Friday, 27 December 2013

द दा विंची कोड

हीरोस गॅमोसचा अनुभव प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगताना सोफी अजूनही हादरलेली दिसत होती हे लँग्डनला समजत होते. लँग्डन स्वत:ही ही गोष्ट ऐवूâन चकित झाला होता. सोफीने तो सर्व सोपस्कार अगदी पूर्णपणे पाहिला होता. पण तिचे आजोबाच खुद्द त्यात सहभागी होते. प्रायरी ऑफ सायनचे ग्रँडमास्टर! या यादीत फार मोठी नावे होती. दा विंची, बोटीसेली, आयझॅक न्यूटन, ाqव्हक्टर ह्यूगो, जॉ कॉक्टो... जाक सॉनिए.

लँग्डन हळू आवाजात म्हणाला, ``मी आणखी तुला काय सांगू मला कळत नाहा.r ''

सोफीच्या हिरव्या डोळ्यात अश्रू आले, ``त्यांनी मला स्वत:च्या मुलीसारखं वाढवलं होतं.''

ते बोलत असताना तिच्या डोळ्यात जमा होणारे भाव आता लँग्डनच्या लक्षात आले. त्यात पश्चाताप होता, अगदी खोल आणि दूरवर गेलेला. सोफीने तिच्या आजोबांवर बहिष्कार टाकला होता आणि आता तिला ते वेगळ्या स्वरुपात दिसले होते.

बाहेर पाहिले तर पहाट जवळ येत चालली होती. दूर क्षितिजावर रंग दिसू लागले होते पण खालच्या बाजूला पृथ्वीवर अजून अंधार होता. 

बरेच कोकाकोलाचे डबे आणि बिाqस्कटे घेऊन टीबिंग त्यांच्याजवळ उत्साहाने परत आले. ``मित्रांनो, खायला प्यायला काही हवं आहे का?'' त्यांनी जवळच्या वस्तू देत खाण्यापिण्याच्या वस्तू विमानात कमी असल्याबद्दल क्षमा मागितली. ते म्हणाले, ``आपला भिक्षू मित्र अजून उठलेला नाही. त्याला थोडा वेळ देऊया.'' एक बिाqस्कट खात, त्यांनी परत त्या कवितेकडे पाहिले, ``मग, माझ्या सुंदर मुली, काही प्रगती
झाली का?'' सोफीकडे पाहत ते म्हणाले, ``तुझ्या आजोबांना नेमवंâ काय सांगायचं आहे? पण हा त्यात म्हटलेला हेडस्टोन नक्की आहे कुठे? टेम्पलर सरदारांनी स्तवन केलेला हेडस्टोन?''

सोफीने मान हलवली आणि ती गप्प बसली. 

टीबिंग पुन्हा त्या कवितेत मग्न झाले. लँग्डनने एक कोकाकोलाचा डबा उघडला आणि खिडकीबाहेर पाहत तो अनेक गुप्त परंपरा आणि न सुटलेल्या कोड्यांचा विचारकरू लागला. टेम्पलर सरदारांनी स्तवन केलेला हेडस्टोन हे मुख्य वाक्य आहे. त्यानेडब्यातून कोकाकोलाचा मोठा घोट घेतला; टेम्पलर सरदारांनी स्तवन केलेलाहेडस्टोन. कोक जरा गरमच होता.रात्रीच्या अंधाराचे पांघरुण पटकन बाजूला झाले. लँग्डन रात्रीचे दिवसात रुपांतरहोत असताना पाहत होता. खाली मोठा महासागर पसरलेला दिसत होता. ती इांqग्लशखाडी होती. आता फार वेळ लागणार नव्हता.लँग्डनला वाटले होते की दिवस उजाडल्यावर त्यांच्या कोड्यावरही प्रकाश पडेलपण जसजसा दिवस उगवला तसतसे त्याला सत्यापासून दूर गेल्यासारखे वाटतहोते. इयााqम्बक वृत्त आणि त्यात गायले गेलेले भजन हेच त्याच्या कानात घुमत होते.जेट विमानांच्या आवाजात हीरोस गॅमोस आणि त्या पवित्र सोपस्कारांचा आवाज एकत्रहोत आहे असे वाटत होते.टेम्पलर सरदारांनी स्तवन केलेला हेडस्टोन.विमान आता पुन्हा जमिनीवरून उडू लागले आणि त्याला एकदम अचानककाहीतरी साक्षात्कार झाला. लँग्डनने कोकाकोलाचा रिकामा डबा जरा जोरातच खालीठेवला. इतरांकडे वळून तो म्हणाला, ``तुमचा विश्वास बसणार नाही पण टेम्पलरलोकांचा हेडस्टोन म्हणजे काय हे मला समजलं आहे!'' टीबिंगचे डोळे बशीकडेवळले, ``हेडस्टोन कुठे आहे, तुला कळलं आहे?'' लँग्डन हसत म्हणाला, ``कुठेआहे नाही पण तो हेडस्टोन म्हणजे नक्की काय कळलं आहे.''सोफी वावूâन ऐवूâ लागली.लँग्डन म्हणाला, ``मला वाटतं की हेडस्टोनचा संदर्भ शब्दश: एका दगडीचेहNयाशी आहे.'' कुठलेतरी अगम्य कोडे सुटल्याचा आनंद चेहNयावर दिसत होता,``अगदी काही कठीण कोडं नव्हतं!''टीबिंग म्हणाले, ``दगडी चेहरा?''सोफीपण तेवढीच गोंधळली होती.लँग्डन वळून म्हणाला, ``ली, इाqन्क्वझिशनच्या काळात चर्चने टेम्पलर सरदारांवरअनेक प्रकारचे आरोप केले, होय ना?''``बरोबर, त्यांनी अनेक प्रकारचे खोटेनाटे आरोप उठवले. टेम्पलर सरदारअनैर्सिगक शरीरसंबंध ठेवायचे, क्रॉसवर मूत्रविसर्जन करायचे, सैतानाची पूजा करायचे,बरीच मोठी यादी होती.''``आणि त्याच यादीमध्ये खोट्या दैवतांची पूजा हे पण होतं, खरं ना? टेम्पलरसरदार एका गुप्तविधीमध्ये दगडातून कोरलेल्या एका डोक्याची, पॅगन लोकांच्यादेवाच्या डोक्याची पूजा करीत असा चर्चने आरोप केला होता.''

Thursday, 26 December 2013

Never to Return

A good place to start would be with my very first memory and that takes me back to when I was about four years old. It was the scream my seven-year-old sister gave out that was to stick with me all these years. She’d just been whacked full force on her hand with a cane and the man who did it was my foster father. I can’t remember what it was for but I got it first, a couple of wee baby taps that wouldn’t hurt a flea and that’s what put Maggie off her guard as she must have expected the same. By the time she’d finished doing the Highland fling he’d gone from the room.

My foster father was about thirty-five and had a face like a ferret.We’d ended up with a foster family because the Welfare wanted to get us out of the children’s home and placed with a foster family so that we could have as normal an upbringing as possible, but I don’t think they really knew what went on or how hard it could be sometimes for children that were boarded out. As Maggie was finding out. But, for the Welfare, the main thing was making sure that we were away from our parents and away from the tinker’s life which they thought was so bad.

‘Bastard!’ Maggie swore. ‘C’mon, we’ll go outside.’ 

We left the room and made our way quietly along the hall and out the front door where the other bairns were waiting for us. Sheena, Lizzie,Wullie, and Rab were our foster parents’ natural children. The oldest was Wullie at eleven years of age, with Sheena aged ten, Lizzie aged eight and the youngest was Rab at seven years of age. Even for them there was not a lot of love to be had in that cold, drab place.

‘Did you get the cane?’ Rab asked, wiping green snot from his nose with his sleeve. He was the same age as Maggie and had inherited his father’s ferret features.

‘Just one,’ Maggie said, blowing into her hands. 

‘That’s bugger all, I got near a hundred once, no just on my hands but the backs o my legs too.’ 

‘Shut your pus Rab!’ his sister Sheena hissed. She was a sullen girl with unkempt mousy brown hair which her father cut himself. He cut everyone’s hair including his own. Both
my foster parents worked and as well as their own wages they had the money that the Welfare paid them for our keep, but that man would do anything to save a few quid.

We wandered off to the pond but before long, Jim, a tractor man from one of the farms, stopped beside us with a warning. 

‘Don’t be walking out on that ice,’ he shouted. ‘It’ll no take yer weight.’

‘Aye, we’ll bide off it,’ Sheena roared back. He drove off and his collie dog was quick to follow the tractor after a kick in the ribs from Rab.

We all leaned on the wooden fence that surrounded the pond.Wullie pulled a piece and jam from his pocket. 

‘Where did you get that?’ Rab asked. 

‘I sneaked it when they were getting a hiding.’

‘Give us half.’

‘No!’

‘Go on, give us half o’ it,’ Rab pleaded, but was ignored. We were always starving. Every single day we got the same thing to eat – white tripe – and it was horrible stuff. My foster
mother would boil the tripe in a big pot and that was our ever staple diet – boiled white tripe! There was no favouritism for their own children but I really hated having to eat tripe all the time. But it was a clear choice, even at the age of four – you either ate what was in your bowl, no matter how horrible it was, or you went hungry. Sometimes my foster father didn’t care if I ate the stuff or not. Other times, for some inexplicable
reason, he would fly into a rage and force me to eat. His method was to to pinch my nose with two fingers, then hold my head back and literally ram the tripe down my gullet as I
gagged. 

Wednesday, 25 December 2013

चिकन सूप फॉर द सोल

शक्ती प्रेमाची

‘व्यवस्थापनांतली आवश्यक मानसिक कणखरता’ या चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी  मी त्या शहरात पोहोचल्यावर तिथल्या मंडळींनी मला आदल्या दिवशी जेवायला बोलावलं व दुसNया दिवशी ज्या लोकांशी मी बोलणार होते त्यांच्याबद्दल थोडीफार कल्पनाही दिली.

त्या चर्चेतल्या ग्रुपचा मुख्य सभासद (लीडर) त्याच्या नावाप्रमाणेच (बिग एड्) धिप्पाड व जबरदस्त आवाज असलेला होता. तो मला म्हणाला की बघ हं, माझं काम हाताखालच्या लोकांच्या चुका काढून त्यांना कामावरून कमी करणं हेच आहे. तेव्हा ज्यो, (माझं नाव) उद्या सर्व लोक तुझ्यासारख्या कणखर माणसाचं व्याख्यान कसं ऐकतील ह्याची मी वाट बघतोय. पण मला खात्री आहे की शेवटी माझी कामाची पद्धतच त्यांना आवडेल.’’ डोळे मिचकावत तो म्हणाला. मला मनोमन खात्री होती की त्यांच्या अपेक्षेच्या अगदी उलट्या बाजूचंच उद्या घडणार आहे.

दुसNया दिवशी तो चर्चा चालू असताना अगदी शांतपणे बसून होता. चर्चेनंतर मला न भेटताच तो निघूनही गेला.

तीन वर्षांनंतर मी परत त्याच गावी त्याच ग्रुपच्या चर्चासत्रासाठी गेलो तेव्हाही बिग एड् तिथे होताच. तो मला मधेच म्हणाला की, ‘‘ज्यो, मी या लोकांशी जरा मधेच बोलू शकतो का?’’ मी हसून त्याला होकार दिला. ‘‘तुझ्यासारख्या प्रचंड शरीरयष्टीच्या माणसाला मी काय नाही म्हणणार!’’ मी मनातच म्हटलं. 

बिग एड् त्या ग्रुपला उद्देशून म्हणाला, ‘‘मित्रांनो, तुम्ही मला ओळखताच आणि काही जणांना माहितीच आहे की माझ्या आयुष्यात गेल्या तीन वर्षांत काय बदल झालेत परंतु तरी मला ते आता तुम्हा सर्वांना सांगावंसं वाटतंय. ज्यो, तू माझं बोलणं संपल्यावर नक्कीच माझं कौतुक करशील.’’

‘‘मागच्या वेळी जेव्हा तू असं सुचवलं होतंस की, मनानी कणखर बनण्यासाठी आधी आपल्या जवळच्या लोकांना आपण स्वत:च्या तोंडाने बोलून ही जाणीव करून द्यावी की ते किती आपल्याला जवळचे वाटतात. आपलं किती प्रेम आहे त्यांच्यावर,’’ हे ऐवूâन मला हा एक निव्वळ भावनिक चावटपणाच वाटला होता.
मानसिक कणखरता व प्रेम ह्याचं काही नातं असतं हे मला पटलं नव्हतं.

