयालाही खूप कष्ट करावे लागतात. दिवस-रात्र राबावे लागते. प्रखर प्रकाशात काम करून करून आरोग्याची हानी होते. अवजड आणि चित्रविचित्र पोशाख, दागदागिने घालून दिवसभर दाढीमिशा िंडकाने चिकटवून, रंगरंगोटी करून बसावे लागते याची काहीच
कल्पना `जाऊ मी सिनेमात?' म्हणणाNयांना नसते. पुढे लेखक म्हणून चित्रपटाशी संबंध आल्यावर मलाही पुष्कळ गोष्टी नव्याने कळल्या. योगायोगाने एक-दोन चित्रपटांत काम करण्याचाही `चान्स' मिळाला. एका चित्रपटात मंगल कार्यालयात परगावहून आल्यामुळे हातात एक ट्रंक घेऊन, जिना चढून मी बायकोबरोबर माडीवर जातो हा सीन होता. ट्रंकेत सामान आहे हे दाखवण्यासाठी ट्रंकेत मोठे चार-दोन दगड भरलेले, त्यामुळे ट्रंक भलतीच जड. ती उचलून जिना चढताना काही संवाद. 

यातले काहीतरी चुकायचे आणि पुन्हा तालीम व्हायची. पुन्हा `रीटेक' व्हायचा. असा प्रकार चार-दोन वेळा झाल्यावर माझी दमछाक झाली. कुठून आपण या पंâदात पडलो असे मला होऊन गेले. दुसNया एका दृश्यात कार्यालयात सगळे पाहुणे पांघरूण घेऊन झोपलेले आहेत याचे चित्रीकरण. तेही नीट झाले नाही. माझे काम
फक्त झोपण्याचे, पण ते करून करून– म्हणजे झोपून झोपून– वैताग आला, पण त्याचे चित्रीकरण नीट होईपर्यंत सक्तीने झोपावेच लागले. अहो, या तर अगदी किरकोळ गोष्टी. काहींच्या वाट्याला मोठे अपघात येतात. जन्माचे पंगुत्व येते, पण आम्हाला त्याची दादही नसते. पडद्यावरच्या मादक, सुंदर दृश्यांना आपण भुलत असतो.

No comments:

Post a Comment