Friday, 6 December 2013

पुण्यभूमी भारत

२३
न्याय-अन्याय

आपल्या येथील सरकारी रुग्णालयात तसेच इतर काही धर्मादाय इाqस्पतळांत गोरगरिबांवर मोफत विंâवा अगदी अल्प दरात उपचार करण्यात येतात. पण तसे ते जर करण्यात येत नसते, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांचे जे काही हाल झाले असते, त्याची कल्पनाही करणं शक्य नाही.

या अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील लोकांच्या मदतीसाठीच आम्ही एक हॉाqस्पटल बांधलं होतं. तेथे गरीब रुग्णांवर मोफत शध्Eाक्रिया केल्या जात, तसंच त्यांना औषधंही पुरवली जात. आमच्या मदतीला समाजसेवेचं व्रत घेतलेले काही निष्णात डॉक्टरही होते. त्यामुळे आमचं हे हॉस्पिटल यशस्वीरीत्या चालत होतं. फक्त कोणत्याही रुग्णाला मोफत उपचार मिळण्यासाठी एकच अट होती. त्याच्यापाशी स्वत:ची ओळख पटवण्यासाठी कोणतेतरी ओळखपत्र हवे आणि तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील असला पाहिजे.

 सर्वच रुग्णांना रांगेत उभं राहावं लागे आणि प्रत्येकाला सारखंच महत्त्व मिळे. कोणत्याही परिाqस्थतीत दोन व्यक्तींमध्ये भेदभाव केला जात नसे. क्वचित कधीतरी आमच्यापैकी कोणीतरी अचानक न कळवता त्या हॉस्पिटलला भेट देत असे. तेथे सर्व कारभार नियमानुसार सुरळीत चालला आहे की नाही हे पाहणं, हा त्यामागचा उद्देश असे. अशीच एक दिवस मी तिथे गेले. मी जाताना बरोबर माझ्या सेव्रेâटरीला घेऊन गेले होते. आमच्याकडे सेव्रेâटरींनासुद्धा प्रोजेक्ट सव्र्हे कसा करावा, याचं पद्धतशीर प्रशिक्षण दिलेलं असतं, त्यामुळे मी तिला बरोबर नेलं होतं. आम्ही हॉस्पिटलची लॅबोरेटरी, मुदपाकखाना, स्वच्छतागृहे, वॉर्ड्स अशा सर्व ठिकाणांना भेटी दिल्या. त्यानंतर आम्ही कॉरिडॉरमधून चाललो असता माझं लक्ष एका ध्Eाीकडे गेलं. ती रांगेत उभी होती, पण आम्हाला तिकडे चालत येताना पाहून ती अचानक अदृश्य झाली. ही गोष्ट केवळ माझ्याच नव्हे, तर माझ्या सेव्रेâटरीच्यासुद्धा लक्षात आली. ‘ही बाई आपल्याला पाहून अशी पळून का बरं गेली असावी’, असा मी मनात विचार करत होते, तेवढ्यात माझी सेव्रेâटरी म्हणाली, ‘‘मॅडम, मी तिला ओळखते. काही महिन्यांपूर्वी आम्ही ज्या घरात भाड्यानं राहत होतो ना, त्या घराची ती मालकीण आहे. तिची आणखी काही घरं आहेत. ती तिनं भाड्यानं दिली आहेत. तिच्या मालकीच्या दोन गाड्यासुद्धा आहेत. त्यांची आर्थिक परिाqस्थती उत्तम आहे.’’

‘‘पण तसं जर असेल, तर मग ती त्या मोफत औषधोपचारांच्या रांगेत कशी काय उभी होती?’’ ‘‘मॅडम, तुम्हाला मी एकदा तिच्याविषयी सांगितलं होतं, आठवतं? आम्ही त्यांचं घर मुदतीच्या करारानं भाड्यानं घेतलं होतं. पण तिला आमच्याहून जास्त भाडं देणारं कोणीतरी गिNहाईक भेटलं. त्यामुळे आम्ही मुदत भरण्याआधीच घर सोडून जावं, असा तिनं तगादा सुरू केला. तिनं आमचा त्यासाठी प्रचंड मानसिक छळ केला. तीच ही बाई.’’ 

त्या दिवसांमध्ये माझ्या सेव्रेâटरीला जो काही त्रास सहन करावा लागला होता, त्या आठवणीनं ती आत्तासुद्धा अस्वस्थ झाली होती. ‘‘मॅडम, या हॉस्पिटलमध्ये उपचार आणि औषधपाणी, दोन्ही पुâकट मिळतं याची तिला कल्पना असल्यामुळे ती मुद्दामच फाटके कपडे घालून आली आहे. तिनं रोजचे दागिनेही उतरवून ठेवले आहेत. मॅडम इथे गोरगरिबांना पुâकट औषधोपचार मिळावे म्हणून पैसा उभा करणं तुम्हाला किती कठीण जातं, हे मला माहीत आहे. जेव्हा अशी श्रीमंत माणसं रांगेत येऊन उभी राहतात, तेव्हा गरिबांनी कुठे जायचं? तुम्ही या बाबतीत न्याय केला पाहिजे. मॅडम, मी जाऊन तिला धरून आणू का?’’