त्या रात्री मी दिवाणखान्यात माझ्या पत्नीच्या समोर बसलो होतो. तुझे शब्द माझ्या कानात घुमत होते. ‘‘तू मला आवडतेस, माझं निस्सिम प्रेम आहे तुझ्यावर’’ हे आपल्या स्वत:च्या पत्नीला सांगायला माझी जीभ रेटत नव्हती. धैर्य होत नव्हतं. घसा साफ करून, खाकरून मी बोलायचा विचार केला पण शब्द बाहेर पडले
नाहीत. मला काहीतरी बोलायचं आहे हे तिच्या लक्षात आलं. तिने मला काय म्हणून विचारलंही. ‘‘काही नाही, काही नाही’’ मी पुटपुटलो. नंतर मात्र अचानक मी माझ्या सोफ्यावरून उठलो व तिच्या सोफ्याशी गेलो. ती वाचत असलेलं वर्तमानपत्र बाजूला केलं आणि म्हणालो, ‘‘एलिस, तू खूप आवडतेस गं मला, किती जीवापाड प्रेम करतो मी तुझ्यावर.’’ क्षणभर स्तिमित होऊन ती बघतच राहिली. तिचे डोळे भरून आले व हळूच ती म्हणाली, ‘एड् मी देखील खूप प्रेम करते तुझ्यावर, पण तुला मात्र तब्बल २५ वर्षं लागली मला हे सांगायला.’’

नंतर आम्ही दोघं प्रेमाच्या दिव्य शक्तीनी कसे सगळे मानसिक तणाव, दुरावलेली नाती नाहीशी होतात अशा अनेक मुद्द्यांवर बोलत बसलो. आयुष्यात प्रथमच कसं छान हलवंâ-पुâलवंâ वाटत होतं. त्याच क्षणी मी निर्णय घेतला व न्यूयॉर्वâमध्ये राहणाNया माझ्या थोरल्या मुलाला फोन केला. तो फोनवर आला व
मी पटकन त्याला म्हटलं, ‘‘ए, तुला वाटेल मला काही चढली वगैरे आहे की काय, पण तसं काही नाहीये. मला सहज तुला फोन करावासा वाटला व सांगायची इच्छा झाली की तू मला खूप आवडतोस, माझा लाडका आहेस तू.’’

दुसNया बाजूला दोन सेवंâद शांतताच राहिली पण तो लगेच म्हणाला, ‘‘बाबा, मला किनई अंदाज होता या गोष्टीचा. पण तुमच्या तोंडून हे शब्द ऐकताना खरंच खूप खूप आनंद झालाय. मला पण तुम्ही नेहमीच खूप आवडता हे सांगावंसं वाटतंय.’’ नंतर बराच वेळ फोनवर आम्ही एकमेकांशी बोलत राहिलो. नंतर मी
माझ्या सॅनप्रâान्सिस्कोमधल्या धाकट्या मुलाशी फोनवरून बोलून माझ्या मनातल्या त्याच्याबद्दलच्या भावना अशाचप्रकारे व्यक्त केल्या. मला वाटतं त्या निमित्ताने आम्ही पहिल्यांदाच एकमेकांशी इतक्या प्रेमाने हितगूज करू शकलो.

‘‘त्या रात्री बिछान्यात आडवं झाल्यावर ज्यो, दिवसभर तू जे काही बोलला होतास त्याचा अर्थ आता मला उमजायला लागला होता. कणखरपणाच्या जोडीला जर प्रेमळ वागणुकीचा पण उपयोग केला तर किती फरक पडू शकतो हे कळू लागलं.’’

‘‘मी नंतर ह्या विषयावर बरंच वाचन केलं. त्यामुळे थोरामोठ्यांनी देखील प्रत्येक ठिकाणी हेच म्हटलं आहे हे समजलं. घरी-दारी, कामाच्या ठिकाणी प्रेमाने वागल्यास किती फायदा होतो. प्रेमात किती भव्य-दिव्य शक्ती लपलीय हे मला मनापासून पटलं.’’

‘‘तुमच्यापैकी काहीजणांना माझ्या कार्यपद्धतीत झालेला फरक लक्षात आलेलाच आहे, आता मी माझी श्रवणशक्ती वाढवली आहे. दुसNयाचं म्हणणं शांतपणे कसं ऐकायचं, त्याला बोलायला, मत मांडायला कसा वाव द्यायचा हे शिकलोय मी. 

इतरांच्या सुप्त गुणांचा विचार करून त्याचा आपल्याला कामात कसा फायदा करून घेता येईल ह्या विचारसरणीचं महत्त्व पटलंय मला. फक्त दुसरी व्यक्ती कुठे कमी पडतेय. तिच्या हातून काय चुका होताहेत हेच बघत बसायची सवय मी प्रयत्नपूर्वक मोडलीय. उलट त्यांचा आत्मविश्वास मी कसा वाढवू शकेन ह्याचा मी जाणीवपूर्वक विचार करू लागलो. तुम्ही सगळे मला जवळचे वाटता, आपले वाटता, मी तुमचा आदर करतो हे मी त्यांना मनमोकळेपणानी दाखवू लागलो. साहजिकच त्यामुळे सगळं वातावरण बदललं. कामाची गती, उत्पादन क्षमता सर्व सर्वच वाढलं.’’

‘‘ज्यो, हे सर्व सांगून मला तुझे जाहीररित्या आभार मानायचे होते. आज मी वंâपनीत फार वरच्या पदावर पोहोचलो आहे हे फक्त तुझ्यामुळेच. वंâपनीतले सगळेजण मला त्यांचा आदर्श नेता मानतात आता. बरं, चला तर, आता तुम्ही सगळे हा ज्यो काय सांगतो ते नीट ऐका.’’


---

ज्यो बॅटन
"Big Ed"

Tuesday, 24 December 2013

कमोदिनी

वैâसे आऊँ बालमा

रेल्वे स्टेशनच्या फलाटावर गाडी उभी होती. प्रवाशांची, हमालांची वर्दळ वाढली होती. भर उन्हाळ्याचा उकाडा जाणवत होता. माणसांच्या वर्दळीबरोबर घामाचा धुमारा वातावरणात भरला होता. पहिल्या वर्गाच्या डब्यापाशी सूरजित आले.

त्यांनी डब्याच्या गजाला बांधलेले रिझव्र्हेशन कार्ड पाहिले आणि त्यांच्या मागून येणाNया नोकराला ते म्हणाले, ‘रामिंसग, हाच डबा! गर्दी दिसत नाही. आणखी एकच पॅसेंजर आहे. बर्थ खालीच आहे. सामान ठेव.’
‘जी!’ म्हणत म्हातारा रामिंसग आत शिरला. पाठोपाठ हमालाने सामानासह डब्यात प्रवेश केला. रामिंसग हमालाकडून सामान लावून घेत होता. बर्थवर अंथरूण पसरून होताच रामिंसग खाली उतरला. त्याने हमालाला पैसे दिले. हमाल जाताच सूरजितांनी विचारलं,

‘रामिंसग.’

‘जी.’

‘बिछायत केली?’

‘जी!’

‘तू तुझी जागा बघ. मुंबईला जाईपर्यंत मला काही लागणार नाही.’

मान तुकवून रामिंसग निघून गेला. फलाटावरून फिरणाNया हातगाड्या ते पाहत होते. पुस्तके, फळे, खाद्यपदार्थ, खेळणी यांच्या गाड्यांना चुकवीत, डबे शोधत जाणारी वर्दळ ते निरखीत होते. सूरजितांचं वय साठी ओलांडून गेलं होतं. 

मस्तकी केसाळ पांढरी शुभ्र टोपी, अंगात जाकीट, लखनवी झब्बा, पायांत विजार आणि मोजडी हा त्यांचा वेश होता. गालावरच्या कल्ल्यांवरून हात फिरवीत असता बोटातली टपोNया माणकाची अंगठी लक्ष वेधून घेत होती. एके काळच्या गौरवर्णावर पांढरी छटा उमटली होती. पाणीदार डोळ्यांभोवती काळी वर्तुळे पसरली होती,
गळ्याजवळ सुरकुत्यांचं जाळं विणलं गेलं होतं. उभारल्या जागी सूरजितांनी आपल्या जाकिटाच्या खिशातून रुमाल काढला. त्या रुमालाची घडी उलगडताच उठलेल्या मंद सुवासाने त्यांना बरं वाटलं. त्या रुमालानं घाम टिपून सूरजितांनी डोळ्यांजवळ मनगट नेऊन आपलं घड्याळ पाहिलं. गाडी सुटायला दहा मिनिटं उरली होती. त्यांच्या डब्यातला सहप्रवासी अद्याप आला नव्हता. कुतूहलाने त्यांनी परत आरक्षण-पत्रिका पाहिली. 

चंदाबाई सावनीवाले हे त्या सहप्रवाशाचं नाव होतं. सूरजितांच्या चेहNयावरचं आश्चर्य लपलं नाही. त्यांनी परत ते नाव वाचलं. त्यांच्या चेहNयावर समाधान पसरलं. त्या समाधानात सूरजित डब्यात चढले. डब्यातले सारे पंखे रामिंसगने सुरू केले होते. उष्मा कमी होण्याऐवजी उष्ण हवेचे वाफारे अंगावर येत होते. सूरजितांनी आपलं जाकीट काढलं. डब्यातल्या आरशावरच्या खुंटाळ्याला जाकीट, टोपी अडकवली. बर्थवर पसरलेल्या अंथरुणावर उशाशेजारी गुलाबी नॅपकीन होता, तो हाती घेऊन ते अंथरुणावर बसले. उशीचा आधार पाठीशी घेऊन पायांतली मोजडी काढून मांडी घालत असता कडक इस्त्री केलेला पांढरा शुभ्र पायजमा कुरकुरला. गाडी सुटायला अवघी पाच मिनिटं उरली असता डब्याच्या रोखाने येणाNया माणसांच्या मेळाव्याने सूरजितांचं लक्ष वेधून घेतलं. त्या गर्दीपुढे दोघे-चौघे गृहस्थ वाट मोकळी करीत होते. त्या गर्दीच्या मध्यभागी प्रयत्नाने राखलेल्या मोकळ्या जागेतून एक वयस्क स्त्री चालत येत होती. डब्यापाशी येताच ती गर्दी डब्याच्या दाराशी पांगली. बसल्या जागेवरून सूरजित ते पाहत होते. ती वयस्क स्त्री दुसरी कोणी नसून भारताची सर्वश्रेष्ठ गायिका चंदाबाई सावनीवाले आहे, हे त्यांनी ओळखलं होतं. डब्यात दुसNया बर्थखाली सामान लावलं जात होतं. चंदाबाईच्या गळ्यात हार घालून पदस्पर्श करणारी माणसं सूरजित पाहत होते. पायाशी वाकलेल्या चाहत्यांच्या पाठीवरून प्रेमभराने चंदाबाईचे हात फिरत होते. कुणीतरी म्हणालं, 

‘माई, गाडीत बसा. वेळ झाली.’

‘होय रे! नारायणा, तू तुझी जागा पकड बाबा.’

‘माई, मी नंतर भेटेन.’

‘नको रे! आज उपवास आहे. मला काही लागायचं नाही.’

नारायण गर्दीतून निघून गेला. चंदाबाई डब्यात चढल्या. दाराशी उभे राहून त्या निरोप घेत होत्या. निरोप देणाNया गर्दीच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते. गाडीची शिटी झाली आणि काही क्षणांत गाडी धक्के देत सरवूâ लागली. फलाट मागे पडेपर्यंत दाराशी हात हलवीत चंदाबाई उभ्या होत्या. नंतर चंदाबार्इंनी दरवाजा लावला. एकदा सूरजितांकडे पाहून त्या आपल्या बर्थवर पसरलेल्या अंथरुणावर बसल्या. बिछान्यावर पानाचा चांदीचा डबा उघडत चंदाबाई म्हणाल्या, ‘भारीच उकाडा, नाही?’

Monday, 23 December 2013

शापित वास्तू

पाहुणा

फीबी झोपून उठली. खरे म्हटले, तर बागेतील पीअर वृक्षावरच्या रॉबिन पक्ष्याच्या त्या प्रेमी युगुलाने मोठा चिवचिवाट करून तिला उठवले. उठल्याउठल्या खालच्या मजल्यातील हालचालीची तिला चाहूल लागली. त्यासरशी अगदी गडबडीने ती स्वयंपाकघरात येऊन पोहोचली. तेथे येऊन बघते तर हेप्झीबा तिच्याआधीच हजर. एका खिडकीजवळ ती उभी होती, हातातले पुस्तक अगदी नाकाजवळ धरून. त्या पुस्तकातील मजकुराचा वास घेण्यासाठीच जणू! पण बिचाNया हेप्झीबाच्या मनात तसले काही नव्हते हो! तिच्या मूळच्या अधू दृष्टीला त्या पुस्तकाचे वाचन अवघड जात होते. खरेच! एखाद्या ग्रंथातील महत्त्वाचे ज्ञान या पद्धतीने, म्हणजे नुसत्या त्याच्या वासाच्या माध्यमातून प्रकट झाले असते, तर अशा प्रकारचा एकमेव ग्रंथ ठरला असता तो! आणि मग मोठी मौज उडाली असती त्या स्वयंपाकगृहात. जिकडेतिकडे हरणाचे मांस, टर्की, कोंबडा, डुकराची चरबी लावून तळलेले कवडे, पुिंडग, केक, खिसमस पाव, नाना तNहेच्या या अन्नपदार्थांचा खमंग घमघमाट पसरून दरवळून गेले असते ते पाकगृह. असा तो ग्रंथ पाकशास्त्रव्र्
िाâयांचा ग्रंथ होता. अगदी सचित्र असा. त्यात इांqग्लश पद्धतीने तयार करण्याच्या पदार्थांच्या असंख्य जुन्या कृती समजावून दिल्या होत्या. स्पष्टीकरणासाठी अधूनमधून चित्रेही दिली होती. त्या चित्रांवरून एखाद्या सरदाराने आपल्या किल्ल्यातील भव्य दिवाणखान्यात योजिलेल्या मेजवानीची मांडणी कशी करावी याची कल्पना येत होती. अशा त्या नानाविध संपन्न व गुणकारी करामतींमधून (अर्थात, त्यांच्यापैकी
एकीची तरी कोणी चव पाहिली असेल िंकवा नाही ही शंका उरतेच म्हणा. अगदी आज्या-पणज्यांच्या काळापर्यंत जाऊन भिडले तरी) बिचारी हेप्झीबा थोड्या वेळात तयार होणारा एखादा पदार्थ शोधीत होती. अंगी असलेले कौशल्य आणि साहित्य यांच्या साहाय्याने तिला न्याहारी बनवायची होती.

थोड्याच वेळात एक खोल सुस्कारा सोडीत हेप्झीबाने पदार्थांच्या कृती सांगणारा तो ग्रंथ बाजूला ठेवला. फीबीकडे तिने म्हाताNया स्पेकलने – कोंबडीचे तिने ठेवलेले नाव –काल एखादे अंडे घातले होते काय, याची चौकशी केली.

ताबडतोब फीबी त्यासाठी धावत गेली, पण हात हलवत परतली; ती अपेक्षित मौल्यवान वस्तू न आणता. मात्र त्याच क्षणी रस्त्यावर आपल्या आगमनाची ललकारी देणारा एका मासेविक्याचा शंखध्वनी ऐवूâ आला. दुकानाच्या खिडकीवर अगदी उत्साहाने ठोके देत हेप्झीबाने त्याला आत बोलावले. त्याने भलावण केलेल्या त्याच्या गाडीतील माशांतला मासा खरेदी केला. तो समुद्रातला मासा होता. नुकत्याच सुरू झालेल्या मोसमाच्या आरंभाला एवढा गलेलठ्ठ मासा प्रथमच सापडला होता. नंतर फीबीला तिने कॉफीची बोंडे भाजण्याची विनंती केली. मध्येच तिने सांगितले की, ती अस्सल ‘मोचा’ (एक उंची कॉफी) होती. तिच्या दृष्टीने त्या प्रत्येक लहान बोंडाचे महत्त्व सुवर्णफळासम भासत होते. इतकी जपून ठेवलेली होती ती तिने. आता तिने त्या जुनाट शेगडीच्या अवाढव्य पात्रात जळणाचा इतका मोठा ढीग ओतला की, त्यामुळे स्वयंपाकघरात रेंगाळणारा अंधार ताबडतोब नाहीसा झाला. फीबीलाही आपण काहीतरी साहाय्य करावे असे वाटून तिने एक
प्रकारचा इंडियन केक बनविण्याची कल्पना काढली. तयार करण्याची पद्धत जितकी सोपी तितकीच त्याची रुचिसंपन्नता मोठी होती. तिच्या आईकडून शिकली होती ती त्याची बनावट. जर व्यवाqस्थत जमला तर कोणत्याही पद्धतीच्या ब्रेकफास्टकेकला तो भारी होता. हेप्झीबाने तिच्या सूचनेचा आनंदाने स्वीकार केला. 

मग काय, ते स्वयंपाकघर खमंग आणि चविष्ट पदार्थांच्या तयारीला लागले. त्या स्वपाकघराच्या रचनादुष्ट धुराड्यातून गिरक्या मारीत पुढे सरकणाNया धूम्रवलयामधून त्या प्रासादात काम केलेल्या मृत स्वयंपाकिणींची भुते त्याच्याकडे मोठ्या आश्चर्याने बघत राहण्याचा संभव होता िंकवा त्या धुराड्यातून खाली डोकावून तेथे तयार होणाNया पदार्थांचा साधेपणा पाहून त्यांनी नाकेही मुरडली असतील. आपले
छायावत हात त्या पदार्थांत खुपसण्याचा निष्फळ प्रयत्नही केला असेल त्यांनी. त्याचे त्यांना दु:खही झाले असेल. अर्धवट भुकेले उंदीर मात्र हळूच आपल्या जागेबाहेर येत होते. आपल्या मागच्या पायांवर बसून त्या धुरकटलेल्या वातावरणाचा वास घेत होते ते. पदार्थ हाताला लागण्याच्या क्षणाची आशाळभूतपणे वाट पाहत
होते बिचारे. 

तसे म्हणाल, तर हेप्झीबाला प्रथमपासूनच स्वयंपाक करण्याची आवड नव्हती. तिच्या आताच्या या कृशतेला तिचा हा तिटकाराच सर्वस्वी जबाबदार होता. स्वयंपाक करावा लागतो, भांड्यात पळी फिरवत बसावे लागते िंकवा आधणावर लक्ष ठेवावे लागते, या कटकटीपेक्षा जेवणच न केलेले बरे, असे तिला वाटायचे. म्हणून आजचा तिचा हा स्वयंपाकाच्या शेगडीपुढचा उत्साह म्हणजे तिच्या भावनेच्या पराक्रमाची एक कसोटीच होती. खरोखरच, ते एक भावना हेलावणारे दृश्य होते, निश्चितपणे शोकदायकही तेवढेच. (अर्थात, वर वर्णन केलेली ती स्वयंपाकिणींची भुते आणि ते उंदीर यांच्याखेरीज तेथे असणारी एकमेव प्रेक्षक – फीबी – दुसNया
एखाद्या कामात गुंतली नसल्यास!) नवीन पेटते निखारे एकत्र करून त्यावर तो समुद्रातला मासा भाजत असताना तिचे ते निस्तेज गाल शेगडीची उष्णता आणि अधिक कामाची घाई यांमुळे लालेलाल झाले होते. त्या भाजत्या माशाकडे ती मोठ्या काळजीने आणि अतिशय लक्ष देऊन पाहत होती, जणूकाय तिचे स्वत:चे
हृदयच काढून घेऊन त्या शेगडीच्या जाळीवर भाजण्यासाठी ठेवलेले होते आणि तो पदार्थ योग्य त्या पद्धतीने तयार होण्यातच तिचे चिरंतन सुख साठवलेले होते. 

घरातील जीवनात व्यवाqस्थत मांडलेल्या आणि सर्व प्रकारचे रुचकर पदार्थ असलेल्या न्याहारीसाठी बसण्याइतके सुखदायक क्षण कोणतेच नसतात. ते सुख वेगळेच असते. आपल्या दवदार जवानीसह दिवस वर येत असतो. आपल्या आध्यााqत्मक आणि विषयासक्त वृत्ती एकमेकांशी जमवून घेण्याच्या ाqस्थतीत
असतात. दिवस जसजसा पुढे सरकेल तसतसे त्यांचे बिनसण्याचा संभव असतो. आपण स्वत: ताजेतवाने होऊन बसलेले असतो तिच्यापुढे. या सगळ्या गोष्टींमुळे त्या सकाळच्या न्याहारीतून मिळणारा ऐहिक आनंद पूर्णत: उपभोगता येतो आपल्याला. आपल्या स्वभावधर्मातील शरीररचनेच्या दृष्टीनेही ते ठीक असते. त्या वेळी थोडेफार अधिक पोटात गेल्यामुळे त्याच्या विशेष मोठ्या तक्रारी अथवा त्याची नुसती होणारी भावना यांपैकी काहीच घडत नाही. अशा एखाद्या न्याहारीच्या ताटावरच्या गप्पाही मोठ्या चुरचुरीत व खेळकर असतात. विशेषत: सभोवती आपल्याच परिचयाची माणसे, पाहुणे असतील तर त्यांच्या विचारांतसुद्धा त्या छटा अधिकाधिक येतात. त्यांच्या जोडीला जेवताजेवता एकमेकांचा जो सहवास येतो, त्या वेळच्या विचारांना ठळक अशा सत्याचा आधार मिळतो. इतर वेळी तसे क्वचितच घडते. आज हेप्झीबाने मांडलेले ते ब्रेकफास्ट-टेबल सर्वांत आनंददायक अशा एका मेजवानीचे स्थळ बनून राहिले होते. जगातील सगळ्या उत्साहाचे वेंâद्रच
बनले होते जणू! सडसडीत आणि डौलदार पायांच्या त्या टेबलावर एक अतिशय उंची रेशमी कापड अंथरलेले होते. त्याच्यावर ठेवलेल्या पदार्थांतील त्या भाजलेल्या माशातून वाफा उठायला लागल्या, पूर्वीच्या काळातील रानवट, मागासलेल्या आदिमानवाच्या देवळातील मूर्तीसमोर जळत राहणाNया सुगंधी धुपातल्यासारख्या.

‘मोचा’च्या बोंडांच्या कॉफीचा सुगंध असा दरवळला म्हणता की, त्याने कोणत्याही संरक्षक अशा कुलदैवताच्या घ्राणेंद्रियाला िंकवा न्याहारीच्या टेबलावर लक्ष ठेवणाNया एखाद्या आधुनिक शक्तीलाही तिच्या स्वादाने आनंदित केले असते. 

Saturday, 21 December 2013

द सिम्पल ट्रूथ

मायकेलच्या अपार्टमेन्टजवळ पोहोचताच कोपNयावरच्या पार्विंâगजवळ सारानं गाडी थांबवली. ‘‘डिकी उघडतो.'’ उतरताना फिस्क म्हणाला. नंतर डिकीतून तो काहीतरी शोधत असल्यागत वस्तू वर-खाली होण्याचा आवाज तिनं ऐकला. 

त्यानंतर तो खिडकीशी आला, तशी ती क्षणभर एकदम दचकली. मग तिनं खिडकीची काच खाली घेतली.

‘‘गाडीची दारं बंद करून घे, इंजीन चालू ठेव आणि आपले डोळे उघडे ठेव. ठीक आहे?’’ तो म्हणाला.

तिनं मान डोलावली. त्याच्या एका हातात टॉर्च आणि दुसNया हातात टायर बदलण्याचा लोखंडी दांडा घट्ट धरलेला होता.

‘‘तू अस्वस्थ झालीस विंâवा तुला भीती वगैरे वाटायला लागली, तर तू सरळ पळ काढ. मी पुरेसा ताकदवान आहे. मी रिचमंडला कसाही पोहोचेन.’’ 

तिनं मान हलवली आणि हट्टीपणानं म्हणाली, ‘‘मी इथंच असेन.’’ 

तिनं त्याला कोपNयावर वळताना पाहिलं, तसा एक विचार तिच्या मनात आला. ती एक मिनिटभर थांबली. त्याला बिल्डिंगमध्ये शिरायला अवधी द्यावा या विचारानं. त्यानंतर ती त्या कोपNयावरून गाडी घेऊन
निघाली. मायकेलच्या बिल्डिंगच्या रस्त्यावर आली आणि त्याच्या रो-हाउससमोरच तिनं गाडी पार्वâ केली. आपला सेल फोन काढून हातात तयार ठेवला. 

जर तिला चुवूâन जरी काही संशयास्पद वाटलं असतं, तरी ती लगेच अपार्टमेन्टवर फोन लावून फिस्कला सूचना देऊ शकणार होती.

आणीबाणीच्या परिस्थितीसाठी तयारी, पण त्याचा उपयोग करण्याची वेळ येऊ नये अशी आशा बाळगून.

फिस्कनं आत प्रवेश केला आणि दार बंद केलं. फ्लॅश लाइट लावला आणि आजूबाजूला पाहिलं. त्या जागेची कुणी तपासणी केलेली नव्हती, हे उघड दिसत होतं कारण तशा कोणत्याही खुणा दिसत नव्हत्या.

त्यानं हॉलच्या लगत असलेल्या छोट्या किचनमध्ये प्रवेश केला. हॉलमध्येच छातीइतक्या उंचीचा बार बनवून त्याला लागून स्वयंपाक घराचं दार बसवून ते किचन वेगळं करण्यात आलं होतं. म्हणजे तसे ते हॉलचेच दोन भाग होते. पातळ प्लास्टिकच्या पिशव्या तो शोधत होता आणि त्याला त्या किचनच्या एका ड्रॉवरमध्ये
मिळाल्या. हाताचे ठसे उमटू नयेत म्हणून हाताभोवती गुंडाळण्यासाठी त्याला त्या पिशव्या हव्या होत्या. किचनमध्ये एक छोटं कपाट होतं, पण त्यानं त्याचं दार उघडून पाहिलं नाही. त्यात स्वयंपाकाला लागणाNया सर्व वस्तू, तयार भाज्यांचे दाणे, वाटाणे वगैरेंचे डबे, अशा गोष्टी रांगेनं नीट लावून ठेवणाNयामध्ये त्याचा
भाऊ बसत नव्हता. तेव्हा ते कपाट रिकामं असणार हे त्याला माहीत होतं.