मी तिला थांबवलं. ‘‘हे बघ, असलं काही करू नको. आज तू तिला ओळखतेस आणि इथे तिला स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलंस, म्हणून तू एवढी अस्वस्थ झालीस. पण त्या रांगेत अशी मोफत औषधोपचाराच्या व्यवस्थेचा गैरफायदा घेणारी आणखी काही माणसं सुद्धा असू शकतील. त्यांना तू पकडू शकणार आहेस का? न्याय कुठेच नसतो. जर श्रीमंत लोक फाटके कपडे घालून गरीब असल्याचा बहाणा करून आली, तर त्यांना थांबवण्याचा काहीही मार्ग आपल्याकडे नाही. मला तर अशा लोकांची कीव येते. खरं तर ही गोष्ट त्यांना
स्वत:लाच समजली पाहिजे. त्यांना स्वत:ला दानधर्म करायचा नसेल, तर तो त्यांनी करू नये. पण जर दुसरा कोणी दानधर्म करत असेल तर त्याचा गैरफायदा तरी घेऊ नये.’’

त्यानंतर मी डॉक्टरांना भेटले तेव्हा ही गोष्ट त्यांच्या कानावर घातली. ते म्हणाले, ‘‘मॅडम, स्वत: गरीब आहोत असा बहाणा करून इथे उपचारासाठी येणारी अशी बरीच श्रीमंत माणसं आहेत. त्यांना कसं आवरायचं? हीच तर मोठी अडचण आहे. आजकाल डॉक्टरांची कन्सल्टेशन फी एवढी भरमसाठ असते म्हणून या श्रीमंतांना ती वाचवायची असते.’’ 

सर्वसाधारपणे आम्ही हिवाळ्यात झोपडपट्टीत राहणाNया लोकांना गरम रग्ज वाटतो. ते वाटताना आम्ही अशी खबरदारी घेतो, की एकाच व्यक्तीला दोन वेळा रग मिळणार नाही. आम्ही आधी त्यांना वूâपन्स देतो आणि प्रत्यक्ष वाटपाच्या वेळी ती वूâपन्स गोळा करतो. एकदा हिवाळ्यात आम्ही रग्जचं वाटप करत असताना माझं एका वृद्ध ध्Eाीकडे लक्ष गेलं. तिच्या अंगावर लाल साडी होती. तिनं आपल्या उजव्या हातावर स्वत:चं नाव गोंदवून घेतलं होते. ही गोष्टही माझ्या लक्षात राहिली. 

रग्जचं वाटप चालू असतानाच आमच्या ध्यानात आलं, की आमच्याकडे जास्तीचे दहा रग्ज उरले होते. माझ्या सेव्रेâटरीने ते ऑफिसात परत नेण्यासाठी बांधले, तेवढ्यात पांढरी साडी नेसलेली एक ध्Eाी हातात वूâपन घेऊन रग नेण्यासाठी आली. मला खात्री होती– हीच ध्Eाी अध्र्या तासापूर्वी लाल साडी नेसून आली होती व
तेव्हाही तिनं एक रग नेला होता. आत्ता तीच परत आली होती; पण तिच्यापाशी आत्ताही वूâपन होतं. माझ्या सेव्रेâटरीच्या लक्षात असंही आलं होतं, की आमच्या हिशेबात एक वूâपन कमी भरत होतं. हा गोंधळ मगाशी लोकांकडून वूâपन्स गोळा करत असताना आमच्या हातून झाला असावा. त्यामुळेच आता ही ध्Eाी परत एकदा साडी बदलून वूâपन घेऊन रग नेण्यासाठी आली होती.

‘‘हे पाहा, तुम्हाला परत रग मिळणार नाही. तुम्ही अगोदर एक रग घेऊन गेला आहात,’’ माझी सेव्रेâटरी तिच्याशी वाद घालू लागली. मी तिला म्हटलं, ‘‘असू दे. दे त्यांना एक रग.’’ त्या ध्Eाीनं रग घेतला; पण तिच्या चेहNयावर वरमल्याचे भाव होते. ती निघून गेली.

माझी सेव्रेâटरी म्हणाली, ‘‘मॅडम, हा अन्याय आहे. तुम्ही असं कसं केलंत?’’ मी तिला म्हणाले, ‘‘अगं, नाहीतरी या जगात न्याय कुठे आहे? कितीतरी श्रीमंत लोकांची प्रामाणिकपणानं जगण्याची ऐपत असताना, ते खोटेपणा करतात. 

त्यांना आपण थांबवू शकतो का? त्यांच्या बाबतीत आपण असमर्थ असतो. मग त्यावेळी आपण नुसतं म्हणतो, ‘जग हे असंच असतं, जीवन हे असंच असतं.’ आणि गप्प बसतो. पण जी माणसं आपल्यापेक्षा गरीब असतात, आपण जे काही बोलू ते खालच्या मानेनं ऐवूâन घेतात, त्यांना आपण त्यांच्या हातून घडलेल्या
चुकीबद्दल नेहमी चार शब्द सुनावतो. त्यावेळी आपण न्याय-अन्यायाचा विचार करतो. मगाचची ती म्हातारी बाई दुसNयांदा रग नेण्यासाठी का आली? त्याचं कारण तिची गरिबी. पण मागे त्या हॉस्पिटलमध्ये ती श्रीमंत बाई मोफत औषधोपचार मिळवण्यासाठी रांगेत उभी राहिली होती, ते आठवतं ना? ती का आली होती?
त्याला कारण तिच्या मनातील लोभ! आपण गरिबी हटवू शकतो, पण माणसाची वृत्तीच जर लोभी असेल, तर ती कशी काय घालवणार आपण?’’ 

No comments:

Post a Comment