तो लिव्हिंग रूममध्ये परतला. त्यानं शर्ट-कोट ठेवण्याचं कपाट शोधलं, सर्व कोटाचे खिसेही तपासले; पण त्यात काहीही नव्हतं. अपार्टमेन्टच्या मागच्या भागात असलेल्या बेडरूमकडे त्याने त्याचा मोर्चा वळवला. जमिनीला बसवलेल्या कार्पेटला भेगा पडलेल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक पावलानिशी कुरकुर आवाज होत
होता. त्यानं बेडरूमचं दार उघडलं अन् आत पाहिलं. अंथरुणावर चादर वगैरे घातलेली नव्हती. कपडे इकडेतिकडे पडले होते. त्यानं त्या कपड्यांचेपण खिसे तपासले. काही नाही. कोपNयात एक छोटं टेबल होतं, ते त्यानं तपासलं, पण तिथंही काही खास नव्हतं. टेबलामागे दडलेली आणि भिंतीवर प्लग केलेली एक वायर त्यानं पाहिली. तिचं दुसरं टोक त्यानं धरलं आणि त्यानं डोळे बारीक केले. त्याच्या कपाळाला आठ्या पडल्या. टेबलाच्या पलीकडे स्टुलावर अपेक्षित असं त्याला दिसलं नाही. लॅपटॉप कॉम्प्युटर. ती वायर त्याला जोडलेली असली पाहिजे होती. `वायर दिसते आहे, पण लॅपटॉप कसा नाही?' त्या टेबलाच्या आसपास ब्रीफकेसही दिसत नव्हती. फिस्कनंच माइकला ती ब्रीफकेस त्याच्या ग्रॅज्युएशननंतर घेऊन दिली होती. `ब्रीफकेस आणि लॅपटॉपबद्दल साराला विचारायला हवं.' त्यानं मनात नोंद केली.

बेडरूमनंतर हॉलमधून तो पुन्हा किचनकडे वळला. तो अचानक थांबला.

कानोसा घेत. असं करतानाच त्यानं हातातला लोखंडी दांडा घट्ट धरला आणि झटकन किचनचं दार उघडलं तसा टॉर्चचा प्रकाश छोट्या जागेत पसरला. दबून बसलेला माणूस ताडकन त्याच्या दिशेनं उसळला आणि त्याच्या खांद्याची धडक फिस्कच्या पोटात बसली. फिस्क मोठ्यानं ओरडला, धडपडला. त्याचा टॉर्च कुठेतरी घरंगळत गेला. तरीही धडपडत उठत त्यानं आपल्या हाताने लोखंडी दांडा त्या पळणाNया माणसाच्या मानेवर मारण्यात यश मिळवलं. वेदनेनं तो विंâचाळला, पण फिस्कच्या अपेक्षेपेक्षा लवकर सावरला. त्यानं फिस्कला
उचलून बारवरून पेâकलं. फिस्क जोरात आदळला. त्याचा खांदा लुळा पडल्यासारखा झाला. तरीही बाजूच्या कुशीवर वळून त्यानं त्या माणसाच्या दिशेनं खालूनच लाथा झाडल्या. हातात असलेला लोखंडी दांडा पडल्या पडल्याच त्यानं फिरवला, पण काळोखामुळे त्याचा नेम बसलाच नाही आणि तो जमिनीवरच आदळला. तेवढ्यात फिस्कच्या जबड्यावर हाताच्या मुठीचा एक जोरदार फटका बसला तसा फिस्क जमिनीवर धाडकन आपटला.

तो माणूस आता दाराकडे पळत होता. फिस्कनं धडपडत उठून दाराकडे जाण्याचा त्याचा प्रयत्न त्याच्या खांद्याला धरून फोल ठरवण्याचा प्रयत्न केला. तो माणूस निसटला. पायNया उतरताना त्याच्या पायांचा आवाज येत होता. तो त्याच्या मागे लागला, पण तेवढ्यात त्यानं बिल्डिंगचं दार उघडल्याचा आवाज ऐकला.
दहा सेवंâदांनंतर फिस्क ते दार उघडून रस्त्यावर आला होता. त्यानं इकडेतिकडे पाहिलं, त्याच वेळेस गाडीच्या हॉर्नचा आवाज झाला. त्यानं तिकडे पाहिलं. सारानं गाडीच्या खिडकीची काच खाली घेतली आणि हात बाहेर काढून उजव्या दिशेकडे दाखवला. एखाद्या स्पर्धेत धावावं तितक्या जोरात तो त्या दिशेकडे भर पावसातून धावला आणि कोपNयावर वळला. सारानं गाडीचा गिअर टाकला, पण दोन गाड्या जाईपर्यंत तिला थांबावं लागलं. त्यानंतर तिनं तो धावला त्या दिशेकडे गाडी घेतली. कोपNयावर वळल्यानंतर ती तशीच पुढे गेली, पण
तिला काही तो दिसला नाही. गाडी वळवून उलट्या दिशेनं ती पुढे गेली, तरी तो दिसला नाही. तो नेमक्या कोणत्या दिशेनं गेला होता, हे तिला समजेना. तिथले तिन्ही-चारही रस्ते तिनं तपासले; पण त्याचा पत्ता नव्हता, तशी ती घाबरली.

एवढ्यात तिला तो दिसला तसा तिनं सुटकेचा निश्वास सोडला. तो रस्त्याच्या मधोमध हवा ओढून घेत उभा होता.

Friday, 20 December 2013

अण्णा हजारे

अण्णांचा भ्रष्टाचारविरोधी

अविरत लढा

अण्णा हजारे अतिशय साधे असून त्यांचे आयुष्याबाबतचे तत्त्वज्ञानही साधे आहे. मात्र त्यांनी मिळवलेले यश साधे नाही. त्यांचे कामच इतके बोलते की, आणखी खुलासा करण्याची गरजच पडत नाही. मात्र अण्णा सतत खुलासा करीत असतात. त्यांच्या समाजसेवी कार्याबद्दल अण्णांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण, कृषिभूषण तसेच इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्काराचा समावेश आहे. अमेरिकेतील ‘केअर इंटरनॅशनल’ आणि दक्षिण कोरियातील ‘ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’ या मानाच्या संस्थांनीही अण्णांचा गौरव केला आहे.

अण्णांचे व्यक्तिगत स्पष्टीकरण वेगवेगळ्या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अण्णांनी स्वत:विषयी केलेले
स्पष्टीकरण थोडक्यात येथे उद्धृत केले आहे : 

`माझ्यासाठी काहीही काळे आणि गोरे नाही. एक तर ते काळे आहे िंकवा गोरे. भ्रष्टाचाराविरुद्ध मी दिलेल्या लढ्यामुळे महाराष्ट्रातील हजारो नागरिकांच्या हृदयात मला स्थान मिळाले आहे. देशातही अन्यत्र हे स्थान मला लाभले आहे.’

`अलेक्झांडर द ग्रेटसारखा जगज्जेतासुद्धा मृत्यूनंतर स्वर्गात जाताना स्वत:समवेत काही घेऊन जाऊ शकला नाही. असे असताना संपत्ती मिळविण्याची एवढी लालसा कशासाठी? शेवटी जीवन म्हणजे तरी नक्की काय? दुसNयांशी चांगले वागणे. 

त्यांच्या कामी येणे. खरे पाहता सेवेतही मोठा आनंद आहे. साठच्या दशकात हा संदेश माझ्या मनात खोलवर रुजला गेला, आणि मला सतत प्रेरणा देत गेला. मी कधीही माघार घेणार नाही. देशवासियांसाठी कोणताही त्याग करण्यासाठी मी केव्हाही तयार आहे. माझे जीवन देशवासियांसाठी सर्मिपत आहे. भ्रष्टाचाराशी मुकाबला करणे, हेच माझे ध्येय आहे. हाच माझा मुख्य कार्यक्रम आहे. माझे ध्येय निश्चित आहे आणि भ्रष्टाचाराशी लढा देण्यासाठी योग्य प्रकारे कार्यक्रमाची आखणीही केलेली आहे.’

`भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांमुळे राजकीय धुरीणांशी कायम संघर्ष करताना आपण मला पाहिले. असे असूनही मला आणखी बदल घडवायचे आहेत. शिक्षण व्यवस्थेत बदल झाल्यास मुलाला आपोआपच चांगल्या वातावरणात वाढण्यासाठी, पुâलण्यासाठी मदत होईल. डोनेशनच्या माध्यमातून शाळा व महाविद्यालये लाच स्वीकारत असतील, तर मुलांकडून तुम्ही कशाची अपेक्षा ठेवणार? कोणत्या मार्गाचा ते अवलंब करतील? गोपनीय कायद्याचे हत्यार देशात कायम वापरले गेले. सरकारला जे काही लपवायचे आहे, ते याच्या नावाखाली लपविण्यात आले.

माझी हा कायदा मोडीत काढण्याची इच्छा आहे. माहिती मिळविण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. मात्र हा केवळ कागदावरच राहिला आहे. का? माहिती मिळवण्यासाठी आपल्याला निश्चित कालमर्यादा आखावी लागेल. गावपातळीवर आणखी अधिकार बहाल करावेत, या मताचा मी आहे.’
`सत्तेच्या गल्ल्या या भ्रष्टाचारावरच पोसल्या गेल्या आहेत. देशाची राजधानी दिल्ली यात अग्रक्रमावर आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढ्यासाठी लोकांना एकत्र करण्यास वेळ लागेल. मात्र आम्ही त्या दिशेने काम करीत आहोत. देशाचे माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांनी मोठ्या प्रमाणावर हे काम केले. मात्र मधेच त्यांचे नियंत्रण सुटले. राजकारणात गेल्याने त्यांच्या आधीच्या उत्तुंग प्रतिमेला तडा गेला. 

मी राजकारणात प्रवेश करावा यासाठी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि राजकीय पक्षांनी अनेकदा माझ्याशी संपर्वâ साधून मला आवाहन केले. मी मात्र माझ्या भूमिकेवर खंबीर राहिलो. अनेक वर्षांपूर्वीच मी  जकारणात प्रेवश न करण्याबाबत माझे मन तयार केले होते. आताची स्थिती आणखी बिकट आहे. स्वच्छ प्रतिमेच्या
लोकांनी राजकारणात प्रवेश करण्याची गरज आहे.’ 

Wednesday, 18 December 2013

हाच माझा मार्ग ...

रामनगरममध्ये ‘शोले’चं शूिंटग सुरू असताना अचानक ‘राजश्री प्रॉडक्शन्स’चे सर्वेसर्वा ताराचंद बडजात्या (सेठजी) एके दिवशी सेटवर आले. त्यांनी रमेश सिप्पी यांच्यासह सगळ्यांशी भेटीगाठी घेतल्या, सगळ्यांबरोबर फोटो काढून झाले. मी दुसNया बाजूला उभा होतो. ‘एक फोटो हिरोबरोबर काढायचाय,’ असं ते म्हणत होते. अमितजी, धरमजी, हरिभाई सगळे तर तिथेच होते. मग ‘हिरो’ कोण, हे कुणालाच कळेना. 

‘आमच्या हिरोबरोबर एक फोटो काढायचाय,’ असं म्हणून ताराचंदजी माझ्याजवळ आले आणि मला फोटोसाठी घेऊन गेले. फोटो काढला. मला या प्रकाराचा त्या वेळी काहीच उलगडा झाला नाही. तो होण्यासाठी आणखी काही काळ जावा लागला....!

सन १९७३च्या अखेरीला अमिताभ यांचे बंधू अजिताभ यांच्या लग्नाचा स्वागत-समारंभ होता. तिथे राजकुमार बडजात्या यांच्याशी भेट झाली. राजबाबू माझ्याकडे येऊन म्हणाले, ‘‘तुमचा ‘अजब तुझे सरकार’ हा चित्रपट मी पाहिला. तुमच्यासोबत आम्हाला एक चित्रपट करायचा आहे.’’ ‘अजब तुझे सरकार’च्या वितरणाचे हक्क ‘राजश्री’नं घेतले होते. त्यामुळे त्यांना माझा चेहरा ओळखीचा होता. ‘दोस्ती’स्टाइलचा एखादा चित्रपट त्यांना माझ्याबरोबर करायचा होता. ताराचंदजींच्या ‘शोले’च्या सेटवरच्या त्या फोटोसेशनचं रहस्य मला या पार्टीत उलगडलं!

‘राजश्री’नं मला करारबद्ध केलं आणि ‘शोले’ बनत असतानाच मला ‘हिरो’ म्हणून ब्रेक मिळाला. ‘गीत गाता चल’ असं चित्रपटाचं नाव ठरलं. पप्पा आणि मधुसूदन कालेलकर हे एकत्र पटकथालेखन करतात, हेसुद्धा राजबाबूंनी ऐकलं होतं. त्यामुळे राजबाबूंनी त्या दोघांना मला डोळ्यासमोर ठेऊन चित्रपटाचं स्क्रिप लिहिण्यासाठी करारबद्ध केलं. चित्रपटाचं शीर्षक ठरलं ‘गीत गाता चल’.

माझ्याबरोबर काम करण्यासाठी दोन हिरॉइन्स हव्या होत्या, त्यासाठी ऑडिशन्स सुरू होत्या. बेबी सारिका नावाची एक बालकलाकार आता मोठ्या भूमिका करण्याच्या वयाची झाली असेल, असं काहींच्या बोलण्यातून येत होतं.

चित्रपट ‘सिनेमास्कोप’ होता, त्यामुळे त्यात शूिंटग झालेला काही भाग पडद्यावर कसा दिसतो, हे पाहण्यासाठी आम्ही ‘अंबर ऑस्कर’या थिएटरमध्ये गेलो होतो. त्या वेळी सारिका तिच्या आईबरोबर तिथे आली होती. तिला पाहताक्षणी तीच या भूमिकेसाठी योग्य आहे, असं मला वाटलं. श्रीमंत ठावूâरच्या मुलीची व्यक्तिरेखा होती. तिच्या चेहNयावर ती श्रीमंती दिसत होती. दिसायला सुंदर आणि उंच होती. (ती उंच असल्यानं आमची जोडी कितपत शोभेल, अशी मला शंका होती. परंतु शूिंटगदरम्यान ती काळजी घेण्यात आली.) अंतिमत: तिची निवड झाली आणि चित्रपट सुरू झाला.

रामजनक िंसह हे उत्तर प्रदेशातील गृहस्थ ‘गीत गाता चल’चे निर्मिती व्यवस्थापक होते. त्यांची भाषा थोडी कडक होती. ते मनाने चांगले होते; पण जिभेला तिखट होते. काहीतरी कारणावरून मी थोडा नाराज होतो, म्हणून मी त्यांच्याकडे तक्रार केली, तर ते माझ्यावर ओरडले. मला तो माझा अपमान वाटला आणि मी त्यांना म्हणालो, ‘‘तुमच्याशी मी यापुढे बोलणार नाही.’’

मी तेव्हा फक्त १७ वर्षांचा होतो. राजबाबूंच्या कानावर ही गोष्ट गेली. ते त्याच दिवशी संध्याकाळी सेटवर आले. माझ्यापाशी येऊन म्हणाले, ‘‘सचिनजी, चूक कुणाचीही असो. ते तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत, तुम्ही त्यांना फक्त एकदा ‘सॉरी’ म्हणा, ते आयुष्यभर तुमचा मान राखतील.’’

त्या वयात राग, अहंकार असणं स्वाभाविक असतं. राजबाबूंना वाटलं की, मी कदाचित नकार देईन. पण मी त्यांचा सल्ला लगेच स्वीकारला. मी रामजनक िंसह यांच्याकडे जाऊन म्हणालो, ‘‘सॉरी! मी तुमच्याशी अशा भाषेत बोलायला नको होतं; माझं चुकलं.’’ ते त्यांच्या जागेवरून उठले आणि मला मिठीच मारली! तेव्हापासून त्यांनी अक्षरश: धाकट्या भावासारखी माझी काळजी घेतली. मला काय हवं-नको याची ते तत्परतेनं काळजी घ्यायचे. ‘राजश्री’च्या ज्या चित्रपटांत मी काम करत असेन, त्याचं निर्मिती व्यवस्थापन आपणच बघणार, असं ते जाहीर करून टाकत. ‘नदिया के पार’पर्यंतच्या चारही चित्रपटांसाठी आम्ही एकत्र होतो. कधी-कधी शूिंटगच्या तारखांवरून माझे आणि राजबाबूंचे काही मतभेद झाले, तर रामजनक िंसह माझी बाजू घेऊन राजबाबूंशी भांडायचे. राजबाबू म्हणायचे, ‘‘बघा सचिनजी, तुमच्या एका ‘सॉरी’नं किती जादू केलीय ती!’’

मी त्यांना म्हणायचो, ‘‘तुम्ही त्या वेळी मला वडीलकीचा सल्ला दिलात, तो जास्त महत्त्वाचा होता.’’

‘‘मी ढीग सल्ला देईन हो, पण तुम्ही त्या वयात तो मानलात, हे महत्त्वाचं नाही का?’’ असा त्यांचा प्रतिप्रश्न असायचा.

हा एक अनुभवसुद्धा मला आयुष्यात खूप अमूल्य शिकवण देऊन गेला.

‘गीत गाता चल’ या चित्रपटाची गाणी खूप छान होती. रवींद्र जैन यांनी अतिशय सुंदर गाणी केली होती. स्वत: गीतकार आणि संगीतकारही तेच. आधीची दोन गाणी त्यांनी तयार केली होती. शीर्षक गीत तयार करताना मी रवींद्र जैन यांच्या सांताक्रूझच्या फ्लॅटमध्ये बसलो होतो. ‘‘दादा, निसर्गावरचं एखादं गाणं करा. चित्रपटाचा ‘हिरो’ हा एक भटकणारा स्वच्छंदी मुलगा आहे.’’ मी सांगितलं. 

Saturday, 14 December 2013

रुचिरा : भाग २

बेगमीचे पदार्थ

उन्हाळा आला, की पूर्वी घरोघरी बायकांची उन्हाळी कामे करण्याची धांदल उडत असे. हल्लीच्या धावपळीच्या जीवनामुळे नोकरी करणाNया महिला बाजारातून वेगवेगळे मसाले, लोणची, पापड असे तयार पदार्थ विंâवा हळद-पूड, तिखट, शिकेकाई-पूड असे वर्षभर लागणारे पदार्थ विकत आणतात. हल्ली बाजारी पदार्थांत
फार मोठ्या प्रमाणात भेसळ असते. यामुळे असे पदार्थ आरोग्यदृष्ट्या हानिकारक तर आहेतच, पण शिवाय ते खूप महागही पडतात. पूर्वीच्या आपल्या गार्हस्थ्य जीवनात कत्र्यासवरत्या अनुभवी महिला आपल्या
मुली-सुनांना बेगमीचे पदार्थ कसे करावेत, साठवावेत, या गोष्टी शिकवत असत. हल्लीच्या सुशिक्षित मुली शिक्षण चालू असेतो स्वयंपाकघरात विशेष रस घेत नाहीत. लग्न ठरले, की प्रथम स्वयंपाकाचे धडे घेऊ लागतात; त्यामुळे त्यांना बेगमीच्या, साठवणीच्या पदार्थांविषयी काहीच माहिती नसते. घराघरांतून वारसा-परंपरेने कित्येक खाण्याच्या गोष्टी चालत असतात. काय करावे, किती व कसे साठवावे, याची माहिती नवशिक्या गृहिणीला असणे जरुरीचे आहे.

तयार पदार्थ अडीनडीला आणावे. परंतु जास्त आणणे परवडत नाही व घरच्या माणसांना ते भरपूर देता येत नाहीत, म्हणून उन्हाळ्याच्या दिवसांत आठ-पंधरा दिवस कष्ट करून उन्हाळी कामे केली, तर बचत तर होईलच; पण चांगले पदार्थ वर्षभर सुखाने भरपूर खाता येतील. हल्लीच्या सहकारी घरबांधणीमुळे असणाNया सोसायटीतील चार-पाच गृहिणींनी एकत्र येऊन सर्वांसाठी पुरतील, इतके साठवणीचे पदार्थ केले, तर वेळ, पैसा व श्रम यांची बचत तर होईलच, पण बांधिलकीचे नातेही निर्माण होईल. या कामाला सुरुवात करण्यापूर्वी प्राथमिक तयारी करावी. 

घट्ट झाकणाचे पत्र्याचे डबे, बरण्या, धान्य साठविण्याचे डबे स्वच्छ धुऊन, उन्हात वाळवून घ्यावेत. वाळवणे करण्यासाठी लागणाNया साड्या, चादरी धुऊन ठेवाव्यात. जे जिन्नस करायचे, त्यांची यादी करून, त्यासाठी लागणाNया पदार्थांची यादी करावी. पेâब्रुवारी-मार्च महिन्यात तांदूळ, मिरच्या, वाल, शिकेकाई, हळवुंâडे,
िंचच, साबूदाणा, गूळ व मसाल्याच्या सामानाची खरेदी करावी. एप्रिल-मे महिन्यांत गहू, ज्वारी, डाळी, मीठ आदी जिन्नस खरेदी करावेत. सर्वप्रथम धान्य, डाळी इत्यादी वस्तूंच्या साठवणीची माहिती घेऊ. 

तांदूळ : आपल्या आवडीप्रमाणे तांदूळ घेऊन, त्यांना बोरिक पावडर विंâवा एरंडेल तेलाचा पुसट हात लावून, भरून ठेवावे. पाNयाच्या गोळ्या घातल्या, तरी चालतील.

गहू : गहू किमान चार दिवस कडक उन्हात पसरून ठेवावेत. शेवटच्या दिवशी उन्हात गरम असलेले गहू डब्यात भरून झाकण लावावे. 

डाळ : हरभरा व तूर डाळी चार दिवस कडक उन्हात वाळवून डब्यात भराव्यात. उडीद-डाळ दोन दिवस उन्हात वाळवून भरावी.

साबूदाणा : दोन दिवस कडक उन्हात वाळवून भरून ठेवावा.

कडधान्ये : वाल दोन प्रकारचे असतात. हिरवट रंगाचे व तांबूस रंगाचे. वाल निवडून घेऊन दहा-बारा दिवस उन्हात घालावे. पक्ष्यांचा त्रास टाळण्यासाठी कापडात पुरचुंडी बांधून, ती वीस दिवस तरी उन्हात ठेवून द्यावी. त्यानंतर एरंडेल तेलाचा पुसट हात लावून, भरून ठेवावे. हे वाल दोन वर्षेसुद्धा चांगले टिकतात. 

पावटा : वालाचाच एक प्रकार. याचे पांढरे मोठे दाणे असतात. कमी वेळात शिजतात व चवीला गोड असतात. वालांप्रमाणेच वाळवून भरून ठेवावे. 

चवळी : पांढNया रंगाची बारीक व मोठ्या दाण्याची अशी दोन प्रकारात असते. भाजून उसळ व ताक घालून कळण चांगले होते.

मटकी : बारीक व जाड अशी दोन प्रकारात.

मूग : हिरवे व पिवळे अशा दोन प्रकारांत असतात. हिरव्या मुगाची उसळ चवीला जास्त चांगली असते.

मसूर : बारीक व मोठी हे दोन प्रकार. मोठी मसूर चवीला जास्त चांगली. 

हरभरा : हिरवे व पिवळे या दोन प्रकारात असतात.

वाटाणे : हिरवे व पिवळे. वरील सर्व कडधान्ये आठ-दहा दिवस कडक उन्हात वाळवून, एरंडेल तेलाचा
हात फिरवून, भरून ठेवावीत; म्हणजे चांगली टिकतात. 

Friday, 13 December 2013

Invite !!!!


रुचिरा : भाग २

पावभाजी

मसाला साहित्य : एक वाटी मिरे, पाव वाटी लवंगा, पन्नास ग्रॅम दालचिनी, पंचवीस ग्रॅम मसाला वेलची, पन्नास सुक्या मिरच्या, अर्धी वाटी धने, पाऊण वाटी जिरे, दोन चमचे शहाजिरे, दोन चमचे बडीशेप,
तीन चमचे हळद, अर्धा चमचा ओवा.

भाजीचे साहित्य : एक सपाट वाटी लोणी अथवा अमूल बटर, हिरव्या मिरच्या, हळद, खाण्याचा सोडा, एक वाटी चिरलेला फ्लॉवर, एक वाटी बटाट्याची फोडी, एक वाटी चिरलेला कांदा, एक वाटी टोमॅटोच्या फोडी, दोन मोठ्या भोपळी मिरच्यांचे तुकडे, एक वाटी ओले मटार (ओले मटार नसल्यास अर्धी वाटी वाटाणे विंâवा सुके मटार आदल्या दिवशी भिजत घालावे) अर्धा चमचा वाटलेले आले, चवीप्रमाणे साखर व मीठ, पाव वाटी तेल, चिंच.

कृती मसाल्याची : वरील सर्व जिन्नस तेलावर थोडे परतून, कुटून पूड करावी. तयार झालेला मसाला बाटलीत बंद करून ठेवावा. लागेल त्या वेळी जरुरीप्रमाणे भाज्यांच्या प्रमाणात काढून घ्यावा. 
कृती : बटाट्याच्या फोडी वाफवून घ्याव्यात. मटार थोडासा सोडा व मीठ घालून वाफवून घ्यावा. पसरट तव्यावर थोडे तेल टावूâन, त्यावर कांदा व भोपळी मिरचीचे तुकडे परतावेत. नंतर टोमॅटोच्या फोडी, बटाटा, मटार इत्यादी टावूâन परतावे. त्यावर उरलेले तेल व चार-पाच चमचे लोणी अथवा बटर घालावे. हिरव्या
मिरच्यांचे तुकडे, साखर, मीठ, आले इत्यादी जिन्नस टाकावेत व झाNयाने अथवा लाकडी उलथन्याने रगडून घोटावे. घोटताना वरील भाजीला दोन ते तीन चमचे तयार केलेला मसाला टाकावा. रगडताना मधून मधून चिंच कोळून घेतलेल्या पाण्याचा थोडासा हबका मारावा.

पावभाजीसाठी चपटे चौकोनी पाव मिळतात, ते घ्यावेत. त्याला आडवा काप घालावा व उघडून ते तव्यावर लोणी वा बटर घालून परतून घ्यावेत. त्याऐवजी साध्या पावाच्या स्लाईस घेतल्या, तरी चालतील. गरम तव्यावर थोडासा चिरलेला कांदा परतावा. त्यावर लिंबू पिळावे. हा परतलेला कांदा भाजीवर घालावा. 

टीप : ही भाजी तिखट झाली, की चांगली लागते. आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट घालावे.

दही-बटाटा पुरी

साहित्य : पुरीसाठी साहित्य व कृती पाणी-पुरी या पदार्थात दिली आहे. चटणीसाठी साहित्य ४० ते ५० पुNयांना पुरेल, या प्रमाणात खालीलप्रमाणे घ्यावे : दोन वाट्या गोड दही, एक वाटी खजूर, अर्धी वाटी िंचच, अर्धी वाटी मूग वा चणे अगर वाटाणे, अर्धा चमचा गरम मसाला, एक चमचा जिNयाची पूड, लाल तिखट, एक वाटी बारीक शेव, एक वाटी चिरलेली कोथिंबीर, मीठ, साखर, पादेलोण, एक वाटी उकडलेल्या बटाट्याच्या फोडी.

कृती : चिंच व खजूर शिजवून, गाळून घ्यावे. त्यामध्ये जिNयाची पूड, आवडीप्रमाणे पादेलोण, गरम मसाला, आवडीप्रमाणे साखर वा गूळ घालून चटणी करून घ्यावी. दह्यामध्ये चवीप्रमाणे साखर व मीठ घालून घुसळून ठेवावे. चणे, वाटाणे अथवा मूग आदल्या दिवशी भिजवून ठेवावेत. भिजलेले चणे, मूग वा वाटाणे शिजवून घ्यावेत. थाळीमध्ये तयार करून घेतलेल्या सहा ते आठ पुNया ठेवाव्यात. प्रत्येक पुरी फोडून तीत शिजवून घेतलेले कडधान्य, उकडलेल्या बटाट्याच्या चार-सहा बारीक फोडी व खजुराची चटणी घालावी. नंतर त्यावर दही घालून, त्यावर जिNयाची पूड, लाल तिखट पसरून टाकावे. त्यावर बारीक शेव व कोथिंबीर घालावी व लगेच खावयास द्यावे. 

पिझ्झा

साहित्य : दोन वाट्या मैदा, एक चमचा यीस्ट, मीठ, गरम पाणी, चार-पाच टोमॅटो, एक-दोन कांदे, पाव वाटी न्यूडल्स, शंभर ग्रॅम चीझ, सॉस.

कृती : यीस्ट थोड्या पाण्यात विरघळावे. थाळीमध्ये मैदा घेऊन त्यात यीस्टचे पाणी व चवीप्रमाणे मीठ घालून मळावे. जरुरीप्रमाणे पाणी घालून घट्ट गोळा करावा. गोळा खूप मळावा. एका हातात गोळा धरून दुसNया हाताने ओढून लांबवावा; पुन्हा गोळा करून पुन्हा लांबवावा. असे करताना गोळा हलका व लवचीक झाल्याचे
लक्षात येईल. नंतर हा गोळा पोळपाटावर ठेवून, फडक्याने झावूâन उबदार जागी ठेवावा. दोन ते तीन तासांत हा गोळा पुâगून दुप्पट होईल. पोळपाटावर पीठ टावूâन, ह्या गोळ्याच्या पाव इंच जाडीच्या साधारण सहा इंच व्यासाच्या गोल पोळ्या लाटाव्यात. पोळीपेक्षा थोड्या मोठ्या आकाराच्या थाळीत लाटलेली पोळी ठेवावी.
टोमॅटो, कांदा व चीझ यां  पातळ चकत्या काढून त्या पोळीवर पसराव्यात. त्यावर कढीलिंबाच्या पानांच्या चुरा व बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर थोडी पसरून टाकावी. त्यावर वाफवून घेतलेल्या न्यूडल्स थोड्या पसराव्यात व त्यावर सॉस घालावा. ओव्हन सुमारे ८०० सेंटिग्रेडवर गरम करून घ्यावा. तयार केलेल्या
पिझ्झाच्या पोळ्या १००० ते १२५० सेंटिग्रेड तापमानावर ओव्हनमध्ये २० ते २५ मिनिटे भाजाव्यात. इलेक्ट्रिक ओव्हन नसेल, तर घरगुती ओव्हनमध्ये सुद्धा पिझ्झा भाजता येईल. 

Thursday, 12 December 2013

रुचिरा : भाग १

बटाट्याची भाजी : प्रकार १

साहित्य : अर्धा किलो बटाटे, चार-पाच ओल्या मिरच्या, एक चमचा उडदाची डाळ, साखर, मीठ, कढीलिंब, कोथिंबीर, ओले खोबरे, फोडणीचे साहित्य.

कृती : बटाटे उकडून, सोलून फोडी कराव्यात. फोडणी करून त्यात उडदाची डाळ तांबूस होईपर्यंत तळावी व त्यातच कढीलिंब घालून, खाली उतरवून ओल्या मिरच्यांचे तुकडे घालावे आणि त्यावर बटाट्याच्या फोडी घालाव्या. नंतर चवीप्रमाणे मीठ व साखर घालावी व भाजी चांगली परतून दोन वाफा आणाव्या. नंतर खाली
उतरवून ओले खोबरे व कोथिंबीर घालावी. 

या भाजीत ओल्या मिरच्यांऐवजी सुक्या मिरच्याही घालतात. या भाजीत कांदाही घालतात. कांदा चिरून फोडणीत टाकावा. 

बटाट्याची भाजी : प्रकार २
साहित्य : अर्धा किलो बटाटे, ओले अगर सुके खोबरे (किसलेले) पाव वाटी, तिखट, मीठ, साखर, कोथिंबीर, फोडणीचे साहित्य.

कृती : बटाटे सोलून, त्यांचे पातळ काप करून घ्यावेत. थोडे जास्त तेल घालून फोडणी करावी व त्यात बटाट्याचे काप टावूâन खरपूस परतावेत. त्यावर चवीप्रमाणे साखर, मीठ व तिखट घालून, चांगले ढवळून, वर खोबरे व कोथिंबीर घालावी. 

बटाट्याची भाजी : प्रकार ३ (बटाटयाचा रस्सा) 

साहित्य : पाव किलो बटाटे, पाव किलो फ्लॉवर, ओल्या मटाराचे दाणे एक वाटी, दोन मोठे कांदे, दोन पिकलेले टोमॅटो, पाव वाटी खसखस, एक चमचा जिरे, दोन चमचे धने, सुक्या खोबNयाचा कीस अर्धी वाटी, दोन लवंगा, दोन मिरे, दालचिनीचे एक इंचाचे दोन तुकडे, एक इंच आल्याचा तुकडा, लसणीच्या पाकळ्या चार-पाच, ओले खोबरे, कोथिंबीर, फोडणीचे साहित्य. 

कृती : बटाटे उकडून, सोलून फोडी कराव्या. फ्लॉवर चिरून घ्यावा. कांदे बारीक चिरावे. सुके खोबरे, धने, जिरे, लवंगा, दालचिनी, मिरे हे सर्व भाजून घेऊन वाटावे अगर बारीक कुटावे. पाणी घालून खसखस व आले व लसूण निरनिराळी वाटावीत. तेलावर कांदा परतून घ्यावा. फोडणी करून, त्यात मटाराचे दाणे घालून एक वाफ आणावी. नंतर त्यात बटाट्याच्या फोडी, फ्लॉवर व कांदा घालून, रस पाहिजे असेल, त्या प्रमाणात पाणी घालावे व उकळी आणावी. उकळी आल्यानंतर त्यात टोमॅटोच्या फोडी घालाव्या व कुटलेला अगर वाटलेला सर्व मसाला, वाटलेली खसखस, आले व लसूण घालावी व चवीप्रमाणे मीठ व गूळ घालून भाजी चांगली शिजवावी. शिजल्यानंतर वर कोथिंबीर व खोबरे घालावे.

कांद्याची भाजी : प्रकार १

साहित्य : अर्धा किलो कांदे, एक चमचा तिखट, चवीप्रमाणे मीठ, गोडा मसाला, सुपारीएवढी चिंच, मोठ्या लिंबाएवढा गूळ, पाव वाटी शेंगदाण्याचे वूâट, सुक्या खोबNयाचा कीस अर्धी वाटी, फोडणीचे साहित्य.

कृती : कांद्याच्या उभ्या फोडी कराव्या. फोडणी करून, त्यावर कांद्याच्या फोडी टाकाव्या व चांगली वाफ आणावी. एक वाटी पाणी घालावे. नंतर त्यात तिखट, मीठ, गोडा मसाला, गूळ व चिंचेचे पाणी घालावे व तसेच दाण्याचे वूâट, तिळाचे वूâट व खोबNयाचा कीस (भाजून) घालावा. नंतर भाजी चांगली शिजवावी.

टीप : भरल्या वांग्यांप्रमाणे भरल्या कांद्याचीही भाजी वरील मसाला घालूनच चांगली होते. मुंबईकडे मद्रासी कांदे मिळतात. ते आकाराने अगदी लहान असतात व जरा तिखटही असतात. त्या कांद्यांची भाजी वरीलप्रमाणे केल्यास जास्त चांगली लागते.

कांद्याची भाजी : प्रकार २ (पीठ पेरून)

साहित्य : अर्धा किलो कांदे, एक ते दीड वाटी चण्याचे पीठ, दोन चमचे तिखट, चवीप्रमाणे मीठ, आवडत असल्यास थोडी साखर, फोडणीचे साहित्य.

कृती : कांदा बारीक चिरून घ्यावा. जरा जास्त तेल घालून फोडणी करावी. नंतर त्यात चिरलेला कांदा टावूâन चांगली वाफ आणावी. नंतर त्यात तिखट, मीठ व आवडत असल्यास साखर घालावी. नंतर भाजी चांगली ढवळून, त्यावर चण्याचे पीठ घालून, भाजी परतावी व चांगली वाफ आणावी.

टीप : या कांद्याच्या भाजीप्रमाणेच कोबी, फ्लॉवर, दुधीभोपळा, पडवळ, नवलकोल, भोंग्या मिरच्या, घोसावळे (गिलकी), हदग्याची पुâले वगैरे भाज्या पीठ पेरून करतात व त्या चांगल्या होतात.

Wednesday, 11 December 2013

गप्पागोष्टी

ड्रॉइंग मास्तरांचा तास

इतिहासाचे मास्तर रजेवर होते. वर्ग रिकामाच होता. घंटा होऊन पाच मिनिटे झाली तरी कोणी आले नाही, हे पाहून आम्हाला बरे वाटले. आता कोणी गुरुजी येत नाहीत, हे नक्की. झकास झाले! तीनचार तास अभ्यास करून हातांची बोटे दुखायला लागली होती. वंâटाळा आला होता. आता एवढा तास झाला म्हणजे मधली सुट्टीच. पोटात खड्डा पडला होता. 

केव्हा एकदा मधली सुट्टी होते आणि डबा खातो असे झाले होते. पिशवीतल्या डब्याकडे एकसारखे लक्ष जात होते आणि मनाला त्रास होत होता. हा एवढा तास... एवढा तास संपला म्हणजे िंजकली. थोडी कळ काढायला पाहिजे...

आम्ही असा विचार करीत होतो आणि गुरुजींची वाट पाहत होतो; पण कोणी आले नाही. घंटा होऊन पाच मिनिटे झाली. याबरोबर सगळीकडे आनंदीआनंद पसरला. पिशवीतला डबा काढून मी तो एकदम उघडून पाहिला. त्यातले एक कडबोळे तोंडात टाकले. दुसNयाने काही उद्योग नसल्यामुळे बाक वाजवायला सुरुवात केली. कुणी शेजारच्या पोराच्या पाठीत धपाटा घातला. कुणी मॉनिटरला वेडावून दाखवले. दोघा-चौघांनी बाकावर उभे राहून उड्या मारल्या आणि टांगत्या दिव्याला हात लावण्याचा प्रयत्न केला. एकाने `इय' म्हटल्यावर दुसNयाने `हुई' केले. हळूहळू वर्गात चांगलाच गोंधळ माजला. कडबोळे खाता-खाताच माझे समोर
लक्ष गेले. डाव्या बाकावरचा वामन्या देशपांडे तोंडात पोqन्सल घालून तोंड वाजवीत होता.

त्याच्या खाकी पँटमधून लंगोटीचे टोक बाहेर लोंबत होते. वामन्या लेकाचा बावळटच आहे. नेहमी लंगोट्या घालून येतो आणि मारुतीसारखा शेपटी लांबवून बसतो. मला तर इतके हसू येते म्हणता!... हळूच मी उठलो आणि हात पुढे करून त्याची लंगोटी ओढली.

त्याबरोबर वामन्या ओरडला आणि त्याची सबंध लंगोटी माझ्या हातात आली. सगळा वर्ग खो-खो करून हसू लागला. वामन्याचे तोंड गोरेगोमटे झाले. कुणी तरी मोठ्यांदा ओरडले, ``बजरंगबली की जय!'' ``वामन्या, शेपूटऽऽ' वामन्या रडवुंâडीला येऊन म्हणाला, ``देतोस का नाहीस माझी लंगोटी? बघ हं, नाही तर –''

``नाहीतर काय करशील?'' मी त्याच्यापुढे लंगोटी नाचवली.

``गुरुजींना सांगेन.''

– असे म्हणून त्याने लंगोटीचे एक टोक धरले आणि ओढले. मग मीही जोरात ओढले. आमची दोघांची रस्सीखेच सुरू झाली. बाकीच्या मुलांनी टाळ्या वाजवून या गोष्टीचे स्वागत केले. ह्यामुळे मला भलताच जोर आला. मारामारी करण्याच्या नादात मुले टाळ्या वाजवायची थांबली, हे माझ्या लक्षात आले नाही. जिकडे  कडे
एकदम शांतता पसरली. भोवताली गोळा झालेले पळत-पळत आपापल्या जागेवर पटापट जाऊन बसले; पण माझे लक्षच नव्हते. काही तरी धोका असल्यासारखे एकाएकी वाटले, म्हणून मी लंगोटी ओढता-ओढता एकदम समोर पाहिले. 

बापरे!

समोर आमचे ड्रॉइंगचे मास्तर टेबलापाशी उभे होते.

त्याबरोबर मी हातातली लंगोटी एकदम सोडून दिली. वामन्या एकदम पाठीमागे कोसळला. त्याचे टाळके शेजारच्या बंडूच्या टाळक्यावर ठाण्दिशी आदळले. दोघेही मोठ्यांदा ओरडले.

घाईघाईने मी खाली बसण्याच्या बेतात होतो. तेवढ्यात ड्रॉइंग मास्तरांनी मला जवळ बोलावले. भीत-भीत मी जागा सोडली. टेबलाच्या दिशेने हलके-हलके प्रवास सुरू केला.

``अरे, लवकर ये ना गाढवा! चालता येत नाही का तुला?'' ड्रॉइंग मास्तर ओरडले. मग ते स्वत:च माझ्याजवळ आले, माझा हात धरला. 

``काय चाललं होतं?''

``काही नाही, सर. हा वामन्या आहे ना, तो म्हणाला माझी लंगोटी तर बघ किती जाम आहे. अजिबात फाटत नाही. म्हणून मी ओढली.'' मी नम्रपणाने उत्तर दिले. 

``नाही सर, यानं उगीच माझी लंगोटी ओढली.'' वामन्या डोक्याला हात लावून म्हणाला, ``मी काही म्हणालो नव्हतो, सर –'' ``होय का?''

असे म्हणून सरांनी माझ्या पाठीत एक गुद्दा चढवला. पाठ चोळीत-चोळीत मी विचारले, ``पण सर –''
``काय?'' ``आत्ता इतिहासाचा तास आहे, सर. ड्रॉइंगचा नाहीये.'' ``ते ठाऊक आहे मला. डोंगरेगुरुजी रजेवर आहेत, म्हणून मी आलोय.''

बोलण्याच्या नादात सरांनी माझा हात सोडला. मी पळत-पळत जागा गाठली. टाळ्या वाजवल्या.

``छान झालं सर, तुम्ही तासावर आलात. आता ड्रॉइंग घ्या, सर; इतिहास नको.'' 

माझी ही सूचना ऐकल्यावर वर्गात जरा खळबळ माजली. सगळेच बोलू लागले. सरांना सूचना करू लागले. कुणी गोष्ट सांगण्याची सूचना केली, कुणी वादनाची पेटी आणण्याबद्दल ओरडून सांगितले, तर कुणी स्वस्थ बसून सगळ्यांनी विश्रांती घेणे इष्ट असल्याचा अभिप्राय व्यक्त केला; पण इतिहास नको याबद्दल सगळ्यांचे एकमत दिसले. 

टेबलावर हात आपटून मास्तरांनी वर्गात शांतता स्थापन केली. मग ते नाक उडवीत खुर्चीत बसले. थोडा वेळ विचार केल्यावर ते रागीट मुद्रेने म्हणाले, ``आता तास इतिहासाचा आहे ना?'' 

Tuesday, 10 December 2013

बेंडबाजा

जाऊ मी सिनेमात?

शाळकरी वयात सिनेमाचे आकर्षण फार मोठे होते. त्या काळात करमणुकीची इतर साधनेही फारशी नव्हतीच म्हणा. आमच्या पंढरपूरसारख्या तालुक्याच्या लहान गावी तर त्या दृष्टीने खडखडाटच. म्हणून सिनेमाचे माहात्म्य फार! कुठलाही सिनेमा हा निदान एकदा तरी पाहण्यासारखा असतोच असे माझे नम्र मत होते. म्हणून कधी सनदशीर मार्गाने वडिलांकडून पैसे घेऊन मी सिनेमा पाहत असे, तर कधी क्रांतिकारकाच्या वाटेने जाऊन गुपचूप आपले ईाqप्सत साध्य करून घेत असे. घरातली रद्दी परस्पर विवूâन त्यातून एखादा सिनेमा बाहेर काढायचा, हा त्यातलाच एक धाडसी मार्ग. डोअरकीपरची ओळख वाढवून त्याच्या वशिल्याने आत घुसणे हा दुसरा मार्ग; मात्र तो फारसा यशस्वी होत नसे. 

मध्यांतरानंतर पुष्कळदा डोअरकीपर हा प्राणी पास न बघता सर्वांना आत सोडी. त्याचा उपयोग करून हातात पांढरा कपटा ठेवून संभावितपणे आत शिरणे ही आणखी एक चोरवाट. अशा वेळी निम्माच सिनेमा पदरात
पडे. निम्मा तर निम्मा! सर्वनाशाची वेळ आली असता शहाणी माणसे अध्र्यावरच समाधान मानतात आणि अर्धा वाटा सोडून देतात, हे संस्कृत वचन मी पुढे शिकलो, पण तो धडा प्रत्यक्षात मात्र मी पूर्वीच गिरवला होता. सिनेमा पाहण्याच्या या वेडामुळे आपण पुढे सिनेमात जावे, ही महत्त्वाकांक्षा मनात निर्माण होणे हे अगदी
अपरिहार्य होते. सिनेमात काम करणारी माणसे प्रत्यक्ष पाहायला मिळत नसत, त्यामुळे त्यांच्याबद्दलचे कुतूहल फारच मोठे होते. माझ्या लहानपणी आमच्या घराच्या शेजारच्या माडीवरच सुप्रसिद्ध अभिनेत्री शांता आपटे राहत असत. त्या तेव्हा फार सुप्रसिद्ध नव्हत्या, पण तरी त्यांचे नाव लोकांना ठाऊक झाले होते. मला
वाटते भालजी पेंढारकरांच्याच `श्यामसुंदर' या चित्रपटात त्यांनी राधेचे काम केले होते. त्यावेळी त्या गाणे शिकण्यासाठी पंढरपूरला राहिल्या होत्या. कधीतरी त्या रस्त्याकडेच्या सज्जात उभ्या राहिलेल्या दिसत. मी अशा वेळी तोंडाचा `आ' करून अत्यंत आश्चर्यचकित मुद्रेने त्यांच्याकडे पाहत राही. सिनेमात काम करणारी माणसे प्रत्यक्ष पाहिली याचा आनंद काही वेगळाच होता. अशा वेळी आपणही सिनेमात जाऊन काम करावे ही आकांक्षा पुन्हा उफाळून वर येई. चित्रपटात काम करण्यासाठी काही पात्रता लागते, ती आपल्याजवळ आहे की नाही असला फालतू विचार तेव्हा कधी डोक्यात आलाच नाही. त्या लोकांना योगायोगाने चान्स मिळाला. आपल्यालाही तसाच कधीतरी `चान्स' मिळाला पाहिजे, एवढेच पक्केपणाने वाटायचे.

आपल्याकडे फार मजा आहे. कुठल्याही व्यवसायात शिरण्यासाठी काही पात्रता असावी लागते असल्या शंका-कुशंका कधी कुणाला येतच नाहीत. ``चान्स मिळाला पाहिजे, बस्स.'' एखादे चिरंजीव उनाड निघाले की, त्याचे तीर्थरूप काळजीत पडतात. या पोराचे पुढे होणार तरी कसे? मग कधीतरी हा बाप आपल्या मित्राला ही व्यथा सांगतो. ``बाबुराव, आता तुम्हीच सांगा. हा आमचा बंडू अगदीच वाया गेलाय! दोन वेळा जेवायला फक्त घरी येतो बघा. एरवी दिवसभर उनाडक्या करीतिं हडतो. अभ्यास नाही, शाळा नाही. काही नाही. 

कार्टं अगदी वाया गेलंय. काय करावं तुम्हीच सांगा मला–'' हे बाबुराव गंभीर चेहरा करून सांगतात, ``असं म्हणता गणपतराव? बंड्या अगदी वाया गेलाय?'' ``अगदी नालायक कार्टं आहे हो! सांगतोय काय मग!'' ``मग असं करा!''

``काय करू?''

``तुम्ही त्याला पोलिसात घाला. नाहीतर जाऊ द्या एकदम मिलिट्रीत– हाण

तिच्या मारी–''

म्हणजे पोलीस खात्यात िंकवा मिलिटरीत जाण्याची पात्रता आमच्या दृष्टीने ही आहे. उमेदवार गडी शक्यतो उनाड, नालायक असला पाहिजे. सिनेमात जाण्यासंबंधीही आमच्या कल्पना अशाच विलक्षण आहेत. आमच्या एका दिग्दर्शक मित्रानेच सांगितलेला अनुभव या दृष्टीने रोमहर्षक आहे. तो म्हणाला, ``अरे, आमचं
एका स्टुडिओत चित्रीकरण चाललं होतं. मधल्या जेवणाची वेळ. ऑफिसच्या आतल्या खोलीत आम्ही एक-दोघे डबे उघडून जेवायला बसलो होतो. चार घास खाल्ले असतील नसतील, तेवढ्यात एक म्हातारबुवा आपल्या चिरंजीवांना घेऊन सरळ आत घुसले. `आत येऊ का?'– वगैरे परवानगी मागण्याची भानगड नाही. 

आले ते आले आणि जोरात म्हणाले, `का हो, तुम्हीच का या सिनेमाचे डायेक्टर?'

मी म्हणालो, `हो, मीच. काय काम आहे?'

आपल्या सतरा-अठरा वर्षांच्या पोराला त्यांनी एकदम पुढे ढकलले. मग आज्ञार्थी सूर काढून पुन्हा जोरात म्हणाले, `या आमच्या मुलाला तुमच्या सिनेमात घ्या.'

मी त्या मुलाकडे निरखून पाहिले. काटकुळा, उंच पोरगा, करकोच्यासारखी मान वर आलेली, डोळ्यांना चष्मा, गालफडं वर आलेली. एवूâण आनंदच होता, पण शक्य तेवढी शांत मुद्रा ठेवून मी विचारलं, `काय शिकलाय हा?' 

`काही शिकलेला नाही. दरवर्षी नापास. नववीतच शाळा सोडलीय काट्र्यानं.' म्हातारबुवा बोलले.

`ते असू द्या, पण याचा आवाज वगैरे चांगला आहे? गाणं?–'

`कसला आवाज?' म्हातारबुवा उसळलेच. `अहो मुसळ घशात कोंबावं तसला आवाज आहे. कुठलं गाणं अन् काय?–'

`मग अभिनय वगैरे? शाळेतल्या नाटकात काम वगैरे?–'

`छट्! अभिनय कसला आलाय बोडक्याचा!'

`मग याला येतं तरी काय?'

`काहीही येत नाही–' म्हातारा गरजलाच. `अगदी नालायक आहे कार्टं. वाया गेलंय म्हणा ना! म्हणून तर म्हणतो तुमच्या सिनेमात घ्या.' ''

दिग्दर्शक मित्राने सांगितलेली ही सत्यकथा ऐवूâन माझी दातखीळच बसली. सिनेमात जाण्याची आमच्याकडं एवूâण ही लायकी! 

सिनेमात गेलं की दाबून पैसा मिळतो, सगळीकडे आपला बोलबाला होतो, कीर्ती वगैरे म्हणतात ती मिळते, एवढीच आमची सिनेमासंबंधी कल्पना. त्यातून सुंदर नटीबरोबर गुलुगुलु गोष्टी करायला मिळतात, तिचा हात हातात घ्यायला मिळतो आणि जमलेच तर एखाद्या दृश्यात अंग भरून मिठीही मारता येते. मग आणखी काय पाहिजे? `काम का काम और इनाम!' चित्रपटसृष्टीत शिरणाNयालाही खूप कष्ट करावे लागतात. दिवस-रात्र राबावे लागते. प्रखर प्रकाशात काम करून करून आरोग्याची हानी होते. अवजड आणि चित्रविचित्र पोशाख, दागदागिने घालून दिवसभर दाढीमिशा िंडकाने चिकटवून, रंगरंगोटी करून बसावे लागते याची काहीच
कल्पना `जाऊ मी सिनेमात?' म्हणणाNयांना नसते. पुढे लेखक म्हणून चित्रपटाशी संबंध आल्यावर मलाही पुष्कळ गोष्टी नव्याने कळल्या. योगायोगाने एक-दोन चित्रपटांत काम करण्याचाही `चान्स' मिळाला. एका चित्रपटात मंगल कार्यालयात परगावहून आल्यामुळे हातात एक ट्रंक घेऊन, जिना चढून मी बायकोबरोबर माडीवर जातो हा सीन होता. ट्रंकेत सामान आहे हे दाखवण्यासाठी ट्रंकेत मोठे चार-दोन दगड भरलेले, त्यामुळे ट्रंक भलतीच जड. ती उचलून जिना चढताना काही संवाद. 

यातले काहीतरी चुकायचे आणि पुन्हा तालीम व्हायची. पुन्हा `रीटेक' व्हायचा. असा प्रकार चार-दोन वेळा झाल्यावर माझी दमछाक झाली. कुठून आपण या पंâदात पडलो असे मला होऊन गेले. दुसNया एका दृश्यात कार्यालयात सगळे पाहुणे पांघरूण घेऊन झोपलेले आहेत याचे चित्रीकरण. तेही नीट झाले नाही. माझे काम
फक्त झोपण्याचे, पण ते करून करून– म्हणजे झोपून झोपून– वैताग आला, पण त्याचे चित्रीकरण नीट होईपर्यंत सक्तीने झोपावेच लागले. अहो, या तर अगदी किरकोळ गोष्टी. काहींच्या वाट्याला मोठे अपघात येतात. जन्माचे पंगुत्व येते, पण आम्हाला त्याची दादही नसते. पडद्यावरच्या मादक, सुंदर दृश्यांना आपण भुलत असतो.

Monday, 9 December 2013

मीरेच्या प्रेमतीर्थावर

स्वागत आहे! आपण ह्या प्रेमाच्या सरोवरात नौकाविहार करू. असं सरोवर मनुष्याच्या इतिहासात नाही, जसं मीराचं सरोवर आहे. मानसरोवरसुद्धा इतवंâ स्वच्छ नाही.

आणि ह्या मीराच्या सरोवरात जर विहार करायचा असेल तर हंसाची गती हवी. हंस बनू शकणार असाल, तरच ह्या सरोवरात उतरा. हंस झाल्याशिवाय ह्या सरोवरात उतरता येणार नाही.

आणि हंस व्हायचं म्हणजे नक्की काय व्हायचं? 

हंस व्हायचा अर्थ असा, की मोती ओळखण्याची नजर हवी. मोती मिळवण्याची आकांक्षा, अभिलाषा हृदयात हवी. हंस फक्त मोतीच टिपतो.

बाकी कुठल्या गोष्टींना मान्यता देऊ नका. जे क्षुद्र आहे, कमी दर्जाचं आहे, ते मान्य केलंत तर जे विराट आहे, सृष्टी व्यापून उरलं आहे ते मिळवण्यासाठी असमर्थ होऊन जाल. नदी-नाल्याचं पाणी प्राशन करून जे तृप्त होतात, ते मानसरोवरापर्यंत पोहोचू शकत नाहीत. आणि तिथपर्यंत पोहोचण्याची त्यांना आवश्यकताही वाटत
नाही. मीराच्या ह्या मानसरोवरात मी तुम्हाला आमंत्रण देतो. मीरा नौका बनू शकते. मीराचे शब्द तुम्हाला बुडू देणार नाहीत, वाचवतील. त्या शब्दांच्या मदतीने तुम्ही पार पोहोचू शकाल.

मीरा तीर्थ आहे. तिचं शाध्Eा प्रेमाचं आहे. ह्याला ‘शाध्Eा’ म्हणणं कदाचित अयोग्य ठरेल.

नारदाने भाqक्तसूत्रं सांगितली, ती शाध्Eा होती. तिथे तर्वâ आहे, एक व्यवस्था आहे. सूत्रबद्धता आहे. तिथे भक्तीचं दर्शन आहे.

मीरा स्वत:च भक्ती आहे. म्हणूनच तुम्ही एका नियमाप्रमाणे, बद्धतेप्रमाणे तर्वâ करून काही मिळवू शकणार नाही. एक साचेबंद, एक पठडी तुम्हाला मिळत नाही. तिथे तर हृदयात सळसळणारी, झळाळती वीज आहे. जे आपलं घर जाळू शकतात, त्यासाठी तयार आहेत, त्यांनाच, आणि त्यांचाच संबंध मीराशी जुळू शकतो.
प्रेमाशी संबंध जुळतो, तो फक्त अशांचाच, जे विचार-आचार विसरू शकतात, हरवू शकतात, जे वेळप्रसंगी शीर तुटलं तरी पर्वा करत नाहीत. उलट शीर तोडण्यासाठी उत्सुक असतात. हे भक्तीचं मूल्य आहे. काही संपूर्णपणे मिळवायचं तर संपूर्णपणे काही द्यावंही लागतं, तसं. जे हे मूल्य देऊ शकत नाहीत ते फक्त भक्तीबद्दल विचारतात, आणि विचार करतात, पण ते भक्त होऊ शकत नाहीत. म्हणूनच मीराच्या शाध्Eााला शाध्Eा म्हणणं योग्य नाही. शाध्Eा कमी आणि संगीत जास्त. पण संगीतच तर भक्तीचं शाध्Eा होऊ शकतं. जसं तर्वâ हे ज्ञानाचं शाध्Eा होऊ शकतं, तसंच संगीत भक्तीचं शाध्Eा होऊ शकतं. गणित जसं ज्ञानाचा
आधार, तसं काव्य हे भक्तीचा आधार. ज्ञानी माणूस नेहमी सत्य शोधत राहतो. भक्त सत्य शोधत फिरत नाही, तो सौंदर्य शोधतो. भक्तासाठी सौंदर्य हेच सत्य आहे. ज्ञानी म्हणतो– `सत्य सुंदर आहे.' भक्त म्हणतो, `सौंदर्य हेच सत्य आहे.'

रवींद्रनाथजींनी म्हटलंय, ब्युटी इज ट्रूथ. सौंदर्य सत्य आहे. रवींद्रनाथजींकडेही तसंच हृदय आहे जसं मीराकडे. पण रवींद्रनाथ पुरुष आहेत. ते द्रवत राहतील, द्रवत राहतील पण तरीही पुरुषांच्या अडचणी ज्या असतात त्या राहतातच. मीरासारखे नाही द्रवू शकत. खूप द्रवले. एक पुरुष जितका द्रवू शकतो अगदी तितके; तरी पण मीरा सारखे नाही द्रवू शकले. मीरा ध्Eाी आहे. ध्Eाीसाठी भक्ती साधी, सोपी आहे. पुरुषांसाठी जसे तर्वâ-विचार साधे सोपे आहेत.

वैज्ञानिक म्हणतात, मनुष्याचा मेंदू दोन भागात विभाजन केला गेला आहे. डाव्या मेंदूच्या भागात विचार, गणित, तर्वâ, नियम असे सर्व जणू काही साखळीने बांधल्यासारखे आहेत. आणि उजव्या मेंदूच्या भागात काही विचार नाहीत. तिथे आहेत भाव-भावना, अनुभव, अनुभूती. तिथे संगीत जखमा करतं, गुंजतं, हेलावून
सोडतं. तिथे तर्वâ प्रभावित होत नाही. तिथे लय, ताल पोहोचतो. तिथे नृत्य पोहोचतं, सिद्धांत नाही.
ध्Eाी नेहमी उजव्या मेंदूने जगते आणि पुरुष नेहमी डाव्या. आणि त्यामुळे ध्Eाी आणि पुरुष ह्यांच्यात संवाद होणं कठीण जातं. त्यांची मतं जुळणं कठीण पडतं. पुरुष काही बोलतो आणि ध्Eाी काही वेगळं बोलते. पुरुषाची विचार करण्याची प्रक्रिया वेगळी आणि ध्Eाीची वेगळी. त्यांचा ढंग वेगवेगळा. ध्Eाी विचार करून मुद्देसूद वागत, बोलत नाही. सरळ एक टोक गाठते. निष्कर्षावर पोहोचते. पण पुरुषाचं तसं
प्रेमाच्या सरोवरात नौकाविहार होत नाही. तो एक एक मुद्दा विचारात घेतो, क्रमाक्रमाने जातो आणि नंतर
निष्कर्षापर्यंत पोहोचतो. 

प्रेमात हे असं काही नसतं. क्रम नसतो, मुद्दा नसतो. प्रेमाचा काय क्रम आणि कुठला मुद्दा! बस्स, ते फक्त होतं, झळाळत्या विजेसारखं. झालं की झालं. आणि जर झालं नाही, तर होण्यासाठी कुठलाही उपाय नाही.
पुरुषांनी भाqक्तगीतं रचली, गायली; पण मीराशी तुलना होऊ शकत नाही त्यांची. कारण मीरासाठी, ती ध्Eाी असल्याने जे अगदी सहज आहे, तेच कारण पुरुषांसाठी आरोपित असं आहे. पुरुष भक्त झाले, ज्यांनी स्वत:ला परमात्म्याची प्रेमिका मानलं, पत्नी मानलं. तरीही ते मानणं जरा अडचणीचं. अशा भक्तांचा
संप्रदाय आहे. बंगालमध्ये असे पुरुष आजही आहेत, जे स्वत: पुरुष असूनही स्वत:ला कृष्णाची पत्नी मानतात. रात्र झाली की ध्Eाी करते तसा शृंगार करतात आणि कृष्णाच्या मूर्तीला छातीशी धरून झोपी जातात. पण ह्या अशा गोष्टींमध्ये एक तNहेचं वेडेपण दिसतं. ही गोष्ट सर्वसामान्यजण मान्य करू शकत नाहीत. जमतच
नाही ही गोष्ट. हे असलं वेडेपण तेव्हाही वाटतं, जेव्हा तुम्ही, जी गोष्ट जिथे असायला नको, तिथे जबरदस्तीने लादता, प्रयत्न करता त्या गोष्टीला नको असणाNया जागी बसवण्याचा, तेव्हा.

पुरुष हा पुरुषच आहे. त्यासाठी ध्Eाी होणं हे ढोंग आहे. आतून तर त्यालाही माहीत असतं की तो पुरुष आहे. वरून तुम्ही ध्Eाीचे कपडे घाला, दागिने घाला, कृष्णाच्या मूर्तीला हृदयाशी कवटाळून बसा, पण म्हणून तुम्ही तुमच्या आतल्या पुरुषाला इतक्या सहजतेने विसरू शकणार नाही. हरवू शकणार नाही. हे सहजी होणं शक्य नाही.

ाqध्Eायाही झाल्या आहेत अशा, ज्यांनी भाqक्तमार्ग सोडून पुरुषांप्रमाणे ज्ञानमार्गा qस्वकारला. पण इथेही गोष्टी अगदी वेगळ्या थराला गेल्या. वेड्यासारख्या. जसं हे पुरुष वेडे वाटतात आणि विचार येतो की हे काय करताहेत? वेडे तर झाले नाहीयेत ना? अशीच एक वेडी घटना कााqश्मरमधे घडली. एक ध्Eाी महावीरच्या विचारांसारखी विचार करू लागली. तिने वध्Eा पेâवूâन दिलं, नग्न झाली. हे वेडेपण! जे शोभा देत नाही. हिला
`ओशो' `लल्ला' म्हणतात. लल्लामधे पण न शोभणारं असं काही आहे. ध्Eाी स्वत:ला लपवते आणि हे अगदी साहजिक आहे. हेच तर ध्Eाीचं खरं रूप– लज्जा आहे. ती स्वत:ला उधळून देत नाही, उघडत नाही. तसं जर तिने केलं तर ती वेश्या होते.

लल्लाने िंहमत दाखवली आणि अंगावरचं वध्Eा पेâवूâन दिलं. ती असाधारण ध्Eाी झाली. ही गोष्ट स्वाभाविक वाटत नाही. पण महावीरांसाठी नग्न होणं, आणि समाजापुढे तसं वावरणं हे अस्वाभाविक नाही वाटत, उलट स्वाभाविक वाटतं. हा फरक आहे. मीरामधे भक्तीची भावना इतकी सहजतेनं झाली आहे, तशी कुठेच नाही. भक्त तर खूप झाले, पण सगळेजण मीरापेक्षा खूप मागे राहिले, मीरा खूप पुढे निघून आली ह्या भक्तीमार्गात. मीरा ही तर झगमगता तारा. आपण सर्वजण या. ह्या ताNयापर्यंत चालू या. मीराच्या ह्या मधुर भाqक्तरसाचे दोन चार थेंब जरी िंशपडले गेले, जीवनात बरसले तरी तुमच्या वाळवंटात पुâलं उगवतील. जर तुमच्या हृदयात थोडे जरी तसेच अश्रू पाझरले, जसे मीराच्या हृदयात पाझरले, आणि जर तुमच्या हृदयात थोडंसं राग-संगीत छेडलं गेलं, जसं मीराच्या हृदयात छेडलं, जरासं, थोडंसं का होईना, एक थेंब का असेना, तो एक थेंब तुम्हाला रंगवून टाकेल, नवीन करेल, ताजं, तृप्त करेल.


Saturday, 7 December 2013

"Parigh" Book Publishing Ceremony 7th December 2013

The morning of 7th December 2013 brought the wave of admiration and literary high for the readers of Mehta Publishing House, Pune as we organized the book publishing ceremony of "Parigh" Authored by renowned philanthropist Mrs. Sudha Murthy, translated into Marathi by Mrs. Uma Kulkarni. 

The event organized by the staff of Mehta Publishing House at Kesariwada, Pune saw a huge turnout of the crowd comprising of readers from all age groups. While Mrs. Murthy was happy to rate "Parigh" as her best book till date and left the audiences spellbound with the instant wit and humor, Mrs. Veena Dev was special while talking about the book at length as a reader. 

In all, it was an event to remember for many days to come while Mehta Publishing House promises to bestow with many such events in the near future as well as a treat to their readers.